⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 ३ जानेवारी इ.स.१६७१
(माघ शुद्ध त्रृतीया शके १५९२ संवत्सर साधारण वार मंगळवार)
महाराज आक्रमक !
इ.स.१६७० नंतर महाराजांनी मिर्झाराजे जयसिंगच्या बरोबरचा तह मोडून तहात गमावलेले किल्ले आणि प्रदेश पुन्हा स्वराज्यात घेण्यास सुरुवात केली. अत्यंत आक्रमकपणे किल्ले सिंहगड घेऊन औरंगजेब आणि मोगलांना आव्हान देत रणशिंग फुंकले. म्हणूनच त्याला प्रत्युत्तर म्हणून औरंगजेबाने महाराजांना रोखण्यासाठी महाबतखानाची नेमणूक करून, दक्षिणेचा सेनापती म्हणून पाठविले व त्यासोबत जसवंतसिंहाची नेमणूक केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/89StQ4kPtf0?si=mrvtAFKdifUgNqoZ
📜 ३ जानेवारी इ.स. १६८२
इ. स. १६८१ च्या डिसेंबरमध्ये सिद्दीने मराठ्यांची आपटे व नागोठणे ही गावे लुटली आणि जाळली. जंजिरेकर सिद्दीच्या ह्या अशा कृत्यांचे छत्रपती संभाजी महाराजांनी लपंडाव करून जंजिरा हस्तगत करण्याचे ठरवले. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कोंडाजी फर्जंद यांना सिद्दीकडे नोकरी मिळवण्यास पाठवले. त्यात ते यशस्वी झाले आणि आपल्या कुटुंबांसह जंजिरा किल्ल्यात राहू लागले. जंजिऱ्यावरील दारूखाना इत्यादींना आग लावून देण्याचा त्यांचा विचार होता. कोंडाजी फर्जंद यांचा हा डाव सिद्दीस कळला तेव्हा सिद्दीने त्यांचे डोके मारले. त्यांच्या सोबत असणाऱ्या काही लोकांना बुडविले. दगलबाजीने जंजिरा सर करण्याचा प्रयत्न अयशस्वी होताच संभाजी महाराजांनी दादाजी रघुनाथ देशपांडे या सेनापतींस दंडाराजपुरीस वेढा घालण्याकरता पाठवले. नंतर, संभाजी महाराज, राजपुत्र अकबर हे वीस हजार सैनिकांसह रायगडाहून निघाले आणि वेढा घालून राहिलेल्या सैनिकांस येऊन मिळाले. ह्या सैन्याने ्पंधरा दिवस सतत जंजिऱ्यावर तोफा डागल्या. तोफांच्या भडिमारामुळे किल्ल्याची भिंत कोसळून पडण्याची वेळ आली. दिनांक ३ जानेवारीपासून दिनांक ३ फेब्रुवारी १६८२ ह्या काळात संभाजी महाराजांनी सिद्दीवर अतिशय दबाव आणला होता, सिद्दीला अडचणीत टाकले होते आणि त्यावेळी मराठे जंजिरा जिंकून घेण्याच्या बेतात होते. त्याकरिता त्यांनी किल्ल्याभोवती खंदक भरून काढण्याकरता ५० हजार माणसे कामास लावली. आठशे यार्ड रुंद आणि तीस यार्ड खोल असणारा खंदक दगड, लाकडे, कापसाची गाठोडी वगैरे टाकून त्यांनी भरून काढला. अशाप्रकारे किल्ल्यावर चाल करून जाणाऱ्या आपल्या सैनिकांकरता त्यांनी रस्ता तयार केला. परंतु, औरंगजेबाचे दोन हजार घोडदळ आणि पंधरा हजार पायदळासह नबाब हसन अलिखान याचे मोगल सैन्य ४ फेब्रुवारी १६८२ रोजी कोकणात येऊन थडकले. दिनांक ३० जानेवारी १६८२ रोजी मोगलांनी कल्याण जिंकून घेतले. त्यामुळे संभाजी महाराजांना सिद्दीवरील मोहीम महाडच्या दादाजी प्रभू देशपांडे यांच्यावर सोपवून मोगल सेनेशी मुकाबला करण्यासाठी रायगडावर परत यावे लागले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३ जानेवारी इ.स.१६८४
छत्रपती संभाजी महाराजांनी वसईच्या देशमुखास पत्र लिहिले:-
सुलतान माजम व शाबदिखान गनीम दोहिकडून कोकणात उतरला, या प्रसंगी हशामांचे बहुतच प्रयोजन आहे.
याकरिता संताजी, येसाजी यास नौसंचनी हशमाचा जमाव वरघाटे पाठविले असे हे सांगतील तिहेप्रमाणे हशमांची नौसंचनी करून पाठवून देणे, तुम्हासंगी हशामाचा पोख्ता जमाव झाला तरी गनिमाचा काय गुमान लागला बुडविलाच जातो.
आजवरी स्वामीने तुमचे चालविले ते सार्थक या दिवसात करून आपला मजुरा करून घेणे म्हणजे स्वामी तुम्हावरी संतोषी होतील, आपले समाधान असो देणे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३ जानेवारी इ.स.१७११
गोव्याच्या व्हिसेरेईने पोर्तुगालच्या राजास लिहीलेल्या पत्राची नोंद!
इ.स.१७०७ छत्रपती शाहू महाराजांचे महाराष्ट्रात आगमण झाले तेव्हा त्यांच्याशी लढण्यासाठी महाराणी ताराबाईसाहेब यांनी व्हिसेरेई दों रुद्रिगु द कांश्त याला पत्र पाठवून तहाचा संदर्भ लावला होता. व्हिसेरेईने पत्रोत्तरी महाराणी ताराबाईसाहेब यांना कळविले होते की, तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी त्यांचे दुत आपणाकडे पाठवावे. परंतु ह्या वाटाघाटी पुर्ण होण्यापूर्वीच छत्रपती शाहू महाराजांकडून महाराणी ताराबाईसाहेब यांचा पराभव झाल्याने त्यांना कोल्हापूरला जाऊन पन्हाळ्याच्या किल्ल्याचा आश्रय घ्यावा लागला. पोर्तुगिजांकडून आपणाला संकटप्रसंगी मदत झाली नाही हे महाराणी ताराबाईसाहेब यांच्या मनात राहीले व पन्हाळ्याला स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी पोर्तुगिजांशी शत्रुत्वाचे धोरण अवलंबिले. "महाराणी ताराबाईसाहेब यांचे सैन्य गोव्याच्या सिमेवर गोळा झाले आहे. हे सैन्य केव्हा गोव्यात घुसेल त्याचा नेम नसल्याने 'कोंगो' येथील ठाण्याच्या मदतीला आरमार पाठवीता आले नाही".
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३ जानेवारी इ.स.१७३७
यशवंत बुरुज - मार्टेलो टॉवर
१७३७ ऑक्टोबरला अर्नाळा किल्ल्याच्या तटबंदीच्या बुरुजाच्या बांधकामास सुरुवात झाली.
