Failed to fetch language order
Failed to fetch language order
या तारखेपासून दहावी - बारावी परीक्षा
5 Posts • 318 views
#📅दहावी-बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर📢 दहावी बारावीच्या परीक्षेच्या तारखा ठरल्या, पाहा कधी होणार परीक्षा दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर झाले आहे. बारावीची परीक्षा दि. ११फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा दि. २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. तसेच दोन्ही परीक्षा नियोजित तारखांपेक्षा दहा दिवस अगोदर होणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाने बारावी व दहावीचे अंतरिम वेळापत्रक जाहीर केले होते. वेळापत्रकावर नोंदविण्यात आलेल्या हरकती व सूचनांचा विचार करून वेळापत्रक पुन्हा सादर करण्यात आले. बारावीची परीक्षा दि. ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत तर दहावीची परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते दि. १७ मार्च या कालावधीत होत आहे. बारावीची प्रात्याक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्याक्षिक परीक्षा या दि.२४ जानेवारी ते दि. १० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत. दहावीच्या प्रात्याक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि. ३ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडील छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #दहावी, बारावी परीक्षा #या तारखेपासून दहावी - बारावी परीक्षा #दहावी बारावी परीक्षा वेळापत्रक
19 likes
44 shares