
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
@63559539
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
स्वतः असण्याची सवय लावा, तुम्ही कधीही दुःखी होणार नाही!
#😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏आई एकविरा 🙏 #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🙏 प्रेरणादायक बॅनर
*आज बदल हवा असे सगळे म्हणतात,*
*पण विचार बदलायला फारच थोडे तयार असतात.*
*बाबासाहेबांचा वारसा सांगतो*
*विचार बदलले, तरच व्यवस्था बदलेल.*
*✊ विचारांची क्रांतीच टिकाऊ असते.*
*#AmbedkariVichar #विचारांचीक्रांती* *#SocialJustice #Equality*
*#DrAmbedkar* *#ConstitutionOfIndia* *#समता #न्याय* *#AmbedkariteThought* #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏आई एकविरा 🙏 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏भक्तीमय सकाळ🎬 #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
*देवाने आपल्याला फळे, दूध, धान्य आणि भाज्या खाण्यासाठी दिल्या आहेत. पण आपण काय करतोय? आपल्या चवीच्या कळ्यांसाठी, आपण त्या आवाजहीन प्राण्यांचा बळी देत आहोत ज्यांना फक्त जगायचे आहे, अगदी तुमच्या आणि माझ्यासारखे. कधी परंपरेच्या नावाखाली, कधी सवयीच्या नावाखाली, तर कधी चवीच्या नावाखाली, आपण एखाद्याचा जीव घेणे सामान्य बनवले आहे. जर एखाद्या निष्पापाचा जीव घेतल्याने तुमचा विश्वास मजबूत होत असेल, तर तुम्ही श्रद्धेचे पालनपोषण करत नाही आहात, तर अहंकार बाळगत आहात. देवाने कधीही त्याग मागितला नाही - त्याने नेहमीच दया मागितली. पण आपण दयेला कमकुवतपणा समजले आणि मारणे ही एक प्रथा बनवली. एकदा प्राण्याकडे पहा, तो देखील जगू इच्छितो.*
*फरक एवढाच आहे की तो शांत आहे आणि तुम्ही शक्तिशाली आहात. मारणे सोपे आहे, पण दया दाखवण्यासाठी धैर्य लागते. यावेळी, दया निवडा - कारण तोच खरा धर्म आहे* #💪बुद्धांची तत्वे📜 #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏आई एकविरा 🙏 #🙏 प्रेरणादायक बॅनर
माणसाला त्याच्या चारित्र्यामुळे चांगला वास येतो, चारित्र्य शुद्ध करण्यासाठी कोणताही परफ्यूम नाही. #🙏आई एकविरा 🙏 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏भक्तीमय सकाळ🎬 #💪बुद्धांची तत्वे📜
@Kiran Sadawarte 2 Bhim Arme
*नांदेड शहरातील युवा नेते आझाद समाज पार्टीचे चे नांदेड जिल्हाध्यक्ष प्रत्येक सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे व नांदेड शहरात कोठेही कोणावर जर अन्याय होत असेल किंवा अत्याचार होत असेल आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांच्या साठी त्यांच्या न्यायासाठी त्यांना न्या मिळून देण्यासाठी निस्वार्थ भावना ठेवून कार्य करणारे आणि पिढीत लोकांसाठी लोकशाहीच्या माध्यमातून सरकार ना व महापालिका यांच्या विरोधात वेग वेगळ्या आंदोलन करून त्यांच्या न्यायासाठी लढणारे*
*नांदेड शहरातील युवा नेते आझाद समाज पार्टीचे चे नांदेड जिल्हाध्यक्ष प्रत्येक सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे व नांदेड शहरात कोठेही कोणावर जर अन्याय होत असेल किंवा अत्याचार होत असेल आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांच्या साठी त्यांच्या न्यायासाठी त्यांना न्या मिळून देण्यासाठी निस्वार्थ भावना ठेवून कार्य करणारे आणि पिढीत लोकांसाठी लोकशाहीच्या माध्यमातून सरकार ना व महापालिका यांच्या विरोधात वेग वेगळ्या आंदोलन करून त्यांच्या न्यायासाठी लढणारे*
