
Devendra Fadnavis
@devendrafadnavis
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, रामसेवक । कारसेवक | महाराष्ट्र सेवक
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे..
🚩प. पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जी यांच्या प्रमुख उपस्थितित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पथसंचलन - नागपूर महानगर
🕗 संध्या. ७.४५ वा. | २७-९-२०२५📍नागपूर.
#नागपूर #महाराष्ट्र #मुख्यमंत्री #आरएसएस #देवेंद्र फडणवीस
सामान्य भाजी विक्रेत्याचं असामान्य दान!
पुण्यातील भाजी विक्रेते चरण वणवे यांनी आज 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी तब्बल ₹1,13,724 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी आमदार हेमंत रासने उपस्थित होते. संकट काळात नागरिकांना मदत करण्यासाठी चरण वणवे आपल्या घरातील सद्गुरू शंकर महाराज यांच्या पादुकांपुढील पेटीत दररोज ₹100 जमा करतात. कोविड काळातही त्यांनी याच संकल्प पेटीतून मोठी मदत केली होती.
सोलापूरसह मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांवर मोठं संकट आले आहे. अशा वेळी मदतीचा हात पुढे करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. याच भावनेतून चरण वणवे यांनी दाखवलेलं माणुसकीचं उदाहरण प्रेरणादायी आहे.
#महाराष्ट्र #पुणे #देवेंद्र फडणवीस
जागतिक पर्यटन दिन!
स्थानिक संस्कृतींचा वारसा जपूया,
पर्यावरणाचे संवर्धन करूया…
शाश्वत पर्यटन अनुभवूया!
#जागतिक पर्यटन दिन #महाराष्ट्र #पर्यटन
विदर्भाच्या विकासाला वेग देणारी 'अमृत भारत एक्सप्रेस'!🚉
वर्ध्यातील प्रवाशांसाठी ओडिसा, छत्तीसगड आणि गुजरात दरम्यान आरामदायी, वेळेची बचत करणारी आणि सर्वांना परवडणारी साप्ताहिक लागोपाठ दुसरी अमृत भारत एक्सप्रेस सुरू होत आहे. या गाडीचा शुभारंभ मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते 27 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. वर्धा व विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी ही महत्त्वाची भेट दिल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांचे मनःपूर्वक आभार!
#नरेंद्र मोदी #महाराष्ट्र
महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान याबाबत एक सविस्तर निवेदन आज आमचे नेते, देशाचे गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांना दिले. एनडीआरएफमधून भरीव मदत महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.
#महाराष्ट्र #पूर #देवेंद्र फडणवीस
एकात्म मानवदर्शनाचे प्रणेते, अंत्योदयाचे जनक, आमचे प्रेरणास्थान पंडित दीनदयालजी उपाध्याय यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!
#पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती #पंडित दीनदयाल उपाध्याय #महाराष्ट्र
अ.भा. मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, माथाडी कामगारांच्या हक्कांसाठी लढणारे झुंझार नेते अण्णासाहेब पाटील यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!
#अण्णासाहेब पाटील #अण्णासाहेब पाटील जयंती #महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस
सोलापूर जिल्यातील माढा तालुका येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
#महाराष्ट्र #अतिवृष्टी #देवेंद्र फडणवीस
सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते।।
आज घटस्थापना, जागर आदिशक्तीचा!
शारदीय नवरात्री आपणा सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, ऐश्वर्य घेऊन येवो, हीच प्रार्थना!
#घटस्थापना #नवरात्री ##जयमातादी #महाराष्ट्र
गरीब-वंचितांसाठी शिक्षणाची कवाडं खुली करणारे, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर समाजसुधारक, शिक्षणप्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#कर्मवीर भाऊराव पाटील जयंती #महाराष्ट्र #अभिवादन