फॉलो करा
Suraj Chavan
@429046716
495
पोस्ट
1,535
फॉलोअर्स
Suraj Chavan
703 जणांनी पाहिले
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•* *------------☆★☆★☆-------------* *🚩३० जानेवारी इ.स.१६४२* *शहाजी राजे कर्नाटकास जातात माहुलीच्या पराभवानंतर शाहजी राजे रणदुल्लाखान सोबत विजापुरास गेले. त्यांना* *आदिलशाहकरिता काम करायला मिळणार होते पण कडक जाचाखाली. लगेच त्यांना* *रणदुल्लाखान बरोबर कर्नाटकात पाठवले गेले. शाहजी राजाच्या कर्नाटकातील कार्याची अजून फारशी माहिती उपलब्ध नाही.* *त्यांना कर्नाटकात पाठवल्यानंतरचे पहिले पत्र ३० जानेवारी १६४२ सालचे आहे व ते आदिलशाहने शाहजीराजांना लिहीले आहे.* *🚩३० जानेवारी इ.स.१६८०* *छ.शिवाजीराजांच्या फौजा खांदेरी उंदेरी बेटावर तटबंदीचे काम अहोरात्र करत होत्या.* *इंग्रजाच्या तोफा आग ओतत होत्या अखेर बेटावरील मराठ्याच्या मदतीला दौलतखान आरमारासह पोहचला यामुळे इंग्रजाना माघार(शरनागती) घ्यावी लागली.* *🚩३० जानेवारी इ.स.१६८१* *छत्रपती शंभूराजांनी "बुन्हाणपूर शहराच्या तटबंदीबाहेरील बहादूरपुरा व इतर १७ पुरे अलोट संपत्ती मिळवली. यावेळी बु-हाणपूरचा सुभेदार खानजमान याने मराठ्यांना प्रतिकार न करताच बुन्हाणपूराचे दरवाजे बंद करून घेतले.* *≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* *आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇 *♠️ अजय सोनवणे* https://wa.me//918605494249 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #🙏आई एकविरा 🙏 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 *≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* *WhatsApp ग्रुप लिंक* *།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१* https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA *།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२* https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb *≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* *-----------☆★۩۞۩★☆-----------* *राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा* *महाराष्ट्र राज्य* *-----------☆★۩۞۩★☆-----------* *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* *जय गडकोट* *!! हर हर महादेव !!*
Suraj Chavan
612 जणांनी पाहिले
‎*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•* ‎📜 १७ जानेवारी इ.स.१६०१ ‎असीरगड - अर्थात दख्खनचा दरवाजा ‎अकबरला या किल्ल्याची प्रसिद्धी माहित होती. असीरगढ़वर चाल करायच्या हेतूने त्याने दक्षिणेची मोहीम उघडली. जशी फारुकी बादशाहाला हि गोष्ट कळली त्याने किल्ल्यावर कडेकोट बंदोबस्त केला. हा बंदोबस्त यवढा होता कि किल्ला सर्व बाजूनी वेढला गेला तरी किल्ला १० वर्ष लढला असता. अकबराने किल्ल्याला वेढा दिला आणि दारूगोळ्याचा मारा सुरु केला. रात्रंदिवस तोफगोळ्यांचा भडीमार करूनही किल्ला ताब्यात येत नाही असे दिसल्यावर अकबराने दूत किल्ल्यात पाठवला व तहाची बोलणी करण्यासाठी फारुकी बादशाहाला आमंत्रण दिले. फारुकी बादशाहाने अकबराच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन तो तहाची बोलणी करायला बाहेर आला. जशी तहाची बोलणी सुरु झाली त्याचवेळेस अकबराच्या एका शिपायाने फारुकी बादशाहावर हल्ला केला आणि त्याला जायबंदी केले. अशा प्रकारे कुटनीतीने अकबराने फारुकी बादशाहाला कैद केले. ‎"यह तुमने मेरे साथ विश्वासघात किया" है। यावर अकबरने "राजनीति में सब कुछ जायज है।" असे उत्तर दिले. किल्लेदार आणि शिपायांना सोने-चांदी देऊन किल्ला काबीज केला. अशा प्रकारे १७ जानेवारी १६०१ ला अकबराने किल्ल्यावर जय मिळवला आणि किल्ल्यावर मुघल सत्तेला प्रारंभ झाला. ‎ ‎📜 १७ जानेवारी इ.स.१६४८ ‎आदीलशहा बादशहाने "नवाब मुस्तफाखान" यास हुकूम दीला की कर्नाटक मध्ये जाऊन त्या बगावतखोर "शहाजी भोसले" ला गिरफ्तार करा. "नवाब मुस्तफाखान" आणि "बाजी घोरपडे" प्रचंड फौज घेऊन विजापूरहून "किल्ले जिंजी" कडे निघाले. ‎ ‎📜 १७ जानेवारी इ.स.१६६३ ‎(माघ वद्य ४ चतुर्थी शके १५८४ संवत्सर शुभक्रृत वार शनिवार) ‎इंग्रज कैद्यांची सुटका! ‎ छत्रपती शिवाजी महाराजांना आधीच इंग्रजांच्या धोरणाचा पत्ता होता... व्यापाराआड देशात हातपाय पसरायची निती शिवरायांना माहीत होती.. अशातच महाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकले असता महाराजांवर, पन्हागडावर तोफा डागण्यात रेव्हिंग्टन, गिफर्ड हे आघाडीवर होते. त्यामुळे पुढे संधी मिळताच महाराजांनी या हरामखोर इंग्रजांना पकडुन कैदेत टाकले. रेव्हिंग्टन आणि गिफर्ड हे कैदेत पडून ६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला होता. मात्र पुढे रेव्हिंग्टन आजारी पडल्यामुळे त्याची काही अटींवर महाराजांनी सुटका केली पण इतरांना सोडायला मात्र, महाराज तयार नव्हते... याच काळात राजापूरचा व्यापार पण ठप्प झाला होता. सुरतेचा अधिकारी प्रे. अँड्रूजने शेवटी शरणागती चे बोलणे राहुजी सोमनाथ यांच्याकडे लावून आणि जंजिरेकर सिद्द्यांविरुद्ध मदतीची तयारी करण्याचे आश्वासन घेऊन किल्ले रायगडाहून इंग्रज कैद्यांची सुटका करण्यात आली. ‎ ‎📜 १७ जानेवारी इ.स.१६६६ ‎(पौष वद्य ७ सप्तमी शके १५८७ संवत्सर विश्वावसू वार बुधवार) ‎ नेतोजी पालकर यांना सेनापती पदावरून दूर केले. पन्हाळ्याच्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या फौजेचे दोन भाग केले. एक तुकडी स्वतःकडे ठेवली तर दुसरी नेताजींना दिली. "अदिलशाही मुलुख मारत आम्हास पन्हाळ्यास आजपासून पाचव्या दिवशी पन्हाळ्याच्या पायथ्याशी हजर व्हा" असा आदेश दिला! तरिही नेतोजी पालकर वेळेवर हजर झाले नाहीत. मात्र या चकमकीत हकनाक १००० सैनिकांची कत्तल झाली! प्रतिशिवाजी म्हणून लौकिक असलेल्या नेतोजी पालकर यांची शिस्तभंगाच्या मुळे सेनापती पदावरूनच नाही तर स्वराज्यातून हकालपट्टी करण्यात आली. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नेतोजी पालकरांचा, त्यांच्या सेनापतीपदाचा कुठलाही मुलाहिजा न बाळगता, नेतोजी पालकरांना सेनापती पदावरून तडकाफडकी दूर केले. ‎ ‎📜 १७ जानेवारी इ.स.१७७४ ‎बारभाई कारस्थान - गंगाबाई किल्ले पुरंदरवर ‎उत्तर पेशवाईत रघुनाथरावाने अन्यायाने पेशवेपद मिळविण्यासाठी केलेला प्रयत्न अयश्स्वी करणाऱ्या मराठी सेनानी व मुत्सद्दी यांचा संघ. नारायणरावाच्या वधानंतर पेशवाई मिळविण्यासाठी रघुनाथरावाने केलेल्या कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी प्रामुख्याने हा स्थापन झाला. बारभाई म्हणजे बारा माणसांचे मंडळ असे नसून काही एका हेतूने एकत्र जमलेला समूह होता. बारभाई मंडळ स्थापन झाले, तेव्हा त्यात सखाराम बापू, भगवंत बोकील, बाळाजी जनार्दन उर्फ नाना फडणीस, त्रिंबकराव पेठे, हरिपंत फडके, मालोजी घोरपडे, महादजी शिंदे, तुकोजी होळकर ही प्रमुख मंडळी होती. रघुनाथरावाला पदच्युत करून नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई हिच्या नावाने कारभार करावा; तिला मुलगा झाला तर त्यास, नाही तर दत्तक घेऊन त्याच्या नावाने कारभार करावा, असे सुरुवातीस कारस्थान ठरले. यालाच बारभाई कारस्थान म्हणतात. सखाराम बापू व नाना फडणीस हे कारभारी आणि त्रिंबकराव पेठे यांच्याकडे फौजेची अखत्यारी ठेवावी असे ठरले. पार्वतीबाई आणि गंगाबाई यांना मारण्याचा कट उघडकीस येताच सखारामबापू नाना फडणीस, हरिपंत फडके यांनी गंगाबाईला पुण्याहून १७ जानेवारी १७७४ रोजी पुरदंरच्या किल्ल्यावर नेले आणि तिच्या नावाने कारभार सुरू केला. त्यामुळे रघुनाथराव व बारभाई संघ असा उघड सामना सुरू झाला. ‎ ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇 ‎*♠️ अजय सोनवणे* ‎https://wa.me//918605494249 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🙏आई एकविरा 🙏 #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*WhatsApp ग्रुप लिंक* ‎*།། राजा श्री शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१* ‎https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA ‎ ‎*समुह क्र.०२* ‎https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb ‎ ‎*-----------☆★۩۞۩★☆-----------* ‎*राजा श्री शिवछत्रपती,* ‎*इतिहास माझ्या राज्याचा.महाराष्ट्र राज्य* ‎*-----------☆★۩۞۩★☆-----------* ‎*जय जगदंब जय जिजाऊ* ‎  *जय शिवराय जय शंभूराजे* ‎           *जय गडकोट* ‎       *!! हर हर महादेव !!* ‎
Suraj Chavan
588 जणांनी पाहिले
‎*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•* ‎📜 १८ जानेवारी इ.स.१६६५ ‎इंग्रजांनी पोर्तुगिजांचा सर्वत्र पिच्छा पुरविला होता. इंग्रजांना स्वतःच्या हिमतीने तोंड देणे पोर्तुगिजांना कठीण गेल्याने त्यांना समेट करावा लागला. इ.स.१६६१ साली इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये मैत्रीच्या वाटाघाटी सुरू झाल्या. पोर्तुगिजांच्या राजाने इंग्लंडची सदिच्छा संपादन करण्यासाठी आपली कन्या कॅथरीना ही इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याला देण्याचे ठरविले. २३, जुन इ.स.१६६१ या दिवशी विवाहाचा करार पार पडला. पोर्तुगालच्या राजाने आंदण म्हणून मुंबई बेट इंग्लंडच्या राजास बहाल केले. शिवाय २० लक्ष पोर्तुगीज "कुझादश्" आणि आफ्रिकेतील "टंजियर" शहरही दीले. वरिल विवाह यशस्वी झाला, त्याचे कारण म्हणजे इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा हा प्रॉटेस्टंट तर कॅथरिन ही कॅथलिक होती. परंतु विवाहाच्या कराराप्रमाणे मुंबई बेट इंग्लंडच्या राजास मिळालेच. हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावरील हे सागरी महत्त्वाचे ठिकाण पोर्तुगिजांच्या हातचे गेल्यास हिंदुस्थानातील पोर्तुगीज हितसंबंधांवर अनिष्ठ परिणाम होतील, अशा आशयाचे कळकळीचे पत्र, गोव्याचा व्हिसेरेई लुईज द मेंदोंस फुर्ताद याने आपल्या राजास लिहीले होते. इतकेच नव्हे तर गोव्याचा गव्हर्नर आंतोनियू मेलू द काश्तू याने मुंबईचे हस्तांतर करण्यासही नकार दिला होता. परंतु राजाची आज्ञा त्याला अखेर मान्य करावी लागली. ‎ ‎📜 १८ जानेवारी इ. स.१६६६ ‎गोव्याच्या गव्हर्नरने पोर्तुगालच्या राजास पाठविलेल्या पत्राची नोंद! छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी करून मोगल साम्राज्यातील हा अग्रगण्य बंदराची लुट केली, तेव्हा पोर्तुगिजांनी थक्क होऊन तोंडात बोटे घातली. औरंगजेबासारख्या आशिया खंडातील बलाढ्य बादशहाची कुरापत काढण्याचे धाडस तोपर्यंत कुणालाच आले नव्हते. ते धाडस महाराजांनी केल्याने त्यांनी महाराजांची तुलना सिकंदर आणि ज्युलियस सीझर या दोघांशी केली. "छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगल आणि आदिलशहा या दोघांच्या सैन्यामधून विद्युल्लतेप्रमाणे वाट काढून सुरतेवर हल्ला केला. त्या शहराची त्यांनी मनसोक्त लुट केली. व आपल्याच प्रदेशाच्या हद्दीवरून ते माघारी परतले. सुरतेच्या लुटीमुळे मोगल बादशहा औरंगजेब क्रोधाविष्ट झाला असून आपला एक अव्वल दर्जाचा सरदार महाराजा जसवंतसिंग याला त्याने महाराजांवर मोठे सैन्य देऊन पाठविले आहे. ‎ ‎📜 १८ जानेवारी इ.स.१६७५ ‎शिवाजी महाराजांनी मुरुड-जंजिरा समोर कांसा उर्फ़ पद्मदुर्ग उभा करून सिद्दीला थेट आव्हान दिले होते. त्या जलदुर्गाचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणुन, प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला आरमारास रसद पोचवायचे काम दिले होते. या कामात हयगय केल्याबद्दल शिवरायांनी जिवाजी विनायक याला कडक शब्दात ताकिद देणारे पत्र लिहिले. ‎त्यात ते म्हणतात,”ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो?” पुढे राजे म्हणतात,”या उपरी बोभाट आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही, गनिमाचे चाकर गनीम जालेस ऐसे जाणून बरा नतिजा तुम्हाला पावेल. ताकीद असे. ‎पुढे शिवरायांच्या निधनानंतर "छत्रपती संभाजी महाराज" यांनी त्या जलदुर्गाचे काम पूर्ण केले. त्यास नाव दिले "किल्ले पद्मदुर्ग". ‎ ‎📜 १८, जानेवारी इ. स. १६८५ ‎(पौष वद्य ८, अष्टमी, शके १६०६, संवत्सर रक्ताक्ष, वार रविवार) ‎शहजादा अकबराचे छत्रपती संभाजी महाराजांस पत्र! ‎            शहजादा अकबराने छत्रपती संभाजी महाराजांना पत्र लिहून, कवी कलशांचा पराक्रम कथन केला. या पत्रात तो लिहितो..., "छत्रपती संभाजी राजे I. यास विदित व्हावे, मोगल घटाखाली उतरून आले त्यावेळी कवी कलशाने ठाण मांडून झुंज दिली. हे महमुदखान व खिदमतखान यांच्या लीहिण्यावरून कळले. कवी कलश हे आपले उत्कृष्ठ सेवेत असून (कोणाच्या मत्सराने त्यांचा नाश होईल असे परमेश्वर न करो. कवी कलशावर आपली कृपा राहावी आणि आपण त्याचे कल्याण करावे हे योग्य होय. आतापर्यंत मोगल माघारी परतले असतीलच. तुमच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही खेळण्याकडे रवाना झाला असाल तसे आम्हास कळवावे. म्हणजे मी पण या मोहिमेत तुमच्याबरोबर राहीन." या आशयाचे हे पत्र असून जेधे शकावलितील "शके १६०७ रक्ताक्षी संवत्सरे पौष वघ ४ चतुर्थी शाबुदीखान (शहाबुद्दीनखान) पुण्याहून दौड करून बोरघाटे उतरून गांगोलीस आला. कवी कलश जाऊन भांडण दिले. फीरोंन रोज घाटावरी घातला" अशी नोंद आहे. ‎ ‎📜 १८ जानेवारी इ.स.१७६१ ‎नानासाहेबांनी १८ जानेवारी सन १७६१ रोजी माळव्याहून सदाशिवराव भाऊसाहेबांना जे पत्र लिहून पाठवले आहे त्यात ते म्हणतात "अब्दालीस कोंडून धरावे" याचा अर्थ पानिपतवरील घडलेल्या विपरीत घटना नानासाहेबांना कळाल्या नव्हत्या ते त्या काळी शक्यही नव्हते. कारण पानिपत ते माळवा यातील अंतर ६५० किमी आहे. ‎नानासाहेबांना पानिपतवरील घटनेची सांकेतिक बातमी भेलसा येथे दिनांक २४ जानेवारी रोजी समजली. भेलसा पानिपतपासून सुमारे ५६० किलोमीटरवर आहे. ‎ ‎📜 १८ जानेवारी इ.स.१७६८ ‎राणोजींची राजपूत पत्नी चिमाबाई हिच्या पोटी जन्माला आलेले महादजी हे राणोजी शिंद्यांचे कनिष्ट पुत्र होते. १८ जानेवारी १७६८ रोजी महादजी शिंदे वयाच्या चाळीशीत गादीवर आले ते १७९४ पर्यंत वयाच्या सत्तरीपर्यंत आपल्या अतुल्य पराक्रमाच्या जोरावर सत्तेत राहिले. शिंदे होळकरांनी पुढे इतिहास घडवला. नजीबाच्या शत्रुत्वामुळे आपले दोन बंधू मृत्युमुखी पावले म्हणून महादजींनी त्याचा निर्वंश करायची शपथ घेतली होतीआणि ती पूर्णत्वास नेली नजीबाची राजधानी घौसगढ महादजींनी जमीनदोस्त केली..आणि नजीबाची कबर फोडून त्याचे प्रेत जाळले..नराधम नजीबाचा नीच नातू गुलाम कादर ह्यालाही महादजी शिंदेही यातनामय मरण देऊन त्या चांडाळाचा निर्वंश केला होता. ‎ ‎📜 १८ जानेवारी इ. स. १७८८ ‎गोव्याच्या व्हिसेरेईने पोर्तुगालच्या राज्य सचिवास लिहीलेल्या पत्राची नोंद! ‎          "कोल्हापूरचा राजा व भोसले या दोघांचे संबंध सांप्रत बिघडले आहेत. भोसल्यांना अद्दल घडवावी असा कोल्हापूरच्या राजाचा विचार दिसतो. आणि हे युद्ध जर झाले तर आम्ही आपणाला भोसल्यांविरूद्ध मदत करावी, अथवा मदत करणे शक्य नसल्यास तटस्थता तरी पाळावी अशी मागणी कोल्हापूरच्या राजाने आमच्याकडे केली आहे.' ‎ ‎📜 १८ जानेवारी इ.स.१७९३ ‎छत्रपती प्रतापसिंह भोसले यांचा जन्म ‎(मृत्यू -४ ऑक्टोबर १८४७) ‎महाराष्ट्रातील एक सद्‌गुणी, प्रतापसिंह भोसले प्रतापसिंह भोसले प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजा. हा छत्रपती दुसरा शाहू (कार. १७७७-९८) व आनंदीबाई यांचा थोरला मुलगा. छत्रपती शाहूनंतर साताऱ्याच्या गादीवर आला. ‎सवाई माधवराव (कार. १७७४-९५) पेशवेपदावर असताना नाना फडणीस मुख्य कारभारी होता आणि छत्रपती पहिला शाहू यांनी स्वहस्ते लिहून दिलेल्या दोन याद्यांप्रमाणे मराठी राज्याचे पुढारीपण पेशव्यांकडे आले होते, तरी सवाई माधवरावाने छत्रपतिपदाची प्रतिष्ठा सामान्यतः राखली; परंतु दुसरा बाजीराव (कार १७९५-१८१८) पेशवेपदी आल्यावर त्याने हळूहळू छत्रपतिपदाचा अवमान करण्यास प्रारंभ केला व अखेरीस छत्रपती प्रतापसिंहांना त्याने प्रायः सातारच्या किल्ल्यात नजरकैदेत टाकले. ‎हे सहन न होऊन छत्रपतींचा सेनापती चतुरसिंग भोसले याने पेशव्यांविरुद्ध बंड केले (१८०९). ते बंड पेशव्यांतर्फे सेनापती बापू गोखले याने मोडले; पण त्यामुळे दुसऱ्या बाजीरावाने प्रतापसिंहाची नजरकैद अधिकच कडक केली. त्या वेळचा इंग्लिश रेसिडेंट मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टन याने या परिस्थितीचा फायदा घेऊन दुसऱ्या बाजीरावाशी युद्ध सुरू केले. ‎हे करताना त्याने प्रकटे केले, की ‘मी छत्रपतींना पेशव्यांच्या जाचातून सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. मला पेशव्यांचे राज्य बुडवावयाचे असून छत्रपतींची सत्ता राखावयाची आहे.’ परिणामतः अष्टी (सोलापूर जिल्हा) येथे झालेल्या शेवटच्या इंग्रज-मराठे लढाईत (१८१८) प्रतापसिंह इंग्रजांच्या सैन्याबरोबर होते. पेशवाईच्या अस्तानंतर एल्फिन्स्टनने प्रतापसिंह यांना छत्रपतींच्या गादीवर ११ एप्रिल १८१८ साली पुन्हा नेऊन बसविले. ‎ ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇 ‎*♠️ अजय सोनवणे* ‎https://wa.me//918605494249 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #🙏आई एकविरा 🙏 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*WhatsApp ग्रुप लिंक* ‎*།། राजा श्री शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१* ‎https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA ‎ ‎*समुह क्र.०२* ‎https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb ‎ ‎*-----------☆★۩۞۩★☆-----------* ‎*राजा श्री शिवछत्रपती,* ‎*इतिहास माझ्या राज्याचा.महाराष्ट्र राज्य* ‎*-----------☆★۩۞۩★☆-----------* ‎*जय जगदंब जय जिजाऊ* ‎  *जय शिवराय जय शंभूराजे* ‎           *जय गडकोट* ‎       *!! हर हर महादेव !!* ‎
Suraj Chavan
637 जणांनी पाहिले