३ जानेवारी १७३७ ला किल्ल्यापासून अदमासे १००० हात अंतरावर फिरंगी बुरुज होता त्याचा बांधकामास हात घातला
घेरा ११५ हात, पाया जमिनीत ४ हात, १८ हात जमिनीपासून उंच ,नऊ हातावर सफेली चुने गच्ची बांधणी केली ,आठ जनग्या धरल्या व १६ तोफांच्या जागा केल्या त्यावर सुतार लावोन तक्तपोशी कौलारु केली
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३ जानेवारी इ.स.१७३९
गुजरात मधील ठाणे बादल पारडी घेण्यासाठी चिमाजी आप्पांनी, पिलाजी जाधव यांचा मुलगा सटवाजी जाधव यास रवाना केले, पण दमण येथील किल्ल्यांची भक्कम शिबंदी पाहता, या मुलखात रायजी शंकर नावाच्या एका माहितगाराला पाठविले व ३ जानेवारी १७३९ रोजी लिहिलेल्या पत्रात चिमाजी आप्पा चौकशी करताना सटवाजी जाधवास लिहितात.
श्री. शके १६६० पौष शु॥ ५.
राजश्री सटवोजी जाधव गोसावी यांसि :--
अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्नो। चिमणाजी बल्लाळ आशीर्वाद. सु॥ तिसा सलासीन मया अलफ. रामनगरकर राज्यांस आह्मी भेटीस बोलाविलें आहे. ऐशास, तुह्मी बादलापारडीस खटपट करावयाचा उद्योग केला असेल, तरी रामनगरकर राज्यांसदेखील तुह्मी आपणाजवळ ठेऊन घेणें; आणि काम सिद्धीस नेणें. तैसेंच रा। रायाजी शंकर यास कार्य असिलें तर ठेवणें. ते राहातील. जरी तुह्मी तेथील कार्यास उपक्रम केलाच नसेल, तर मग विना कार्य मशारनिल्हेस ठेवावेसें नाहीं. पाठऊन देणें. डहाणूजवळ डोंगर बांधावयाचा आहे तो बांधतील. सारांश, तुह्मी बादलापारडी जेर करावयाचा उद्योग केला असेल तरी व रायाबा तेथें असावेसें असेल,
तें वर्तमान लिहिणें ?
लेखन सीमा. श्री राजा शाहू नरपति
हर्षनिधान बाजीराव
बल्लाळ प्रधान.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३ जानेवारी इ.स.१७७५
गोव्याच्या व्हिसेरेईने पुणे दरबारातील पोर्तुगिजांचे वकील नारायण शेणवी धुमे यांना लिहीलेल्या पत्राची नोंद!
"आशियाई लोक हे लांचलुचपतीला बळी पडणारे असतात. तेव्हा तुम्ही मंत्री आणि अधिकारी यांना लाच चारून त्यांना सहज वश करून घेऊ शकाल. मात्र पैशांचा व्यवहार विश्वासू माणसांमार्फत करावा".वानगी दाखल वरील अवतरण दीले आहे, त्यावरून पोर्तुगीज आणि पेशवाईतील मुत्सद्दी यांच्यामधील संबंधावर चांगला प्रकाश पडतो.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३ जानेवारी इ.स.१८३१
भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेच्या 'शिक्षिका', 'मुख्याध्यापिका' आणि पहिल्या 'शेतकरी शाळेच्या' संस्थापक "महानायिका क्राँतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती (मृत्यू : मार्च १०, इ.स. १८९७ पुणे)
सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #📜इतिहास शिवरायांचा
💐💐🙏💐💐 #माता सावित्रीबाई फुले जयंती #सावित्रीबाई फुले #सावित्रीबाई फुले #सावित्रीबाई फुले #सावित्रीबाई फुले
✨💐💐🙏💐💐✨ #सावित्रीबाई फुले #सावित्रीबाई फुले #सावित्रीबाई फुले #सावित्रीबाई फुले #माता सावित्रीबाई फुले जयंती
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 २ जानेवारी इ.स.१६६१
मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांना शिवाजी महाराजांनी मुजुमदारी बहाल केली. मोरोपंत त्रिमल पिंगळे. शिवशाहीतील एक मानाचे पान. स्वकर्तुत्वाच्या बळावर पुढे आलेले एक असामान्य व्यक्तिमत्व. हिंदुपतपादशाहीच्या राजधानीचा मान ज्या दुर्गाला मिळाला, ते तीर्थक्षेत्र राजगड. या राजगडाच्या बांधणीची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलणारी विभूती म्हणजे मोरोपंत पिंगळे. या मोरोपंत पिंगळ्यांचे कर्तुत्व अफजलस्वारीच्या प्रसंगांवरून ध्यानी घेऊन शिवरायांनी त्यांना मुजुमदारी बहाल केली. तो दिवस म्हणजे इ.स. २ जानेवारी १६६१. मुजुमदारी म्हणजे राज्याचा जमा खर्च पाहाणे. केवढी महत्वाची जबाबदारी ही ? अष्टप्रधानमंडळातील एक महत्वाचे पद. पण मोरोपंतांचे क्षात्रतेज लपू शकले नाही. जमा - खर्च प्रामाणिकपणे पाहाण्याच्याइतकीच तरवार चालवण्याची धडाडी आणि उत्तम मुत्सद्देगिरीचा पिंड लाभलेले मोरोपंत, हे पूढील वर्षभरातच 'पेशवे' झाले (दि.०३/०४/१६६२).
मोरोपंत पेशवे पंतप्रधान - ते हेच. स्वराज्यस्थापनेच्या काळापासून सतत शिवकार्याचे पाईक ठरलेले हे एक अलौकिक व्यक्तिमत्व आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/lTjqp_C7jHY?si=e7aEXMuNvjk1PNv0
📜 २ जानेवारी इ.स.१६७१
सरदार सुर्यजी काकडे यांना वीरमरण
साल्हेरच्या युद्धात त्यांना विजय मिळाला, पण आनंदाच्याबरोबर युद्धातील विजय दु:ख घेऊनच येतो. या युद्धात महाराजांचा एक अत्यंत आवडता, शूर जिवलग सूर्याजी काकडे हा मारला गेला. महाराजांना अपार दु:ख झाले. त्यांच्या तोंडूनउद्गार बाहेर पडले, ' माझा सूर्याराऊ पडिला. तो जैसा महा भारतातील कर्ण होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २ जानेवारी इ.स.१६८८
(पौष शुद्ध दशमी शके १६०९ संवत्सर प्रभव वार सोमवार)
हरजीराजे महाडिक यांचा पराक्रम!
जिंजी प्रदेशात हरजीराजे महाडीक यांची मोठी साथ छत्रपती संभाजी महाराजांना मिळत होती. हरजीराजे शुर व पराक्रमी! मुळातच तशातच महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांचे बळ लाभल्यामुळे त्यांना जास्त बळकटी आली. हरजीराजेाजे महाडिक यांनी कोनीमेरच्या उत्तरेकडील ९, नऊ मैलांवरील मराकण हा प्रदेश लुटला!
