जगत् जागृती प्राथमिक मंदिर चाकूर च्या... श्रीमती सिंधू बेजगमवार व महादेव हिंगमिरे यांचा...
जगत् जागृती विद्यामंदिर येथे सेवापूर्ती समारंभ संपन्न
चाकूरः- जगत् जागृती शिक्षण प्रसारक मंडळ चाकूर द्वारा संचलित जगत् जागृती प्राथमिक विद्यामंदिर चाकूर येथील सह शिक्षिका श्रीमती सिंधूताई बेजगमवार या 39 वर्षाच्या प्रदीर्घ सेवे नंतर तसेच श्री महादेव हिंगमिरे हे 32 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.
जगत् जागृती शिक्षण प्रसारक मंडळ चाकूर च्या वतीने जगत् जागृती प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर चाकूर च्या वतीने श्री हिंगमिरे आणि श्रीमती सिंधू ताई बेजगमवार यांचा सेवापुर्ती सोहळा जगत् जागृती विद्यामंदिर चाकूर येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगत् जागृती शिक्षण प्रसारक मंडळ चाकूर चे अध्यक्ष सर्वोत्तम राव कुलकर्णी होते तर प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून जगत् जागृती शिक्षण प्रसारक मंडळ चाकूरचे सचिव नरेश पाटील चाकूरकर हे उपस्थित होते.
त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सहसचिव बाबुराव बिडवे, संस्थेचे कोषाध्यक्ष धोंडीराम तोंडारे, संस्थेचे संचालक विठ्ठल रावजी सोनटक्के तसेच जगत् जागृती विद्यामंदिर चाकूरचे मुख्याध्यापक संजय नारागुडे, पर्यवेक्षक प्रदीप ऊस्तुर्गे आणि जगत् जागृती प्राथमिक विद्यामंदिर चाकूर चे मुख्याध्यापक महादेव काळोजी , राष्ट्रमाता प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजकुमार सूर्यवंशी, मुख्याध्यापक शाम येलाले, ज्ञानेश्वर बेजगमवार, उमाकांत बेजगमवार आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी संस्थेचे सचिव नरेश पाटील चाकूरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत मार्गदर्शन केले. तसेच याप्रसंगी सहशिक्षिका मीना ढोबळे, संस्कृती बिडवई तसेच विद्यालयातील विद्यार्थी शेख अबूसुफियान, देशमुख गौरवी, विश्वराज रायफळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव काळोजी यांनी केले . सत्कारमूर्ती सिंधुताई बेजगमवार आणि महादेव हिंगमिरे यांनी सत्काराला उत्तर दिले. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप संस्थेचे अध्यक्ष सर्वोत्तमराव कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार कदम यांनी केले तर आभार दयानंद हाळीकर यांनी व्यक्त केले. #📝मराठवाडा अपडेट्स
चाकूरात अजितदादा पवार यांना वाहिली श्रद्धांजली
चाकूर : (प्रतिनिधी)
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांना चाकूर येथे समस्त चाकूरवासियांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
आज बुधवार दि.28 जानेवारी रोजी सकाळी विमान अपघातामध्ये अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाले. त्यामुळे राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला गेला. त्यांच्या निधनामुळे राज्य सरकारच्यावतीने तीन दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. चाकूर नगरपंचायतीच्या प्रांगणात अजितदादा पवार यांना समस्त चाकूरवासियांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच यावेळी झालेल्या शोकसभेत नगराध्यक्ष करीमसाहेब गुळवे, मुख्याधिकारी प्रतीक लंबे, नगरसेवक मिलिंद महालिंगे, विलासराव पाटील, नितीन रेड्डी, राम कसबे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते बालाजी सूर्यवंशी, दयानंद सुरवसे, भाजपचे तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष हुसेन शेख,लिंगायत महासंघाचे शिवकुमार होळदांडगे, गणपत नितळे,सिद्धेश्वर अंकलकोटे, प्रा. डॉ. बी. डी. पवार, प्रा. दयानंद झांबरे,हणमंत लवटे,बिलाल पठाण, पत्रकार हाकाणी शेख, संग्राम वाघमारे, मधुकर कांबळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी उपनगराध्यक्ष साईप्रसाद हिप्पाळे,माजी सरपंच किशनराव रेड्डी,माजी उपसरपंच मुर्तूजा सय्यद, चाकूर बाजार समितीचे संचालक यशवंत जाधव,राहुल सुरवसे, ,अनिल वाडकर,वकील संघाचे अध्यक्ष ॲड. संतोष गंभीरे, संजय पाटील,महमद सय्यद,बाबु दापकेवाले,मधुकर मुंढे,शिवशंकर हाळे,संदीप शेटे,, समाधान डोंगरे,अजित सौदागर,गंगाधरअप्पा अक्कानवरू, साजिद लखनगावे,बालाजी भोरे,महेंद्र आचार्य, चंद्रमणी सिरसाठ,यांच्यासह नगरपंचायतीचे अधिकारी,कर्मचारी, शहरातील व्यापारी, पत्रकार व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. #📝मराठवाडा अपडेट्स
