Devendra Fadnavis
689 views
4 days ago
माझ्या मराठीची बोलू कौतुकें। परि अमृतातेंहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचे समन्वयक अमोल सावरकर यांनी आज झ्युरिक येथे मराठी मंचाने स्वित्झर्लंडमधील विविध शाळांमध्ये मराठी भाषेचा वर्ग सुरू करण्याचा उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले. महाराष्ट्रासाठी आणि आपल्या माय मराठीसाठी ही एक अभिमानास्पद बाब आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. जागतिक स्तरावरील या अशा उपक्रमांमुळेच मराठी भाषेचे ज्ञानभाषा व वैश्विक भाषा होण्याच्या दिशेने मार्गक्रमण आहे. 18-1-2026 📍Zurich, Switzerland. #महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस