फॉलो करा
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
@63559539
5,689
पोस्ट
9,292
फॉलोअर्स
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
758 जणांनी पाहिले
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सकाळी विमान अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबियांना बळ मिळो हीच अपेक्षा आणि अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. हसत खेळत राजकारण करणारा राजकारणातला महामेरू हरपला उपमुख्यमंत्री अजिद दादा पवार यांना जड अंतःकरणातून भावपूर्ण श्रद्धांजली.... #Rip #AjitPawar #sadnewstoday #maharashta #AjitPawar #accident #🙏 प्रेरणादायक बॅनर #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
8.9K जणांनी पाहिले
*सत्याचा शोध घेतला जात नाही,* *जेव्हा साधक थकतो आणि खाली पडतो तेव्हा सत्य प्रकट होते.* *जिथे प्रयत्न संपतात, तिथे जागृती सुरू होते. त्या क्षणी, आत एक खोल शांतता येते आणि पहिल्यांदाच जीवनाचा आवाज न ऐकू येतो.* *मनाच्या सर्व युक्त्या तिथेच विघटित होतात, अहंकार थकून जातो आणि शांत होतो आणि उरतो तो तुम्ही.* *निर्विकार, स्वतंत्र, अनंत।"* #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
609 जणांनी पाहिले
*श्रीमंतांच्या पैशावर पक्षाचे कार्य जर चालू लागले तर पक्षाचे वैशिष्ट्य नष्ट होईल...* *गरीबांच्या पक्षास देण्या ऊंच भरारी;* *सदस्य बनविणे गरजेचे घरोघरी* । *दि. २७ मार्च १९३८ रोजी नायगाव मुंबई येथे स्वतंत्र मजूर पक्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्‌गारले,* *: भाषण :* *आजच्या या स्वतंत्र मजूर पक्षाच्या मुंबई शाखेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस हजर राहण्यास मला आनंद वाटतो. आपले स्वतंत्र मजूर पक्षाचे कार्य शिस्तीने व नियमबद्धतेने चालू ठेवण्याकडे लक्ष देणे जरूर आहे. आजची सभा महत्त्वाची आहे. आज सकाळी मी स्वतंत्र मजूर पक्षाच्या मुंबई शाखेच्या ऑफिसला भेट दिली व दोन-अडीच तास तेथे राहून* *चाललेल्या कामाची तपासणी केली. त्यात तेथे जे पाहण्यास मिळाले ते पाहून मला आनंद व आश्चर्यही बाटले. आश्चर्य बाटण्याचे कारण हे की, स्वतंत्र मजूर पक्षाचे येथील कार्य अत्यंत व्यवस्थितपणाने व सुरळीत चालल्याचे मला दिसून आले आणि दुसरा कोणीही माणूस ऑफिसमध्ये जाऊन पाहील तर त्याच्याही मनाची खात्री झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या कोणाला ऑफिसमध्ये जाऊर सदर काम पाहणे शक्य नसेल त्यांची मी खात्री करू शकतो की, एकंदर कामाची व्यवस्था चांगल्या तन्हेने चालली आहे. ऑफिसमध्ये काम करणरे जे स्वयंसेवक किंवा थोडासा मोबदला घेऊन काम करणारे ९-१० वर्कर्स आहेत त्यांनाही या कामाचे श्रेय दिले पाहिजे. आपला पक्ष गरिबांचा असल्यामुळे आपणाला त्यांना भरपूर मोबदला देता येत नाही. असे असून ते व्यवस्थित काम करतात. हे त्यास भूषणावह आहे. आता तुम्हाला जो जमखर्चाचा अहवाल वाचून दाखविण्यात आला त्यावरून तुम्हाला दिसून आले असेल की, आतापर्यंत हजार बाराशे रुपयांचा खर्च झाला आहे व हजार बाराशे रुपये शिल्लक आहेत. या जमाखर्चाची काँग्रेसच्या जमाखर्चाशी तुलना केल्यास काँग्रेसच्या मिठमिशीलाही