#

technology

🚀 ठरलं! चांद्रयान 22 जुलैला अवकाशात झेपावणार 👍 भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात 'इस्रो'च्या महत्वकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेच्या प्रक्षेपणाचा नवा मुहूर्त ठरला 💁‍♂ तांत्रिक बिघाडामुळे प्रक्षेपण रद्द झाल्यानंतर आता सोमवार दि. 22 जुलै रोजी दुपारी 2.43 मिनिटांनी या अवकाशयानाचे प्रक्षेपण होणार 🧐 श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून अवकाशात झेपावल्यानंतर 52 दिवसांनी चांद्रयान 2 चंद्रावर पोहचेल, यानंतर हे चांद्रयान 16 दिवस पृथ्वीची परिक्रमा करणार 📍 विशेष बाबी : ▪ भारत अशा प्रकारची मोहीम राबवणारा पहिलाच देश ठरणार ▪ या मोहिमेसाठी भारताला तब्बल 978 कोटी रुपये खर्च आला आहे ▪ सर्वात महत्वाचे म्हणजे या यानाचे सर्व भाग स्वदेशी आहेत 🔎 अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार : ▪ या मोहिमेत चंद्रावर असलेल्या पाण्याची पातळी, चंद्रावरील जमीन, त्यावर उपलब्ध असलेली खनिजं, रसायनं आणि त्यांचा अभ्यास केला जाणार ▪ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जमिनीखाली कोणती खनिजं दडली आहेत? तिथे पाण्याचा अंश आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तपासणीनंतर मिळणार #technology
129 जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post