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २ जानेवारी इ.स.१७३५
मराठे व पोर्तुगीज यांच्यात १७३० सालानंतर बरेच आमनेसामने झाले. पोर्तुगीजांस पेशव्यांशी युद्ध नको होते. कारण पोर्तुगीजांना मराठ्यांची दहशत वाटत असल्याचे उल्लेख आहेत. पोर्तुगीज व मराठे यांचे चौलच्या मशिदीजवळ २ जानेवारी १७३५ ला झुंज होण्यापूर्वी काही दिवस, बाजीरावांनी सन १७३२ च्या तहास अनुसरून कल्याण व भिवंडी येथील व्यापाऱ्यांसाठी वसईत एक वखार बांधण्यास वसईच्या 'जराल' कडे जागा मागितली होती. परंतु त्याने ति जागा तर दिली नाहीच, उलट खुद्द बाजीरावांस अनुलक्षून 'निग्रो' (Negro) असा अपमानास्पद शब्द वापरला !
ह्या काळी पोर्तुगीज लोक हिंदूस सामान्यतः 'जेंतीव' (अशिक्षित) किंवा 'नेग्रु' (काळा) अशा शब्दाने संबोधीत. वासुदेव जोशी यांनी बाजीरावांना लिहिलेल्या पत्रात लिहितात, 'फिरगियांनी लबाडी केली. पत्र पाठविले त्याचे उतर मगरूरपणे लिहिले याकरिता त्याला ठेचगा द्यावा म्हणून लिहिले. निदान दोन अडीच हजार माणूस व दीड हजार व दोन हजार स्वार सिद्ध करावे म्हणजे स्वामींचे प्रतापे कार्य सिद्धीस जाते.'
पुढे १७३९ सालात मराठ्यांनी वसई प्रांतातला पोर्तुगीज अंमल पूर्णपणे उठवला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २ जानेवारी इ.स.१७५४
इंग्रज आणि कर्नाटक नबाब यांच्या भांडणात मुरारराव घोरपडेनी मध्यस्थी केली व दोघांकडूनहि पैसे घेतले. तसेच फ्रेंचांबरोबर तह केला व पुढील भांडणात ते इंग्रजांविरुद्ध लढले. आणि इंग्रज फ्रेंचांच्या कलहात भाग घेऊन त्यांनी आपल्या हातून गेलेली त्रिचनापल्ली पुन्हा मिळविली. या घडामोडी पेशव्यास पेशव्यांचा कर्नाटकातील वकील लिहून कळवित होता. त्यान पेशव्यास कर्नाटकात त्वरीत येण्यासाठी लिहिले. त्याप्रमाणे पेशवे २ जानेवारी १७५४ रोजी पुणे सोडून कर्नाटक स्वारीस निघाले. ही पेशव्यांची कर्नाटकातील दुसरी स्वारी होती हरपनहल्ली, बागलकोट, होटल्ली, कुडादंगी, बिदनूर इत्यादि संस्थानिकांकडून तारीख २३ मार्च १७५४ पर्यंत ३ लक्ष ६ हजार एवढी खंडणी पेशव्यांनी वसूल केली. अशा रीतीने ज्यांनी खंडणी दिली त्या त्या पाळेगारांना अभय देऊन पेशवे ४ जून १७५४ रोजी पुण्यास परत आले. वरील स्वारीत पेशवे कर्नाटकात असता त्यास निजाम पुण्यावर चाल करून जाणार अशी बातमी समजली. म्हणून पेशवे घाईने पुण्यास परतले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २ जानेवारी इ.स.१८०३
दुसरे बाजीराव व इंग्रज यात तह (वसईचा तह) घडून आला ही बातमी वसईहून पुण्यास लगेच पोचली. पुण्यास दिनांक २ जानेवारी १८०३ रोजी अमृतराव, होळकर व त्यांचा दिवाण गणपतराव, मीरखान, बाबा
फडके, मोरोबा फडणीस, वगैरे मंडळी एकत्र जमून पुढील विचार करू लागली. बाजीरावांनी राज्य बुडविले व इंग्रज घरात घातला, यास काढून लावावयाचे तर शिंदे, नागपूरकर भोसले या सर्वांनी एकजुटीने वागून इंग्रजांशी मुकाबला करावयास हवा हा विचार सर्वत्रांस पसंत पडला पण हे शिंदे उत्तरेत, होळकर दक्षिणेत, नागपूरकर भोसले नागपुरात, अशी स्थिती असल्यामुळे ते एकत्र येऊन, त्यांची एकजूट होऊन इंग्रजांविरुद्ध आघाडी बनवून ती प्रत्यक्षात घडवून आणणे हा एकच मार्ग सर्व मराठ्यांना सुचत होता. त्याप्रमाणे मराठे सरदारांकडून हालचाली होऊ लागल्या. त्यांची सर्व हकिगत इंग्रजांस कळत होती म्हणून इंग्रज सावध राहून त्याने हा बनाव होऊ न देण्याच्या क्लृप्त्या शोधून काढिल्या व ते त्यांत यशस्वी झाले. जानेवारी १८०३ पासून पुणे दरबारने होळकर व अमृतराव पेशवे यांच्या पुढारीपणाने सर्व मराठा मंडळाची जूट बनवून मराठी राज्य सावरण्याचे ठरविले. यशवंतराव होळकर यांस अमृतरावांनी पुण्यास बोलाविले होते. त्याबद्दल त्यास एक कोट रुपये देऊ केले होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २ जानेवारी इ.स.१९४३
पहाटे मुरबाड जवळील सिध्दगडाच्या पायथ्याशी एका ओढ्याकाठी वीरभाई कोतवाल त्यांचे सहकारी व इंग्रज यांच्यात रणसंग्राम सुरू होता . यामध्ये वीरभाई कोतवाल व त्यांचे सहकारी हिराजी पाटील शहीद झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 १ जानेवारी इ.स.१३९९
शके १३२१ च्या पौष व. ९ रोजी तैमूरलंग भारतांतून अगणित लूट घेऊन आणि मनसोक्तपणे रक्तपात करून आपल्या मायदेशी गेला.
दिल्ली शहर हस्तगत झाल्याबरोबर तैमूरच्या सैन्यांत विजयोत्सव सुरू झाले. पकड, लूट, मारहाण या प्रकारांना ऊत आला. पंधरा दिवसपर्यंत तैमूरलंगाचा मुक्काम दिल्लीस होता. भारतांतील कलाकौशल्यावर तो फार खुष होता. कित्येक कारागीर त्याने स्वतःबरोबर धेतले. जाता जाता ही त्याने पुष्कळच अनन्वित प्रकार केले. मिरत शहरी त्याच्या सैन्याची थट्टा कोणी केली म्हणून त्यानें सर्वोची कत्तल केली. आग्नि व तरवार यांच्या साह्याने तैमूरचा तुफानी प्रचार होत होता. हरद्वार येथे आल्यावर त्यास समजलें कीं, गोमुखांतून गंगा पडते. या 'पारवंडीपणा 'वर तो खूपच संतापला आणि त्यामुळे त्यावर विश्वास ठेवणारांना कडक शासन भोगावे लागले. लक्षावधि लोकांना त्याने मृत्यु- लोकांत पाठविले.
मनुष्यजातीचे महान् शत्रु म्हणून इतिहासांत जे नांवाजलेले आहेत त्यांच्यांत तैमूरची गणाना केली जाते. तो एखाद्या नवीन शहरी आला म्हणजे तेथील लोकांजवळ सर्व संपत्तीची दरडावून मागणी करीत असे. नंतर ती लुटून आणण्यास आपली फौज पाठवी. सर्व लोकांना पकडून तो एका ठिकाणी जमा करी. अशा लोकांतून कोणी कारागीर किंवा विद्वान् असतील तर तो त्यांना निवडून दूर करी. इतरांचा जीव घेऊन त्यांच्या शिरांचा एक मोठा ढीग शहराबाहेर रचण्यांत येई. बगदाद शहर घेतले त्या वेळेस अशा शिरांचे मनोरे एकशेवीस झाले होते. केव्हां केव्हा जिवंत माणसांना चुन्याने व विटांनी चिणून त्यांचा तट बांधण्याचे काम तैमूरचे कुशल कारागीर करीत."
हिंदुस्थानांत मुंगली जुलभास व्यवस्थितपणे सुरुवात तैमूरनेच केली. त्याच्या नांवाने बादशाहीहि चालू होती. तो जिवंत असेपर्यंत त्याच्या नांवानें खुत्बा वाचण्यांत येत असे. तैमूरलंगाची स्वारी म्हणजे एक प्रकारचा ईश्वरी क्षोभच भारतीय लोक समजत असत.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
📜 १ जानेवारी इ.स.१६६२
पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचा जन्म.
(मृत्यू: १२ एप्रिल १७२०)
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #📜इतिहास शिवरायांचा #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/JGULDVH_rrc?si=eHkIrwSvN1834Z31
📜 १ जानेवारी इ.स.१६६५
(पौष वद्य दशमी शके १५८६ संवत्सर क्रोधी वार रविवार)
महाराज सहपरिवार महाबळेश्वर येथे मुक्कामी!
डिसेंबर इ. स. १६६४, रोजीच्या शेवटच्या आठवड्यात महाराजांनी डचांची वेंगुर्ल्याची वखार साफ लुटली. मात्र याच काळात धुमकेतू दर्शनामुळे जनमानसात खळबळ माजली होती, त्या पाठोपाठ येणाऱ्या सूर्यग्रहणामुळे महाराजांनी आपली इतर कामे बाजूला सारून ग्रहण निवारणार्थ पर्वणी साधण्यासाठी महाराज सहपरिवार महाबळेश्वर येथे आले. सूर्यग्रहणाच्या या पर्वावर महाराजांनी मनोमन माँसाहेब जिजाऊ आणि सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला करण्याचे ठरविले. या सगळ्याची आवश्यक ती तयारी करण्यासाठी महाराज महाबळेश्वर येथे मुक्कामी आले. याच काळात महाराजांनी पुढे ग्रहणानिमित्त पर्वणी साधून सुवर्णतुलेचा योग घडवून आणला.
📜 १ जानेवारी इ.स.१६७५
इ.स. १६७३ मध्ये महाराजांनी कर्नाटकातील हुबळी येथे घातलेल्या छाप्यात इंग्रजांचीही वखार लुटली गेली. यात इंग्रजांचे सुमारे पाऊण लाख रुपयांचे नुकसान झाले. हुबळी आणि राजापूर इथल्या लुटीची नुकसानभरपाई मिळावी म्हणून मुंबईचा डेप्युटी गव्हर्नर ऑनजिअर याने महाराजांकडे पुष्कळवेळा आर्जव केले. पण महाराजांनी ते मान्य केले नाही. मे १६७३ मध्ये मुंबईहून टॉमस निकल्स नावाचा वकील महाराजांना भेटायला रायगडावर आला, पण त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही. निकल्स हात हलवत परत फिरला. पुढे इ.स. १६७४ च्या ४ एप्रिलला मुंबईहूनच हेन्री ऑक्झेंडन हा वकील महाराजांच्या भेटीसाठी आला. त्याने बरोबर येताना वीस कलमी मसुदा तयार करून आणला होता. त्यात बाकीची सर्व कलमे ही व्यापारविषयक होती. पण शेवटचे कलम होते, ते म्हणजे मराठ्यांच्या राज्यात इंग्रजांची (कंपनीची) नाणी चालावीत. पण महाराजांनी नेमके हेच कलम रद्द करून बाकीची कलमे मान्य केली. यावेळेस मराठे आणि इंग्रज यांच्यात समझोता झाला असतानाही दि. १ जानेवारी १६७५ रोजी खुद्द महाराजांच्या फौजेने व-हाड-खानदेशातील मोगलांवरील स्वारीच्या वेळी इंग्रजांची धरणगावास असणारी वखार लुटली. याची चौकशी करण्याकरता, खरंतर जाब विचारण्याकरता आणि नुकसानभरपाईसाठी इंग्रजांचा ऑस्टिन नावाचा माणूस रायगडावर आला. पण महाराजांनी त्याला स्पष्टपणे सांगितले, 'आम्ही शत्रूच्या मुलुखात युद्ध करीत असता, कोणाचेही नुकसान झाले तरी ते भरून देण्यास आम्ही बांधील नाही!' बिचारा ऑस्टिन मुकाट्याने परत फिरला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
📜 १ जानेवारी इ.स.१६८१
इंग्रजांच्या आश्रयाने मराठी मूलखाला त्रास देणाऱ्या सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी संभाजी महाराजांनी इंग्रजांशी बोलणी करण्यासाठी आपला वकील मुंबईला पाठवला.संभाजीराजेंचे वकील आवजी पंडित यांनी इंग्रजांना सांगितले की शिवाजी महाराजांशी झालेल्या तहाप्रमाणे इंग्रजानी जर सिद्दीचा बंदोबस्त केला नाही तर संभाजीराजे इंग्रजांशी युद्ध पुकारतील. आवजी पंडित मुंबईत आल्याचे पाहून मराठ्यांच्या आरमाराला तोंड द्यायची तयारी नसल्याने सिद्दीने आपले आरमार बंदराच्या बाहेर नांगरले. त्यानंतर शंभुराजेंच्या आणि पर्यायाने मराठ्यांच्या सामर्थ्याची पुरेपुर माहिती व परिणामांची त्यांना असलेली भीती इंग्रजानी पत्र पाठवून लंडनला कळवली होती. "संभाजीराजे इंग्रजांशी मैत्री राखण्यासाठी तयार असले तरी ते यापुढे हा उपद्रव सहन करणार नाहीत. सिद्दीचा मदत ताबडतोब थांबवून त्याला आरमारासह बाहेर काढले नाही आणि त्याची मदत चालू राहिली तर संभाजी महाराजांनी मुंबईवर स्वारी करण्याचा निश्चय केला आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
📜 १ जानेवारी इ.स.१६८२
छत्रपती संभाजी महाराजांनी डिचोलीच्या सुभेदाराची बदली केली आणि शिवाजी फडनाइकांची नेमणूक केली. ही बातमी समजल्यावर विजरई येसाजी गंभिरराव यांस कळवितो की, "आमचे या दोन्ही राज्यांत सलोखा निर्माण व्हावा ही तळमळीची इच्छा आहे".
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
📜 १ जानेवारी इ.स.१६८३
शके १६०४ च्या पौष शु. १३ रोजी समर्थपंचायतनांतील प्रसिद्ध सत्पुरुष भागानगरकर केशवस्वामी हे समाधिस्थ झाले !
