ᴀɴɪʀᴜᴅᴅʜᴀ ᴍɪʀᴀɴᴇ
1K views • 6 months ago
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग☀️ #🎭Whatsapp status #✨बुधवार स्पेशल✨ #🌈रंगपंचमी🎨 =
आज दि. १९/०३/२०२५, बुधवार
रंगपंचमी 🎨
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्याचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा, रंग नव्या उस्तावाचा..
रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
...........................................
तुमच्या आयुष्यात आनंद, प्रेम आणि स्नेह नेहमी उजळत राहो!
रंगपंचमीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला रंगीबेरंगी शुभेच्छा..!
...........................................
एक रंग मैत्रीचा
एक रंग आनंदाचा
सण आला उत्सवाचा
साजरा करूया चला सण रंगाचा
रंगपंचमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
...........................................
परस्परातील भेदभाव, मतभेद, कटुता विसरून सर्वांना एकत्र आणणारा, विवधतेतून एकात्मतेचा संदेश देणारा सण म्हणजे रंगपंचमी.
सोडूनी भेद नी भाव
रंग उधळू उत्साहाचे.. रंग जपू माणुसकीचे
रंगाचा हा उत्सव आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी आणि आनंद भरभराट घेऊन येवो...
रंगपंचमी च्या सर्वांनां मनःपूर्वक शुभेच्छा!
...........................................
रंगून जाऊ रंगात आता, अखंड उठू दे मनी तरंग...
तोडुनी सारे बंध मनाचे, असे उधळूया आज हे रंग..
सर्वत्र उत्साहात साजरी होणाऱ्या रंगपंचमीच्या सर्वांना मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा !
...........................................
रंगपंचमी म्हणजे फक्त रंगांची उधळण नाही, तर आनंद, उत्साह आणि स्नेहाचा उत्सव आहे. आजच्या या रंगीबेरंगी दिवशी राग, वैर, मत्सर विसरून नाती अधिक मजबूत करूया!
सर्वांना रंगपंचमीच्या विविधरंगी शुभेच्छा!
...........................................
आज (१९ मार्च) रंगपंचमी...
होळी सणाचे शेवटचे पर्व म्हणजे, ‘रंगपंचमी.’ होळीनंतर फाल्गुन वद्य पंचमीला रंगपंचमी साजरी होते..! हिंदू शास्त्रानुसार, या दिवशी देवतांसह होळी खेळली जाते. त्यामुळे या सणाला ‘देव पंचमी’ असेही म्हणतात.
सर्वांनी मत्सर, मतभेद विसरून एकत्र यावे, एकमेकांवर रंग उधळताना प्रेम, बंधुतेची भावना दृढ करावी, हा रंगपंचमीचा उद्देश आहे. देशातील अनेक राज्यांत होळीदिवशी रंगपंचमी साजरी होते. मुंबई हे कॉस्मोपॉलिटिन शहर असल्याने होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. महाराष्ट्राच्या उर्वरित भागात आजच्या दिवशी रंगपंचमी साजरी होते.
रंगपंचमी सार्वजनिकरित्या साजरी करताना काही गोष्टींची दक्षता घेणे आवश्यक आहे. हानिकारक रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक रंग वापरणे, डोळे, त्वचा, केस यांची काळजी घेणे, पाण्याचा अपव्यय टाळणे तसेच लहान मुलांना जपणे आवश्यक आहे.
सर्वांना रंगपंचमीनिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा...
6 likes
10 shares