श्री विठ्ठल भक्तिगीते
#

श्री विठ्ठल भक्तिगीते

ह्या दिवशी महर्षी व्यासांनी पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतला अशी आपल्या धुरिणांची श्रद्धा आहे. त्यामुळे संन्यासी मंडळी ह्या दिवशी व्यासांची पूजा करतात. त्यासाठी स्नानादी नित्यकर्मानंतर संकल्पपूर्वक एक सुती धूतवस्त्र अंथरतात. त्याच्यावर गंधाने पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा बारा रेषा काढतात. हेच व्यासपीठ! मग त्यावर ब्रह्मा, विष्णू, वसिष्ठ, पराशर, शक्ती, व्यास, शुकदेव, गौडपाद, गोविंदस्वामी आणि शंकराचार्य यांना आवाहन केले जाते. त्यानंतर त्यांची विधिवत कृतज्ञतापूर्वक पूजा करतात. दक्षिणेकडील शंकरपीठांमध्ये ह्या दिवशी महोत्सवच असतो. व्यास हे अखिल जगाचे गुरू आहेत. आपल्या संस्कृतीची मूळ संकल्पना ही व्यासांचीच आहे. त्यांनीच तिची जोपासना केली. व्यास आपले धर्म-अध्यात्म- वाङ्मय अशा सर्वच विषयांतील गुरू आहेत. त्यामुळे आपली संस्कृती व्यासांचे असे कृतज्ञतापूर्वक स्मरण करते. ह्याच दिवशी आपल्या मातापित्यांची आणि गुरूंची पूजा करण्याची प्रथा आहे. गुरू-शिष्याचे नाते म्हणजे दोन आत्म्यांचे परस्परांशी असलेले अनोखे, अतूट नाते आहे. निष्ठावान शिष्य आणि आदर्श गुरू ह्यांचे परस्परांशी असलेले नाते अन्य मंडळींना कळणारे नसते. शिष्याला आपला गुरू हा देवाहूनही श्रेष्ठ असतो. तर शिष्याला भवसागरातून पैलपार नेण्याची शक्ती केवळ गुरूपाशीच असते.       आजच्या काळात आदर्श गुरू आणि आदर्श शिष्य मिळणे तसे दुरापास्तच झाले आहे. गुरू असला तर त्याच्याकडे ज्ञानाचा खडखडाट तरी असतो किंवा गुरूकडे ज्ञान असले तरी ते घेण्याची शिष्याची पात्रता नसते. मुख्य म्हणजे प्रसिद्धी, पैसा झटपट आणि विनासायास मिळविण्याचे अध्यात्म हे मोकळे कुरणच आहे अशी अज्ञानीजनांची कल्पना असते. निखळ ज्ञानासाठी तळमळणारा निष्ठावान शिष्य मिळणे हे गुरूचे भाग्य म्हणावयास हवे. असा भाग्यवान गुरू फार विराळाच!       तरीही आहे त्या स्थितीतील गुरू-शिष्यांनी शक्यतो ह्या व्यासपीठाचा मान आणि शान राखण्याचा कसोशीने प्रयत्न करावयास हवा. ज्यांना गुरू असेल त्यांनी गुरूची निरपेक्षभावाने पूजा करावी. त्याने सांगितलेल्या प्रत्येक आज्ञेचे मनापासून पालन करावे. त्याच्याबद्दल आदरभाव बाळगावा. स्वतःकडे जे उत्तम असेल ते ह्या दिवशी गुरूला ‘गुरुदक्षिणा’ म्हणून द्यावे. ज्यांना गुरू नसेल त्यांनी दत्तमंदिरात जाऊन श्रीगुरुदत्तात्रेयाचे दर्शन घ्यावे. उपवास करावा, वडीलधार्‍यांना आदराने वागवावे. संदर्भ टीप : प्रस्तुत लेख हा हिंदुधर्मातील पारंपरिक रूढी, परंपरा, समजुती तसेच पंचांगशास्त्र या अनुषंगाने परंतु त्याचवेळी स्वतंत्र विचारधारेने लिहिला आहे. - ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर
1.2k जणांनी पाहिले
10 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post