‎*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•* ‎📜 १९ जानेवारी इ.स. १३११ ‎वारंगळच्या लुटीतच जगप्रसिद्ध कोह-इ-नुर (कोहिनूर) हिरा मलिक काफुरच्या  हातात सापडला. तो हिरा मलिक काफूरने जून १३१० मध्ये दिल्लीला माघारी जाऊन अल्लाउद्दीनला भेट केला. वारंगळची लुट बघून अल्लाउद्दीनचे डोळे लकाकले आणि त्याच्या लक्षात आले की भारताचा दक्षिण भूभाग अधिक समृद्ध आहे. म्हणून त्याने कर्नाटकातील द्वारसमुद्र म्हणजे नंतरचे हलेबिंदू येथील होयसला साम्राज्य जिंकण्यासाठी पुन्हा मलिक काफूरला दहा हजार सैन्यासह दक्षिणेकडे पाठवले. १९ ऑक्टोबर १३१० ला मलिक काफूर दहा हजार सैन्यासह दक्षिणेकडे निघाला आणि बरोबर तीन महिन्यानंतर त्याची गाठ गुणवडीजवळ करणसिंह गावडे आणि त्यांच्या सैन्याबरोबर पडली. वाटेत लागतील ती गावे लुटायची, स्रियांचे अपहरण करायचे, लोकांना बळजबरीने धर्मांतरे करायला लावायची हाच क्रुर मलिक काफूरचा एक कलमी कार्यक्रम होता. त्याच्यासमोर कोणाचाच टिकाव लागत नव्हता.  पण गुणवडी गावातील दत्तोबा मंदिराजवळ असणा-या भुयाराजवळ  सुर्यकुल कुलभूषण श्री करणसिंह गावडे यांच्या आणि भीमराव गावडे यांच्या नेतृत्वाखाली सगर राजपूत आणि काही ब्राम्हण योद्धे असे अकराशे जणांचे एक पथक त्या मलिक काफूरचा प्रतिकार करण्यासाठी जमले होते. १९ जानेवारी ते २० जानेवारी १३११ असे दीड दिवस हे घनघोर युद्ध चालले होते. एका बाजूला मलिक काफूरचे दहा हजार सैन्य तर दुस-या बाजूला फक्त अकराशे योद्धे. शेवटी दीड दिवसांच्या संग्रामानंतर २०जानेवारी १३११ या दिवशी २२ सगर योद्धे या ठिकाणी मारले गेले. ‎ ‎📜 १९ जानेवारी इ.स.१५९७ ‎#महाराणा_प्रताप_यांचा_स्मृतिदिन ‎(जन्म ९ मे १५४०) ‎राणा प्रतापसिंह गुहिलोत ह्या राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राजा. उदयसिंहाचा पुत्र. प्रतापसिंह गुहिलोत ह्या नावाने हा राजस्थानात प्रसिद्ध आहे. उदयसिंहाने जगमल ह्या आपल्या आवडत्या पुत्रास गादीचा वारस नेमले होते; परंतु प्रतापसिंहाच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रतापास १ मार्च १५७२ रोजी महाराणा केले. तो महाराणा झाला त्यावेळी राजधानी चितोड शत्रूच्या हातात गेली होती. अनेक राजपूत अधिपतींनी अकबराचे स्वामित्व पतकरले होते व काहींनी आपल्या मुली त्यास देऊन शरीरसंबंध जोडला होता; पण राणाप्रतापने त्याच्यापुढे मान लवविली नाही. त्याने चितोड अकबराच्या हातून स्वतंत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि आपले वास्तव्य अकबराच्या सैन्याच्या दृष्टिक्षेपापासून दूर ठिकाणी केले. प्रजेला अरवलीच्या डोंगराळ भागात, जेथे अकबराचा उपद्रव पोहोचणार नाही, अशा ठिकाणी वस्ती करण्यास लावले. तेथेच त्याने काही भागात शेती केली. मेवाडचा मैदानी प्रदेश ओसाड करून टाकला आणि आपली राजधानी गोगुंड येथे नेली. सर्व डोंगरभागांतून अभेद्य असे किल्ले बांधले व ते शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केले. अकबराचे स्वामित्व न पतकरल्यामुळे त्यास मोगलांशी अखेरपर्यंत झगडा करावा लागला. अकबराने मानसिंह आणि आसफखान यांच्याबरोबर मोठी सेना देऊन त्याच्यावर पाठविले. २१ जून १५७६ रोजी हळदीघाटच्या घनघोर लढाईत प्रतापसिंहाचा पराजय झाला, तरी तो तीतून निसटला आणि राजस्थानच्या दऱ्याखोऱ्यांतून त्याने मोगलांशी गनिमी काव्याने संघर्ष चालू ठेवला. त्यांच्या रसदा तोडल्या, खजिने लुटले. अकबर स्वतः त्याच्यावर चालून गेला पण त्याला प्रतापला न जिंकताच परत फिरावे लागले. त्याची पाठ वळताच प्रतापने आपले गेलेले सर्व किल्ले परत मिळविले. यानंतर त्याने पुढे १२ वर्षे शांततेने राज्य केले. ह्यावेळी अकबर हा पंजाब व दक्षिण भारत ह्या दोन ठिकाणी आपली सत्ता स्थिर करण्याच्या बेतात होता. त्यामुळे त्याने पुढे प्रतापकडे लक्ष दिले नसावे. राणाप्रतापास परचक्राची फार चिंता होती. म्हणून त्याने आपल्या सरदारांकडून तुर्कांपासून आपल्या देशाचे रक्षण करण्याचे प्रथम वचन घेऊन नंतर आपल्या अमरसिंह ह्या पुत्राच्या हाती राज्य सोपविले व प्राण सोडला. अकबरानेही त्याची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. कर्नल टॉड म्हणतो, ‘प्रतापचे नाव अजूनही पूज्य मानले जाते आणि पुढेही एखाद्या नवीन जुलमी राजसत्तेकडून राजपुतांत शिल्लक असलेली देशाभिमानाची ठिणगी विझेपर्यंत ते नाव पूज्यच मानले जाईल.’ ‎ ‎📜 १९ जानेवारी इ.स.१६३६ ‎निजामशाही संपवायची ह्या ध्येयाने शहाजहान निघाला होता. त्याने हांडियाजवळ नर्मदा ओलांडली. इथूनच ९ जानेवारीला आदिलशाहला पत्राने तंबी दिली की निजामशाहीमधल्या शाहजी राजा बरोबर असलेल्या सरदारांना पाठिंबा मिळता कामा नये. वर हे सुद्धा लिहीले की त्याने देय असलेली वार्षिक खंडणी १० मार्च १६३६ पर्यंत दौलताबादला पाठवावी. ह्यासाठी शाहजहानने सोलापूर, त्याच्या आसपासचा परिसर व वांगीचा भाग निजामशाहिकडील भाग आदिलशाहला देऊ केले. ह्या परिसरातून वर्षाला नऊ लक्ष होनाचे उत्पन्न येत होते. १९ जानेवारी १६३६ ला शेख दबीर व इतर काही आदिलशाही वकील शाहजहानला भेटले. त्यानंतर ५ फेब्रुवारीला शाहजहानने खानजमान, खानदौरान व शाहिस्ताखान यांना निजामशाहीचा परिसर जिंकण्यासाठी धाडले. ‎ ‎📜 १९ जानेवारी इ.स.१६६५ ‎(माघ शुद्ध १३, त्रयोदशी शके १५८६, संवत्सर क्रोधी, वार गुरुवार) ‎मिर्झाराजे जयसिंग आले! ‎          ९ जानेवारी इ.स.१६६५ मिर्झाराजे जयसिंगांनी हंडीया घाटातून नर्मदा ओलांडली अन् १३ जानेवारी इ.स.१६६५ ला ते बुर्हानपुरास पोहोचून वेळ न दवडता पुढे कुच कुच केले. मिर्झाराजे जयसिंगांनी बर्हाणपुर सोडून औरंगाबादच्या दिशेने प्रवास सुरू केला.मिर्झाराजे जयसिंगांनी पहिल्या प्रवासात कुठेही वेळ दवडला नाही. ‎ ‎📜 १९ जानेवारी इ.स.१६८२ ‎(माघ वद्य षष्ठी, शके १६०३, संवत्सर दुर्मती, वार गुरुवार) ‎          सिद्दी कासीम हा पावसाळा तेथेच काढील या भितीने मुंबईकर चिंतातुर झाले आणि मुंबईकरांनी सुरतकरांना कळविले की "सिद्दीचे आरमार मुंबई बंदरात येत आहे आणि सिद्दीवर छत्रपती संभाजी महाराज फारच, क्रृद्ध झाला असून सिद्दीवर छत्रपती संभाजी महाराज तुटून पडणार आहेत. तेव्हा सिद्दीला पावसाळ्यात मुंबई बंदरावर ठेवणे, आपणास त्रासदायक ठरेल तेव्हा त्यास तेथून हालविण्याबाबत निर्णय करावा." ‎ ‎📜 १९ जानेवारी इ.स.