महाराष्ट्रातील संतांत तीन पंचायतने प्रसिद्ध आहेत. निवृत्ति, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई व चांगदेव हे ज्ञानेश्वर-पंचायतन, एकाजनार्दन, रामजनार्दन, जनी- जनार्दन, विठा रेणुकानंद व दासोपंत हे एकनाथ -पंचायतन व रामदास, जयराम स्वामी, रंगनाथ स्वामी, केशव स्वामी व आनंदमूर्ति हे रामदास-पंचायतन. या शेवटच्या पंचायतनांतील केशव स्वामी खेरीज इतर सर्व संत प्रांतांत शेजारी शेजारी राहत असत. त्यामुळे त्यांच्या वारंवार गांठी-भेटी होत असत परंतु केशव स्वामींचे वास्तव्य मात्र हैद्राबादेस असे. केशव स्वामी मूळचे कल्याणीचे. आत्मारामपंत कुलकर्णी व गंगाबाई या सच्छील दांपत्याच्या पोटी केशवस्वामींचा जन्म झाला. असे सांगतात की, केशवस्वामी वयाच्या पांचव्या वर्षापर्यंत बोलतच नव्हते. परंतु पुढे श्रीमत् आचार्य यांच्या कृपेवरून केशवस्वामी बोलूं लागले. संमर्थीप्रमाणें यांना ही गाण्याची अत्यंत आवड होती. केशवस्वामी ' स्वामी असले तरी प्रपंची होते. ते व त्यांची पत्नी नेहमी भगवभक्तीत दंग असत. जनतेत धर्मश्रद्धा निर्माण' करण्यासाठी, हे स्वतः कविता रचून कर्तिने करीत असत. त्यांच्या पद्यांतून वरवर शृंगाराची छटा असे. गीतगोविंदकतें जयदेव कवि यांचेच अवतार म्हणून ही लोक यांना समजत. यांच्या काव्याबद्दल राजा- राम प्रासादी भक्तमंजरीमालेत म्हणतात.
"जगत्रं जाली कीर्ति । धन्य कृपाळु केशवमूर्ती ॥
उद्घारावया यया जगतीं । जयदेव कवि अवतरला ॥
पूर्वी शृंगार देवाचा । वर्णितां लाचावली वाचा ।
तोचि अभ्यास पडता साचा । अनुकार कवनाचा तोचि पै ॥
अध्यात्मयुक्त शृंगारिक । भाषण जयाचें नेमक ।
जाहलें काव्य तेंचि चोख । प्रासादिक सकल जनां ।
" केशवस्वामींची कविता श्री. नरहरशास्त्री स्वरशीकर यांनी प्रसिद्ध केली आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
📜 १ जानेवारी इ.स.१७०१
परळीपासून बादशहाला सैन्यासह भूषणगडाकडे जावयाचे होते. भूषणगड परळीपासून रस्त्याने ४५ मैल अंतरावर. परळीहून बादशहाने भूषणगडाकडे जाण्यासाठी भर पावसाळ्यात २१ जून १७०० ला कूच केले. ज्या जनावरांवर सामानाची ओझी लावली होती ती जनावरे पटापट मरू लागली. कृष्णा नदीला पूर होता. त्यातून सैन्य मोठ्या मुष्किलीने पैलतीरी पोहोचले. शेकडो उपासमारीने मेले, पुढे हळूहळू मार्ग आक्रमत मोगली लष्कर २५ जुलै रोजी भूषणगडास पोहोचले व गडाचा ताबा मिळविला. येथे बादशहाने आपल्या शहाजाद्याला व इतर सरदारांना सैन्यासह निरनिराळ्या शहरात जाऊन विश्रांती घेण्यास पाठविले. त्यांनी त्याप्रमाणे केले व त्यामुळे त्यास व त्यांचे घोड्यांस भरपूर दाणागोटा मिळाल्यामुळे ते आनंदित झाले. बादशहा ३० ऑगस्ट १७०० ला खवासपुरी येथे जाऊन राहिला. तेथे असताना माण नदीस अचानक मोठा पूर आल्याने चार-पाच हजार लोक, हत्ती, घोडे, वगैरे वाहून गेले व लष्कराचे फार नुकसान झाले. नंतर १६ डिसेंबर १७०० ला बादशहाने मिरजेस जाण्यासाठी आपला तळ हालविला व १ जानेवारी १७०१ ला बादशाही सैन्य मिरजेस आले. त्यानंतर तो २ महिने तिथेच मुक्काम ठोकून राहिला. त्या मुदतीत त्याने पन्हाळगडावर स्वारी करण्याचे ठरविले. त्यासाठी उत्तर हिंदुस्थानातील ताज्या दमाची फौज व सामानसुमान मिरजेस येऊन पोहचले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
📜 १ जानेवारी इ.स.१८१८
कोरेगाव भिमाची लढाई
ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई १ जानेवारी इ.स. १८१८ रोजी इंग्रज ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व मराठा साम्राज्य यांच्यात झाली होती. ब्रिटिशांच्या बाजूने एकूण ८३४ सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टाँटन करीत होता तर मराठा साम्राज्याच्या बाजूने २८,००० सैनिक होते, ज्याचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरा करीत होता. इंग्रजांच्या सैनिकांत 'बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी'चे ५०० महार सैनिक होते, काही युरोपियन व इतर काही सैनिक होते. मराठ्यांच्या सैनिकांत मराठा, अरब व गोसाई या सैनिकांचा समावेश होता. पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महार, मांग व इतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने मराठ्यांविरूद्ध लढले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
📜 १ जानेवारी इ.स.१८४८
महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे येथे भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. समाजाच्या विरोधात जाऊन एखादं चांगलं काम करायचं झालेतरी अंगावर दगडी पडतात. सगळ्यात या दगडी खाण्याची हिम्मत असतेच असे नाही, मनात खूप असते ओ पण समाज काय म्हणेल या विचारातून उठणाऱ्या मनातल्या लाटा पुन्हा मनातचं विरून जातात. पण क्रांतीज्योती कधीच डगमगली नाही, नावाप्रमाणेचं महात्मा जोतीबा फूलेंनी अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी सुरवात केली होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 ३१ डिसेंबर इ.स.१६००
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना
डचांच्या अतिपूर्वेकडील मसाल्याच्या फायदेशीर व्यापाराला शह देण्यासाठी सप्टेंबर १५९९ मध्ये लंडनमधील व्यापाऱ्यांनी एक संघटना स्थापन केली. देशातील भागधारकांकडून ३,००,००० पौंडांचे भांडवल जमविले. ३१ डिसेंबर १६०० ला एलिझाबेथ राणीने ईस्ट इंडिया कंपनीला पंधरा वर्षांच्या कराराने अतिपूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची सनद दिली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/1rsBsmNCgWM?feature=share
📜 ३१ डिसेंबर इ.स.१६६३
