ShareChat
click to see wallet page

"ते तारे बघ कसे चमचम करतायत...! तुला ठाऊक आहे हे तारे रात्र भर कोणासाठी जागतात...?" "कोणासाठी..??" त्याने तिच्या चॉकलेटी डोळ्यात बघत उत्सुकतेने विचारल... "त्यांच्या प्रेमा साठी...!" ती हलकेच पापण्या फडकवत म्हणाली... "हेsssss.... तु काही ही बोलत असतेस... ही एवढीशी तु कुठून ऐकून येतेस ग असल्या गोष्टी..??" तो तिच्यावर हसत म्हणाला.. "मी आता मोठी झालीय... या वर्षी सातवीच्या वर्गात जाणारेय..." तीच इवलंस नाक रागाने लाल झाल.. तशी ती गाल फुगऊन तोंड फिरऊन बसली... "ओके स स सॉरी बाबा... विसरलोच मी या वर्षी तु सातवीत जाणारेयस.." तो पटकन तिच्या समोरच्या बाजूला येऊन कान पकडून क्युटपणे सॉरी बोलून गोड पणे मनवत होता.. तसा तिच्या नाकावरचा राग थोडासा कमी झाल्या सारखा वाटला... "अच्छा तु म्हणत आहेस तसच असेल...? पण त्यांचं कोणावर प्रेम आहे? ते तरी सांग....?" तशी तिच्या त्या इवल्याश्या चॉकलेटी डोळ्यात जणू चांदण्यांची चमक उतरली... अन् पुढच्या क्षणी ती त्याच्यावर हसुन म्हणाली... "अरे बुद्दू त्या चंद्रावर त्यांचं प्रेम आहे, आणि म्हणुनच त्या त्याच्या सोबत रात्रभर जागत असतात...! आणि कधी कधी तो येतच नाही तेव्हा पण त्या त्याची परत येण्याची वाट बघत रात्रभर जागतात..." ती आकाशातल्या चंद्र ताऱ्यांकडे डोळे मोठे करून बघत त्याला सांगत होती.... तस त्याने पण वरती आकाशात पाहील... त्याच्या चंद्रा सारख्या निरागस चेहऱ्यावर एक वलोभनीय स्मित उमटल... तीच चंद्र चांदण्यांची चमक घेऊन त्याने समोर बसलेल्या तिच्या नजरेत खोलवर पाहील... "आणि तुला कोणी हे सांगितल...?" त्याने उत्सुकतेने विचारल... "परवा ना मी आणि शरू आम्ही टीव्ही बघत होतो तेव्हा बघितल..." "खुशी उद्या माझी मॉम येतेय... मी उद्या जाणारेय...!" "खरच तु उद्या जाणार.....? तु गेल्यावर मला तुझी खुप खुप आठवण येणार..." टपोऱ्या डोळ्यांनी त्याच्या नजरेत तिने पाहील अन् थोड भाऊक होऊन म्हणाली.. "खुशी मी पण तुला खुप मिस्स करेन...!" तो तिचा इवलासा हात हातात घेऊन तिच्या चॉकलेटी डोळ्यात बघत म्हणाला.. दोघांच्या ही नजरेत खुप क्युट आणि निरागस भावना होत्या.. ज्यात किंचित मात्र खोटेपणा नव्हता होत ते बस्स निर्मळ निरागस प्रेम आणि पुढच्या भेटीची ओढ! "तु पुढच्या सुट्टीत येशील ना...?त्या चांदण्या त्याच्या चंद्राची वाट पाहतायत तसच मी पण तुझी वाट पाहीन..." "खरच तु माझी वाट बघणार ना...? म्हणजे मी मी तुझा चंद्र आहे?" ती पुढे काही बोलणार इतक्यात... "खुशीssssssss.......!!" आईचा आवाज कानावर आला तशी ती पटकन उठली... "उद्या जायच्या आधी इकडे मला भेटायला ये हा... मी तुझी वाट पाहीन...!" "खुशीssssssss.....!" पुन्हा आईचा आवाज कानी पडला... तशी ती तिचा घेरदार फ्रॉक दोन्ही हातात पकडून आवाजाच्या दिशेने धावत निघुन गेली.... आणि त्याच वेळी चंद्रच्या मंद प्रकाशात त्याच्या नजरे समोर काहीतरी चमकलं... तसा तो पटकन पुढे झाला अन् जमिनीवर पडलेली ती वस्तू उचलली... "पैंजण......!! तीच पैंजण..... खुssssssss....