ही आपली रक्कम पुरणार नाही एवढी थोडी आहे. आतापर्यंत कार्यकारी मंडळातील ४०-५० लोकांनी व बाहेरील २५-३० प्रचारकांनीच हे कार्य केले आहे. तुम्ही सर्वानी जर मनावर घेतले तर यापेक्षाही मोठे कार्य घडून आल्याशिवाय राहाणार नाही. मुंबई शहरात अस्पृश्य वर्गाचीच लोकसंख्या एक लाखावर आहे. त्यापैकी स्वतंत्र मजूर पक्षाचे चार हजार सभासद झाले आहेत, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. येथे लोकांची बसण्याची जी व्यवस्था केली आहे. त्यावरून स्त्रियांचे दोन गट व त्याप्रमाणेच पुरुषांचेही दोन गट असलेले मला दिसून आले. चौकशी केल्यावर मला समजले की, स्त्रियांच्या अलिकडील गटातील सर्व स्त्रिया स्वतंत्र मजूर पक्षाच्या सभासद आहेत व पलिकडिल गट सभासद न झालेल्या स्त्रियांचा आहे. या दोन्ही गटात सभासद न झालेल्या स्त्रियांचाच गट मोठा दिसतो. ज्या स्त्रियांना व पुरुषांना येथे सभेला येऊन काय कार्य चाललेले आहे हे ऐकावेसे वाटते त्यांना आठ आणे देऊन सभासद होण्याची बुद्धी का झाली नाही, याचे मला आश्चर्य वाटते. हा स्वतंत्र मजूर पक्षाचा एकंदर कारभार कोणाकरिता व कशासाठी आहे, याचा तुम्ही विचार केला आहे काय? हा सर्व कारभार तुमच्या आमच्यावर जो इतरांचा जुलूम आहे तो नाहिसा करण्याकरिता आहे. तेव्हा या कारभाराला मदत करणे, हे तुमचे कर्तव्य नाही काय? या जमलेल्या स्त्रियांमध्ये पुष्कळांना पानसुपारी खाण्याची सवय असेल. त्यासाठी दरमहा त्यांचे रुपया दोन रुपये खर्च होत असतील! असे असता स्वतंत्र मजूर पक्षालाच वर्षाकाठी आठ आणे देण्यास त्यांना जड का वाटावे ? माझी सर्व महार स्त्रियांवरा भिस्त आहे. त्या पुढे येऊन स्वतंत्र मजूर पक्षाच्या सभासद होतील तर पुरुषांनाही त्यांचा कित्ता गिरविणे भाग पडेल. आतापर्यंत तुम्ही सर्व स्वतंत्र मजूर पक्षाचे आठ आणे देऊन सभासद झाला नाहीतं याबद्दल मला खेद बाटतो. परंतु मला आशा आहे की, थोड्याच अवधीत तुम्ही सर्वजण स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद व्हाल.* *पुरुषांनाही मला हेच सांगावयाचे आहे की, तुमच्या हितासाठी स्वतंत्र मजूर पक्ष निघाला असून त्याचे आतापर्यंत चार हजारा सभासद व्हावेत ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी आहे. तुम्ही सर्वांनी या पक्षाचे सभासद का होऊ नये, हे मला कळत नाही. काँग्रेसच्या श्रीमंतांच्या कैवारी संस्थेच्याविरुद्ध गोरगरिबांची दाद लावण्याचे कार्य हा स्वतंत्र मजूर पक्ष करीत आहे. आज असेंब्लीत काँग्रेसच्या झिंज्या उपटणारा व गरिबांचा कैवार घेणारा कोणता पक्ष असेल तर तो एकटा स्वतंत्र मजूर पक्ष हाच होय! मला या पक्षासाठी कॉंग्रेससारखे श्रीमंतांकडून पैसे मिळणार नाहीत, असे नाही. मी प्रयत्न केला तर श्रीमंताकडूनही या पक्षाला पुष्कळ पैसे मिळवून देवू शकेन, परंतु अशारीतीने श्रीमंतांच्या पैशाबर पैशाबर जर या पक्षाचे कार्य चालू लागले तर मग या पक्षाचे वैशिष्ट्य नष्ट होईल. हा पक्ष श्रीमंत लोकांनी विकत घेतल्यासारखे होईल. मग या पक्षाला गरिबांच्या हितासाठी कसे झटता येईल? म्हणून गरिबांच्या हितासाठी निघालेल्या या स्वतंत्र मजूर पक्षाला गरिबांनीच मदत केली पाहिजे. असे करण्यानेच तुमचे स्वातंत्र्य कायम राहील. गरिबांचा संसार गरिबांनीच चालविला पाहिजे हे जर तुम्हाला समजले असेल तर मला आशा आहे की, मुंबई शाखेच्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या सभासदांची संख्या चार हजारांची चाळीस हजार होण्यास वेळ लागणार नाही. देशाचे स्वातंत्र्य काँग्रेसचे शेठजी-भटजी मिळवणार नसून ते स्वतंत्र मजूर पक्षाचा श्रमजिवी वर्गच मिळवील ही गोष्ट लक्षात ठेवा...