-Kalpana K
1.1K views
29 days ago
#✍️भक्ती संदेश #🌻आध्यात्म 🙏 #💐संत महंत🙏 . . . ll ज्ञानेश्वरीतील ज्ञानामृत चिंतन ll . *******************. . आकाशात जाणाऱ्या ज्वाळेप्रमाणे तुझी कर्मे निष्फळ ठरू देत. कारण कर्मफलत्याग हा सर्वश्रेष्ठ योग आहे. वेळूच्या झाडाला एकदा बी आले की त्याची वाढ खुंटते त्याप्रमाणे त्या योग्याची जन्म-मरणापासून सुटका होते.' **********************************************. . आणि जेणे जणे वेळे । पडति कर्मे सकळे l . तयांचि तिथे फळे । त्यजितु जाय ll .***************[ ज्ञानेश्वरी-१२/१२८]**************** . ------- llअर्थ ll ------ . आणि ज्या ज्या वेळी जी जी कर्मे घडतील, त्या सर्वांच्या फळाची आशा धरू नकोस. . ------ll चिंतन ll----- . भगवंत म्हणतात, 'हेही करण्यास तू असमर्थ असशील तर मनाचा संयम कर आणि अनन्यभावाने मला शरण येऊन सर्व फळांचा त्याग कर.' . ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, 'हे अर्जुना, तू मला कर्म अर्पण केले नाहीस किंवा तुला ते करता आले नाही तर मी सांगतो ते ऐक. बुद्धी उत्पन्न होताना किंवा नंतर, तसेच कर्माच्या आधी अगर शेवटी माझी आठवण करणे तुला जर साधले नाही तर बुद्धीला इंद्रिय निग्रहाकडे लाव. ज्या ज्या वेळी जी जी कर्मे घडतील त्या सर्वांची फलाशा धरू नकोस. वृक्ष आणि वेली स्वतःच्या फळांचा त्याग करत त्याप्रमाणे पूर्ण झालेल्या कर्माविषयी फळाची आशा धरू नकोस. . खडकावर पडलेला पाऊस किंवा आगीत टाकलेले बी जसे व्यर्थ होते तसे जे जे कर्म करशील ते ते स्वप्नाप्रमाणे व्यर्थ आहे असे समज, आकाशात जाणाऱ्या ज्वाळेप्रमाणे तुझी कर्मे निष्फळ ठरू देत. कारण कर्मफलत्याग हा सर्वश्रेष्ठ योग आहे. वेळूच्या झाडाला एकदा बी आले की त्याची वाढ खुंटते त्याप्रमाणे त्या योग्याची जन्म-मरणापासून सुटका होते.' . अभ्यासाच्या पायरीने ज्ञान वाढते व मग ध्यान साधते. मनोवत्ती ध्यानमय झाल्या की मग कर्म आपोआप दूर राहते म्हणून हे अर्जुना, शांती मिळविण्यास हाच एक मार्ग आहे. तेव्हा अगोदर अभ्यास केलाच पाहिजे. . ll राम कृष्ण हरी, माऊली ll