पहिल्या प्रशिक्षणाला २९ कर्मचाऱ्यांची दांडी
गैरहजर असणाऱ्यांना प्रशासन नोटीस बजावणार
चाकूर : आगामी होऊ घातलेल्या चाकुर तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गट व १० पंचायत समितीच्या गणाची सार्वत्रिक निवडणूकीसाठी चाकुर तालुक्यात नियुक्त करण्यात आलेल्या पहिले प्रशिक्षण २४ जानेवारी रोजी पार पडले.या प्रशिक्षणासाठी एकूण ८५० निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यापैकी २९ कर्मचारी गैरहजर होते.गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन त्यांचे योग्य ते कारण तपासले जाईल अयोग्य कारणे दाखवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संगीता टकले यांनी सांगितले.निवडणुकीच्या कामासाठी ८५० कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, त्यांना शनिवारी (ता. २४) प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी २९ कर्मचारी गैरहजर होते. त्यांना नोटीस पाठविण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार नरसिंग जाधव यांनी दिली.
व पंचायत समितीच्या दहा गणांसाठी तालुक्यातील जिल्हा परिषदेचे पाच निवडणूक होत असून, यात १५१ मतदान केंद्र आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी संगीता टकले यांनी कर्मचाऱ्यांना निवडणुकीतील मतदारसंख्या, मतदारयादी, दुबार मतदारांची नावे, केंद्राध्यक्षांसह इतर कर्मचाऱ्यांनी करावयाची कामे याबाबत माहिती निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण वातावरणात पार पडावी म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी संगीता टकले यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणात मतदान प्रक्रिया, ईव्हीएम हाताळणी, मतदान केंद्रावरील जबाबदाऱ्या, मतदार ओळख तपासणी, आदर्श आचारसंहितेचे पालन तसेच आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. तसेच उपस्थित प्रशिक्षणादरम्यान कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले. संबंधित अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*दुसरे प्रशिक्षण १ फेब्रुवारी तर तिसरे ४ फेब्रुवारीला होणार*
*पहिले प्रशिक्षण हे २४ जानेवारी रोजी घेण्यात आले, तर दुसरे प्रशिक्षण ३१ जानेवारी रोजी यशवंत मंगल कार्यालय येथे आणि तिसरे ४ फेब्रुवारी रोजी यशवंत मंगल कार्यालय येथे प्रशिक्षण घेण्यात येणार असून त्याठिकाणी साहित्याचे ही वाटप करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संगीता टकले व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार नरसिंग जाधव यांनी दिली.* #📝मराठवाडा अपडेट्स
चाकुर अर्बनच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न
चाकुरः-चाकुर शहरातील चाकुर अर्बन बँकेच्या वतीने महिलासाठी हळदी कुंकूवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
चाकूर अर्बन परिवारा तर्फे शाखा चाकूर येथे दिनांक १८ जानेवारी वार रविवार या दिवशी प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी मकर संक्रांति निमित्त हळदी कुंकू चा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष युनूस मासुलदार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला .या कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर हाक्के मॅडम, शिक्षिका केंद्रे मॅडम, व शिक्षिका स्वामी मॅडम, शिक्षिका साधना कुलकर्णी मॅडम, नगरसेविका गंगुबाई गोलावर, नगरसेविका स्वामी ज्योती , प्राचार्य वैशाली शिंदे मॅडम, प्राध्यापिका संगीता घोगरे, शिक्षिका अंबिका कोरे ,श्रीदेवी हाळे, शिवानी कोरे, शितल जाधव, प्रणिता फुलारी, सुनिता हराळे, संगीता हाळे ,आदि जण उपस्थित राहून एकमेकांशी हळदीकुंकवाच्या माध्यमातून संवाद साधला व त्या संवादातून नात्यातील गोडवा जपण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष व शाखाधिकारी रेश्मा सय्यद, अकाउंटंट करले प्रियंका क्लार्क लाड नसरीन, तमन्ना मॅडम ,समीना शेख, सानिया शेख आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले... #📝मराठवाडा अपडेट्स
बंद अवस्थेत मध्ये असलेला जय जवान जय किसान कारखाना चालू करण्यासाठी प्रयत्नशील राहणार-माजी मंञी आ.अमित देशमुख
चाकुरः-नळेगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या हितासाठी जय जवान जय किसान साखर कारखाना सुरू करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ त्यासोबतच, या परिसरातील नवउद्योजकांना उद्योग उभारणीसाठी त्याचबरोबर तरुणांच्या हाताला काम मिळावे म्हणून औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहे
रविवार दि. २५ जानेवारी रोजी नळेगाव येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत माजी मंत्री, आमदार अमित देशमुख बोलताना होते. अध्यक्षस्थानी माधवराव खांड `कर गुरुजी होते तर माजी मंत्री विनायकराव पाटील, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा काँग्रेस व महाविकास आघाडीचे जानवळ जिल्हा परिषद गटाचे उमेदवार एन. आर. पाटील, अहमदपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत मद्दे, चाकूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धनंजय कोरे, ट्वेन्टी वन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, विलास को. ऑप. बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल आदीसह यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते तसेच नळेगाव जिल्हा परिषद गटासह सुगाव व नळेगाव पंचायत समिती गणातील मतदार बंधू भगिनी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पूढे बोलतांना आमदार अमित देशमुख म्हणाले की, देशाचे माजी गृहमंत्री कै. शिवराज पाटील चाकुरकर यांच्या पुढाकारातून उभारलेला जय जवान जय किसान कारखाना अनेक वर्ष बंद आहे. मात्र सत्तेवर असलेल्या भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तो स-रू करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. मध्यंतरी आपण हा कारखाना चालू करण्यासाठी
पुढाकार घेतला परंतु याच मंडळीनी त्याला खोडा घातला, आत्ता पुन्हा लोकांच्या आग्रहास्तव हा कारखाना चालू करण्यासाठी आपण पुढाक ार घेणार आहोत, असे सांगून, महामार्गाच्या जवळ असलेल्या नळेगाव परिसरात औद्योगिक वसाहत उभा करण्याच्या दृष्टीनेही आपले प्रयत्न सुरू आहेत, यातून कृषी पूरक उद्योगाला येथे चालना मिळणार आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या मुलांच्या हाताला कामही मिळेल असेल असे यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी बोलताना माजी मंत्री, माजी आमदार विनायकराव पाटील म्हणाले की, लातुर जिल्हा परिषदेच्या नळेगाव गटातील महाविकास अघाडी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्राचारार्थ
आज या ठिकाणी एकत्रित जमलो आहोत. भाजप सरकारच्या आणि महायुतीच्या विरोधात आज सर्वत्र प्रंचड मोठी लाट उसळली असून आपल्याकडील नेत्याला त्यांच्या पुतण्याच्या पलीकडे अन्य कोणत्याही उमेदवार माहिती नाही आणि ते आज अहमदपूर व चाकूरमध्ये स्वतःच्या विकासाच्या पलीकडे त्यांना काहीच दिसत नाही हे आपण सद्या पाहतो आहे. ते आपल्या भाषणात सांगत आहेत येणाऱ्या ५ तारखेपर्यंत आपण मतदार जे सांगतील ते आम्ही जरूर पूर्ण करु पण त्यानंतरच्या काळात हे नेते आपले अजिबात ऐकणार नाहीत तर पुढील ५ वर्ष आपल्याला त्यांचे ऐकावे लागेल. मागील काळात आपण विकासापासून वंचित राहिलो
असेच यापुढेही आपल्याला राहण्याची वेळ यईल याचा विचार आपण आता या निवडणुकीत करावा आणि आपली ताकद आमच्या काँगेस अघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहावे आणि आपल्या सर्व उमेदवारांना या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी करावे. आपल्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये पाठवावे, - अशी विनंती त्यांनी यावेळी केली.दरम्यान नळेगाव येथील रहिवाशी संजय सौदागर यांच्या दुःखद निधनाबद्दल या सभेत - शोक व्यक्त करीत उपस्थित सर्वानी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमजद घोरवाडे, अनिल चव्हाण, एन. आर. पाटील, असगर पटेल यांनी आपले मनोगत व्यक्त करीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आघाडीच्या सर्व उमेदवाराना प्रचंड मतांनी - विजयी करून मतदार व आपल्या मतदार - संघाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत पाठवावे, अशी विनंती सभेतील उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनींना केली.
या सभेस चंद्रकांत वाजपल्ले, संतोष पाटील, गोविंद धोत्रे, दिगंबर हुडगे, दाऊद वागवान, गंगाधर केराळे, शिवाजी गायकवाड, संजय पवार, पप्पू शेख, सलीमभाई तांबोळी ,दयानंद सुर्यवंशी यांच्यासह लातूर जिल्हा परिषद आणि चाकूर पंचायत समिती निवडणुकीतील काँग्रेस महाविकास आघाडीचे नळेगाव जि. प. गटातील उमेदवार अनिल विश्वनाथ चव्हाण, नळेगाव पं. स. अमजद घोरवाडे, सुगाव पं. स. गणातील अशोक पांडुरंग नागिमे, तसेच जानवळ जिल्हा परिषद गटातील नागनाथ रामराव पाटील, जानवळ पं. स. गणातील प्रतिभा गणपत सूर्यवंशी, झरी (बु) पं. स. गणातील अमृता जळवा खंदारे, आणि वडवळ (ना.) जि. प. गटातील उमेदवार माधव निवृत्ती कोळगावे, वडवळ (ना.) गणातील राजाबाई रोहिदास कसबे, आष्टा पं. स. गणातील ज्योती शिवाजी शेळके आदी उपस्थित होते.
*चौकट*
*दुपारची जोहर मशिदीत आजान सुरू होताच आमदार अमित देशमुख यांची सभा तात्काळ थांबवण्यात आली.*
*धार्मिक भावनांचा आदर राखत, आजान चालू असताना कोणतीही गोंधळ किंवा व्यत्यय होऊ नये म्हणून सभेचे कामकाज थांबवण्यात आले. काँग्रेस व महाविकास आघाडी उमेदवाराच्या प्रचारार्थ नळेगाव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.उपस्थितांनीही शांतता पाळत आदर व्यक्त केला. या घटनेमुळे सामाजिक सलोखा, सहिष्णुता आणि परस्पर सन्मानाचा आदर्श संदेश दिला गेला.* #📝मराठवाडा अपडेट्स
जगत् जागृती शिक्षण प्रसारक मंडळ चाकूर येथे...
*प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
**************************
चाकूर:
जगत् जागृती शिक्षण प्रसारक मंडळ चाकूरद्वारा संचलित जगत् जागृती माध्यमिक विद्यामंदिर चाकूर व जगत् जागृती प्राथमिक विद्यामंदिर चाकूर येथे संस्थेचे सचिव माननीय *नरेश पाटील चाकूरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण* करून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी एनसीसी कॅडेट च्या वतीने मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. तसेच स्काऊट आणि गाईड यांच्या वतीने ही मान्यवरांना मानवंदना देण्यात आली.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र शासन व पंचायत समिती चाकूरच्या संयुक्त विद्यमाने
विद्यालयाच्या प्रांगणात ...
*सामूहिक संगीत कवायत उपक्रम 2026* राबविण्यात आला.
चाकूर शहरातील सर्व विद्यालयातील विद्यार्थ्यांचा जगत् जागृती विद्यामंदिर चाकूरच्या प्रांगणामध्ये सामूहिक संगीत कवायती चा उपक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी जगत् जागृती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नरेश पाटील चाकूरकर, गटशिक्षणाधिकारी मंदोदरी वाकडे पंचायत समिती चाकूर, गटशिक्षण अधिकारी संतोष वंगवाडे, चाकुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भंडे साहेब, विस्तार अधिकारी संजय अलमले, पांचाळ साहेब शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती चाकूर, वैद्यकीय अधिकारी होळे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी मुख्तार पटेल पंचायत समिती चाकूर, जगत् जागृती विद्यामंदिर चाकूर चे मुख्याध्यापक संजय नारागुडे आदि सह शहरातील सर्व विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.
या सामूहिक संगीत कवायत उपक्रम 2026 मध्ये शहरातील जगत् जागृती माध्यमिक विद्यामंदिर चाकूर, रेणुका माता माध्यमिक विद्यालय चाकूर,भाई किशनराव देशमुख माध्यमिक विद्यालय चाकूर, जिल्हा परिषद प्रशाला मुलांची चाकूर, जिल्हा परिषद प्रशाला मुलींची चाकूर, राष्ट्रमाता इंदिरा गांधी प्राथमिक शाळा चाकूर, लोकमान्य प्राथमिक विद्यामंदिर चाकूर, यशवंतराव चव्हाण प्राथमिक विद्यालय चाकुर, हकानिया उर्दू प्रार्थमिक व माध्यमिक विद्यालय चाकूर, आणि विलासराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय चाकूर आदी सह शहरातील सर्व शाळा या उपक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या.
या संगीत कवायतीचे संचलन एनसीसी विभाग प्रमुख संतोष चिटबोणे यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनराज सूर्यवंशी विषय तज्ञ बीआरसी चाकूर यांनी केले. तसेच याप्रसंगी उद्देशिकाचे वाचन राजीव पिटलावार, मतदार शपथ व कॉपीमुक्त अभियानाची शपथ राजकुमार कदम यांनी दिली तर असाक्षरमुक्त गाव शपथ भालके सर यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना दिली. कार्यक्रमाची सुरेख सूत्रसंचालन राजकुमार कदम आणि श्याम कल्याणकर यांनी केले तर
कार्यक्रमाचे आभार नलमले सर यांनी व्यक्त केले . #📝मराठवाडा अपडेट्स
मराठवाडा स्तरीय पत्रकारीता पुरस्काराने जेवरीकर, थोरात आणि मिरजकर सन्मानित !
पत्रकारांची लेखणी ही तलवारीपेक्षा अधिक धारदार असते - सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन
चाकूरः- समाजाच्या जडणघडणीत पत्रकारांची भूमिका फार महत्वाची असून खऱ्या अर्थाने पत्रकारांच्या लेखणीतूनच समाजाचे प्रतिबिंब उमटते.पत्रकार हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातील दुवा असून पत्रकारांची लेखणी ही तलवारीपेक्षा अधिक धारदार असते असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी केले.ते चाकूर येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाच्या सभागृहात चाकूर सिटी प्रेस क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सर्जेराव शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष करीमसाहेब गुळवे, उपनगराध्यक्ष साईप्रसाद हिपाळे, पोलीस निरीक्षक बालाजी भंडे, जेष्ठ पत्रकार अनिल वाडकर, कामगार नेते पप्पूभाई शेख उपस्थित होते.
पुढे बोलताना सहकार मंत्री नामदार पाटील म्हणाले की पत्रकारिता ही समाजाला न्याय देण्यासाठी असुन सामाजिक बांधिलकी समजून पत्रकारिता करणे आवश्यक असते,पुरस्कार छोटा आहे किंवा किती मोठा आहे हे महत्वाचे नसते तर त्या पुरस्काराच्या पाठीमागील भावना महत्वाच्या असतात.सिटी प्रेस क्लब चाकूरने पुरस्कारासाठी अत्यंत योग्य पत्रकारांची निवड केली आहे.अशाच पद्धतीने त्यांनी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाही सन्मानित करावे अशी अपेक्षा सहकार मंत्री नामदार पाटील यांनी व्यक्त केली.
या शानदार समारंभात ना. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते जेष्ठ पत्रकार संजय जेवरीकर यांना स्व.नागोराव संभाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ पत्रकार अ. ना.शिंदे यांच्यावतीने 'राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार',मुंबई येथील वरिष्ठ सहाय्यक संचालक,जनसंपर्क विभागातील काशीबाई थोरात यांना स्व.काशीबाई बळीराम सोनटक्के यांच्या स्मरणार्थ जेष्ठ स्वातंत्र सैनिक बळीरामजी सोनटक्के व पत्रकार संगमेश्वर जनगावे यांच्या वतीने 'राज्यस्तरीय पत्रकार भूषण पुरस्कार' तर ,दैनिक सामनाचे लातूर जिल्हा प्रतिनिधी अभय मिरजकर यांना कालवश मालनबाई सोपानराव कांबळे व कालवश सोपान काशीराम कांबळे यांच्या स्मरणार्थ पत्रकार मधुकर कांबळे यांच्या वतीने 'राज्यस्तरीय मायदादा वृत्तरत्न पुरस्कार' देऊन सन्मानीत करण्यात आले.
याप्रसंगी पुरस्कार प्राप्त सन्मानार्थी पत्रकार संजय जेवरीकर, काशीबाई थोरात, अभय मिरजकर यांनी सत्काराला देत यथोचीत मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ.सर्जेराव शिंदे यांनी केला.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात या पुरस्काराची भूमिका सिटी प्रेस क्लबचे सचिव मधुकर कांबळे यांनी विशद केली.अध्यक्ष प्रा. अ. ना. शिंदे यांनी पुरस्कार प्राप्त सन्मानार्थी यांच्या कार्याच्या आढावा घेत परिचय करून दिला. दरम्यान कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ,युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आणि दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास व्ही. एस. पँथर्सचे जिल्हाध्यक्ष शरद किनीकर,दशरथ अर्बन बँकेचे चेअरमन दिलीप पाटील, राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष संदीप शेटे,प्रा. डॉ. बी. डी. पवार यांच्यासह विविध वर्तमान पत्राचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संगमेश्वर जनगावे, सलीम तांबोळी, सुनील भोसले, के. आर. वाघमारे, विजय शिंदे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सिटी प्रेस क्लबचे सल्लागार प्रा. डॉ.राजेश तगडपल्लेवार यांनी केले तर आभारप्रदर्शन सलीम तांबोळी यांनी मानले. #📝मराठवाडा अपडेट्स
भाई किशनराव देशमुख महविद्यालयाचे रासेयो सात दिवसीय विशेष मौजे नायगाव येथे संपन्न .
चाकूर (वार्ताहर )
येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे " शाश्वत विकाससाठी युवक: जलसंधारण व ओसाड भूमी विकास " या शिर्षकाखाली शिबीर दि. 4 जानेवारी ते 10 जानेवारी 2026 या कालावधीत मौजे नायगाव येथे लोकायत शिक्षण संस्थेचे सचिव ॲड. पी.डी. कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले , प्रमुख उपस्थिती प्राचार्य डॉ. सर्जेराव शिंदे , गतिमान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल देशमुख , पर्यवेक्षक प्रा. बाळासाहेब बचाटे , हरिराम कासले , मुख्याध्यापक बालाजी कांबळे , चेअरमन आर.डी. शेख, कॉलेज विकास समितीचे सदस्य रामभाऊ जाधव, तंडामुक्ती उपाध्यक्ष महादेव सुडे , रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. नामदेव गौंड ,प्रा. मंगल माळवदकर ,प्रा. रमेश शिंदे उपस्थित होते.
प्रा. सौ. माळवदकर यांनी शिबीराचा आढावा मांडतांना म्हणाल्या पशुरोग तपासणी , स्वच्छता, वृक्षारोपण , महिला संबलीकरण , सायबर सुरक्षा, एड्स जागृती , अंधश्रद्धा निमुर्लन कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केले.
प्राचार्य डॉ. शिंदे म्हणाले युवक आकाशाला गवसणी घालण्याचे कार्य करू शकतात, ग्रामसंस्कृती व रासेयो चे अनन्यसाधारण महत्व आहे. श्रमासाठी झपाटलेले विद्यार्थी पाहायला मिळत नाहीत ही खंत ही व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी ॲड. कदम म्हणाले तरुणाई ही धाडसी असते ती कधीच भित्री नसते, व्यक्तीच्या सर्वांगिण विकासासाठी शिक्षण व विद्वते शिवाय पर्याय नाही , निरंतर प्रयत्न हाच विद्यार्थ्याचा यशाचा मार्ग आहे असे उद्गार काढले .
शिबीराच्या यशस्वीते बाबत मुख्याध्यापक बालाजी कांबळे , स्वंयसेवक रजत भोळे , करीना वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले.
समारोप दिनी मौजे नायगाव येथे वृक्षारोपण करून झाडांना ट्री गार्ड लावण्यात आले , वृक्षारोपण कार्यक्रमात ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. समाजशास्त्र विभागाच्या वतीने ही वृक्षारोपण करण्यात आले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ . प्रकर्ष देशमुख , डॉ. जनार्धन वाघमारे,प्रा. राजेश विभुते ,डॉ. श्याम जाधव , डॉ. भारत लासुरे 'डॉ. वाघुले दत्तात्रय ,डॉ. राजु जाधव,प्रा वर्षा भारती , डॉ. काळे गोविंद ,प्रा वैभव तपघाळे ' माजिद शेख , ज्ञानोबा येमले , दत्ता कोकरे , हिरामन राठोड यांनी परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेश तगडपल्लेवार , तर आभार प्रा. रमेश शिंदे यांनी मानले. #📝मराठवाडा अपडेट्स
*चापोलीच्या ग्रामदैवत रामगिर महाराज संस्थांनचा विकास करणार– सहकार मंत्री नामदार पाटील*
चाकुरः- चापोली येथील सर्वांचे ग्रामदेवत असलेल्या रामगिर महाराज मठसंस्थांनचा भविष्यकाळात भरीव असा निधी देऊन विकास करणार असल्याचे प्रतीपादन राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी चापोली येथे केले.
चापोली येथे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चापोली जिल्हा परिषद मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात सहकार मंत्री नामदार पाटील बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर अफसर शेख होते.
व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, किशोर मुंडे , प्राचार्य धनंजय चाटे, सुदर्शन मुंडे, सौ . रंजनाताई चाटे ,शिवाजीराव माने, दयानंद सुरवसे, भानुदासराव पोटे, बालाजी सूर्यवंशी, रामचंद्र तिरुके, अर्जुन मद्रेवार, मिलिंद महालिंगे, यशवंतराव जाधव, फारूकमीया देशमुख, धोंडीराम हाके, विष्णू तीकटे, मधुकर मुंडे, सिद्धेश्वर अंकलकोटे, महताब मोमीन, भागवत फुले, शिवदर्शन स्वामी, अनिल वाडकर, शैलेश कदम, राम कसबे, संदीप शेटे, श्रीनाथ सावंत, माऊली कासले, व्यंकटेश शिंदे, गणपतराव नेते, देविदास माने, डी जी भूरकापलै, सिद्धार्थ माने, बाळासाहेब पाटील , मेघराज पाटील, रामचंद्र घटकार , दिनकर काकनाटे, बि डी पवार, महेश देवणे, पांडुरंग धडे, ज्योती हाके, निसार देशमुख, शकुंतला शेवाळे, हाकानी शेख, सुरज घुमे, मदन रामासाने, सचिन तोरे, परमेश्वर नवगन, धारबा पाटील , मंचक पाटील, संभाजी कोल्हे, संभाजी दुडिले, बालाजी घुमे, प्रभाकर होनराव, रामचंद्र शेळके, संदीप बाचपले, बळीराम भोसले, गंगाधर अक्कांनवरु, जगन्नाथ आयनुले, राजकुमार शेटे, हनुमंतराव नरवटे, अमोल जंपनगीरे, अजिज शेख सह विविध मान्यवर उपस्थित होते.
यापुढे बोलताना सहकार मंत्री नामदार पाटील म्हणाले की, चापोली जिल्हा परिषद मतदार संघाचा उमेदवार सुद्धा आम्ही लोकातून देणार असून मतदारसंघाची जाणीव असलेले उमेदवार व सर्वांना कामे पडणारे उमेदवार आम्ही या निवडणुकीत देणार असल्याचे सहकार मंत्री नामदार पाटील म्हणाले.
चापोली व माझा स्नेह संबंध जुना असून चापोलीच्या विकासासाठी अनेक निधी आपण आतापर्यंत दिला आहे यापुढेही चापोलीच्या विकासासाठी निधी देऊ. चापोलीच्या प्रशासकीय इमारतीसाठी 25 लक्ष रुपयाचा निधी दिला आहे. या प्रशासकीय इमारतीतून चांगला प्रशासकीय कारभार होईल अशी माझी अपेक्षा असल्याचे सहकार मंत्री नामदार पाटील म्हणाले.
मागच्या काळात लाईटचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर होता तो आपण सोडवण्याचा प्रयत्न केला. आगामी काळात पाणंद रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात आपण काम करणार असून मतदारसंघात आगामी वर्षभरात दोन नवीन कारखान्याची निर्मिती करणार असून त्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सुद्धा सहकार मंत्री नामदार पाटील म्हणाले. यावेळी मिलिंदराव महालिंगे, किशोर मुंडे, व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अफसर शेख यांनी मनोगत व्यक्त केले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीलाल पठाण, संदीप मुंडे, अलीम शेख यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चापोली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाथा मद्रेवार, विश्वनाथ पाटील, गणेश स्वामी, गजानन होनराव, रामेश्वर होनराव, चांद मोमीन, नारायण काचे ,युवराज भोसले ,अजीज मोमीन सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला.
कार्यक्रमासह चापोली व जिल्हा परिषद मतदार संघातील 22 गावातील विविध मतदार नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
*चौकट*
*सहकार मंत्री नामदार पाटील यांच्यामुळे चापोलीचे अनेक प्रश्न निकाली– सरपंच डॉ. भालचंद्र चाटे*
*सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी चापोलीला विकासात झुकते माप दिले असून , चापोलीचे अनेक प्रश्न त्यांच्यामुळे निकाली निघाली असून चापोलीच्या विकासासाठी कायम सहकार्याची भूमिका सहकार मंत्री नामदार पाटील यांनी घेतली आहे.*
*स्वर्गवासी डॉक्टर नारायणराव चाटे यांच्या निधनानंतर आमच्या कुटुंबीयांना आधार देण्याचे काम सहकार मंत्री नामदार पाटील यांनी केला आहे. आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांना विजयी करून सहकार मंत्री नामदार पाटील यांचे हात बळकट करावे असेही सरपंच डॉक्टर भालचंद्र चाटे म्हणाले.* #📝मराठवाडा अपडेट्स
जानवळ जिल्हा परिषद गटाला मॉडेल करण्यासाठी कॉग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मतरूपी आशीर्वाद द्यावे-अभय सांळुखे
चाकुरः-जिल्हा परिषद जानवळ गटातील भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांची संवाद बैठक झरी येथे आयोजित करण्यात आली होती.यावेळी जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे म्हणाले जानवळ जिल्हा परिषद गटातील विकासाला गती देण्यासाठी मतदारसंघातील मतदारांनी कॉग्रेस पक्षाच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून देऊन जिल्हा परिषद सभागृहात पाठवावे.रस्ते,विज,पाणी,आरोग्य या मुलभुत सोयी-सुविधा जनतेला सहज उपलब्ध करून देण्यासाठी आमचे निवडून येणारे उमेदवार करतील असा विश्वास मला आहे.जानवळ गटांचा म्हणावा तसा विकास झाला नाही.रस्त्याची दुरावस्था आहे.वाड्या-ताड्यावर पिण्याच्या पाण्याची उन्हाळ्यात तीव्र टंचाई निर्माण होत असते.विजेची समस्या आहे.शेतकऱ्यांना शेतात पाणी असून सुध्दा पाणी देण्यासाठी वीजपुरवठा होत नाही.सतत वीज खंडित होत असते.अशा समस्यांचा निपटारा करण्यासाठी आमच्या पक्षाच्या उमेदवाराला मतरूपी आशीर्वाद देण्याचे आहवान केले.
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस पक्षाचे सचिव तथा जि.म.बँ.सं.एन.आर.पाटील,विलासराव पाटील चाकुकर,ॲन्ड.धनजय कोरे,अनिल चव्हाण,सुरेश मुंडे,पप्पुभाई शेख,विष्णू धायगुडे,अजित खंदारे,सलीमभाई तांबोळी,गणपत सुर्यवंशी,आदी उपस्थित होते.पुढे बोलताना अभय साळुंखे म्हणाले चाकुर तालुक्यातील पाच गट व दहा गणामधील सर्वच जागेवर कॉग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आण्यासाठी कार्यकर्त्यांनी अहोराञ मेहनत करावी.पक्षाचे ध्ये-धोरण सर्वसामान्य लोकापर्यंत पोहचवावे.मतचोरी,बेरोजगारी,महागाई,शेतकऱ्यांच्या शेतातील पिकलेल्या मालाला हमीभाव नाही.सरकार फक्त जाती-जाती मध्ये भांडणे लावून आपले राजकीय स्वार्थ साधत आहे.मतदारसंघात जाऊन शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्य जनतेला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे अनुदान अजून मिळाले नाही.पिक विम्याचे पैसे खात्यावर जमा झाले नाही.फक्त आश्वासन देऊन सरकार जनतेची फसवणूक करीत आहे.
*चौकट*
*तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद व दहा पंचायत समिती सर्कल मध्ये कॉग्रेसचा झेंडा फडकवणार-एन.आर.पाटील*
*जानवळ जिल्हा परिषद व झरी पंचायत समिती जानवळ पंचायत समिती पुर्ण ताकदीनिशी लढवणार व जिंकून दाखवणार मतदारसंघ अनेक समस्या आहेत.शेतकऱ्यांना शासनाच्या योजना मिळवून घेण्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागत आहेत.विहिरी मंजुर करून घेण्यासाठी वीस हजार रूपये शेतकऱ्यांना मोजावे लागत आहे.गोठा मंजूर करून घेण्यासाठी दहा हजार रूपये द्यावे लागत आहेत.भ्रष्टाचार वाढला आहे.आम्हा जर जनतेने निवडून दिल्यास शासनाच्या योजनेसाठी कोणत्याही अधिकाऱ्यांना एक रूपयाही देण्याची आवश्यकता नाही.मतदारसंघात पाणी,रस्ते,वीज,आरोग्य,शिक्षण,शेतकरी,बेरोजगार तरूण,महिलांना उद्योग,बचत गटाना अर्थ सहाय्य,यासाठी जानवळ जिल्हा परिषद गटातील जनतेला सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटीबध्द राहु* #📝मराठवाडा अपडेट्स













