#विनोद #joke #जोक #Comedy joke. 😂😂😂 #थोडी गंमत जंमत# एका 5 स्टार हॉस्पिटल मधे एक *शिक्षक* छातीत दुखतं असल्यामुळे तपासणीसाठी गेला. डॉक्टरांच्या टीमने पेशन्टला तपासून लगेच आजच्या आजच बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिला ....
पेशंट खूप नर्व्हस झाला पण मनाची तयारी केली...
ऑपरेशनच्या अगोदरचे सगळ्या टेस्ट झाल्यानंतर डॉक्टरच्या टीमने बजेट सांगितलं *१८ लाख रुपये* ... जे पेशन्टच्या कुटुंबातल्याना जरा जास्तच वाटू लागलं. पण *"जान है तो जहान है"* हा विचार करुन फॉर्म भरायला लागले.
फॉर्म भरताना व्यवसाय हा कॉलम आला तेव्हा ऑपरेशनच्या टेन्शनमुळे आणि पैशाची इकडून तिकडून जमावजमव करण्याच्या गडबडीत त्या कॉलमच्या पुढे त्याने *E.D.* अस लिहलं आणि मग ... हॉस्पिटल मधलं सगळं वातावरणच बदललं ...डॉक्टरांची दुसरी टीम चेकअप करायला आली.. मग तिसरी टीम आली सर्व *चेक-अप* झालं.
सर्व टेस्ट परत एकदा करण्यात आल्या. आणि मग डॉक्टरांच्या टीमने निर्णय घेतला ...."ऑपरेशन करण्याची गरज नाही, औषध- गोळ्या घेऊन ब्लॉकेज जातील"!
पेशन्टला डिस्चार्ज द्यायच्या आधी तीन महिन्याची औषधं फ्री दिली आणी चेकिंग फी मध्ये पण जबरदस्त डिस्काऊन्ट देऊन पाठवलं...
या गोष्टीला सहा महिने झाले .... पेशन्ट आता चांगला ठणठणीत बरा झाला.
आता पेशन्ट कधी- कधी त्या हॉस्पिटलमधे चेकिंगला जायचा तर त्याच चेकिंग पण फ्री तर करायचेच आणि वर ज्यूस पाजल्याशिवाय डॉक्टर त्याला सोडायचे नाहीत.
पेशन्ट तर खूप खुष होता ! या हॉस्पिटलच्या वागणुकीमुळे सगळ्यांकडे या हॉस्पिटल आणि सर्व स्टाफच कौतुक करीत सुटायचा ! ...पण बऱ्याच वेळा विचार करून हैराण व्हायचा की ५ वर्ष झाली नोकरी करुन त्याला !आता तर तो रिटायर झाला होता...
पण *"Education Department"* (E.D.) चा एम्प्लॉई असल्या कारणाने इतका मान- सन्मान त्याला घरात सुद्धा मिळाला नव्हता, इतका त्या हॉस्पिटलवाल्यानी त्याला दिला होता...🙄😂