*नुसतेच मागे प्रज्ञा सदावर्ते बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड, महाराष्ट्र व भास्कर* *व्यायम शाळा व किडा मंडळ* *नांदेड महाराष्ट्र, यांच्या अंतर्गत*
*राजस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2025*
*राजस्तरीय युवारत्न पुरस्कार सोहळा आयोजन करून आजच्या युवा पिढीली त्यांना अजून त्यांच्या हातून अजून सामाजिक कार्य व्हावे म्हणून एक ऊर्जा निर्माण व्हावी म्हणून त्यांना युवा रत्न पुरस्कार देण्यात आले भाऊ चे कार्य निस्वार्तपणे असते त्या मध्ये कोणाही स्वार्था साठी कार्य करणारे नाही तर समाजासाठी कार्य करणारे आहे भाऊ तुमच्या हातून असेच सामाजिक कार्य होत राहो तुमच्या गोर गरीब लोकांना न्याय देण्याचे काम होत राही हीच अपेक्षा आहे भाऊ तो तुमच्या बद्दल बोलण्यासाठी अजून खूप काही आहे शब्द अपुरे पडतील भाऊ आपणास वाढदिवसाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा आपणास दीर्घ आयुष्य लाभो हीच बुद्धाचारणी प्रार्थना करतो आपणास क्रांतीकारी जय भीम नमो बुद्धाय*
*शुभेच्छूक : संदीप वाटोरे* #💪बुद्धांची तत्वे📜 #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #🙂Positive Thought #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙏 प्रेरणादायक बॅनर
*मी तुम्हाला एक कटू सत्य सांगू का? जर तुम्ही वारलात तर तुमचे नातेवाईक सर्वात आधी विचारतील, "किती दिवस झाले?" कारण त्यांना अंत्यसंस्कार लवकर संपवण्यापेक्षा तुमच्या मृत्यूची जास्त काळजी असेल. तुमचे मित्र काही दिवस त्यांच्या कथांवर तुमचा फोटो पोस्ट करतील, काही जण कवितांच्या दोन ओळीही लिहितील, पण नंतर... ते पुढे जातील. सत्य हे आहे: हे जग कोणाशिवाय थांबत नाही. कोणीही नाही. तर अजूनही वेळ आहे - स्वतःसाठी जगा, तुमच्या आनंदासाठी लढा. कारण शेवटी, तुमच्या कबरीवर रडणारे देखील काळासोबत हसायला शिकतील.* #🙏 प्रेरणादायक बॅनर #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙂Positive Thought #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #💪बुद्धांची तत्वे📜
भय का त्याग करने पर ही जीवन का आरम्भ होता है। #🙂Positive Thought #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙏 प्रेरणादायक बॅनर
*२५ डिसेंबर भारतीय महिला दिन /*
*राष्ट्रीय परिषद, महाड १९९८*
*अध्यक्षा शांताबाई भालेराव यांचे भाषण*
*आज महाडच्या भूमीत येत असताना माझं मन ७१ वर्षांपूर्वीच्या आठवणींनी भरून आलं आहे. याच भूमीत १९२७ साली डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांची माणूस म्हणून जगाला ओळख दिली. समाजातील अगदी शेवटच्या स्तरावरील दलित स्त्रीच्या चेतनेलाही डॉ. आंबेडकरांनी याच भूमीत जागवले आणि महिलांच्या चळवळीला सुरुवात केली. मनुस्मृतीने स्त्रीला जातीचे द्वार बनवले, पातिव्रत्याच्या कल्पना समाजमनावर बिंबवल्या आणि स्त्रीला अनेक रूढी-परंपरांमध्ये जखडून टाकले. त्या सर्व संकल्पनांना आणि रूढी-परंपरांना डॉ. बाबासाहेच आंबेडकरांनी याच भूमीत दहन करून छेद दिला व स्त्रीजाणिवेचे स्फुल्लिंग चेतविले. मात्र ती चेतना पुढे अपेक्षेप्रमाणे वृद्धिंगत झाली नाही. ही खंत मला त्या वेळच्या क्रांतिकारी आठवणी सांगण्यास प्रवृत्त करत आहे.*