शी....!" तिला आवाज देत तिच्या घराच्या दिशेने निघालाच होता की... तितक्यात त्याला पाठीमागुन कोणी तरी आवाज दिला...... "शानsssssss....... किती वेळा सांगितल तुला....!! संध्याकाळच्या वेळी इकडे येत जाऊ नकोस म्हणुन..... चल पटकन तुझी मॉम आलीय.....!!" मुख्य रस्त्या पासून थोड आत त्यांच्या शेतात असलेल्या तिच्या घराकडे तो बघत होता आणि मामा त्याचा हात पकडून त्याला ओढून घेऊन जात होता.... दुसऱ्या दिवशी निघण्या पूर्वी सर्वांची नजर चुकऊन तो तिला भेटायला आला खरा पण तीच अँकलेट आणायचं विसरूनच गेला... तिच्या घराच्या मागच्या बाजूला चिंचे च डेरेदार झाड होत... तिकडे एका लाकडाच्या ओंडक्यावर बसून केव्हा पासून ती त्याची वाट बघत होती... "खुशीssssssss........!" त्याचा आवाज कानी पडला... तशी तिच्या गोबऱ्या गालावरची खळी खोल होत गेली... ते पाहून त्याच्या चेहऱ्यावर स्मित पसरल... "आलास तु......!" पटकन उठून त्याच्या समोर येत तिने विचारल... डोळ्यात निराळीच चमक होती तिच्या.. "मला तर वाटल तु मला न भेटताच निघुन गेलास... पुढच्या सुट्टीला नक्की येशील ना...?" तिने अधीरतेने विचारल.. "अ हो, नक्की येईन... हे बघ मी तुझ्या साठी काय आणलंय?" त्याने आपली छोटीशी ओंजळ तिच्या समोर ओपन केली... त्यात संगमरवरी डोक्यावर लाल रंगाचा मुकुट आणि सोनेरी नक्षी असलेली बाप्पाची सुबक अशी छोटीशी मूर्ती होती.. "अय्या..... गणू....!!" तिच्या इवल्याश्या डोळ्यात आनंद मावत नव्हता... "हम्म... जत्रेत घेतला होता... तुला द्यायला आत्ता माझ्याकडे काहीच नाही... माझी आठवण म्हणुन ठेव तुझ्या जवळ... तुला माझी आठवण आली ना की याला सांग, मग तो मला सांगेल.. मॉम म्हणते आपल कोणी दूर असेल आणि त्याला निरोप द्यायचा असेल तर बाप्पा जवळ दिला तर बाप्पा आपल्या व्यक्ती पर्यंत आपला निरोप पोहचवतो...!" तो बोलत होता आणि ती कसल्याश्या विचारात पडलेली... "म्हणजे पुढच्या वर्षी तुला सुट्टीत ये म्हणुन मी याच्या जवळ सांगितल तर हा तुला माझा निरोप देईल?" तिच्या डोळ्यात चमक आणि प्रश्नाचीन्न होत.. "हो.... अरे यार खुशी.... मी तुझ पैंजण आणायचं विसरूनच गेलो.. काल संध्याकाळी तिकडे तुझ पैंजण पडल होत... तु गेलीस आणि मग मला ते दिसलं....!!" "शानsssssss......... मूर्ख आहेस का तु.....!!" मामाचा रागीट आवाज कानावर पडला तस दचकून त्याने मागे वळून पाहील... मामाचे डोळे रागाने लाल बुंद झालेले पाहून तो घाबरला... "तुला अक्कल आहे का...? आम्ही तिकडे तुला शोधतोय आणि तु इकडे! कसल्या गप्पा मारता रे तुम्ही???" पटकन पुढे येऊन मामाने त्याचा हात घट्ट पकडला आणि त्याला आपल्या मागे ओढत घेऊन जाऊ लागला... मागे उभ्या खुशीचे डोळे अश्रुनी काटोकाट भरले होते... हातातल्या बाप्पाच्या मूर्ती कडे आणि त्याच्याकडे ती डोळे भरून पाहत होती.. त्याचा तिरसट स्वभावाचा