महाराज नाशिक शहरात त्र्यंबकेश्वरला पोहोचले. वास्तविक पुण्यापासूनच पुढील सर्व भाग मोगलांच्या त्यामुळे एवढ्या सैन्यानिशी सुरतेपर्यंत ३०० मैलांचा धाडशी प्रवास शत्रू ताब्यात होता. मुलुखातून महाराजांनी कशा प्रकारे केला असेल या विचारानेच मन दंग होते. दुर्दैवाने महाराजांच्या यावेळेच्या सुरत प्रवासाच्या मार्गाविषयी सविस्तर माहिती उपलब्ध नाही. फक्त शिवापूर दप्तरातील यादीत "महाराजांनी पौष शुद्ध द्वादशीला त्र्यंबकराज दर्शन घेतल्याची नोंद आढळते. याचा अर्थ वार रविवार दि. ६ डिसेंबर इ. स.१६६३ रोजी महाराज किल्ले राजगडाहून निघून त्र्यंबकेश्वरला पोहोचले. किल्ले राजगड ते त्र्यंबकेश्वर अंतर सुमारे २०० मैल पडतj म्हणजे त्र्यंबकेश्वर पर्यंत महाराजांच्या प्रवासाचा वेग दिवसाकाठी ८ मैल पडत होता. अॅबे कॅरे या समकालीन प्रवाशाने लिहिले आहे की, महाराजांनी यावेळी फक्त रात्रीच प्रवास केला. दिवसा उन्हापासून बचाव करण्यासाठी व आपल्या हालचालीचा सुगावा शत्रूस लागू नये म्हणून ते दाट जंगलात विश्रांती घेत. महाराजांचा वेग लक्षात घेता अॅबे कॅरेचे हे विधान विश्वसनीय समजायला हरकत वाटत नाही. महाराज त्र्यंबकेश्वरला कोणत्या मार्गाने गेले याबद्दल कुठेच उल्लेख आढळत नाही. आमच्या मते किल्ले राजगडावरून निघालेले महाराज किल्ले सिंहगडा जवळून किल्ले लोहगड- माहुली-त्र्यंबक असे डोंगराच्या आश्रयाने पुढे सरकले असावेत. हिरवळीने विनटलेल्या काळ्या कुळकुळीत ब्रम्हगिरीच्या छत्रछायेत त्र्यंबकराज विराजमान झालेला महाराजांनी पाहिला. त्याची मनोभावे पूजा बादली. त्र्यंबकेश्वर येथील महाराजांचे तीर्थोपाध्याय होते वेदशास्त्रसंपन्न वेदमुर्ती राजेश्री आपदेव भट ढेरे. नाशिक शहरात त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३१ डिसेंबर इ.स.१६७५
(पौष वद्य दशमी, शके १५९७ संवत्सर राक्षस वार शुक्रवार)
छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगिजांच्या सिबॉन नावाच्या किल्ल्याच्या समोरच २ भक्कम गुढ्या उभारण्याचे काम सुरू केल्याने घाबरून पोर्तुगिजांनी महाराजांशी युद्ध पुकारले. मात्र पोर्तुगिजांच्या कुठल्याही विरोधाला न जुमानता छत्रपती शिवाजी महाराजांनी हे काम अखंडपणे सुरू ठेवले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३१ डिसेंबर इ.स.१६८७
हरजीराजे व संतोजी भोसले यांच्यात बेबनाव!
मोगल सैन्य कर्नाटकात जाणार हे जाणून छत्रपती संभाजी महाराजांनी केसोत्रिमल पिंगळे यांना १२ हजार स्वारांनिशी कर्नाटकात रवाना केले. त्यांचे बरोबर यावेळी संताजी भोसले होते. हरजीराजेंच्या मदतीसाठीच हे सैन्य केसोपंतांबरोबर छत्रपती संभाजी महाराजांनी पाठविले. मात्र त्यामुळे अर्काटच्या किल्ल्यासाठी संताजींनी ही मदत केली नाही. या वादातून हरजीराजेंचे, केसोत्रिमलांचे वाद सुरू झाले. यात संताजी भोसले हे केसोत्रिमलांच्या पक्षाचे, त्यामुळे साहजिकच हरजीराजेंचे व संताजी भोसलेंचेही वाद होऊ लागले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३१ डिसेंबर इ.स.१७९७
तुकोजी होळकर वारले व त्याच्या मुलांमध्यें सरदारीबद्दल तंटा लागला. तेव्हां दौलतराव शिंद्यानें काशीरावाचा पक्ष घेऊन त्याचा शूर भाऊ मल्हारराव याच्यावर एकाएकीं छापा घालून त्यास ठार मारून त्याच्या अल्पवयस्क मुलास (खंडेराव) आपल्यापाशीं ठेवून त्याच्या नांवें होळकरी संस्थान चालविलें. त्यामुळें त्यांच्यांत व यशवंतरावांत वैर माजलें. आतां शिंदे हा नानांजवळ कबूल केलेली रक्कम व नगरचा किल्ला आणि १० लाखांचा मुलूख मागूं लागला. नानानें बरीच रक्कम भरून उत्तरेकडे कूच केल्यास किल्ला देण्याचें कबूल केलें. कारण क्षणैकबुद्धि रावबाजी त्याच्या साहाय्यानें नानास अपाय करण्यास टपला होता. परंतु शिंदा जाईना. यावेळीं अनेक मसलती झाल्या. अखेर वचन देऊन शिंद्यानें नानांस आपल्या गोटांत आणवून विश्वासघातानें (रावबाजीच्या सांगण्यावरून) त्यानां कैद करून नगरास पाठविलें (३१ डिसेंबर १७९७).
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३१ डिसेंबर इ.स.१८१७
#भिमा_कोरेगावची_लढाई
रात्री ८ वाजता बॉम्बे नेटीव्ह आर्मीची एक बटालियन (सुमारे हजार सैनिक), मद्रास आर्टिलरीच्या दोन ६ पाउंडर तोफा व त्यावरील अधिकारी, आणि २५० घोडेस्वार घेऊन कॅप्टन स्टॉन्टन शिरूरकडून पुण्याकडे निघाला होता. रात्रभर प्रवास करून १ जानेवारी १८१८ रोजी हे सगळे कोरेगावपासून दोन मैलांवर पोहोचले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३१ डिसेंबर इ.स.१९२६
#इतिहासाचार्य_विश्वनाथ_काशीनाथ_राजवाडे यांचा मृत्यू
(जन्म जुलै १२, १८६३) हे मराठी इतिहास-संशोधक होते. To
राजवाडे अतिशय प्रखर दृढनिश्चयी इतिहास संशोधक म्हणून ओळखले जात. आजन्म भ्रमंती करून त्यांनी मराठय़ांच्या इतिहासाची कागदपत्रे जमविली आणि अस्सल साधनांचे बावीस खंड संपादून प्रसिद्ध केले.
त्यांनी संपादित केलेले 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' ह्या ग्रंथाचे खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 ३० डिसेंबर इ.स.१६००
काही ब्रिटिश व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्लंडच्या राज्या तर्फे या कंपनीला भारतातील व्यापाराचे सारे अधिकार देण्यात आले. त्या नंतर १६०८ साली कंपनीचे पहिले जहाज सुरतेच्या बंदरात येऊन धडकलं.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩शिवराय
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/UrP5pkKiLMo?feature=share
📜 ३० डिसेंबर इ.स. १६८०
(पौष शुद्ध अष्टमी शके १६०१ सिद्दार्थी संवत्सर वार मंगळवार)
छत्रपती संभाजी महाराजांची सुवर्णतुला!
