𝚂𝚑𝚛𝚎𝚎𝚛𝚘𝚘𝚙_𝚁𝚊𝚓𝚎
697 views • 3 months ago
"डॉ. केशव तुपे, सहसंचालक यांनी पुरविलेल्या समितीचा अहवाल आणि दोषीवर कारवाई च्या आश्वासना नंतर श्री लखन मैघणे यांचे उपोषण तात्पुरते स्थगित"
*डॉक्टर अरुण शेंडे यांच्याकडील प्रभार काढण्यात आला*
लखन अरविंद मैघणे यांचं दिनांक २१ मे २०२५ पासून आमरण उपोषण अमरावती विद्यापीठाच् या मुख्यप्रवेश द्वारासमोर सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालय यवतमाळ चे प्रभारी प्राचार्य डॉ. अरुण दादाजी शेंडे यांना देण्यात आलेल्या प्रभारी प्राचार्य पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात झालेल्या गैरप्रकारचा विरोध
दर्शवण्यासाठी व सदर गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी गेल्या ५१ दिवसापासून आमरण उपोषण चालू होते. सदर उपोषणाची दखल घेत शिक्षण सह सहसंचालक अमरावती विभाग यांच्या आदेशानुसार विद्यापीठ गठीत दोन सदस्सीय समिती अहवाल सुपूर्द करणे आणि दोषीवर कार्यवाई करण्याचे लेखी आश्वासना नंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रशासनाने द्विसदस्यीय चौकशी समिती गठीत केली होती.सादर समितीच्या चौकशी अहवालाच्या अनुषंगाने सावित्री ज्योतिराव फुले समाजकार्य महाविद्यालय यवतमाळ प्रभारी प्राचार्य डॉ. अरुण दादाजी शेंडे यांचे अतिरिक्त प्रभारी प्राचार्य पदाचा कार्यभरास मान्यता गोठवण्यात व स्थगित करण्यात आल्याचे पत्र विद्यापीठ प्रशासनाकडून कडून प्राप्त झाले.डॉक्टर अरुण शेंडे यांच्याकडील प्राचार्य पदाचा प्रभार चौकशी समितीच्या अहवालानुसार काढून घेण्यात आला असून हा पदभार डॉक्टर सीमा शेटे यांच्याकडे देण्यात आलेला आहे. व त्याच आधारे दिनांक १० जुलै २०२५ रोजी सहसंचालक उच्च शिक्षण विभाग अमरावती यांनी चौकशी अहवालाची प्रत सुद्धा दिली.
त्रिपब्लिकनमुळे सहसंचालक उच्च शिक्षण डॉ. केशव तुपे व रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद जिल्हाध्यक्ष ऍड.आकाश हिवराळे, सामाजिक कार्यकत्या सोनालीताई देशमुख यांच्या विनंतीला मान देऊन आज गुरूपोर्णिमेच्या औचित्य साधून आज दिनांक १० जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७:३० च्या दरम्यान सहसंचालक डॉ.केशव तुपे सहसंचालक उच्च शिक्षण विभाग अमरावती, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष ऍड.आकाश हिवराळे,सामाजिक कार्यकर्त्या सोनालीताई देशमुख यांच्या हस्ते आज उपोषणकर्ते लखन मैघणे यांनी उपोषण तात्पुरते मागे घेतले असून दोषीवर कार्यवाही साठी लढा निरंतर चालु राहील तसेच कार्यवाहि न झाल्यास पुन्हा उपोषण असा सूचक इशारा दिला आहे.
#whistleblowerlakhan #supportforlakhanmaighane
9 likes
10 shares