फॉलो करा
⭐dipali creation⭐
@dipalimi
2,401
पोस्ट
14,376
फॉलोअर्स
⭐dipali creation⭐
642 जणांनी पाहिले
7 दिवसांपूर्वी
मात्र या योजनेसाठी केवायसीची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे नोव्हेंबर चा महिना उलटलाय तरीही अजून नोव्हेंबर चे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेले नाही. यामुळे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात धाकधूक वाढली आहे. दरम्यान आता या योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. खरे तर लाडकी बहीण योजनेसाठीच्या केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा एक महत्त्वाचा निर्णय अलीकडेच घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने लाडक्या बहिणींना दिलासा देत केवायसी प्रक्रियेला 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आधी यासाठी 18 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र मुदतीत अनेकांची ईकेवायसी पूर्ण झाली नाही आणि म्हणून मुदतवाढीची मागणी होऊ लागली. दरम्यान मुदतवाढीची मागणी पाहता शासनाच्या माध्यमातून केवायसीसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा एक कामाचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान ज्या महिलांनी अद्याप केवायसी पूर्ण केलेली नसेल त्यांनी या तारखेपर्यंत केवायसी पूर्ण करून घ्यावी असे आवाहन आता जाणकारांकडून करण्यात आले आहे. नोव्हेंबरचा हफ्ता कधी मिळणार ? ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर मध्ये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. यामुळे आता नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबर मध्ये जमा होण्याची शक्यता आहे. खरंतर राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान उद्या संपन्न होणार आहे. दोन डिसेंबरला मतदान होईल आणि तीन डिसेंबरला मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहेत. दरम्यान मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबर चा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच चार डिसेंबर नंतर पात्र ठरणाऱ्या महिलांना लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळू शकतात असा अंदाज आहे. खरेतर राज्यातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात सध्या आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना सध्यातरी पैसे मिळण्याची शक्यता नाहीये. पण निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर नोव्हेंबर चा हप्ता जमा होऊ शकतो. म्हणजे 4 डिसेंबरनंतर पैसे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ##लाडकीबहिणयोजना #📲व्हायरल व्हिडिओ #🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌ #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
See other profiles for amazing content