Failed to fetch language order
🌗चंद्र ग्रहण🌑
24 Posts • 107K views
Santosh Sawant
1K views 5 months ago
Chandra Grahan 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 2025 वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण (Chandra Grahan) 7 सप्टेंबर रोजी लागमार आहे. हे चंद्रग्रहण शनीच्या कुंभ राशीत लागणार आहे. तसेच, चंद्रग्रहणाची सुरुवात रात्री 9 वाजून 58 मिनिटांनी होणार आहे. तर, रात्री 1 वाजून 26 मिनिटांनी हे ग्रहण संपणार आहे. मुख्य म्हणजे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. त्यामुळे याचा सर्व 12 राशींवर परिणाम होणार आहे. मात्र, काही राशींना या काळात सावधान राहण्याची गरज आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.  कर्क रास (Cancer Horoscope) कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे. त्यामुळे ग्रहणाच्या वेळी या राशीच्या लोकांना जास्त सतर्क राहण्याची गरज आहे. तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. तसेच, तुम्हाला सतत चिंता जाणवेल. अचानक तुमच्या आयुष्यात नकारात्मक बदल घडताना दिसतील. नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या काळात भगवान शंकराच्या मंत्राचा जप करणं तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरेल. यामुळे कदाचित तुम्हाला शुभ परिणाम मिळू शकतात.  कन्या रास (Virgo Horoscope) वर्षातील हे चंद्रग्रहण या राशीच्या सहाव्या चरणात होणार आहे. त्यामुळे ग्रहणाच्या काळात विरोधकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. तसेच, या काळात तुम्ही नियोजित केलेली कामे बिघडू शकतात. आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या काळात पैशांची गुंतवणूक करु नका. त्यामुळे या काळात धार्मिक होण्याचा प्रयत्न करा. तसेच, चंद्र ग्रहाच्या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करु शकता.  मीन रास (Pisces Horoscope) या राशीच्या द्वादश भावात हे चंद्रग्रहण लागणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. आरोग्याशी संबंधित देखील तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे. चंद्रग्रहणाच्या काळात तुम्हाला वाईट परिणामांपासून दूर राहायचं असेल तर योग-ध्यान करण्याची गरज आहे. तसेच, चांदी, दूध, पाणी यांसारख्या वस्तू दान करणं शुभ राहील.  (टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचकां पर्यंत पोहोचवत आहोत. यातून कोणताही दावा करत नाही.) #सूर्य ग्रहण 🌞/चंद्र ग्रहण.🌛 #🌚चंद्र ग्रहण 🌘🌑 #🌗चंद्र ग्रहण🌑 #चंद्र ग्रहण #🌘 चंद्र ग्रहण 🌒
24 likes
26 shares