#🎂HBD नरेंद्र मोदी🌷 #🎭Whatsapp status #☀️गुड मॉर्निंग☀️ #pune #😴शुभ रात्री😴 =
पुण्याच्या आकाशात झळकली संस्कृतीची गाथा अन् विकसित भारताचा संकल्प…
देशाचे यशस्वी पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित अभूतपूर्व ड्रोन लाईट शोला पुणेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. हजारो पुणेकरांनी उपस्थित राहून महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, मानबिंदू आणि विकसित भारताच्या स्वप्नाचं आकाशात उमटलेलं दर्शन उघड्या डोळ्यांनी अनुभवलं. आकाशात रंगीबेरंगी प्रकाशाच्या लहरींनी उभ्या राहिलेल्या आकृत्या पाहताना पुणेकरांच्या चेहऱ्यावर कौतुक, अभिमान आणि आनंद यांचा संगम दिसत होता.
अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात प्रथमच झालेलं हे आयोजन पुणेकरांसाठी एक अनोखं पर्व ठरलं. “विकसित भारत” या संकल्पनेला साकार करणारे संदेश, सांस्कृतिक प्रतीकं, आणि मा. मोदींच्या जीवनप्रवासाचे पैलू ड्रोनच्या माध्यमातून इतक्या आकर्षक स्वरूपात उभे राहिले की, संपूर्ण वातावरणात देशभक्ती आणि उत्साहाची लहर निर्माण झाली.
हा शो फक्त एक दृश्यमान अनुभव नव्हता, तर तो प्रत्येक प्रेक्षकाच्या मनाला भिडणारा भावनिक क्षण होता. पुण्याच्या आकाशात उमटलेला हा प्रकाशमहोत्सव भविष्यातील भारताची दिशा दाखवणारा आणि एकतेचा संदेश देणारा ठरला.