१६८२ ‎(माघ वद्य षष्ठी, शके १६०३, संवत्सर दुर्मती, वार गुरुवार) ‎दंडाराजपुरीवर छत्रपती संभाजी महाराजांचे प्रखर हल्ले! ‎            दंडाराजपुरीवर छत्रपती संभाजी महाराजांचे प्रखर हल्ले सुरूच होते. समुद्रावर ख्रिस्ती, हबशी सत्ता नामशेष करण्याचे छत्रपती संभाजी महाराजांनी ठरविले होते. त्यामुळे साम, दाम, दंड, भेद या नितीचा वापर करून छत्रपती संभाजी महाराजांच्या आदेशानुसार मराठी सैन्य दंडाराजपुरीवर तुटून पडले होते. 'याचा सर्वात जास्त त्रास इंग्रजांना होत होता. ‎ ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇 ‎*♠️ अजय सोनवणे* ‎https://wa.me//918605494249 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #🙏आई एकविरा 🙏 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*WhatsApp ग्रुप लिंक* ‎*།། राजा श्री शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१* ‎https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA ‎ ‎*समुह क्र.०२* ‎https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb ‎ ‎*-----------☆★۩۞۩★☆-----------* ‎*राजा श्री शिवछत्रपती,* ‎*इतिहास माझ्या राज्याचा.महाराष्ट्र राज्य* ‎*-----------☆★۩۞۩★☆-----------* ‎*जय जगदंब जय जिजाऊ* ‎  *जय शिवराय जय शंभूराजे* ‎           *जय गडकोट* ‎       *!! हर हर महादेव !!* ‎
Suraj Chavan
585 जणांनी पाहिले
#🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🙏आई एकविरा 🙏 #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 जानेवारी... अर्थात हिंदू शिरोमणी, महादेव भक्त, हिंदू धर्माभिमानी, राष्ट्रभक्त, रणधुरंदर, हिंदू नरेश, महाबली श्री महाराणा प्रताप यांची पुण्यतिथी! 😞🚩🙏🏻🌺⚔️🇮🇳 इक्बाल था बुलंद, उसे धूल कर दिया । मद जिसका था प्रचंड, सारा दूर कर दिया ॥ राणा प्रताप इकलोते थे, ऐसे वीर जिसने । अकबर का सारा घमंड चूर चूर कर दिया ॥ *वीर महाराणा प्रताप यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🥺🙏🏻⚔️🚩🇮🇳*
Suraj Chavan
631 जणांनी पाहिले
‎*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•* ‎📜 २१ जानेवारी इ.स.१६५५ ‎शहाजीराजांचे मोरया गोसाविंकडून नव्याने कुठलेही कर घेऊ नये याविषयी पुणे व सुपे परगण्याच्या कारकुनांना ताकीद पत्र, ‎अज रख्तखाने राजश्री शाहाजी राजे दामदौलतहु बजानेब कारकुनांनी हाल व इस्तकबाल व देसमुखानी पा| सुपे बिदानंद सु|| खमस खमसैन अलफ राजेश्री मोरोवा गोसावी सो|| चिंचवड पा|| पुणे यांचे बाबे रघुनाथ खेडकर येही हुजूर येऊन माळूम केले जे गोसावी यास इनाम पा|| मा|| बा||फर्मान व खुर्दखते वजीरानी व बा|| खुर्दखते रख्तखाना गह्दम सालाबाद ता|| सालुगा||कुलबाब कुलकानु दुमाले चालत असता साल माराकारणे कारकून नवी जिकीर करून गोसावियाचे इनामावरी कनकगिरीपटी नवी बाब जाली आहे ते घाळून पैकीयाची तहसील लाविली आहे व आणखी नविया पटिया जालिया आहेती त्याही घाळून घेऊन म्हणताती तरी ये बाबे माहाराज्रे ताकीद खुर्दखत मर्हामती करून कनकगिरीपटीची व आणिक नवे पटीयाची तसवीस न लगे व उसापती केली असेल टे फिराउन देती यैसा हुकुम केला पाहिजे म्हणौनू माळूम केले तरी गोसावियाचे इनाम कुलबाब कुलकानु ता|| सालगुदस्ता बा|| सनद दुमाले असता सालमा||कनकगिरीपटी घाळूनु त्यास तहसील लावणे व आणिखी नविया पटीया घाळूनु घेउनू म्हणणे हे तुम्हास कोण फर्मावले आहे यावरून तुमचे कारकुनीची बूज जाहीर जाली आता खुर्दखत पावताच याचे इनामावरील कनकगिरीपटी घेतली असेली व टे आणिखी नविया पटीया काही घातलिया असतील तरी त्या दुरी करणे काही उचापती केली असेल तरी टे जराबजरा फिराउन देवणे त्याचा एक रुका ठेविलियावरी साहेब तुमची नुरी ण ठेवीत पेस्तर हरयेक बाब येकजरा याचे इनामाचे वाटे नव जाणे सालाबाद चालिलेप्रमाणे चालवणे तालिक घेऊन असल खुर्दखत फिराउन देणे फिर्यादी येऊ ण देणे पा|खा|| जैनाखान पिरजादे बा|| ‎ ‎📜 २१ जानेवारी इ.स.१६६२ ‎शिवरायांचा कोकणात अमल ! ‎शके १५८३ च्या माघ शु. १२ रोजी श्री छत्रपती शिवाजीमहाराज यांनी तळकोकण काबीज करून तेथे आपला एक अमल बसविला. ‎ विजापूर दरबारने अफझलखानास आपल्यावर पाठविले याबद्दल शिवरायांच्या मनांत राग होता. त्याचा सूड घेण्यासाठी कल्याण पासूनच्या दक्षिण किनाऱ्यावर त्यांनी आपले लक्ष वेधवून घेतले. आदिलशहाच्या ताब्यातील तेथील प्रदेश सोडवावेत व पश्चिमेकडील व्यापान्यांचाही बंदोबस्त करावा असा दुहेरी हेतु शिवरायांचा होता. दाभोळ, राजापूर, कारवार इत्यादि धनाढ्य बंदरांच्या आश्रयास राहून युरोपियन व्यापारी सिद्दीस मदत करीत. तेव्हां त्यांची ही ठाणे उठवणे अगत्याचे होते. म्हणून शिवरायांची स्वारी आता या उद्योगास लागली. कोंकणांतील श्रीमंत शहरे व पेठा हस्तगत केल्या. निजामपूर, दापोली, पालवण, संगमेश्वर वगैरे ठिकाणे हस्तगत केली. पुढे शिवराय राजापुरास आले. तेथील इंग्रजांची वखार लुटून उपद्रव देणाऱ्या सहा इंग्रजांना त्याने कैदेत ठेविले. सर्व प्रदेश ताब्यात आल्यावर प्रचितगड, पालगड, मंडनगड हे किल्ले त्यांनी नवीन बांधले. सर्वत्र शिवरायांचे वर्चस्व प्रस्थापित होऊन तळकोकण महाराजांस अजोनी झाले. ‎कोकण हस्तगत झाल्यावर शिवरायांची फौज दाभोळवर आली. या संपन्न बंदरात अफझलखानाची तीन जहाजे होती. ती घेऊन तेथील अमलदार राजापुरास पळून गेला. खानाची तन जहाजे इंग्रजांच्या आश्रयास गेली. इंग्रज सुखासुखी जहाजे शिवरायांकडे देत नव्हते. अफझलखानाची दुर्दशा सर्वत्र जाहीर झाली होती. शिवरायांचे नाव ऐकताच भीतीने वखारीचा मुख्य रेव्हिंग्टन हा बंदर सोडून भर समुद्रातून पळून गेला. पुढे रॅडॉल्फ टेलर, रिचर्ड टेलर, गिफर्ड इत्यादि इंग्रजांनी काही आगळीक केली म्हणून शिवरायांनी त्यांना कैदेत ठेविले, शिवाजीच्या अधिकार्याने इंग्रजांना कळविले, " महाराजांस सिद्दीचे ताब्यातून दंडा राजपुरी घ्यावयाची आहे, त्या कामी तुम्ही मदत करीत असाल तर तुम्हास मोठे बक्षिस देऊ, नाही तर दंड भरल्याशिवाय तुमची सुटका व्हावयाची नाही." ‎ ‎📜 २१ जानेवारी इ.स.