Failed to fetch language order
जुन ते सोन...love
122 Posts • 80K views
पत्रास कारण की... एक काळ होता ना..आपण पत्र लिहायचो.. मोबाईल नव्हता तेंव्हा..पत्रानेच खुशाली कळायची.. पाठवलं ते एकदा की..काही दिवस लागायचे.. मग उत्तर यायचं आपल्याला..अनेक उत्तर मिळायची.. पत्रास कारण की..|| पत्रास कारण की..अशी त्याची सुरुवात असायची.. त्यात तब्बेत भांडण काळजी..चौकशी व्हायची.. अगदी सविस्तर लिहीत असू..शब्दात भावना मांडून.. अन पोस्टमन काकांची..डोळे लावून वाट पाहायची.. पत्रास कारण की..|| बहीण जायची नांदायला..किंवा लेक सासरी.. कधी बायकोही माहेरी..रुसून जायची.. चार दिवस वाट पाहून..मग पत्र उपयोगी पडायची.. घाई मिरवायची..अन तीला परत आणायची.. पत्रास कारण की..|| मुलगा शिकायला जेंव्हा..बाहेरगावी असायचा... कोणी देशसेवेसाठी तेंव्हा..सीमेवरती जायचा.. आई बाप जेंव्हा काळजीत..पत्र यायचं उपयोगी.. एक आनंद अन समाधान..याच पत्रात असायचा.. पत्रास कारण की..|| आधुनिक जग झालं..पत्र लुप्त झाली दिसत नाही.. मोबाईल आला तस..लोक जवळ आली मन दुरावली.. झटक्यात होत सगळं..सहज अस उपलब्ध.. पण ती बात च और होती..वाटत ओढ हिरावली..|| होय..आम्ही तो काळ पाहिलाय..अभिमान आहे.. उगीच म्हणत नाहीत..जुन ते सोन.. जगलोय आम्ही ते दिवस..अन त्या आठवणी.. पूर्वीच जग अन जीवन म्हणजे..लाखमोलाच सोन.. पत्रास कारण की...|| #जुन ते सोन #जुन ते सोन😍☺️✨💯 #जुन ते सोन #जुन ते सोन #जुन ते सोन...love
11 likes
12 shares