फॉलो करा
Arya
@arya_001
103
पोस्ट
345
फॉलोअर्स
Arya
761 जणांनी पाहिले
🚆 1 ऑक्टोबरपासून रेल्वे तिकीट बुकिंग नियमात मोठा बदल; दलालांची मनमानी थांबणार, जाणून घ्या नवीन नियम 🔸 भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंगच्या प्रक्रियेत एक महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 ऑक्टोबर 2025 पासून कोणत्याही ट्रेनच्या जनरल तिकीट बुकिंगसाठी नवीन नियम लागू होणार आहे. या निर्णयामुळे तिकीट बुकिंगमध्ये अधिक पारदर्शकता येईल. 🔸 तसेच दलाल व एजंट्सच्या मनमानीला आळा बसेल ज्यामुळे सामान्य प्रवाशांना सीट मिळण्याची अधिक संधी मिळेल.नवीन नियमानुसार कोणत्याही ट्रेनचे तिकीट बुकिंग सुरू झाल्यावर सुरुवातीच्या 15 मिनिटांसाठी फक्त आधार-प्रमाणित युजर्सच आयआरसीटीसीच्या वेबसाइट किंवा ॲपवरून तिकीट बुक करू शकता 🔸 ज्यांच्याकडे आधार प्रमाणीकरण नाही, त्यांना या महत्त्वपूर्ण 15 मिनिटांच्या वेळेत बुकिंग करता येणार नाही. उदाहरणार्थ जर 15 नोव्हेंबरच्या प्रवासासाठी तिकीट बुकिंग 16 सप्टेंबर रोजी रात्री 12:20 वाजता सुरू झाले, तर रात्री 12:35 वाजेपर्यंत केवळ आधार-सत्यापित खात्यातूनच तिकीट बुक करता येईल. 🔸 सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळात ट्रेनच्या तिकिटांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे या काळात सामान्य बुकिंगमध्येही 'तत्काळ बुकिंग' सारखीच गर्दी होते. या नवीन आधार-आधारित नियमामुळे बुकिंग प्रक्रिया अधिक पारदर्शक होऊन, व्यस्त वेळेतील गैरव्यवहार थांबवण्यास मदत होईल. #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #🌐 देश- विदेश अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #📢18 सप्टेंबर अपडेट्स🆕 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
Arya
716 जणांनी पाहिले
#📢18 सप्टेंबर अपडेट्स🆕 🥼 राज्यातील सर्व शासकीय डॉक्टर आज संपावर; रुग्णसेवेवर मोठा परिणाम, नेमके कारण काय ? 🔸 आज महाराष्ट्रातील सर्व शासकीय डॉक्टर एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर गेले आहेत. या संपामुळे राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये रुग्णसेवेवर मोठा परिणाम झाला आहे. सेंट्रल महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स या संघटनेने हा संप पुकारला आहे. #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #🌐 देश- विदेश अपडेट्स 🔸 सरकार आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने घेतलेल्या एका निर्णयामुळे डॉक्टर नाराज आहेत. या निर्णयानुसार होमिओपॅथी पदवीधारकांना सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी पूर्ण केल्यानंतर आधुनिक वैद्यकीय पद्धतीमध्ये नोंदणी करण्याची परवानगी मिळणार आहे. 🔸 मार्डचा असा युक्तिवाद आहे की साडेपाच वर्षांच्या एमबीबीएस अभ्यासक्रमाची तुलना एका वर्षाच्या अल्पकालीन सीसीएमपी कोर्सशी होऊ शकत नाही, कारण यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या संपादरम्यान नियमित ओपीडी आणि नियोजित शस्त्रक्रिया सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत, मात्र आपत्कालीन सेवा सुरू राहणार आहेत. 🔸 असे असले तरी सरकारी रुग्णालयांवरील ताण कमी झाल्याने खासगी रुग्णालयांमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मार्डने सरकारला हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली असून अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
See other profiles for amazing content