१७१८ ‎गोव्याच्या व्हिसेरेईने पोर्तुगालच्या राजास लिहीलेल्या पत्राची नोंद! ‎"कोल्हापुरच्या सरदारांनी I. साष्टी प्रांतात घुसताच गोवा बेटातील रहिवाशांची नुसती पाचावर धारण बसली, आक्रमकांनी मडगाव, कुक्कल्ली आणि वेरडे ही गावे लुटली. नावेलीचे श्रीमंत चर्च त्यांनी साफ धुऊन नेले. या चर्चचा भक्तगण फार मोठा आहे." ‎ ‎📜 २१ जानेवारी इ.स.१६८८ ‎(पौष वद्य १३, त्रयोदशी, शके १६०९, संवत्सर प्रभव, वार शनिवार) ‎छत्रपती संभाजी महाराजांचे आक्रमण! ‎ आपल्या अद्वितीय पराक्रम कौशल्यावर कुतुबशाही प्रदेशातील पण मोगली अंमलाखाली प्रदेशावर प्रचंड हल्ला करून सुमारे १४० शहरे व काही किल्ले घेऊन मोगलांना नुसता तडाखा दिला नाही तर भुईसपाट केले, ती तारिख होती. ‎ ‎📜 २१ जानेवारी इ.स.१७४० ‎स्वतः शाहू छत्रपतींना बाजीरावांच्या ह्या गुणांची पुरेपूर जाणीव होती. म्हणूनच त्यांनी बहुतांश बाबतीत राऊंना स्वातंत्र्य दिले होते. त्यामुळेच अनेकदा मोहीमांवर बाजीराव परस्पर निर्णय घ्यायचे, तरी बाजीरावांच्या निष्ठेबद्दल शाहू थोडीदेखील शंका बाळगत नसत. बाजीरावांवर कधीच नाराज होत नसत. उलट १७२८ मध्ये सातारा दरबारातील पेशव्यांचे मुतालिक लिहितात (तत्रोक्त), "..राऊ स्वामींची मर्जी अवघियांनी पालावी. त्यांचे चित्तास क्षोभ करु नये"! किंवा मस्तानीच्याही संदर्भात शाहूंचे चिटणीस गोविंद खंडो दि. २१ जानेवारी १७४० यादिवशी नानासाहेबांना लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३२), "ऐसियास राजश्री स्वामींची मर्जी पाहाता ते वस्तू (मस्तानी) त्याजबरोबर (बाजीराव) न द्यावी, ठेवून घ्यावी, चौकी बसवावी; त्यामुळे राऊ खटे जाले, तऱ्ही करावे ऐसी नाही"! एवढी मर्जी सांभाळत असत शाहू बाजीरावांची. ‎ ‎📜 २१ जानेवारी इ.स.१८१९ ‎वीर नोवसाजी मस्के नाईकांचे स्वातंत्र्य युद्ध - ‎हे नोवाहचे युध्द दिनांक ८ जानेवारी १८१९ ते ३१ जानेवारी १८१९ पर्यंत चालले. २१ जानेवारी ला हाटकरांच्या उठावासंबंधी लेफ्टनंट रौबर्ट पिटमन याने ब्रिटीश अधिकारी हेन्री रसेलला लिहिलेल्या पत्रात नोवासाजी नाईकांच्या गनिमी युद्धनीतीचा उल्लेख केला आहे. "१९ तारखेच्या रात्री १० वाजता नोवसाजीच्या सैन्यातील २०० घोडेस्वार अचानक आले आणि त्यांनी माझ्या लष्करी छावणीच्या मागील बाजूस असलेल्या रक्षकावर गोळीबार केला. ते हल्ला परतवत होते, लेफ्टनंट सुथरलैंड यांनी त्वरित काही स्वार जमवून छोटे दल तयार केले, आणि काही मैलांपर्यंत त्यांचा पाठलाग केला, परंतु रात्रीच्या अंधारात ते दिसेनासे झाले." निजामाच्या ५,००० सैन्याविरुद्ध हाटकरानी निकराचा लढा दिला होता. या संपूर्ण युद्धात हटकरांकडील ५०० अरब, ८० पेक्षा जास्त अतिजखमी आणि ४०० योद्धे शहीद झाले. तसेच, हैद्रबाद सरकारकडचे १८० सैनिक जखमी आणि २४ मारले गेले. जखमींमध्ये ६ युरोपीय अधिकारी होते. या युद्धात हटकरांना पराभव स्वीकारावा लागला. काही काळानंतर सर्व हटकर नाईकांना पकडून फाशीवर देण्यात आले. नोवसाजी यांना दगा करून पकडण्यात आले. ब्रिटिशांच्या दृष्टीकोनातुन हे युध्द इतके महत्त्वपूर्ण होते कि नंतर रेजिमेंटमध्ये युद्धाच्या विजयानंतर पदक वाटली गेली. ३१ जानेवारी १८१९ ला हाटकरांचे हे युद्ध संपल्याची माहिती मिळते. ‎ ‎📜 २१ जानेवारी इ.स.१६६१ ‎आदिलशहाच्या ताब्यातील कोकणपट्टी स्वराज्यात सामिल करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी कोकण मोहिम हाती घेतली. ‎ ‎ ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇 ‎*♠️ अजय सोनवणे* ‎https://wa.me//918605494249 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🙏आई एकविरा 🙏 #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*WhatsApp ग्रुप लिंक* ‎*།། राजा श्री शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१* ‎https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA ‎ ‎*समुह क्र.०२* ‎https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb ‎ ‎*-----------☆★۩۞۩★☆-----------* ‎*राजा श्री शिवछत्रपती,* ‎*इतिहास माझ्या राज्याचा.महाराष्ट्र राज्य* ‎*-----------☆★۩۞۩★☆-----------* ‎*जय जगदंब जय जिजाऊ* ‎  *जय शिवराय जय शंभूराजे* ‎           *जय गडकोट* ‎       *!! हर हर महादेव !!* ‎
Suraj Chavan
599 जणांनी पाहिले
‎*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•* ‎📜 २२ जानेवारी इ.स.१६७७ ‎छत्रपती शिवरायानी हुसेनखानाचा पराभव केला. ‎हुसेनखान मियाना, पठाण, जणू दुसरा बहलोलखान अशी त्याची ख्याती. वृत्तीने कजाख, मोठा लढवय्या. ‎जुलमी अधिकारी - मियाना बंधूंच्या अमलाने गांजलेल्या कोप्पळ प्रांतातील रयतेची हाक छत्रपती शिवरायांच्या कानी आली, सरनोबत हंबीरराव मोहित्यांच्या हाताखाली महाराजांनी फौज रवाना केली. येल्बुर्गा जवळ मोठी लढाई झाली, मराठ्यांच्या तुलनेत पठाणीसैन्य संख्येने जास्त असूनही मराठ्यांनी निकराचे युद्ध केले, 'सहा प्रहरात कुल फौज बुडविली' (सभासद बखर), हंबीरराव,धनाजी जाधव,नागोजी जेधे(कान्होजी जेध्यांचे नातू, सर्जेराव जेध्यांचे मुल) आदींनी पराक्रमाची शर्थ केली. लढाईचे पारडे फिरले, हुसेनखान पळून जाऊ लागला, तेव्हा तरण्याबांड नागोजी जेध्यानी आपला घोडा पठाणाच्या हत्तीवर घातला, हत्तीची सोंड कापून, हत्ती जेर केला, घाबरून हुसेन्खानाने सपकन बाण सोडला, बाण नागोजींच्या कपाळातून घुसून हनुवटी फोडून बाहेर आला. बाण काढताच नागोजीनेचे प्राण पंचत्वात विलीन झाले. त्यांची पत्नी गोदुबाई जेध्यांच्या कारी गावी सती गेली. मियाना बंधू कैद झाले. नागोजी जेध्यांच्या हौतात्म्याची बातमी ऐकून महाराज कारी गावी जेध्यांच्या सांत्वनास गेले. प्रतिवर्षी एक शेर सोने देण्याची मोईन केली.(जेधे करीना) ‎ ‎📜 २२ जानेवारी इ.स.