3️⃣5️⃣8️⃣♈🕯️⤴️🅰️Y
939 views • 5 months ago
#शिवराज्य अभिषेक सोहळा #🙏प्रेरणादायक / सुविचार #🌹प्रेमरंग #🚩शिवराय . शिवरायांचा राज्याभिषेक ही आशिया खंडातील अद्भुत घटना आहे. सम्राट अशोकाच्या नंतर कुणबी, कुरवाडी, रयत मराठा आणि सर्व धर्मांतील अलुतेदार, बलुतेदार, दलीत, आदिवासी, भटके विमुक्त आणि स्त्रिया यांना काळजा प्रमाणे जपणारा राजा शिवाजी सर्वांना प्राण प्रिय होता. पण काही धर्ममार्तंड उच्यजातीय ब्राह्मण आणि दिल्लीस्वारांच्या इशाऱ्यावर चालणारे सरंजामदार त्यांना राजा मानायला तयार नव्हते. म्हणून राज्याभिषेकाची गरज निर्माण झाली.
याच राज्याभिषेकामुळे राजे शिवराय छ. शिवाजी राजे बनले. त्यामुळेच त्यांना शूद्र म्हणून हिणवणाऱ्या आणि त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्यांना छत्रपतींची आज्ञापत्रे मान्य करावी लागली. आशिया खंडातील धर्ममार्तंडांच्या मनुस्मृतीला शरण गेलेल्या मोंगलासकट सर्व राजे आणि दिल्लीस्वाराना ही चपराक होती.
राजांचा राज्याभिषेक राजधानी रायगड येथे भव्यदिव्य स्वरूपात साजरा झाला. राजमाता जिजाऊ, युवराज संभाजीराजे यांच्या सह भारत वर्षातील अनेक राजे आणि इंग्रज, डच, फ्रेन्च इत्यादी प्रतिनिधि उपस्थित असलेल्या सोहळ्याचे संयोजन काशीचे विद्वान पंडीत गागाभट्ट यांनी केले.
राज्याभिषेकाची तिथी जेष्ठ.शुद्ध. त्रयोदशी शके १५९६. असली तरी ग्रेग्रियन कॅलेंडर प्रमाणे राज्याभिषेक शनिवार तारीख ६जुन १६७४ रोजी झाला. ज्या काही मंडळींनी राजांच्या जन्मजातिवरून त्यांना शूद्र म्हणून राज्याभिषेकाला विरोध केला, त्यातीलच काहीं मंडळी इंग्रजांच्या नावाखाली ग्रेग्रियन कॅलेंडर पुढे करुन पुन्हा विरोध करीत आहेत. छ. शिवरायांचे तत्व आणि राज्यकारभाराची रीत, त्यांचे शौर्य आणि धुरीनत्व याचा सर्व जगभर स्वीकार होत असताना पुन्हा धर्म आणि संस्कृतीच्या माध्यमातून त्याच्यावर मर्यादा घालण्याचे मनसुभे रचले जात आहेत. अश्यावेळी आपण सर्व शिवशंभू प्रेमींनी संघटित पणे हा कावा हाणून पाडून शिवरायांच्या शोर्याचा झंजावात सर्व जगभर घेवून जाण्यासाठी प्रयत्न करुया.
- *६ जून रोजी राज्याभिषेक सोहळा हा गावागावात, घराघरात, ऑफिसात जिथ जिथं शक्य असेल तिथं प्रतिमा किंवा पुतळ्याला अभिवादन करूयात.*
6 likes
11 shares