* *डॉ बाबासाहेब आंबेडकर* *स्थळ - नायगाव मुंबई* *सोर्स - जनता* *तारीख २७/३/१९३८* #🙂Positive Thought #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #💪बुद्धांची तत्वे📜 #🙏 प्रेरणादायक बॅनर
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
925 जणांनी पाहिले
*हा तो दिवस आहे ज्या दिवशी माणसाला माणूस म्हणून ओळख बाबासाहेबांच्या संविधानाने दिली... जात, धर्म, वर्ग यांच्या पलीकडे जाऊन बाबासाहेबांनी राष्ट्र घडवलं, म्हणूनच भारत प्रजासत्ताक झाला आणि लोकशाही उभी राहिली.* *एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून संविधानिक मूल्यांची जपणूक करणे हे आपले कर्तव्य आहे. देशातील लोकशाही व सार्वभौमत्व अबाधित राखण्याचा आजच्या दिवशी दृढ निश्चय करूया. सर्व देशवासियांना 'प्रजासत्ताक दिना'च्या हार्दिक शुभेच्छा!* #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought #💪बुद्धांची तत्वे📜 #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
2.6K जणांनी पाहिले
*एकूण झोप.* *हा एक साधू आहे! ज्या वेळी शिलवान कोणत्याही घरात जातो, तेव्हा गृहस्थांनी पाच प्रकारांमध्ये अनेक घरे बांधली.* *कोणत्या पाच प्रकारात?* *(१) एक भिक्षू आहे! ज्या वेळी शिलवान स्थलांतरितांच्या घरात जातो, तेव्हा घरातील लोक त्यांना पाहतात आणि आदर निर्माण करतात. त्या वेळी हा भिक्षू आहे, या कुळातील लोक स्वर्गाच्या वाटेवर व्यापार करतात.* *(२) एक भिक्षू आहे! ज्या वेळी शिलवान स्थलांतरित कुटुंबात जातो. घरातील लोक त्याचे स्वागत करतात आणि त्याला आसन देतात. त्या वेळी तो भिक्षू असतो, या कुळातील लोक उच्च कुळात जन्मल्याचा निषेध पाळतात.* *(३) तो भिक्षू आहे! ज्या वेळी शिलवान स्थलांतरितांच्या घरी जातो, त्या वेळी घरातील लोक मत्स्यालय सोडून जातात. त्या वेळी भिक्षू असतो, त्या कुळातील लोक निषेधात अग्रेसर असतात.* *(४) एक भिक्षू आहे! ज्या वेळी शिलवान स्थलांतरितांच्या घरी जातो, तेव्हा लोक शक्ती आणि बल दान करतात. त्या वेळी तो भिक्षू असतो, त्या कुळातील लोक निषेधाचे अनुकरण करतात.* *(४) एक भिक्षू आहे! ज्या वेळी शिलवान स्थलांतरितांच्या घरी जातो, तेव्हा लोक शक्ती आणि बल दान करतात. त्या वेळी तो भिक्षू असतो, त्या कुळातील लोक निषेधाचे अनुकरण करतात.* *(५) एक भिक्षू आहे! जेव्हा शिलवान स्थलांतरित घरात जातो तेव्हा लोक प्रश्न विचारतात, धर्म ऐकतात. त्या वेळी भिक्षू असतो, त्या कुळातील लोक ज्ञान मिळविण्याचा निषेध पाळतात.* *तो एक साधू आहे, शिलवान एका घराकडे जातो तेव्हा. नंतर घर पाच प्रकारांमध्ये खूप पुनर्बांधणी केली.* #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙂Positive Thought #💪बुद्धांची तत्वे📜 #🙏 प्रेरणादायक बॅनर
See other profiles for amazing content