१६८२ ‎संत रामदासस्वामी यांची समाधि ! ‎शके १६०३ च्या माघ व. ९ रोजी आपल्या अंगची भगवद्भक्ति व ईश्वरोपासनेचे तेज यांच्या जोरावर महाराष्ट्राला प्रपंचविज्ञान शिकवून चेतना देणारे विख्यात संत श्रीसमर्थ रामदास स्वामी यांनी समाधि घेतली. ‎छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधानाचे वर्तमान समजतांच 'श्रीची इच्छा ' म्हणून रामदास आपल्या खोलीत गेले. त्यानी अन्न खाणे सोडून दिले. फक्त दुधावर निर्वाह करून बाहेरचे हिंडणे -फिरणे हि अंद केले. शंभूराजांनी केलेल्या अनन्वित कृत्यांची हकीगत स्वामींच्या कानावर आली. त्यांनी शंभूराजेंना पत्र लिहून शिवरायाचें् आठवावे रूप । शिवरायाचा आठवावा प्रताप । शिवरायाचा आठवावा साक्षेप । भूमंडळी ॥" असा उपदेश केला. दिवसेदिवस त्यांची प्रकृति खालावत होती. माघ व ९ ला श्रीराममूर्तीस साष्टांग नमस्कार घालून स्वामी मूर्तिसम्मुख भूमीवर बसले. शेवटची वेळ येऊन ठेपली होती. समर्थांनी उपदेश केला ‎" माझी काया गेली खरे । परि मी आहें जगदाकरें । ‎ ऐका स्वहित उत्तरे | सांगेन तीं । ‎ नका करू खटपट | पहा माझा ग्रंथ नीट ॥ ‎ तेण सायुज्याची वाट । ठार्थी पडे ॥ " ‎शेवटी स्वामींनी 'हर हर' शब्द एकवीस वेळा उच्चारून 'श्रीराम' या शब्दा- बरोबर अवतार समाप्त केला. ‎रामदासांचा जन्म शके १५३० मध्ये रामजन्माच्या दिवशी झाला. हे जांब गावचे कुलकर्णी सूर्याजीपंत ठोसर यांचे चिरंजीव. प्रथमपासूनच रामदास विरक्त होते. लग्नाच्या वेळी हे घरातून पळून गेले. नाशिक जवळील टाकळीस बारा वर्षे यांनी, खडतर, अशी तपश्चर्या केली. आणि पुढील बारा वर्षे सबंध हिंदुस्थानांत भ्रमण करून देशस्थिति स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली. आणि दुःखाने विव्हळ होऊन कृष्णातीरी लोकजागृति व धर्मप्रसार करणाऱ्या आपल्या सांप्रदायाची उभारणी केली. ‎ ‎📜 २२ जानेवारी इ.स.१६८८ ‎राजश्री संतोजीराजे भोसले ‎दक्षिण दिग्वीजयाच्यावेळी राजश्री संतोजीराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांना सामील झाले. व्यंकोजीराजांना पाठविलेल्या पत्रात चिरंजीव संतोजीराजे असा केला आहे. जेस्विटच्या वृत्तांतात संतोजीराजे एक शुर सेनापती होता असा उल्लेख आहे. व्यंकोजीराजांसोबत मदुरेचे सैन्यसुद्धा संतोजीराजे, रघुनाथपंत हणमंते आणि हंबीरराव मोहिते यांच्याशी युद्ध करण्यास जिंजीत आले. व्यंकोजीराजांच्या सैन्याचा पराभाव होताच संतोजीराजांसोबत मदुरानयकानेही तंजावरला वेढा दिला. संतोजीराजांचा पहिला बेत होता की मदुरानायकाकडून भरमसाट पैसा घेऊन तंजावरचा किल्ला आणि राज्य मदुरानायकाच्या स्वाधीन करावे. परंतु रघुनाथपंतांच्या सल्ल्याने आणि शिवाजी महाराजांच्या पत्राने व्यंकोजीराजांच्या राज्याचा नाश करू नये अशी सूचना मिळाल्यावर संतोजीराजांनी मदुरानायका सोबतचा शब्द मोडला आणि जिंजीला परत निघून गेले. इंग्रजांच्या सेंट जॉर्जवखारीतून सुरतला पाठवलेल्या पत्रात संतोजीराजांच्या हाताखाली ६००० घोडदळ & ६००० पायदळ होते. तर व्यंकोजीराजांचे ४००० घोडदळ आणि १०००० पायदळ होते. यात व्यंकोजीराजांच्या घोडदळाने कमाल केल्याचा उल्लेख आहे. पण त्यांचे मुसलमानी पायदळ सैरावैरा पळत सुटले. ‎श्री. गजानन मेहेंदळेंच्या श्रीराजा शिवछत्रपती या ग्रंथात राजश्री संतोजीराजे यांच्या मातोश्री महाराणी नरसाबाईंची तुरळक माहिती आहे. सभासद बखरीत नरसाबाईंचा उल्लेख एक उपस्त्री म्हणून केला आहे. नरसाबाईंनी २२ जानेवारी १६८८ ला बाळंभट उपाध्ये याला लिहून दिलेले एक दानपत्र आहे. त्रिणामल म्हणजे तिरुवन्नमलै प्रांतातील तोरपाड उर्फ नरसांबापूर नावाचे गाव नरसाबाईंनी दान दिले आहे. यात नरसाबाईंनी स्वत:चा उल्लेख “माहाराज राजेश्री शहाजीराजे भोसले यांची स्त्री, राजेश्री संतोजीराजियांची माता, राजेश्री नरसाबाई” असा केला आहे. जिंजी प्रांतातील वीरनम येथुन आंद्रे फायर याने पॉल ऑलिव्हा याला इ.स.१६७८ मध्ये पाठविलेल्या एका पत्रात ‘संताजी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भावांपैकी एक भाऊ’ असल्याचे म्हटले आहे. ‎ ‎📜 २२ जानेवारी इ.स.१६९३ ‎जुल्फिकार खानचा पराभव ‎स्वातंत्र्य लढा संताजी-धनाजीने बेळगाव-धारवाड करत कर्नाटक प्रांतात नेला. नंतर ह्यांनी जिंजीकडे आपला मोर्चा वळवला. जिंजी किल्ल्यास जुल्फिकार खान, त्याचा बाप असद खान, आणि शहजादा कामबक्ष वेढा घालून बसले होते. संताजी साधारण १५ हजाराचे घोडदळ घेऊन, तर धनाजी साधारण १० हजाराचे घोडदळ घेऊन जिंजीस थडकले. प्रथम धनाजी आपली फौज घेऊन सामोरे आले आणि मोगली सैन्यावर हल्ला केला. मागून येणाऱ्या संताजीस अलिमर्दाखान आडवा आला. अलिमर्दाखान हा जिंजीच्या मोगली फौजेला रसद पुरवीत असे. त्याची रसद मारीत संताजी पुढे निघून गेले. (संदर्भ- जेधे शकावली) या लढाईची फ्रेंच गव्हर्नर मार्टिन याने आपल्या डायरीत नोंद केली आहे. संताजी आणि धनाजी यांच्या या जोशासमोर मोगल सैन्याची दाणादाण उडाली. जिंजीच्या मोगली सैन्याचीतर वाताहत झाली. त्यांची रसद तोडली गेली, अफवांचे पीक उठवले जाऊ लागले होते. त्यात किल्ल्यातून मोगली फौजेवर हल्ले होऊ लागले. स्वतः जुल्फिकार खान रसद आण्यास बाहेर पडला असता त्याचा सामना संताजी बरोबर झाला. जुल्फिकार खान कसाबसा आपला जीव वाचवत परत छावणीत आला. जुल्फिकार खानने संताजीकडे वाट मागितली आणि जिंजीचा वेढा उठवण्याचा वायदा केला. २२ जानेवारी १६९३ रोजी हुकमाची वाट न पाहता मोगली सैन्य जिंजी सोडून वांदीवाश येथे निघून गेले. ‎ ‎📜२२ जानेवारी इ.स.१७३२ ‎अखेर वाड्यात राहायला जाण्याचा मुहूर्त ठरला. दि. २२ जानेवारी १७३२, ‎रथसप्तमीच्या मुहूर्तावर शनिवारवाड्याची वास्तुशांत थाटात करण्यात आली. वास्तुशांतीकरता खुद्द श्रीमंत बाजीराव पेशवे साताऱ्यास छत्रपती शाहूमहाराजांना आमंत्रण द्यायला गेले होते. पण काही कामानिमित्त महाराज येऊ शकले नाहीत. साताऱ्याहून अष्टप्रधानांपैकी काहीजण आले होते. नव्या हवेलीचे नाव काय असावे, याबाबत काही निर्णय होत नव्हता. शेवटी बाजीरावसाहेबांनीच नाव सुचवले. वाड्याची पाहणी करण्यात आली. तो शनिवार होता. वाड्याची पायाभरणी झाली, तोही शनिवार होता. आज (२२ जानेवारी १७३२) वाड्याची वास्तुशांत व गृहप्रवेश होतोय, तोही शनिवारच. म्हणून वाड्याचे नाव ठेवले 'शनिवारवाडा'. वाडा बांधताना ज्या लोकांच्या जमिनी विकत घेतल्या होत्या, त्यांना व इतरांनाही बाजीरावांनी वाड्याच्या आसपास जागा दिल्या व वस्ती करण्यास परवानगी दिली. ही वस्ती म्हणजेच पुणे कसबाच्या शेजारची 'शनिवार पेठ'. वास्तुशांतीनिमित्ते मोठ्याप्रमाणावर अन्नदान करण्यात आले. पेशव्यांनी सोहळा मोठा थाटाचा केला. ‎ ‎📜 २२ जानेवारी इ.