मानवी मन हे अत्यंत चंचल असते़ ते चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींकडे आकर्षित होते़ अशा मनाला चांगले कोणते वाईट कोणते, योग्य कोणते, अयोग्य कोणते याची जाणीव करून देणे व चांगल्याकडेच त्याची प्रवृत्ती घडवणे हे संतांच्या विचारांमधून सहजपणे साध्य होते़ ' मी देह नसून मी देव आहे ' याचा अर्थ प्रत्येक माणसात देव आहे़ . हा प्रत्येकांच्या ठिकाणी असलेला परमेश्वराचा अंश संतांनी इतका विकसित केलेला असतो की त्यांचे मन हेच सत्य व असत्याविषयी प्रमाणभूत असते़ . संतांनी शिकविलेल्या अध्यात्माचा मुख्य परिणाम हा असतो की त्यामुळे मनुष्याचा 'विवेक' जागा होतो़ वस्तुत: हा 'विवेक' म्हणजे सद्विचाराचा व सदाचरणाचा परिणामच असतो़ हा विवेकच परमार्थाचे महत्त्वाचे साधन असतो़ 'विवेक' दृढ झाल्यावाचून खरा परमार्थ जीवनात येऊ शकत नाही़ . ( संग्रहित विवेकत्व )
#

सद्गुरु माऊली

सद्गुरु माऊली - जगारी ( 6 ) श्री स्वामी समर्थ । । - ShareChat
347 जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
#

सद्गुरु माऊली

नामस्मरणाच्या पायर्‍या अशा सांगता येतील- पहिली, सुस्थितीतले वरवरचे नामस्मरण; दुसरी, परमात्म्याशिवाय आपले कोणी नाही ही जाणीव होऊन, संकटसमयी त्याचे स्मरण; आणि तिसरी, हीच जाणीव पुढे दृढ होऊन अखंड होणारे नामस्मरण. यांपैकी वरवर स्मरण करणारा ’ आम्हाला संकतेच नकोत ’ असे म्हणतो, तर साधुसंत ’ आम्हाला संकते येऊ देत ’ असे भगवंताजवळ मागतात, कारण त्यावेळेसच त्याचे खरे स्मरण होते. आपण स्वतः आहोत याची आपल्याला आज जितकी खात्री आहे, तितकी खात्री भगवंत आहे अशी झाली पाहिजे. परमात्मा सर्व ठिकाणी आहे ही कल्पना केव्हा तरी आपल्याला होते खरी, पण ती कायम न राहिल्याने दृढपणे आचरणात येत नाही; आपली वृत्ती तशी झाली की ती आपल्या आचरणात येईल. भगवंत हा कर्ता आहे आशी भावना दृढ झाली की आपण प्रत्येक गोष्ट त्याला सांगत बसणार नाही. ’ भगवंताला माझे सर्व कळते ’ असे जर खरे वाट्ले तर त्याला आवडेल आसेच वागू. पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळयांसमोर आणून प्रर्थना करावी, आणि " तुझे विस्मरण जिथे होते, तिथे मला जागृत करीत जावे; नाही मला आता तुझाशिवाय आसरा, " असे म्हणून त्याला मनपूर्वक नमस्कर करावा. मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीने मिळेल. जो भगवंताचा झाला त्याला जगण्याचा कंटाळा कधीच येणार नाही. विषयाचा आनंद हा दारूसारखा आहे; ती धुंदी उतरल्यावर मनुष्य जास्त दुःखी बनतो. ’ मी भगवंताचा आहे ’ या भावनेने जो राहील त्यालाच खरा आनंद भोगता येईल.
757 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post