मामा त्याला एखाद्या जनावरा सारखा ओढत घेऊन निघाला होता... आणि तो भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे मागे वळून बघत होता... "खुशीssssss...... पुढल्या सुट्टीत नक्की येईन मी...!!" तो थोड थांबून म्हणला.. तसा मामाने त्याच्या हाताला जोराचा झटका दिला अन् पुढे ओढल... "आता परत नाही कोण आणणार त्याला इकडे..!! गप्प चल रे...!!" पाठीमागे उभ्या खुशी कडे रागीट नजरेन बघत मामाने पुन्हा एकदा त्याच्या हाताला जोराचा हिसका दिला अन् त्याला ओढत घेऊन गेला.... "खुशीssssss.....! मी मी येईन नक्की येईन.....!!" मामाला न जुमानता तो मागे वळून तिला ओरडून ओरडून सांगत होता... "खुशी...... मी येईन तुला भेटायला..... नक्की येईन....!!" घामाघूम झालेला तो तोंडातल्या तोंडातच बडबडत उठून बेडवर बसला.... अन् कावऱ्या बावऱ्या नजरेन आजूबाजूला पाहू लागला... सर्वांग घामाने चिंब भिजलं होत.... एसी च्या थंड हवेत ही त्याच्या घशाला कोरडं पडलेली.. त्याने दोन्ही हातांनी चेहऱ्यावरचा घाम पुसला अन् तसेच केसातून हात मागे घेत मान वर करून डोळे गच्च मिटून घेत एक उसासा सोडला... "ओह्ह्ह...... शिट्ट आज पुन्हा स्वप्न...!!! खुशी कुठे आहेस यार तु.....!" त्याने एक आवंढा गिळला... अन् उठून बाहेर बाल्कनीत आला.... पहाटेची थंड हवा शरीराला स्पर्शून गेली... तस त्याच मन तिच्या आठवणीने अधिकच व्याकुळ झाल... 'गेल्या दहा वर्षात सर्वच किती बदलून गेलय.... मी तुला पुढच्या सुट्टीत भेटायला येईन असं प्रॉमिस केल पण नाही येऊ शकलो.... तु खुप वाट पाहिली असशील ना ग माझी...? इतकुशी बारा तेरा वर्षाची खुशी..... या दहा वर्षात तु पण खुप बदलली असशील ना ग....? त्या आकाशातल्या चांदण्या जशा त्यांच्या चंद्रा साठी रात्र रात्र जागतात तशी तु पण माझ्या आठवणीत जागत असशील ना ग...? खुशी तु मला विसरून तर गेली नसशील ना.?' "इशूsssssss.......!" आईचा आवाज कानात घुमला तसे त्याच्या मनातले विचार थांबले... "इशूsssss अरे आज तु लवकर उठलास....? बरा आहेस ना....?" आई पटकन काळजीने त्याच्या जवळ येऊन त्याला विचारत होती... "मॉम आय एम ओके....! चल मला आवरून निघायचय... आज इम्पॉर्टन्ट मिटिंग आहे...!" आत्ता पर्यंत तो वास्तवात आलेला... तशी आता त्याला कामाची आठवण झाली... तर हा आहे आपल्या कथेचा हिरो ईशान देसाई.. दिसायला स्मार्ट, डॉशिंग, उंच, गोरा वर्ण पिळदार शरीर, काळेभोर तेजस्वी डोळे, त्याच्या उभ्या फेसकटला शोभणारी ट्रिम बेअर्ड आणि डोळ्यात कमालीचा आत्मविश्वास... कामाव्यतीरीक्त कोणाशी जास्त संबंध न ठेवणारा... त्याच्यासाठी त्याची फॅमेली सर्वस्व होती.... खाली दिलेल्या लिंक वरून प्रतिलिपी अँपवर कथा वाचा.. https://marathi.pratilipi.com/series/hrwht0kda4ra?language=MARATHI&utm_source=android&utm_medium=content_series_share #✍मराठी साहित्य #🌹प्रेमरंग #✍🏽 माझ्या लेखणीतून #📚मराठी रोमांचक कथा🧐 #☺️प्रेरक विचार

745 ने देखा