Suraj Chavan
1K views • 2 days ago
‎*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•* ‎📜 ३ नोव्हेंबर इ.स.१६१८ ‎आजचा अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत आणि बांगलादेश या चार देशांची लोकसंख्या, जागतिक लोकसंख्येच्या साधारण २८% आहे. अवघ्या ३०० वर्षांपूर्वी हे चारही देश एकाच विशाल साम्राज्याचा भाग होते. या साम्राज्याचा महसूल, जागतिक महसुलाच्या ११४ होता. अशा या जगातील सर्वात शक्तिशाली साम्राज्याचा सम्राट होता, “हजरत सलामत किब्ला ई दिनों दुनिया अबुल मुजफ्फर मुहिउद्दीन मोहंमद औरंगजेब आलमगीर बादशहा ई गाझी शहेनशहा ए सल्तनत ए हिंद” ..ज्याला जग आज फक्त औरंगझेब म्हणून ओळखते. त्याच्या नावाच्या पुढच्या आणि मागच्या पदव्या, त्याच्या साम्राज्यसह गळून पडल्यात आज ३ नोव्हेंबर. आजच्याच दिवशी १६१८ मध्ये मुघल सम्राट औरंगजेब याचा जन्म झाला होता. औरंगजेबाचा जन्म ३ नोव्हेंबर १६१८ रोजी दोहादमध्ये जहांगीराच्या शासन काळात झाला. औरंगजेब शाहजहाँचा तिसरा मुलगा होता. शहाजहाँची चारही मुलं मुमताज महलपासून झाली होती. औरंगजेबाला इस्लामिक धार्मिक साहित्य तसंच तुर्की साहित्यात रुची होती. इतर मुघल राजांप्रमाणे औरंगजेबाला उत्तम हिंदी बोलता येत होतं. तसंच त्याने सुलेखनशास्त्रात प्रावीण्य मिळवलं होतं. इतिहासकार कॅथरीन ब्राउन यांनी 'डिड औरंगज़ेब बॅन म्युझिक?' मध्ये औरंगजेबाच्या बऱ्हाणपूर भेटीचा उल्लेख आहे. औरंगजेब तिथं त्याच्या मावशीला भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी तो बऱ्हाणपूरच्या हिराबाई जैनाबादी हिच्या प्रेमात पडला. हिराबाई एक गायिका आणि नर्तकी होती. हिराबाई झाडावरील आंबे तोडत होती, त्यावेळी औरंगजेबानं तिला पाहिलं आणि तिच्या प्रेमात पडला. औरंगजेब तिच्या इतक्या प्रेमात होता की कधीही दारू न पिण्याची शपथ मोडण्यासाठी तो तयार झाला होता. औरंगजेब दारूचा घोट घेणारच होता पण त्याला हिराबाईनंच रोखलं. या हिराबाईचं एका वर्षातच निधन झालं आणि ही प्रेम कहाणी संपली. हिराबाईचं दफन औरंगाबादमध्येच झालं. या घटनेनंतर औरंगजेब अधिक कट्टर धर्मांध व क्रूर झाला असे काही इतिहासकारांचे मत आहे. शाहजहाँच्या चारही मुलांना कमी वयातच सिंहासन मिळवण्याची ओढ लागली होती. त्याकाळात मध्य आशियातल्या पद्धतीनुसार सर्व भावांचा सत्तेवर समान हक्क असायचा. मुघल शासकसुद्धा या परंपरेचं पालन करत होते. दारा शुकोह उत्तराधिकारी व्हावा, अशी शाहजहाँनची इच्छा होती. तर औरंगजेबाच्या मते मुघल साम्राज्याचा योग्य वारस तो स्वतः होता. १६५८ ला औरंगजेब आणि लहान भाऊ मुराद यानं आग्र्याच्या किल्ल्याला घेरलं होतं. त्यावेळी शाहजहाँ किल्ल्याच्या आतच होता. औरंगजेबानं किल्ल्याचा पाणीपुरवठा तोडला. काही दिवसांतच शाहजहाँनं किल्ल्याचे दरवाजे उघडले आणि स्वतःला औरंगजेबाकडे सोपवलं.यावेळी साम्राज्याची ५ भागांत विभाजन करण्याचा प्रस्ताव शाहजहाँनं ठेवला. चार भावांना चार हिस्से आणि एक हिस्सा औरंगजेबाचा मोठा मुलगा मोहम्मद सुलतान याला देण्याचा प्रस्ताव होता. ‎ ‎📜 ३ नोव्हेंबर इ.स.