१४ जानेवारी इ.स.१६८१ ते १६ जानेवारी इ.स.१६८१ छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला असला तरी त्यासाठी आवश्यक असणारी सुवर्णतुला आज करण्यात आली. या सुवर्णतुलेनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी सपत्नीक किल्ले प्रतापगडावर जाऊन कुलस्वामिनी भवानीआईचे षोडशोपचारे पूजाअर्चा केली. सदर राज्यभिषेक व सुवर्णतुलेचे अनुपुराणात वर्णन आढळत असले तरी समकालीन इतर कागदपत्रांत फारसे उल्लेख आढळत नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांची सुवर्णतुला झाली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ३० डिसेंबर इ.स.१७०४
रामचंद्रपंत अमात्य यांनी व्हिसेरेईला पाठविलेल्या पत्राची नोंद!
रामचंद्रपंत अमात्य यांनी व्हिसेरेईला पत्र पाठवून कळविले होते की, आपल्या दरबारात पोर्तुगीज राजदूत नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना विषाद वाटतो. व्हिसेरेई रामचंद्रपंत अमात्य यांना दि.३० डिसेंबर इ. स.१७०४, रोजी पाठविलेल्या ऊत्तरात शीण काढतो की, त्याचे गोव्यात व्हिसेरेई म्हणून आगमन झाले, तेव्हा बहुतेक राजेरजवाड्यांनी पत्रे पाठवून त्याचे स्वागत केले होते. परंतु त्या पत्रात महाराजांचे अभिनंदनपर पत्र नव्हते. राजदूत विषयी तो म्हणतो की, छत्रपती शिवराय व पोर्तुगीज यांच्यामध्ये सलोखा नांदत असल्याचा सुगावा मोगल बादशहास लागू नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरबारात राजदूत न पाठविण्याचा निष्काळजीपणा आपल्या हातून घडला असावा. ज्याप्रमाणे आपले अभिनंदन न करण्याचा निष्काळजीपणा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कडून घडला त्याप्रमाणे पोर्तुगिजांनी आपला वकील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरबारात पाठविला नाही म्हणून बुरानजी मोहीते आणि कान्होजी आंग्रे या दोघांनाही व्हिसेरेईला पत्रे पाठवून तक्रार गुदरवली होती. रामचंद्रपंतत्या दोघांनाही व्हिसेरेईने वरच्या सारखेच ऊत्तर धाडले. अमात्य यांनी व्हिसेरेईला पत्र पाठविले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ३० डिसेंबर इ.स.१७२५
छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती शाहूराजे यांच्यात करार
छत्रपती संभाजींनी निजामाशी प्रथम मैत्री संपादिली, तसेच गोव्याचे पोर्तुगीज यांच्याबरोबर १७१६ साली दारुगोळा, तोफा, बंदुका वगैरे सामान विकत घेण्याचा करार केला. शाहू महाराजांनी संभाजींच्या सरदारांविरुद्घ जशी मोहीम आखली, तशीच संभाजींनी सातारापक्षीय सरदारांविरुद्घ आघाडी उघडली. त्यांपैकीच १७१८ मधील सावंतवाडीची मोहीम होती. यासंदर्भात दोघांमधील वडगावच्या लढाईत शाहूंची सरशी झाली; तथापि मिरज, कराड इ. ठाणी
त्यांनी स्वतः सैन्याचे नेतृत्व केले. २० मार्च १७२० च्या उरुणबहे लढाईत (इस्लामपूर जवळचे कृष्णेकाठचे गाव) बाळाजी विश्वनाथांनी त्यांचा पूर्ण पराभव केला, तेव्हा संभाजींना माघार घेऊन पन्हाळ्याला जावे लागले. छत्रपतींच्या दोन घराण्यांत राज्याची विभागणी व्हावी, अशी त्यांची सुरुवातीपासून इच्छा होती. त्यानुसार ३० डिसेंबर १७२५ मध्ये उभयतांत एक करार झाला. त्यानुसार दक्षिणेकडील सर्व ठाणी व किल्ले संभाजींकडे आणि मिरज व विजापूर प्रांत हे शाहूंकडे असे ठरले आणि एकविचारे राज्याभिवृद्धी करावी, असे ठरले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ३० डिसेंबर इ.स.१७६०
३० डिसेंबर १७६० रोजी उत्तरेतला अजून एक मामलेदार गोपाळराव गणेश बर्वे, दहा हजाराचे अनअनुभवी सैन्य घेऊन शूजाच्या मुलुखात घुसला. गोपाळरावांच्या मराठी शिलेदारांनी भोजपुरच्या बळकट गढीवर हल्ला चढविला. या गढीत काही उत्तम बंदुकधारी रोहिले होते पण मराठ्यांच्या पुढे त्यांचा टिकाव लागला नाही आणि ते पळून जवळच असलेल्या धरेमौ गढीच्या आश्रयास गेले. मराठ्यांनी आता या गढीला वेध घातला. उपासमार झाल्याने किल्लेदाराने पूर्ण ताकदीनिशी मराठ्यांवर प्रतिहल्ला केला पण या चकमकीत सुद्धा रोहिल्यांचा पूर्ण बिमोड झाला, त्यांचे अनेक सैनिक कापले गेले तर अनेक युद्ध बंदी झाले. मराठ्यांनी शूजाच्या मुलुखाची वाताहात केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३० डिसेंबर इ.स.१९४३
ऐतिहासिक व स्फूर्तिदायी दिवस
३० डिसेंबर. आजचा दिवस भारताच्या स्वातंत्र्य लढायांतील एक अति महत्वाचा व स्फूर्तिदायी दिवस.
१९४३ साली याच दिवशी आझाद हिंद सेनेचे सेनापती नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी अंदमानमध्ये पोर्ट ब्लेअर शहरात प्रथमच 'स्वतंत्र' भारताचा ध्वज फडकवला व भारतीय स्वातंत्र्याची घोषणा केली.
त्या काळात दुसरे महायुद्ध चालू होते. नेताजींनी जपान व जर्मन सरकारांशी संगनमत करून आझाद हिंद सेनेकडून ब्रिटिश प्रदेशावर आक्रमणे सुरू केली. या मोहिमेचा भाग म्हणून अंदमान-निकोबार द्विप समुह त्यांनी जिंकला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
#🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा
#📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #🗿शिवकालीन पुराणवस्तू
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 २९ डिसेंबर इ.स.१६६५
महाराज मिर्झाराजांसह विजापुरापासून ५ कोसांवर पोहचले. विजापुरी विरोधाला कसेबसे तोंड देत मिर्झाराजे जयसिंगांची फौज संथगतीने पुढे सरकू लागली अदिलशहाने मोगली सैन्याचा कोंडमारा करण्यासाठी नौरसपूर व शाहापूर येथील तलावांचे बांध फोडून टाकले. विजापुरच्या किल्ल्याभोवतालच्या विहीरी व बावड्या माती आणि काटेकुटे यांनी भरून टाकल्या. काही विहिरींच्या पाण्यात विष कालवून ठेवले. जमिनीत खिळे ठोकून शहराभोवतालच्या बागा व उंच घरे पाडून टाकली. (तोफांचा मारा नीट करता यावा यासाठी.) विजापूर किल्ल्याच्या रक्षणार्थ हजारो कर्णाटकी प्यादे सैन्यात भरती करून ठेवले गेले. विजापुरवर निर्वाणीचा हल्ला चढविण्यासाठी मिर्झाराजे जयसिंगांनी व्यूहरचना सुरू केली. मिर्झाराजे जयसिंगांचे लष्कर विजापुरपासून फक्त पाच कोसांवर येऊन पोहोचले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #🗿शिवकालीन पुराणवस्तू
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/93cEnIpbRjw
📜 २९ डिसेंबर इ.स.१६७२
(पौष वद्य षष्ठी शके १५९४ संवत्सर परिघावी वार रविवार)
महाराजांची जंजिरेकर सिद्धी आणि किनारपट्टीच्या बंदोबस्तासाठी मोहिम.
