ᴍᴀʀᴏᴛɪsʜɪʀᴀʟᴇ45
2K views • 4 hours ago
विजयांचं द्विशतक! T20I इतिहासात भारताची सुवर्ण नोंद ✌🏻💯🏏🇮🇳🔥🤯
भारताने न्यूझीलंड विरुद्ध दुसरा टी२० सामना जिंकून इतिहास रचला. भारत टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २०० सामने जिंकणारा पहिला संघ ठरला. भारताने ही कामगिरी आपल्या ३००व्या सामन्यात केली.
न्यूझीलंड दौऱ्यावर असणाऱ्या श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय टी२० संघाने सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. भारताने शनिवारी (२४ ऑक्टोबर) न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा टी२० सामना ४ विकेट्सने जिंकला. त्याचबरोबर पाच सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. हा विजय भारताचा २००वा होता आणि असा पराक्रम करणारा भारत पहिलाच संघ ठरला.
भारताने आतापर्यंत ३०० टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि त्यातील २०० सामने जिंकले (सरळ विजय). त्यातील ८३ सामने गमावले, ७ बरोबरीत सुटले आणि १० अनिर्णीत राहिले. यामुळे भारताच्या विजयाची टक्केवारी ६६.६७ आहे. तसेच भारताच्या काही सामन्यांचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला (पाच सुपर-ओव्हर, एक बॉल-आऊट).
सर्वाधिक टी२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारे संघ (सामने)
२०० विजय - भारत (३०० सामने)
१७६ विजय - पाकिस्तान (३०४ सामने)
१३५ विजय - न्यूझीलंड (२६९ सामने)
१२९ विजय - दक्षिण आफ्रिका (२३५ सामने)
१२८ विजय - इंग्लंड (२३३ सामने). #🇮🇳टीम इंडिया🤩 #📣T20 अपडेट्स🏏 #🏏टीम इंडियाने 4 विकेट्स मॅच जिंकली👊
23 shares