*मनुस्मृतीसारख्या धर्मशास्त्रांनी चातुर्वर्ण्य निर्माण करून भारतीय समाजात विषमतेचे बी पेरले आणि माणसामाणसात भिंती निर्माण केल्या. अस्पृश्यांना कुत्र्या-मांजराहूनही हीन आयुष्य जगायला भाग पाडले. त्यांना घोटभर पाण्यालाही महाग केले. इंग्रजांच्या राजवटीत सार्वजनिक ठिकाणे म्हणजे पाणवठे, देवळे, बांजारहाट वगैरे अस्पृश्यांसाठी खुले करण्यात आले. सीताराम केशव बोले यांनी मुंबई विधिमंडळात तसा ठराव पास करून घेतला. पण सार्वजनिक ठिकाणी जाण्यास अस्पृश्यांना सनातनी लोकांचा कट्टर विरोध होता. हा विरोध संपला पाहिजे, अस्पृश्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळाले पाहिजेत, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच भूमीत १९ व २० मार्च १९२७ ला परिषद घेऊन आपल्या अस्पृश्य बांधवांसह चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा निर्धार केला, ही घटना येथील सवर्णांच्या रागाला कारण झाली. त्यांनी परिषदेसाठी जमलेल्या अस्पृश्यांना मारहाण केली व अस्पृश्यांविरुद्ध कोर्टात दाबा घातला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या घटनेने अधिकच चिडले आणि त्यांनी पुन्हा २५ डिसेंबर १९२७ला याच ठिकाणी येऊन सत्याग्रह करण्याचे ठरवले.*
*त्यावेळी मुंबईत अस्पृश्यलोक सातरस्ता, दगडचाळ, लोखंडचाळ, मदनपुरा, नागपाडा, गोलपीठा इत्यादी ठिकाणी रहात असत. त्यात डेव्हिड, डोळस वगैरे मोठे कार्यकर्ते होते. त्यात माझे वडील दगडूजी भिवाजी शिंदे हेही होते. माझे वडील तेव्हा मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड मटिग्यू चेम्सफर्ड यांच्या गाडीचे ड्रायव्हर होते. बाबासाहेबांनी २५ डिसेंबरला महाडला येऊन पुन्हा सत्याग्रह करण्याचा निर्णय केला तेव्हा त्यांच्या सोबत मुंबईचे सर्व कार्यकर्ते व महाड येथील सुभेदार विश्राम गंगाराम सवादकर, रामचंद्र मोरे, तुकाराम गायकवाड, शिवराम जाधव, हाटे, दादासाहेब गायकवाड, राजभोज इत्यादी अस्पृश्य कार्यकर्ते होते, तसेच सुरबा टिपणीस, शिवतरकर, सहस्रबुद्धे, अनंतराव चित्रे असे सवर्ण कार्यकर्तेही होते. मी तेव्हा १३ वर्षांची होते. मी अधूनमधून बाबासाहेबांच्या घरीही रहात असे. शाळेत असताना मी दादाभाई नौराजी यांच्यावर निबंध लिहिला होता. त्या निबंधाला पहिल्या नंबरचे बक्षिस मिळाले. म्हणून मला सरोजिनी नायडू यांच्या हस्ते चांदीचा बिल्ला मिळाल्याबद्दल बाबासाहेबांनी एका कार्यक्रमात माझा सत्कारही केला. रमाबाई आणि लक्ष्मीबाई ह्या मला प्रेमाने वागवत असत. बाबासाहेबांनी रमाबाईंना पत्र लिहिले की जर तू लिहायला वाचायला शिकली नाहीस तर मी मुंबईला परत येणार नाही. ते ऐकून रमाबाई भांबावून गेल्या. लक्ष्मीबाई मात्र खुदूखुदू हसत होत्या. बाबासाहेब मुंबईला आल्यावर त्यांनी रमाबाईंना शिकवायला शिक्षकही ठेवला होता. त्यामुळे रमाबाईंना थोडे लिहिता-वाचताही येत होते.*
*महाडच्या सत्याग्रहाची तयारी सुरू झाली तेव्हा मी महाडला येण्याचा माझ्या वडिलांकडे हट्ट धरला. रमाबाईंचीही महाडला येण्याची इच्छा होती, पण याचवेळी बाबासाहेबांचे भाऊ बाळाराम आंबेडकर हे १२ नोव्हेंबर १९२७ ला मृत्यू पावले. ते पलटणीत वादक होते. नंतर त्यांनी मुंबई महानगरपालिकेतही कारकून म्हणून नोकरी केली. त्यांच्या मृत्यूमुळे परिषदेचे कसे होईल असे वाटत होते. पण बाबांनी दुःख मागे टाकले आणि ते परिषदेच्या कामाला लागले.*
