माणसाला जगायला अन्नाप्रमाणे शिक्षण
देखील आवश्यक ठरते. स्वतःची सर्वप्रकारे प्रगती करून जीवन आनंदमय करायचे तर ज्ञान व परिस्थितीचे
भान असायलाच हवे. ते शिक्षणाविना लाभणे कठीणच.अश्या या मौलिक शिक्षणाचा प्रसार सर्वसामान्य जनतेत होणेआवश्यक आहे,हे जाणून ह्या महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजनांना देखील शिक्षण मिळावे, आणि सर्वसामान्य जनता शिक्षित व्हावी याकरिता कमवा आणि शिका या योजनेच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेच रोपट लावलं आणि आज त्याचा वटवृक्ष झाला.
आज लाखो विद्यार्थी या वटवृक्षाच्या सावलीत विसावत देश विदेशात नावलौकिक मिळवत आहेत.आज अण्णांची जयंती त्यानिमित्त या महापुरुषांस कोटी कोटी प्रणाम..
#कर्मवीर भाऊराव पाटील जयंती #कर्मवीर भाऊराव पाटील जयंती🌺🌷 #कर्मवीर भाऊराव पाटील जयंती 🌹 #कर्मवीर भाऊराव पाटील #कर्मवीर भाऊराव पाटील जयंती #कर्मवीर भाऊराव पाटील