पन्हाळगड घेण्याची जबाबदारी अन्नाजी दत्तोंवर सोपवून महाराजांनी स्वतःदेखील मोहीम काढली. सुरतेहून मोगली कुमक आल्याने सिद्दी शेफारून जाऊन त्याने परत उपद्रव देण्यास सुरुवात केली होती. त्याच काळात महाराज इंग्रजांविरुद्ध वेगळी खेळी खेळले! कारण हरामी इंग्रज आतून सिद्दीला सामील होते. म्हणून महाराजांनी मुंबई बेट इंग्रजांना न मिळता डचांना मिळावे यासाठी ३ हजार सैन्य डचांना पुरवावे व त्या बदल्यात डचांनी दंडाराजपुरी व जंजी-याच्या सिद्दीविरूद्ध मोहीमेसाठी सहकार्य करावे असा करार रिकलाॅफ या डच वकिलामार्फत केला व ही बातमी प्रसारित केली. परिणाम योग्य झाला. इंग्रजांचे धाबे साफ दणाणले. माज उतरला अन् त्यानंतर किनारपट्टीवर जंजी-याच्या सिद्दीची जोरिजोरी बरीच कमी झाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २९ डिसेंबर इ.स.१६७६
१६७६ मध्ये मोरोपंत पिंगळेच्या नेतृत्वाखाली १० हजार फौज देऊन महाराजांनी जंजिरा किल्ला घेण्याची मोहीम आखली.
लढाऊ नौकांनी जंजि-यावर लहान तोफांनी मारा केला, पण उपयोग झाला नाही. तेव्हा मोरोपंतानी हवालदार सुभानजी मोहिते, सरनोबत सुभानजी खराडे व कारकून मल्हार नारायण सबनीस यांच्या करवी अष्टागरातील कोळीवाडीचा प्रमुख लाय पाटील व त्याच्या पद्मदुर्गावर चाकरी करणा-या काही शूर सोनकोळ्यांना पद्मदुर्गावर बोलावून जंजिरा घेण्याची मोहीम सांगितली. शूर लाय पाटलाने ८-१० सहका-यांसह रात्री दोरखंडाच्या शिडय़ा बांधून जंजिरा तटावर प्रवेश मिळविला.
हबशांना त्याचा पत्ताही लागला नाही. मोरोपंताच्या सैन्याच्या तुकडीची लाय पाटील आणि त्याचे सहकारी पहाट फुटायच्या वेळेपर्यंत वाट पाहून थकले. सैन्य आले नाही म्हणून निराश होऊन दोराच्या शिडय़ा कापून त्यांनी माघार घेतली.
मोरोपंतांनी ह्या मोहिमेच्या अपयश स्वतः स्वीकारले. महाराजांना ही घटना कळताच त्यांनी लाय पाटलाचा सन्मान करण्यास त्याला बोलावले व त्यास पालखीचा बहुमान देऊ केला. पण त्या स्वराज्याच्या इमानी सेवकाने नम्रपणे तो बहुमान नाकारला. हे पाहून कौतुकाने महाराजांनी लाय पाटलासाठी गलबत बांधण्याचे फर्मान सोडले व त्यास "पालखी" असे नाव दिले. एका दर्यावीराचा यथोचित सत्कार महाराजांनीच करावा.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २९ डिसेंबर इ.स.१७६१
माधवरावांनी ऑगस्ट १७६१ ला निजामावर स्वारी करायचे ठरले. परंतु नुकत्याच पानिपतच्या युद्धात झालेल्या सैन्याच्या भयंकर नुकसानीमुळे माधवरावांनी निजामाशी थेट न भिडता आपले सैन्य निजामाच्या मुलुखात घुसवले. निजामाचा भाऊ सफदरजंगही फितूर होऊन मराठ्यांच्या मदतीला आला होता. या मोहिमेत आजारीपणाचे निमित्त करून रघुनाथराव सामील झालेले नव्हते. ते शनिवारवाड्यातच होते. निजाम मार्गावरची मंदिरे फोडत, जाळपोळ करत पुण्याच्या आग्रेयेस असलेल्या 'उरूळी- कांचन' या गावापाशी येऊन पोहोचला. निजामाच्या या हल्ल्यामुळे राघोबादादा गांगरून गेले. कारण यावेळेस निजामाला तोंड देण्याकरता पुण्यात फारशी फौजच नव्हती. आता लवकर हालचाल केली नाही तर निजाम पुणेही जाळेल, ही भीती वाटल्याने दि. २९ डिसेंबर १७६१ या दिवशी रघुनाथरावांनी निजामाशी घाईघाईने तह केला व त्या अन्वये २७ लक्ष रुपये वार्षिक उत्पन्नाचा मुलुखही तोडून देण्याचे कबूल केले. जानेवारी १७६२ मध्ये माधवरावांना या तहाची बातमी मिळाली. आता काहीही करता येऊ शकत नव्हते. शेवटी नाईलाजाने माधवराव पुण्यास परतले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀








![📜इतिहास शिवरायांचा - The Great Maratha Warriors] Iu GuIIl ` 444=9!0 YSHESHEREATED B1 Bois P4 The Vaxrid Ked $ शिवदिनविशेष जानेवारी इ॰स.१६६५ 9 छत्रपती शिवाजी महाराज सहपरिवार महाबळेश्वर येथे मुक्कामास आले. theqreat maratho uarriors the great marathawarriors the qreat marathauarriors The Great Maratha Warriors] Iu GuIIl ` 444=9!0 YSHESHEREATED B1 Bois P4 The Vaxrid Ked $ शिवदिनविशेष जानेवारी इ॰स.१६६५ 9 छत्रपती शिवाजी महाराज सहपरिवार महाबळेश्वर येथे मुक्कामास आले. theqreat maratho uarriors the great marathawarriors the qreat marathauarriors - ShareChat 📜इतिहास शिवरायांचा - The Great Maratha Warriors] Iu GuIIl ` 444=9!0 YSHESHEREATED B1 Bois P4 The Vaxrid Ked $ शिवदिनविशेष जानेवारी इ॰स.१६६५ 9 छत्रपती शिवाजी महाराज सहपरिवार महाबळेश्वर येथे मुक्कामास आले. theqreat maratho uarriors the great marathawarriors the qreat marathauarriors The Great Maratha Warriors] Iu GuIIl ` 444=9!0 YSHESHEREATED B1 Bois P4 The Vaxrid Ked $ शिवदिनविशेष जानेवारी इ॰स.१६६५ 9 छत्रपती शिवाजी महाराज सहपरिवार महाबळेश्वर येथे मुक्कामास आले. theqreat maratho uarriors the great marathawarriors the qreat marathauarriors - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_890677_13f34621_1767230882629_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=629_sc.jpg)