१६७८ ‎छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याबाहेर असल्याने स्वराज्याची जबाबदार आमच्याकडे असल्याने तूर्तास आम्हांस आपल्याकडे येणे शक्य नाही” असे म्हणत संभाजी महाराजांनी दिलेर खान यास अनेक महिने खेळवत ठेवले होते. मुघल साम्राज्यात आल्यास त्यांना कितीची मनसबदारी मिळणार, त्यांचे पद काय असणार यावर संभाजी महाराज दिलेर खान यांच्यात जवळपास ६ पत्रव्यवहार झाले होते, त्यात प्रत्येकवेळी संभाजी महाराजांनी औरंगजेबाची परवानगी मागितली असल्याने प्रत्येक पत्रासाठी दिलेर खानाला औरंगजेबाची परवानगी घेण्यासाठी त्याच्या माणसांना पाठवावे लागे. यात अनेक महिन्यांचा काळ गेला. एवढी मोठी फौज घेऊन चालून आलेला दिलेर खान अनेक महिने पत्रव्यवहारात अडकून बसला होता. त्याची फौज विनालढाई असल्याने सुस्तावली होती. दिवसेंदिवस फौजेचा खर्च वाढत होता. संभाजी महाराजांनी राजकारणातील गनिमी कावा करत दिलेर खान ला स्वराज्यात चांगलेच अडकून ठेवले होते. परंतु, त्यानंतर छ. शिवाजी महाराज एप्रिल-मे १६७८ दरम्यान कर्नाटकच्या स्वारीवरून परतल्यावर त्यांनी राजांना सज्जनगडावर जाण्याचा आदेश दिला. ‎ ‎📜 ३ नोव्हेंबर इ.स.१६७९ ‎खांदेरीची रणसंग्राम ‎इंग्रजांची अधिक कोंडी करण्यासाठी महाराजांनी पनवेल जवळ सैन्य गोळा करायला सुरुवात केली. लवकरच शिवाजी मुंबईवर चाल करून येणार अशा बातम्या थेट सुरत पर्यंत गेल्या. तिथल्या इंग्रज अधिकाऱ्याने मग ३ नोव्हेंबर १६७९ ला मुंबईकरांना या मोहिमेवरील खर्च खूप वाढल्याची आणि पदरी यश येत नसल्याची जाणीव करून दिली. त्यांच्या पत्रातून लिहिले की, ”शिवाजीराजांशी तहाची बोलणी चातुर्याने करावीत. चौलच्या सुभेदारामार्फत तहाची बोलणी करावी. शिवाजीचे लोक बेटाला सहज मदत करू शकतात, बेटावर किल्ल्याचे बांधकाम करू शकतात आणि तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्हाला दोन गलबते दिली मात्र तुम्हाला यश येत नाही. आता चिडून शिवाजी खुद्द मुंबईवर हल्ला करेल, तेंव्हा मुंबईचे चांगले रक्षण कसे करावे याचा विचार करावा... इत्यादी... ‎ ‎📜 ३ नोव्हेंबर इ.स.१६८८ ‎अम्बर संस्थानचे राजा सवाई जयसिंग (दुसरे) यांचा जन्म. (मृत्यू: २१ सप्टेंबर १७४३) ‎ ‎📜 ३ नोव्हेंबर इ.स‌.१६८९ ‎रायगड मुघलांच्या ताब्यात गेला ‎महाराष्ट्रात मोगल मराठा संघर्ष तीव्र झाला होता. रामचंद्रपंत, शंकराजी नारायण, संताजी, धनाजी एकदिलाने लढा देऊन चिवट प्रतिकार करत होते. तिकडे इतिकदखानाने रायगडाचा वेढा चोख ठेवला होता. रायगडहि मोगली वेढ्याला दाद देत नव्हता. पण तुंगभद्रा नदीकाठी झालेल्या संग्रामानंतर राजाराम महाराजांच्या अटकेच्या बातमीने सर्व नूर पालटला. रायगडावर भीतीचे ढग जमा होऊ लागले. दक्षिणेतून उलटसुलट बातम्या येत होत्या. त्यामुळे रायगडावरून येसूबाईंच्या सुटकेची आशा मावळत चालली होती. मोगलांची सरशी झाल्यास गडावरील राजकुटुंबास धोका होता. मोगली आक्रमणात त्यांची हत्या झाली असती किंवा कैदेत विटंबना झाली असती. त्यामुळे मोगलांशी सन्मानपूर्वक बोलणी करून वाटाघाटी करण्याकडे येसूबाईंचा कल झुकू लागला. त्याप्रमाणे त्यांनी इतिकदखानकडे निरोप पाठवला. इतिकदखानाने आलेल्या संधीचा फायदा उठवला. रायगड आपल्या ताब्यात आल्यास आपण संभाजी