#🎥Viral व्हिडिओ: प्रजासत्ताक दिनीच पोलिसाचा मृत्यू देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला. लोकशाहीच्या या उत्सवात लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण सहभागी झाले होते. एकीकडे अवघा देश तिरंगी रंगात रंगला असतानाच धाराशिवमध्ये एक काळीज पिळवटणारी घटना घडली. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात हृदयविकाराच्या धक्क्याने दारूबंदी अधिकाऱ्याच निधन झाल्याची दुर्दैवी घटना उमरग्यात घडली. या मन सुन्न करणाऱ्या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Buldhana News: झेंडावंदन करताना अनर्थ घडला! मुख्याध्यापकाच्या मृत्यूने गावावर शोककळा; शाळेत काय घडलं?
तिरंग्याला सलामी देताच कोसळले
याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहन समारंभासाठी उपस्थित असणाऱ्या दारूबंदी अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची घटना धाराशिवच्या उमरग्यात घडली आहे. मोहन जाधव असे या दारूबंदी अधिकाऱ्याचं नाव आहे. सोलापूर- हैद्राबाद महामार्गावरील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणी नाक्यावर ध्वजवंदन सुरु असताना ही दुर्दैवी घटना घडली.
ध्वजवंदनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व अधिकारी, सहकाऱ्यांचा एकत्रित फोटो काढला जात होता. फोटोसेशनसाठी सर्वजण उभे असतानाच मोहन जाधव हे चक्कर आल्याने खाली कोसळले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराआधीच डॉक्टरांनी मोहन जाधव यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.