chaturthi
42 Posts • 78K views
D
1K views 17 days ago
विघ्नांच्या अचाट पर्वतालाही जे आपल्या इवल्याशा मूषक वाहनावरून लीलया पार करतात, त्या बुद्धीदात्याचा हा जयघोष! आजची अंगारकी चतुर्थी म्हणजे स्वतःमधील दुर्गुणांचे दहन करून सद्गुणांची पेरणी करण्याचा दिवस. हे लंबोदरा, तुझ्या विशाल उदरात ज्याप्रमाणे तू ब्रह्मांडाला सामावून घेतले आहेस, तसेच आमच्या सर्व चिंता आणि व्यथांना तुझ्यामध्ये सामावून घे. आम्हाला निर्भयतेचे वरदान दे... आणि यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचण्यासाठी लागणारी जिद्द आणि आत्मबल प्रदान कर. सर्व गणेश भक्तांना अंगारकी चतुर्थीच्या मंगलमय सदिच्छा..! #अंगारकीचतुर्थी #PK धडपडणाऱ्या तरुणाईसाठी #angaraki,chaturthi,2023 #विनायक चतुर्थी #chaturthi
9 likes
21 shares