महाराजांच्या कुटुंबास सन्मानाने वागवू असा निरोप त्याने पाठविला. वाटाघाटीना हळूहळू यश येऊ लागले. ३ नोव्हेंबर १६८९ रोजी रायगड मुघलांच्या ताब्यात गेला. योगायोगाने याच्या एकच दिवस अगोदर राजाराम महाराज सुखरूप जिंजीत पोहोचले होते. येसूबाईसाहेबांचा धोरणीपणा पुन्हा एकवार दिसून येतो. स्वराज्याचे जास्त नुकसान होऊ नये म्हणून त्या स्वतःहून कैदेत गेल्या. यावेळी त्यांच्या बरोबर युवराज शाहू, शिवरायांच्या पत्नी सकवारबाईसाहेब व रायगडावरील इतर प्रमुख अधिकारी व त्यांचे कुटुंबकबिले मोगलांच्या कैदेत गेले. ‎ ‎📜 ३ नोव्हेंबर इ.स.१७६० ‎दि. १ नोव्हेंबर १७६० या दिवशी अब्दाली पानिपतावर आला आणि पहिल्यांदाच थेट मराठ्यांना भिडला, दोघांच्यातही चकमक झाली. परंतु काही वेळातच अब्दालीने आपल्या सैन्याला माघारी फिरण्याचा हुकूम दिला. ३ नोव्हेंबर या दिवशी अब्दालीची छावणी दहाड या गावाच्या दक्षिणेस पडली. पहिल्याच हल्ल्यात आवेशाने आलेला अब्दाली मराठेही जय्यत तयारीत आहेत हे पाहताच तितक्याच जोराने (की मराठ्यांच्या झटक्याने!) मागे आला. या चकमकीनंतर अब्दाली स्वतःहून हल्ला करण्याचा बेत टाळत होता. याचाच फायदा घेऊन मराठे रात्रीच्या वेळेस अब्दालीच्या फौजेत शक्य होईल तेवढे शिरून हाती येतील ते घोडे, उंट, हत्ती आणि बैल पळवत होते. पंधरा-वीस दिवसांतच मराठ्यांनी अब्दालीच्या छावणीतून बाराशे घोडी, चारशे उंट आणि चार हत्ती पळवले. ‎ ‎📜 ३ नोव्हेंबर इ.स.१७८४ ‎आग्रा या किल्ल्याने एकेकाळी मराठ्यांचा राज्याचा अस्त करण्याचे स्वप्न पाहिले पण नंतरच्या काळात मराठ्यांनी तो किल्ला आपला गुलाम केला, शहाआलम शिंद्याचे स्वागतास आग्रा येथे:- १७८४ च्या ऑक्टोबर माहिन्यात, ग्वाल्हेरहून आग्रा येथे आला अग्र्याच्या मोगल अधिकारी अफरासियाब खान याने त्यांचे वीरोचित स्वागत केले. पण हे मुहम्मद बेग हमदानी याला आजिबात सहन झाले नाही. त्यांनी ३ नोव्हेंबर १७८४ रोजी अफरासियाब खान याची हत्या घड़वुन आणली तथापि या हत्येचा शिंद्याची राजकीय प्रगती वर कुठलाच विपरीत परिणाम झाला नाही. उलट यामुळे मराठे सावध झाले. शिंद्याच्या सरदार अंबुजी इंगळे याने हमदानीवर आक्रमण केले. त्याला पकड़ून आग्रच्या किल्लात अतिशय कड़क बंदोबस्त कैदेत ड़ांबले. ‎ ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇 ‎*♠️ अजय सोनवणे* ‎https://wa.me//918605494249 #🙏श्री स्वामी समर्थ📿 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏आई एकविरा 🙏 ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*WhatsApp ग्रुप लिंक* ‎*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१* ‎https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA ‎ ‎*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२* ‎https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*-----------☆★۩۞۩★☆-----------* ‎*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा* ‎*महाराष्ट्र राज्य* ‎*-----------☆★۩۞۩★☆-----------* ‎*जय जगदंब जय जिजाऊ* ‎  *जय शिवराय जय शंभूराजे* ‎           *जय गडकोट* ‎       *!! हर हर महादेव !!*
20 shares