स.१७३९ ‎मराठ्यांनी शिरगावचा किल्ला जिंकला ‎नोव्हेंबर १७३७ मध्ये मराठ्यांनी पोर्तुगिजांच्या ताब्यातील या किल्ल्याला वेढा घातला. महिना झाला तरी किल्ला सर होत नव्हता म्हणून मराठ्यांनी डिसेंबर अखेर वेढा उठवला. ‎जानेवारी १७३९ रोजी मराठ्यांनी पुन्हा शिरगावला वेढा घातला व दिनांक २२ जानेवारी १७३९ रोजी गड मराठ्यांच्या ताब्यात आला. १७७२ मध्ये मराठ्यांनी किल्ल्याची दुरुस्ती केली. पुढे १८१८ मध्ये शिरगावचा ताबा इंग्रजांकडे गेला. ‎ ‎📜 २२ जानेवारी इ.स.१७७९ ‎इष्टुर फांकडा - ‎मराठीशाहीमधील तीन फांकडे म्हणजे कोन्हेरराव (एकबोटे), मानाजीराव (शिंदे) व इष्टुर (जेम्स स्टुअर्ट) हे होत. क्याप्टन स्टुअर्टला मराठे लोक त्याच्या शौर्यामुळे मोठया कौतुकाने 'इष्टुर फांकडा असे म्हणत. श्रीमंत रघुनाथराव दादासाहेब पेशवे हे पुण्याची पेशव्यांची गादी मिळविण्याकरिता मुंबईच्या इंग्रजांस जाऊन मिळाले व त्यांचे सैन्य मदतीस घेऊन पुणे दरबाराच्या सैन्याशी लढण्याकरितां इ.स. १७७८ मध्ये बोरघांटामध्ये आले. या युध्दप्रसंगांमध्ये इंग्रजांच्या वतीने जे रणशूर योध्दे प्रसिध्दीस आले, त्यांपैकी क्याप्टन स्टुअर्ट हा एक होय. ह्यावेळी सर्व इंग्रज सैन्याचे अधिपत्य कर्नल इगर्टन हयाच्याकडे असून, त्याने आपल्या सैन्याच्या मुख्य दोन तुकडया केल्या होत्या. व त्यांचे अधिपत्य लेप्टनंट-कर्नल कॉकबर्न व लेप्टनंट-कर्नल के हया दोन नामांकित सेनापतीस दिले होते. हयाशिवाय तलासासाठी पुढे चाल करुन जाणारी बिनीच्या सैन्याची एक वेगळी तुकडी केली होती. तिचे अधिपत्य क्याप्टन स्टुअर्ट हयाजकडे होते. पुणे दरबारच्या सैन्याच्या वेगवेगळया तुकडया केल्या असून त्यांचे सेनाधिपत्य हरिपंत फडके, रामचंद्र गणेश, बाजीपंत बर्वे, तुकोजी होळकर, महादजी शिंदे, वगैरे नामांकित योध्दयांकडे होते. हे सर्व सरदार आपापल्या सैन्यानिशी तळेगांवापासून बोरघाटापर्यंत माऱ्याच्या जागा रोखून युध्दास सिध्द होते. क्याप्टन जेम्स स्टुअर्ट हा योध्दा फार पटाईत असून, त्यास सर्व रस्त्यांची व घांटनाक्यांची पूर्ण माहिती होती. तो आपल्याबरोबर ग्रेनेडियर शिपायांची एक पलटण व थोडासा तोफखाना घेऊन ता. २२ नोव्हेंबर रोजी मुंबईहून निघाला व आपटे नदीपर्यंत येऊन तेथून दुसरा मार्ग घेऊनब रघांट चढून वर येऊन पोहोचला. ता.२५ रोजी त्याने खंडाळयाच्या उंच टेकडीवर आपले निशाण लाविले. ‎क्याप्टन स्टुअर्ट हयाने खंडाळयास बराच मुक्काम केला. मुंबईचे दुसरे सैन्य व तोफखाना ता. २३ दिसेंबर इ.स. १७७८ रोजी पनवेलच्या मार्गाने घांट चढून एकदां खंडाळयास येऊन पोहोचला. इकडे मराठयांचे सैन्य व तोफखाना शत्रूंशी तोड देण्याकरिता खंडाळयाच्या आजूबाजूस येऊन माऱ्याच्या जागा रोखून युध्दास सिध्द झाला. मराठयांच्या तोफखान्याचे मुख्य सेनापति भिवराव पानसे यांनी तोफा व बाण हयांचा प्रतिपक्षावर दररोज बर्षाव चालविला. मराठयांच्या सैन्यामध्ये नरोन्हा नांवाचा एक फिरंगी गोलदाज होता. तो तोफा डागण्यामध्ये अतिशय कुशल होता. त्याने शत्रूंवर तोफांचा व बाणांचा असा मारा केला की, प्रत्येक खेपेस शत्रूंचा नामांकित शिपाई नेमका गोळयाखाली सापडत असे. अशा प्रकारची निकराची लढाई चालू असता, क्याप्टन स्टुअर्ट हयाने आपल्या पराक्रमाची शर्थ करुन व शत्रूंच्या तोफांचा भडिमार सहन करुन, कारल्यापर्यंत आपली फौज नेऊन पोहोचविली. त्या योगाने मराठे सेनापतीस त्याच्या शौर्याचा प्रभाव फार अलौकिक वाटून त्यांनी त्याची फार वाहवा केली; व त्यास कोतुकाने “इष्टुर फांकडा” असे अभिधान दिले. मराठयांच्या सैन्यामध्ये इंग्रजी फौजतील ज्या गुप्त बातम्या येत असत. त्यांमध्ये इष्टुर फांकडयाच्या शौर्याबद्दल, धैर्याबद्दल आणि युध्दचातुर्याबद्दल फार प्रशंसनीय उल्लेख असत. त्यामुळे मराठयांच्या सेनापतीसहि इष्टुर फांकडयाशी शर्थीचे युध्द करुन त्यास आपले रणशौर्य दाखविण्याचे विशेष स्फुरण चढले. हया निकराच्या चकमकीमध्ये इष्टुर फांकडयास तोफेचा गोळा लागून तो ता. ४ जानेवारी इ.स.१७७९ रोजी मरण पावला. हया प्रसंगी मराठी सैन्याने “इष्टुर फांकडया शाबास” अशी आनंदचित्ताने शाबासकी दिली. ‎इष्टुर फांकडयाच्या मृत्यूचे वर्तमान तत्कालीन अस्सल मराठी पत्रांत आढळून येते. त्यामध्ये इष्टुर फांकडयाच्या नावापुढे 'लढाव म्हणजे 'लढवय्या असे विशेषण मराठयांनी लाविलेले दिसून येते. परशुरामभाऊ पटवर्धनांचा कारकून शिवाजी बाबाजी हयाने ता. २२ जानेवारी इ.स. १७७९ च्या पत्रामध्ये पुढील उध्दार काढले आहेत. “मुख्यत्वे श्रीमंतांचे पुण्य विचित्र ? अवतारी पुरुषा त्यासारखे योग घडले. ज्या मॉष्टीनाने मसलत केली, तो घाटावर येताच, समाधान नाही म्हणोन मुंबईस गेला; तेव्हा मृत्यु पावला. इष्टुर फांकडा लढाव, इकडील फौजेचा, कारल्याच्या मुक्कामी गोळा लागून ठार जाहला. कर्णेल के म्हणोन होता, त्यास बाण लागून जेर जाहला. आकारिक (कर्ते) होते त्यांची अशी अवस्था जाहली... .. सारांश, श्रीमंतांचा प्रताप हे खरे. ‎ ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇 ‎*♠️ अजय सोनवणे* ‎https://wa.me//918605494249 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #🙏आई एकविरा 🙏 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*WhatsApp ग्रुप लिंक* ‎*།། राजा श्री शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१* ‎https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA ‎ ‎*समुह क्र.०२* ‎https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb ‎ ‎*-----------☆★۩۞۩★☆-----------* ‎*राजा श्री शिवछत्रपती,* ‎*इतिहास माझ्या राज्याचा.महाराष्ट्र राज्य* ‎*-----------☆★۩۞۩★☆-----------* ‎*जय जगदंब जय जिजाऊ* ‎  *जय शिवराय जय शंभूराजे* ‎           *जय गडकोट* ‎       *!! हर हर महादेव !!* ‎
See other profiles for amazing content