*कुटुंबासाठी 20 कठोर पण प्रामाणिक नियम* 👇🏻👍🏻
1.आदर हा अनिवार्य आहे – रागातसुद्धा.
कितीही राग आला तरी एकमेकांचा सन्मान ठेवणे आवश्यक आहे.
2.गुपितं व खोटं नाही – प्रामाणिकपणातून विश्वास टिकतो.
खोटं बोलणं किंवा गोष्टी लपवणं नात्यांमध्ये अंतर आणतं.
3.कुटुंब प्रथम, पण दोघांचाही प्रयत्न हवा.
नातं टिकवायचं असेल तर एकतर्फी प्रयत्न चालत नाहीत.
4.चूक झाली तर क्षमा मागा – कारणं नकोत, अहंकार नाही.
माफी मागणं हे ताकदीचं लक्षण आहे, कमजोरीचं नाही.
5.पूर्ण उपस्थित राहा – स्क्रीनमध्ये अडकू नका.
शरीरानेच नव्हे, मनानेही एकत्र असणं महत्त्वाचं आहे.
6.भूतकाळाच्या चुका हत्यार म्हणून वापरू नका.
जुन्या गोष्टी उगाळून आजच्या नात्याला दुखावू नका.
7.घराबाहेर एकमेकांचं नाव जपा.
कौटुंबिक गोष्टी इतरांपाशी बोलू नयेत.
8.यश मिळालं तर ईर्षा न करता साजरं करा.
एकमेकांच्या यशात खरा आनंद वाटायला हवा.
9.उदाहरणातून शिकवा, उपदेश नको.
कृतीमधून शिकवलेलं जास्त परिणामकारक असतं.
10.मौनव्रत नको – बोलून विषय मिटवा.
शांत राहून शिक्षा देणं नात्याला तोडतं.
11.कुटुंबीयांची तुलना करू नका.
प्रत्येक जण वेगळा आहे आणि तसा स्वीकारला पाहिजे.
12.मदत करा, पण हिशोब ठेवू नका.
प्रेमातून केलेली मदत गणतीत ठेवली जात नाही.
13.गोपनीयता आणि वैयक्तिक हद्दीचा सन्मान करा.
प्रत्येकाची स्पेस महत्त्वाची असते.
14.फक्त सोप्या वेळी नाही, कठीण वेळीही साथ द्या.
खऱ्या नात्याची ओळख संकटातच होते.
15.प्रेमाने सुधारणा करा, अपमान करून नाही.
चुका दाखवताना शब्दांचा वापर प्रेमळ असावा.
16.क्षमा करा, पण शिकलेला धडा लक्षात ठेवा.
माफ करणं गरजेचं आहे, पण अनुभव लक्षात ठेवावा.
17. कोणाच्याही न्यूनगंडावर विनोद करू नका.
अशा गोष्टी खोल जखमा करत असतात.
18. कुटुंबातील प्रश्न खासगी ठेवा.
आपल्या समस्यांचं प्रदर्शन समाजात करू नका.
19. शिस्त प्रेमातून लावा, भीतीद्वारे नाही.
भीतीतून आलेली शिस्त टिकत नाही.
20. पूर्ण लक्ष द्या, अर्धवट उपस्थिती नाही.
संवाद करताना संपूर्ण लक्ष द्या, फक्त “हो” म्हणणं पुरेसं नाही.
21. वाद असला तरी प्रेमळ बोलणी ठेवा.
कठोर सत्यही नम्रपणे सांगितलं तर स्वीकारलं जातं.
22. जबाबदाऱ्या वाटून घ्या – सगळं एका व्यक्तीवर टाकू नका.
*घर म्हणजे टीमवर्क – प्रत्येकाची भूमिका असते.* 👍🏻👍🏻
#🙏🌹माझं घर परिवार नातेवाईक 🌹🙏🅿️🅿️ #आपलं घर, आपला परिवार #👨👩👧👦माझा परिवार #🙂Positive Thought #🙏प्रेरणादायक / सुविचार