*बाबासाहेबांसह त्यांचे अनेक कार्यकर्ते महाडला येण्यास निघाले. मीही माझ्या वडिलांसोबत होते. मुंबईत भाऊच्या धक्क्यावर आम्ही सर्व मंडळी बोटीत बसलो व बागमंडल्याला उतरलो. बाबासाहेब मात्र दासगाव येथे उतरले. आम्ही सर्वजण मोठ्या मिरवणुकीने तळ्याजवळच्या मंडपात आलो. त्यावेळी इथे होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा साधारण अशी होती की, सकाळी सभेत बाबासाहेबांनी भाषण करायचे, नंतर चवदार तळ्यावर जाऊन तळ्याचे पाणी प्यायचे, नंतर जेवण करून तीन वाजता मनुस्मृतीदहन करायचे व त्या प्रसंगी बाबासाहेबांनी भाषण करायचे. पुन्हा चवदार तळ्यावर जाऊन ते पाणी भरून आणायचे. नंतर थोडासा फराळ करून त्यानंतर कीर्तन व रात्री सत्यशोधक तमाशाने लोकांचे प्रबोधन करायचे. पण प्रत्यक्ष मंडपात आल्यावर असे समजले की महाडचे कलेक्टर यांनी सांगितले आहे की चवदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करायचा नाही, कारण ते तळे खाजगी आहे. ते ऐकून सत्याग्रही चिडले व पाण्यासाठी सत्याग्रह करायचाच अशी भाषणे करू लागले. त्यावेळी मीही भाषण मोठ्यामोठ्याने वाचून दाखवले व नंतर कळशी घेऊन हळूच तळ्यावर जाऊन पाणी भरून आणले; तेव्हा....*
*पुढील भागात*
*मुक्तीदाता विशेषांक* #💪बुद्धांची तत्वे📜 #🙏 प्रेरणादायक बॅनर #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #🙂Positive Thought
२५ डिसेंबर ह्या दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अन्यायकारक, विषमतावादी आणि मानवतेला नाकारणाऱ्या विचारांविरुद्ध पेटवलेल्या क्रांतिकारी संघर्ष होता.
मनुस्मृती दहन म्हणजे केवळ ग्रंथ जाळणे नव्हे, तर माणसाला माणूस म्हणून जगू न देणाऱ्या विचारांचा त्याग होय. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या संविधानिक मूल्यांवर आधारित समाज हाच खऱ्या अर्थाने मानवमुक्तीचा मार्ग आहे.
#ManusmrutiDahanDin #DrBabasahebAmbedka #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙏 प्रेरणादायक बॅनर #💪बुद्धांची तत्वे📜
*मनुस्मृती दहन दिवस !!!*
*२५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन करून अन्यायावर आधारित सामाजिक व्यवस्थेला जाहीर आव्हान दिले. मनुस्मृती हे नुसते धार्मिक पुस्तक नव्हते, तर माणसा माणसांत भेद करणारे, विषमता जपणारे आणि समतेला नाकारणारे प्रतीक होते. या ग्रंथाने स्त्रियांना गुलामीत ढकलले, शोषणाला धार्मिक अधिष्ठान दिले आणि मानवतेचा अपमान केला. बाबासाहेबांनी ते जाळून समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा मार्ग दाखवला. मनुस्मृती दहन म्हणजे त्या विषारी ग्रंथाचा फक्त निषेधचं नव्हता, तर नव्या न्याय्य समाजनिर्मितीची सुरुवात होती.*
*आजही बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचारांच्या पायावर उभी आहे आणि त्यांनी दाखवलेल्या समता, स्वातंत्र्य व बंधुत्वाच्या मार्गावर समाजाला पुढे नेण्याचा निर्धार करत आहे. मनुस्मृतीसारख्या अन्याय्य विचारांचा विरोध करणे आणि मानवी प्रतिष्ठेवर आधारलेली लोकशाही मजबूत करणे हेच आमचे ध्येय आहे.*
*#स्त्री_मुक्ती_दिन* #🙏 प्रेरणादायक बॅनर #💪बुद्धांची तत्वे📜 #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ







