श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
ShareChat
click to see wallet page
@266210066
266210066
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
@266210066
शेतकर्‍यांसाठीचा माहितीचा खजिना👌
#🌱मी शेतकरी #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती केल्यानंतर पाऊस आला तर पुन्हा फवारणी करावी का ?* पावसाळ्यात रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने इतर हंगामांपेक्षा जास्त असतो. त्यात झडीचा व संततधार पाऊस रोगांचे नियंत्रण ठेवणे अवघड बनवतो.बऱ्याच वेळा फवारणी केल्यानंतर लगेचच पाऊस येतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात पुनर्फवारणी विषयी संभ्रम निर्माण होतो. फवारणी पुनर्फवारणी ही खालील घटकांवर अवलंबून असते : फवारणीनंतर किती वेळाने पाऊस आला ? फवारणीनंतर साधरणतः ३-४ तास पाऊस नको असतो. रसायन जर आंतरप्रवाही असतील तर ३-४ तासात शोषली जातात, व जर स्पर्शीय असतील तर कीटक व किडींवर ५०-६०% परिणाम केलेला असतो. अशावेळी पुनर्फवारणीची करू नये. कोणत्या रसायनाची फवारणी केली ? ऍसिफेट सारख्या रसायनांना परिणाम करण्यासाठी १२-१४ तास लागतात त्यामुळे संततधार पाऊस चालू असेल तर ऍसिफेट ची फवारणी टाळावी. डायमेथोऍट हे सर्वाधिक जलद काम करते, मात्र लागोपाठ वापर टाळावा. पावसाची तीव्रता व वेग : फवारणीनंतर लगेचच २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ रिमझिम पाऊस चालला तर ५०-६० % फवारा धुवून जातो. अशावेळी दुसऱ्या दिवशी फवारणी करणे गरजेचे असते. फवारणीनंतर एक तासाने १५-२० मिनिटांसाठी रिमझिम पाऊस आला तर तिसऱ्या दिवशी फवारणी केली तरी चालते. थेंबाचा आकार मध्यम किंवा मोठा असेल व फवारणीनंतर १५-२० मिनिटे पाऊस चालला तर ९५% फवारा धुवून जातो. अशावेळी हवामानाचा अंदाज बघून २-३ तासानंतर फवारणी करावी. पावसाळ्यात फवारणी शक्यतो सकाळी करावी. फवारणी करताना घ्यावयाची काळजी : हवामानाचा अंदाज बघून पाऊस येण्याआधी फवारणी टाळावी. फळबागांवर पावसाळ्यात ३ दिवसांतून एकदा बुरशीनाशकांची फवारणी आवश्यक असते. किटकनाशकापेक्षा बुरशीनाशकांचा अधिक वापर करावा. पावसानंतर लगेच फवारणी टाळावी.कारण तुम्ही फवारलेले रसायन झाडावर पाणी असल्याने जमिनीवर पडते. परिणामी वाया जाते व जमिनीत झिरपल्याने मित्रजिवाणू मारले जातात. त्याचबरोबर विहिरीत मिसळण्याचा धोकाही असतोच. पावसाळ्यात फवारणी करताना स्टिकर, इमल्शन (चिकट द्रावण) चा उपयोग करावा, जेणेकरून रिमझिम पावसाचा फवाऱ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. पावसाळ्यात कुमान एल बुरशीनाशक म्हणून फायद्याचे ठरते.
#🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌱मी शेतकरी *ढगाळ वातावरणात पिकांची घ्यावयाची काळजी* महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस सुरू आहे. अशा वातावरणात आपल्या पिकांची योग्य ती काळजी घेतली नाही तर मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. सिस्टेमिक (आंतरप्रवाही) बुरशीनाशकापेक्षा कॉन्टॅक्ट (स्पर्शजन्य) बुरशीनाशकाचा वापर करावा. याचे कारण म्हणजे अशा वातावरणात पर्णरंध्रे (stomata) शक्यतो बंद असतात आणि आपण फवारत असलेले औषध झाडाच्या आत प्रवेश करू शकत नाही. जर आंतरप्रवाही बुरशीनाशक झाडातच जाऊ शकत नाही तर ते प्रभावीपणे काम करू शकणार नाही. परिणामी आपले पैसे अक्षरशः वाया जातील. म्हणूनच या वातावरणात स्पर्शजन्य बुरशीनाशके व कीटकनाशके वापरल्यास फायदेशीर ठरते. आंतरप्रवाही व स्पर्शजन्य बुरशीनाशके वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. त्याबद्दल आपण येत्या काही दिवसांत स्वतंत्र पोस्टमधून चर्चा करू. मात्र सध्या तरी वरील मुद्दा लक्षात घेऊन काम करायला हवे. तसेच, या दिवसांमध्ये पिकाची वाढ वेगाने होत असल्याचे आपल्याला दिसते. याचे कारण म्हणजे सूर्यप्रकाश कमी असतो आणि तो शोधण्यासाठी झाड स्वतःची उंची वाढवते. साधे उदाहरण द्यायचे झाल्यास बर्फाळ प्रदेशात झाडांची उंची ही इतर कोणत्याही प्रदेशातील झाडांपेक्षा जास्त असते. इथेही तेच कारण, झाडे सूर्यप्रकाश शोधत उंच उंच होत जातात. मात्र ही जास्तीची उंची आपल्या पिकांसाठी तितकीशी फायदेशीर नाही. हे आटोक्यात ठेवण्यासाठी पिकाचा नायट्रोजन कमी करावा अथवा परिस्थितीनुसार पूर्णपणे थांबवावा. तसेच पाणीदेखील गरजेनुसारच द्यावे. कारण झाडांना पाण्यातून देखील नायट्रोजन मिळत असतो आणि गरजेनुसार पाणी दिल्यास जास्तीचा नायट्रोजन आपल्याला टाळता येईल. © ॲग्रोतमिस्सा (सदर माहिती कुणीही "ॲग्रोतमिस्सा" च्या व्यतिरिक्त इतर नावाने टाकण्याचा प्रयत्न केल्यास, अथवा सदर लेखात छेडछाड करून पुढे पाठविल्यास कॉपीराईटचा भंग केला म्हणून कायदेशीर कारवाई करण्यात येईल)
#🌱मी शेतकरी #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती या पिकाचे उत्पादन कसे वाढविता येईल? यावर्षी परतीचा पाऊस चांगला झाला त्यामुळे तुर पिकाची वाढ उत्तम आहे व पीक सुद्धा चांगले येणार आहे. आपल्याकडे तुर या पिकामधील सोयाबीन कापणी सुरू आहे .या तुर पिकांमध्ये खोल मशागत करू नये, शक्यतोवर रोटावेटर करूच नये कारण वरचा भाग भुसभुशीत दिसत असला तरी जमीन ओलसर असल्यामुळे खालील भाग टणक येतो व त्यामुळे मुळी अडचणीत येते . तरी शक्यतोवर तन किंवा काडीकचरा नसेल तर आंतर मशागत नाही केली तरी चालेल किंवा करावयाची झाल्यास अगदी वरचे हाताने हलकी आंतरमशागत करावी जेणेकरून सक्रिय मुळ्या/ जारवट तुटणार नाही ही काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. तूर या पिकांमध्ये दुसरे कमी उत्पादन येण्याचे कारण म्हणजे वेळेवर पीकसंरक्षण . बहुतेक शेतकरी फुले येण्याची वाट बघतात नंतर फवारणी करतात असे न करता कळी दिसावयास लागली म्हणजेच पिकावर फवारणी करावी कारण कळी वरती फुले उमलण्याच्या आधी फुलपाखरं अंडी घालतात व अळी बाहेर पडून फुले उमलल्या पूर्वी कळी खाऊन टाकतात तरी कळी अवस्थेत पहिली कीटकनाशकाची फवारणी करावी त्यामध्ये (डायथेन एम-45 + कार्बनडॅनजिम ) 30 ग्रॅम + इमामेक्टीन बेंजोएट 10 ग्रम + क्लोरोपायरीफॉस 35 मिली +सूक्ष्म मूलद्रव्य 25 ग्राम प्रति पंपास (15 लिटर) घेऊन फवारणी करणे व नंतर 12 ते 15 दिवसांनी दुसरी फवारणी क्लोरोअल्ट्रानीलीप्रोल 5 मिली प्रति पंपास (15 लिटर) घेऊन फवारणी करणे यानंतर शक्यतोवर फवारणीचे काम पडणार नाही तरी पण गरज भासल्यास तिसरी फवारणी करणे . बहुतेक वेळा तूर या पिकाला पाणी देताना अति पाणी दिल्या जाते त्यामुळे ही उत्पादनात घट येणे किंवा अपरिपक्व दाणे( मुकंन) जास्त प्रमाणात तयार होऊन प्रत खालावते. म्हणून तूर या पिकाला पाणी देताना कळी येण्याची व्यवस्था व दुसरे पाणी फुलं गळून शेंगा पकडल्यानंतर पाणी देणे. परंतु यावर्षी परतीचा पाऊस चांगला झाल्यामुळे कळीच्या अवस्थेत पाणी देण्याची गरज नाही यानंतर पाणी द्यावयाचे असल्यास फुलं शेट होउन शेंगा धरल्या नंतर पाणी उपलब्ध असल्यास एक पाण्याची पाळी देणे .मागील तीन-चार वर्षांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी तीन ते चार पाण्याच्या पाळ्या दिल्या त्या शेतकऱ्यांना उत्पादनात मोठी घट आल्याचा अनुभव आहे. वरील विवेचनात आपले मत मांडावयाचे असल्यास अथवा अडचण असल्यास श्री पी एस शेळके कृषी अधिकारी पंचायत समिती मंगरूळपीर यांचेशी 94 23 14 95 59 या नंबर वरती संपर्क साधावा ही विनंती.
#🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌱मी शेतकरी उबळणे/तुर मरणे* ******************** शेतकरी बंधुनो, ह्या पुर्वी *पट्टा पद्धती ने तुरीची पेरणी* ह्या बाबत सविस्तर माहिती गृप वर टाकली होती बर्याच शेतकरयानी पेरणी केली असुन अंतर पिक सोयाबीन, उडीद, मुग पेरला आहे तुर मोठी झाले वर ती उबळते झाडे वाळतात शेतकरया चे मोठे नुकसान होते शेतकरी तुर पेरणे सोडुन देतात ह्याला कारण जमिन त हानीकारक बुरशी फ्युजॅरिअम, रायझोक्लोनिया ह्या तुरीच्या मुळात जाऊन अन्न रस खोडा कडे पाठविणे बंद करतात त्या मुळे तुरीचे झाडे उबळतात, मरतात याला ऊपाय जमिनीतील वरील अपायकारक बुरशी मारणे रासायनिक बुरशी नाशके येथे काम करीत नाही त्या करता *ट्रायकोडर्मा* ही परोपजीवी मित्र बुरशी जमिनीत सोडणे, बिजप्रक्रीया करणे,भाजी पाला रोपे बुडवणे हे जैविक नियंत्रण आवश्यक आहे *ट्रायकोडर्मा* कृषि विज्ञान केंद्रात दोन स्वरूपात मिळते पावडर, द्रावण, कांही कंपनी चे प्रॉडक्ट बाजारात उपलब्ध आहेत वापर 1) बिजप्रक्रीया = 1 किलोस 4/5ग्रॅम गुळ पाण्या सह चोळावे 2) 5 लि पाण्यात =25 मि, =25 ग्रॅम टाकुन द्रावणात रोपे बुडवणे 3) शेणखत,गांडुळ खतात पावडर मिक्स करुन पेरणी आधी टाकावी 4) ठिबक मधुन =एकरी 5 लिट सोडावे 5)पंपातुन नोझल काढून बायोसंजिवनी ट्रायकोडर्मा पावडर 25 ग्रॅम +25 ग्रॅम मल्टीप्लायर पावडर टाकुन एकजीव करून खोडा जवळ सोडावे बुरशी क्रियाशील होईल हानीकारक बुरशीमरेल ट्रायकोडर्मा, कृषि विज्ञान केंद्र औ बाद,व करडा वाशिम येथे मिळेल बायोसंजिवनी ट्रायकोडर्मा साठी 9822606382 यांचेशी संपर्क साधावा कोरिअरने आपणास मिळेल ही जाहिरात नाही शेतकरया च्या सोई साठी व्यवस्था *विलास काळकर जळगाव* 9822840646, 9970676671, *************************
#🌱मी शेतकरी #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती *शेतकऱ्यांना लुटने सरकारांनी थांबवले नाही तर लवकरच भारताचा श्रीलंका होणार,💂‍♂️राजे हो जागे व्हा...एस बी नाना पाटील.* _भारतात राजे उदार ,शेतकरी बेजार अशी अवस्था असून भारताची वाटचाल श्रीलंकेकडे आहे हे निश्चित._ *राज्य सत्ता मिळवण्यासाठी कुणी फुकट धान्य देणार,कुणी देतय फुकट घर देणार तर कुणी देतय फुकटचे सिलिंडर* _देशातील सारे राजे झाले उदार पण त्यांच्या नियोजनावर नाही तर शेतकऱ्याच्या जीवावर.जगातील इतर देशात राज्य कमवण्यासाठी एकतर युद्ध केली जातात किंवा देशहीताची कामे केली जातात.परंतु १९७७नंतर भारतीय राजकारणाचे गणितच बदलले साऱ्या जनतेला म्हणजे गरीब असो की करोडपती साऱ्यांना शेतमाल फुकट दिला की राज्य मिळते.हे किती दिवस चालेल_ *त्यामुळे जगातील कोणत्याही युध्दात मारले गेले नाहीत किंवा महामारीत देखील मारले गेले नाहीत तेवढ्या शेतकऱ्यांनी भारतात आत्महत्या केल्यात.शेतकऱ्यांचे मुलांचे लग्न होत नाहीत,थोडक्यात काय शेती व्यवसाय मारला.* सरकारी नोकरी म्हणजे उत्पन्नाचे हमखास स्त्रोत यामुळे सारे त्या मृगजळामागे धावत आहेत. त्यासाठी आरक्षण मिळावे ही रास्त मागणी,पण त्याने प्रश्न सुटणार आहेत का? *काही हजार फक्त नोकऱ्या पण करोडो रोजगार देण्याची ताकत फक्त आणि फक्त कृषी क्षेत्र देवू शकते* . _सरकारने गेल्या कित्येक वर्षात सरकारी नोकर भरती केली नाही, थोड्याफार जागा भरण्यासाठी घोषणा होतात ,पण त्या प्रक्रियेत काही त्रुटी मुद्दाम ठेवायच्या ,म्हणजे कुनी तरी अन्याय झाला म्हणून कोर्टात जाणार, ते कोर्टात गेलं की ते स्थगिती मिळनार मग पुढे चार ते पाच वर्ष भरती करायची गरज नाही._ *जे काही सरकारी कामे होत आहेत ती एकतर जॉब वर्क वर किंवा कंत्राटी पद्धतीने केली जात आहेत.* _त्यामुळे ज्यांना आरक्षण आहे त्यांनाही फायदा नाही व जे मागत आहेत त्यांना तर दूर दूर पर्यंत फायदा दिसत नाही.अर्थात तो ज्यांचा हकक आहे त्यांना मिळावा हीच इच्छा._ *देशातील ६५%जनता ही शेतीवर अवलंबून आहे त्यांना शेतमालास भाव मिळाला तर आणि तरच ते जगू शकतील याला एकच मार्ग त्याला जीवन जगण्यासाठी योग्य तो नफा मिळाला तर ना कुणी शेती सोडेल ना कुणी नोकरी मागेल.* 😳 _काय आहे श्रीलंका चे धोरण आणि भारतातील धोरणात साम्य..._ 😳 _आज श्रीलंकेचा महागाईचा प्रश्न गंभीर झाला,कारण काय?...चुकीचे कृषीविषयक धोरण._ *श्रीलंकेने शेतीत संपूर्ण रासायनिक खत बंद करून नैसर्गिक शेती करण्याचा निर्णय घेतला,सबब शेतमालाचे उत्पादन घटले व देशातील जनतेला पुरेल एवढे अन्नधान्य सोडा भाजीपाला मिळणे देखील अवघड झाले.* _कोणताही बदल करण्याचा टोकाचा निर्णय हा आत्मघाती ठरतो हे यावरून दिसते.बदल हे हळु हळू आणि दुसरा पर्याय निर्माण करून करायचे असतात._ *भारतात देखील नैसर्गिक शेती करावी व रासायनिक खते वापरू नयेत यासाठी काही तज्ञ मत मांडत आहेत.जर शंभर टक्के त्यांचे ऐकले तर श्रीलंका लहान देश आहे त्यांचे महाग घेवून का असेना त्यांची अन्नधान्याची सोय होईल, पण भारताला १३०कोटी लोकसंख्येला अन्नधान्य पुरवणे कसे शक्य होईल.* _रासायनिक खतांना व कीटकनाशक यांचा वापर मर्यादित करून विषमुक्त अन्न उत्पादन करने ,येथ पर्यंत निश्चित योग्य आहे. त्यामुळे उत्पादन वआरोग्य दोघांचा समन्वय साधला जाईल._ *यासाठी शेतीतून येणाऱ्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी सरकारने नियोजन केले तर निश्चित सुवर्णमध्य साधला जाईल.अन्यथा यादवी पासून आपणही दूर नाहीत.* _२०१७मध्ये महाराष्ट्रातील शेतकरी फक्त काही दिवस संपावर गेला तरी भीषण अवस्था झाली होती.जर काही महिने संपावर गेला तर काय गत होईल ह्याची कल्पना न केलेली बरी..._ *म्हणून म्हणतो राजे सावध व्हा व देश वाचवा.देश फक्त नोकरदार किंवा राज्यकर्ते चालवत नसून शेतकरी चालवतात याची जाणीव ठेवावी,म्हणजे संकटे येणार नाही.* *जय जवान 👮🏻‍♂️जय किसान👳‍♂️* 🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
#🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌱मी शेतकरी प्रणाली🌿☘🌱🍀🍀 खरीप पीक : जुलै ते ऑक्टो रब्बी पीक : ऑक्टोबर ते मार्च झैद पीक : मार्च ते जून 🌴पीक पद्धती : दिलेल्या क्षेत्रावरील पिकांचा वार्षिक क्रम आणि अवकाशीय मांडणी (एकावेळी विविध पिकाखालील क्षेत्राचे प्रमाण) 🌳पीक योजना : ही संसाधने, जमीन, श्रम, भांडवल यांचा सर्वात फायदेशीर वापराशी संबंधित योजना आहे. आणि व्यवस्थापन. 🌳पीक प्रणाली, एलएस प्रणाली, कुक्कुटपालन प्रणाली इत्यादी, शेती पद्धतीचे उपविभाग आहेत 🌳 पीक प्रणाली ही पीक पद्धतीचा उपविभाग आहे 🌳मोनो क्रॉपिंगला मोनो कल्चर असेही म्हणतात 🌳मोनो क्रॉपिंग: एका हंगामात किंवा वर्षात एक पीक. 🌳दुप्पट पीक : वर्षाला दोन पीक 🌳 तिप्पट पीक : वर्षाला तीन पिके 🌳एकाधिक पीक: प्रति वर्ष 2 पेक्षा जास्त पिके 🌳 समांतर एकाधिक क्रॉपिंग: शून्य स्पर्धेसह आंतरपीक 🌳मल्टिपल क्रॉपिंग / इंटर क्रॉपिंग / मिश्र पीक / रिले क्रॉपिंग / स्ट्रिप क्रॉपिंग : पीक तीव्रता वेळ आणि स्थान परिमाण आहे 🌳 अनुक्रमिक पीक : पीक तीव्रता केवळ वेळेच्या परिमाणानुसार आहे. आंतरपीक स्पर्धा नाही. पहिल्या पिकाच्या काढणीनंतर लागवड केलेले यशस्वी पीक 🌳 रिले क्रॉपिंग : . अगोदरच्या पिकाच्या काढणीपूर्वी लागवड केलेले यशस्वी पीक 🌳सहकारी पीक : उसाच्या मध्ये लागवड केलेले कमी कालावधीचे पीक (आंतरपीक). ऊस लांबवण्याच्या अवस्थेपूर्वी कापणी केली 🌳घटक पीक : एकापेक्षा जास्त पीक पद्धतीचा भाग असलेल्या वैयक्तिक पीक प्रजाती 🌳 एकमेव पीक : शुद्ध स्टँड किंवा घन लागवड (आंतरपीकांच्या विरुद्ध) 🌳 एकाचवेळी पॉली कल्चर : यामध्ये आंतरपीक, मिश्र पीक, आंतरसंस्कृती, आंतर लागवड, रिले लागवड. 🌳अॅलेलोपॅथी : पर्यावरणात निघून जाणाऱ्या रासायनिक पदार्थांच्या निर्मितीद्वारे एका वनस्पतीचा दुसऱ्या वनस्पतीवर होणारा कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हानिकारक प्रभाव 🌳सिनेर्जेटिक पीक: दोन पिकांचे उत्पादन एकट्या पिकाच्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे 🌳ऊर्जा पीक : ऊस आणि टॅपिओका 🌳नर्स पीक किंवा हिरवे खत पीक : टेफ्रोसिया, क्रोटालेरिया 🌳अव्हेन्यू पीक किंवा रस्त्याच्या कडेचे पीक : ग्लिरिसिडिया, पिजन वाटाणा 🌳रिपेरियन पीक : मिरपूड, पाणी बांधणारे तण
#🌱मी शेतकरी #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती कांदा शेती माहिती, व्यवस्थापन🧅_* *_🍇🐓🍅🐄🌾🥦🍉🐛🌶🦗🌹_* *~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~* _◆कांदा हे एक महत्वाचे पीक आहे. भारतात कांद्याचे उत्पादन खरीप रांगडा व रब्बी या तीनही हंगामात घेतले जाते. भारतात कांद्याच्या एकूण उत्पादन पैकी सुमारे २१.२१ टक्के उत्पादन खरिफ कांद्यापासून मिळते. खरिफ कांद्याचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात होते. खरीप कांद्याची लागवड जुलै ते ऑगस्ट दरम्यान केली जाते आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात काढणी केली जाते._ _◆मागील वर्षी खरिफ कांद्याचे सदोष बियाणे सतत पावसामुळे रोपवाटिकेत बुरशी रोगांचा प्रादुर्भाव इ. कारणांमुळे कांदा उत्पादनावर खूप परिणाम दिसून आला होता. म्हणून कांदा उत्पादनासाठी योग्य वाणांची निवड, खात्रीशीर बियाण्याची निवड तसेच रोपवाटिका व्यवथापन खूप महत्वाचे असते बियाणाची तसेच वाणांची निवड करताना काही निकष लक्षात घेणे गरजेचे असते._ _◆वाण निवडताना रोग आणि कीड प्रतिकारक्षमता, मानेची जाडी, परिपक्वतेसाठी अवधी आणि रंग इ. निकष लक्षात घेणे गरजेचे असते. तसेच बियाणे खरेदी करताना देखील अनुवांशिकदृष्ट्या शुद्ध, शास्त्रीय पद्धतीने तयार केलेले, चालू वर्षाचे बियाणे, प्रमाणित आयसोलेशन अंतर ठेऊन केलेले बीजोत्पादन, भेसळमुक्त बियाणे इ. निकष महत्वाचे असतात._ _◆म्हणून बियाणाची खरेदी प्रमाणिक स्त्रोत (कृषिविद्यापीठ, फलोत्पादन संशोधन संस्था इ.) कडून करावी. जर खाजगी शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदी करत असाल तर विश्वसार्हता असणे आवश्यक असते तसेच शास्त्रीय पद्धतीने तयार केलेले बियाणे असावे. जर बियाणे अनुवांशिकदृष्ट्या शुद्ध नसेल तर कंद परिपक्वते अगोदर डेंगळे येणे तसेच भेसळयुक्त कांदे इ. समश्या येण्याची संभावना असते._ *_📍खरिफ हंगामासाठी वाणांची निवड_* _खरिफ हंगामासाठी अधिक आद्रता, दमटपणा अशा प्रकारच्या वातावरणास प्रतिसाद देणारी, ९०-१०० दिवसात तयार होणारी जात आवश्यक असते. बरेच शेतकरी पारंपारिकरित्या वाढवलेल्या हळवा कांद्याचे बियाणे वापरतात, त्यामुळे रंग, आकार व वजन याबाबत एकसारखेपणा नसतो. तसेच सर्वच कांदे एकसारखे पोसत नाहीत. चिंगळी कांद्याचे प्रमाण बरेच राहते._ _◆भारतीय कृषि अनुसंधान परिषद-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर, पुणे या केंद्राने विकसित केलेले वाण भीमा सुपर, भीमा राज, भीमा रेड, भीमा डार्क रेड, तसेच पांढऱ्या जाती भीमा शुभ्रा, भीमा श्वेता, भीमा सफेद, तसेच कृषिविद्यापीठ किंवा बागवानी संशोधन संस्था यांच्या बसवंत-७८०, फुले समर्थ, अग्रिफॉऊंड डार्क रेड अर्का कल्याण इ. जातींची निवड करावी. मुलभूत बीयाणे घेऊन दरवर्षी निवड करून दोन जातीमध्ये विहित केलेले विलगीकरण अंतर राखुन शेतकरी देखील बीजोत्पादन करू शकतो. मागच्या हंगामातील बीयाणे वापरणार असाल तर त्याची उगवणक्षमता तपासुन घेऊन प्रमाणित केलेले असावे._ *_🌱खरीप कांदा रोपवाटिका व्यवस्थापन_* _◆खरीप कांद्याच्या रोपवाटिका व्यवस्थापनेसाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. खरीप कांद्याच्या रोपवाटिकेसाठी सेंद्रीय पदार्थांनी समृद्ध, वालुकामय चिकणमातीयुक्त, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य ठरते. जमिनीचा सामू ६ ते ७.५ असावा. रोपवाटिकेत पाणी सतत साठून राहू नये म्हणून जमिनीला किंचित उतार असावा, जेणेकरून अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा होणे सोयीस्कर ठरते. रोपवाटिकेत सतत पाणी साठून राहण्याची स्थिती बुरशीजन्य रोगांच्या संसर्गास अनुकूल ठरते. जमिनीत चिकन मातीचे प्रमाण जास्त नसावे._ _◆रोपवाटिका तयार करण्यासाठी पूर्वनियोजित वेळी खोल नांगरणी आणि गरजेनुसार वखरणी करून घ्यावी जेणेकरून जमीन स्वच्छ व भुसभुशीत होईल. तसेच तण, बुरशीजन्य रोग व जमिनीतील किडींचा उपद्रव कमी होण्यास मदत होईल. रोपवाटिकेत विविध बुरशीजन्य रोग (रायजोक्टोनिया, फाइटोप्थोरा, पीथियम आणि फ्यूजेरियम) येण्याची शक्यता असते. ज्या ठिकाणी रोपवाटिकेत बुरशीजन्य मानमोडी (डैम्पिंग ऑफ) किंवा मातीतून प्रसार होणा-या रोगांचा गंभीर परिणाम होतो अशा जमिनींमध्ये मृदा सौरिकरण (सोलॅरिझेशन) उपचाराची आवश्यकता असते._ _◆मृदा सौरिकरण (सोलॅरिझेशन) उपचार पद्धतीने मानमोडी बुरशीजन्य रोगांपासून रोपवाटिकेचा बचाव करू शकतो. ज्या ठिकाणी रोपवाटिका करण्याचे नियोजित असते अशा क्षेत्राला हलक्या स्वरूपात पाणी देऊन जमीन थोडी ओलसर करून घ्यावी. मार्च ते मे दरम्यान रोपवाटिकेसाठी निवडलेली जागा २०० गेजच्या पांढऱ्या पारदर्शक पॉलिथीनने अश्या प्रकारे झाकून ठेवावी की आतील भागातील बाष्पयुक्त हवा बाहेर येणार नाही._ _◆अशा प्रकारे ६-७ आठवडे पर्यंत झाकून ठेवल्यामुळे आतील तापमान ५० डिग्री सेल्सिअस पर्यंत टिकून राहील. ६-७ आठवड्यांनंतर पॉलिथीन काढून टाकून आवश्यक प्रतीक्षा काळानंतर रोपवाटिका करण्यासाठी वाफे तयार करावेत. रोपवाटिकेसाठी वाफे कशाप्रकारचे बनवावे हे ऋतू (हंगाम) नुसार अवलंबून असते. सपाट वाफ्यात पाणी एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे वाहत जाते म्हणून बियाणे वाहून जाण्याची शक्यता असते भारी (चिकणमाती) जमीनची पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते म्हणून खरिफ हंगामासाठी गादीवाफे करणे फायद्याचे असते._ _◆खरिफ कांद्याची रोपवाटिका गादी वाफ्यावर करावी. गादीवाफ्याची लांबी २-३ मी. रुंदी १-१.५ मी. आणि जमिनीपासून १५ ते २० सें.मी. उंची गरजेची असते. तण काढणे सुलभ होण्यासाठी वाफ्याची रुंदी १-१.५ मी ठेवणे गरजेचे असते. या आकाराच्या प्रति वाफ्यानुसार ८-१० किलो चांगले कुजलेले शेणखत, १५० ग्रा. १९:१९:१९ (एन.पी.के.) आणि ५० ग्रा. कॉपर ऑक्सीक्लोराईड वाफे बनवताना मातीत एकसमान मिसळून देणे फायदेकारक ठरते._ *_कुजलेले शेणखत, १९:१९:१९ आणि कॉपर ऑक्सीक्लोराईड इ. मातीत मिसळून देणे_* _◆ट्रायकोडर्मा हर्झियानम ३० ग्रा. प्रति वाफ्याप्रमाणे चांगल्या प्रकारे कुजलेल्या सेंद्रिय खतातून मातीत मिसळावे किंवा बुरशीजन्य मर रोग नियंत्रणसाठी व निरोगी रोपे मिळण्यासाठी प्रति हेक्टर प्रमाणे १.२५ किलो ट्रायकोडर्मा वापरण्याची शिफारस देखील केलेली आहे._ _◆एक हेक्टर क्षेत्रावर कांदा पुनर्रलागवड करण्यासाठी ८-१० किलो बियाणे आवश्यक असते. जर ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीने रोपवाटिका नियोजन केले असेल तर प्रति हेक्टर ५-७ किलो बियाणे पुरेशे असते. मागील वर्षी खरीप कांद्याच्या रोपवाटिकेत अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता जसे की, बुरशीजन्य मानमोडी रोग, रोपांच्या मुळांची सड आणि रोपे पिवळे पडणे इ. म्हणून या सर्व समश्या कमी करण्यासाठी सुरुवातीच्या काळातच रोपवाटिकेची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी अशास्रिय पद्धतीने तयार केलेले बी वापरू नये._ _◆पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास २-३ ग्रा. कॅप्टन किंवा कार्बेन्डाझिमची बीजप्रक्रिया करावी. पॅकेटबंद उपचार केलेल्या बियाण्यास पुन्हा उपचार करण्याची आवश्यक नसते. *टीप-* बाजारातून आणलेल्या बियाणे पाकिटावर कोणत्या रासायनिक घटकांची प्रक्रिया झाली आहे त्याची खात्री करावी. बियाणे ओळींमध्ये १-१.५ से.मी. खोलीवर टाकावे. ओळींमध्ये ५-७.५ से.मी. अंतर ठेवावे. बियाणे टाकून त्यावर कुजलेल्या शेणखत किंवा कंपोस्ट खताच्या बारीक भुकटीचा हलकासा थर द्यावा व नंतर हलके पाणी द्यावे._ *_🎯गादीवाफ्यावर कांदा रोपवाटिका_* _◆रोपवाटिकेच्या विस्तार थोडा असेल तर बियाणाची उगवण होईपर्यंत झारीने पाणी द्यावे रोपवाटिकेच्या विस्तार मोठा असेल आणि ठिबक किंवा तुषार सिंचनाची सोय उपलब्ध नसेल तर गादीवाफ्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या पाटातून पाणी द्यावे._ _◆नोंद गादीवाफ्याच्या दोन्ही बाजूच्या भुईदंडामधून पाणी वाफ्याला पुरेशे पाणी मिळाले नाही तर उगवण क्षमतेवर परिणाम होऊ शकतो म्हणून स्प्रिंकलर किंवा ठिबक किंवा रेनगेज पाईप द्वारे पाणी देणे आवश्यक असते हे शक्य नसेल, जमीन योग्य उताराची, पाण्याचा योग्य निचरा क्षमता असलेली असल्यास या वाफा पद्धती ऐवजी सपाट वाफा पद्धती चा अवलंब करू शकता._ _◆गादीवाफ्यावर ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर करून देखील यशस्वीरित्या रोपवाटिका वाढविता येते स्वस्थ आणि तंदरुस्त रोपे तयार करण्यासाठी खरीप हंगामात कांद्याच्या रोपवाटिकेत गरजेनुसार वेळीच खुरपीने गवत काढणे महत्वाचे असते. रोपवाटिकेत तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खुरपीच्या सहाय्याने २ खुरपण्या प्रभावी ठरतात तणनाशकाच्या सहाय्याने तण नियंत्रण करायचे असल्यास रोपे उगवण्यापूर्वी वाफ्यावर पेंडीमॅथिलीन २ मि.ली. प्रति लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी बियाणे टाकल्यानंतर २०-२५ दिवसांनी हाताने खुरपणी करावी. ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यायचे असल्यास १६ मि.मी. व्यासाच्या लॅटरलचा वापर करावा. दोन ड्रीपर मध्ये ३०-५० से.मी. अंतर असावे._ _◆ड्रिपरची प्रति तास ४ लिटर पाणी बाहेर टाकण्याची क्षमता असावी. तुषार सिंचन ने पाणी द्यायचे असल्यास २ लॅटरल मध्ये ६ मीटर अंतर ठेवावे व नोझलची पाणी फेकण्याची क्षमता प्रति तास १३५ लिटर असावी. परंतु रोपवाटिकेच्या विस्तार लहान असेल तर या २ पद्धतीने पाणी व्यवस्थापन करणे अवघड असते. रोपवाटिकेत खरिफ हंगामात पाणी जास्त होण्याची संभावना असते म्हणून आवश्यकतेनुसार पाणी बाहेर काढून टाकावे कारण सतत पाणी साठल्यामुळे जमिनीची ऑक्सिजनची वहन क्षमता कमी होते परिमाणी रोपांना मुळांद्वारे अन्नद्रव्ये घेणे कठीण होते. अशावेळी बुरशीची देखील वाढ होऊ शकते व रोपे पिवळी पडून मरण्याची शक्यता असते. म्हणून जमिनीपासून २ मीटर उंचीवर ग्रीन शेडनेट किंवा ६० ते १०० मेश नायलॉनची कीडरोधक जाळीच्या साहाय्याने पावसाळ्यात रोपांना संरक्षित ठेवणे अत्यंत गरजेचे असते._ _◆रोपवाटिकेत रोपांवर विविध कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो. म्हणून निरोगी, कीड, रोग मुक्त रोपे मिळण्यासाठी योग्यवेळी योग्य उपाययोजना करणे गरजेचे असते. फुलकिड कांद्यातील एक प्रमुख कीड आहे फुलकिड नियंत्रणासाठी फिप्रोनिल ५ इ.सी. १ मि.ली. किंवा कार्बोसल्फान २५ % ई.सी. २ मि.ली. प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी पावसाळ्यात स्टिकरचा वापर करावा. ढगाळ हवामान आणि दव स्थिती बुरशीजन्य रोगास अनुकूल असते. काळा आणि तपकिरी करपा रोग नियंत्रण करण्यासाठी मँकोझेब २.५ ग्रा. किंवा हेक्साकोनॅझोल १ ग्रा. प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी._ _◆पावसाळ्यात रोपवाटिकेत सतत पाणी साठून राहणे जमिनीची अयोग्य पाणी निचरा क्षमता इ. स्थिती बुरशीजन्य रोगामुळे रोपांची मूळसड, मर रोग होण्यास अनुकूल ठरू शकते. नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईडचे ३ ग्रा. प्रति लिटर पाणी प्रमाणे द्रावणाची रोपांच्या ओळीत आळवणी करावी. मर रोगापासून नियंत्रण करण्यासाठी संयुक्त बुरशीनाशक मेटॅलॅक्झिल ४ % + मेंकोजेब ६४ % २ ग्रा. प्रति लिटर पाणी प्रमाणे द्रावण करून रोपांच्या ओळीत ओतावे._ *_🧧बुरशीनाशक द्रावणाची रोपांच्या ओळीत आळवणी_* _◆सतत पडणाऱ्या पावसामुळे लीचिंगद्वारे पोषक अन्नद्रव्यांच्या मोठ्या प्रमाणातील ऱ्हासामुळे रोपे पिवळी पडण्याची शक्यता असते, म्हणून बीयाने टाकल्यानंतर २० दिवसांनी १९:१९:१९ (एन.पी.के.) आणि सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण (जस्त ३ %, लोह २.५ %, मंगल १ %, तांबे १ % आणि बोरॉन ०.५ %) ची शिफारशीनुसार किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणी केल्यास अन्नद्रव्यांची कमतरता कमी करू शकतो. अन्नद्रव्य व्यवस्थापन माती परीक्षण आणि पिकांचा प्रतिसाद किंवा जेव्हा पीक अन्नद्रव्यांच्या कमतरतेचे लक्षण दर्शवतात तेव्हा करणे गरजेचे असते व हे परिस्थितीनुसार बदलत असते._ *_🎈कांद्याची पुनर्रलागवड_* _◆साधारणतः रोपे ४५–६० दिवसांची झाल्यानंतर त्यांची १५ x १० से.मी. अंतरावर पुनर्रलागवड करतात. साधारणतः ०.८–०.९ से.मी. मानेची जाडी असलेली २०–३५ से.मी. उंचीचे रोपे लागवड करण्यासाठी उपयुक्त मानली जातात._ _◆लागवडीसाठी तयार झालेल्या रोपांना साधारणतः ५-६ दिवस पाणी देणे बंद करावे व लागवासीसाठी रोपे उखडताना १-२ दिवस अगोदर हलक्या स्वरूपात पाणी द्यावे. पुनर्रलागवड करताना वाढलेल्या रोपांचा शेंड्याकडील एक तृतीयांश भाग कापून टाकावा. कार्बोसल्फान २ मि.लि. व कार्बेन्डाझिम १ ग्रा. प्रति १ लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे या द्रावणात रोपांची मुळे बुडवून नंतर लागवड करावी. म्हणून बुरशीजन्य रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी करता येऊ शकतो._ *_🏵️कांदा रोपांच्या मुळांना प्रक्रिया_* *_अन्नद्रव्य व्यवस्थापन_* _कांद्याचे अपेक्षित उत्पादनासाठी हेक्टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत वापरावे. हेक्टरी ट्रायकोडर्मा, अझोटोबॅक्टर आणि पी.एस.बी. प्रत्येकी ५ किलो शेणखतातून देऊ शकतो. जैविक घटक हे रासायनिक घटकांबरोबर देऊ नये जर ट्रायकोडर्मा, अझोटोबॅक्टर आणि पी.एस.बी. द्रव स्वरूपात असतील तर ठिबक संचाद्वारे देखील देऊ शकतो (साधारणतः पायाभूत रासायनिक खताच्या मात्रेनंतर १० दिवसांनी). हेक्टरी २५० किलो निंबोळी पेंड देखील देऊ शकतो. माती परिक्षणानुसार अन्नद्रव्याची (खत) मात्रा द्यावी._ _◆कांद्यासाठी नत्र १०० किलो (युरिया २१७ किलो), स्फुरद ५० किलो (सिंगल सुपर फोस्फट ३१३ किलो) आणि पालाश ५० किलो (म्युरेट ऑफ पोटॅश ८३ किलो) प्रति हेक्टर द्यावे. अर्धे नत्र (५० किलो युरिया १०९ किलो) पूर्ण स्फुरद आणि पालाश पुनर्लागवडीच्या वेळी द्यावे. उर्वरित नत्र (५० किलो- युरिया १०९ किलो) पुनर्लागवडीनंतर १ आणि १.५ महिन्याने सामान हप्त्याने द्यावे. खते देण्यापूर्वी माती परीक्षण करून, त्याप्रमाणे तज्ज्ञांच्या सल्ल्याने खताची मात्रा द्यावी._ *~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~* *✳️🌀✳️🌀✳️🌀✳️🌀✳️🌀✳️*
#🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌱मी शेतकरी विभाग🏵️* *🏵️महाराष्ट्र शासन🏵️* *रोग नियंत्रण ⭕पोक्का बोईंग -* हा रोग फ्युजॅरिअम बुरशीमुळे होतो. तीन ते सात महिन्यांच्या उसामध्ये मॉन्सूनपूर्व वळीव पाऊस व मॉन्सूनमुळे वाढलेल्या हवेतील आर्द्रतेमुळे हा रोग पानांवर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. सुरवातीस बुरशीची लागण शेंड्यातून येणाऱ्या तिसऱ्या वा चौथ्या कोवळ्या पानावर दिसून येते. पानाच्या खालच्या भागात सुरवातीस फिक्कट हिरवट, पिवळसर, पांढरट पट्टे अथवा ठिपके दिसतात. अशा पानांचा आकार बदलतो. लांबी कमी होते व खोडाकडील भाग अरुंद होऊन पाने एकमेकांत गुंफली जातात. त्यामुळे ती पूर्णपणे उघडली जात नाहीत. प्रादुर्भावग्रस्त जुन्या पानावर पिवळसर पट्ट्याच्या जागेवर वर्तुळाकार, लांब अरुंद वेगवेगळ्या आकारांचे लालसर ते तपकिरी ठिपके अथवा रेषा दिसतात. रोगाची तीव्रता वाढल्यास शेंडा कूज व कांडी कापाची लक्षणे दिसतात. शेंडा कूज व कांडी काप झालेल्या उसातील शेंडा जोम नष्ट होतो. त्यामुळे उसावरील डोळ्यातून पांगशा फुटतात, कालांतराने असे ऊस वाळतात. 🛡️उपाययोजना 👉माती परिक्षणावर आधारित रासायनिक खतांची (मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये) मात्रा वेळेवर व योग्य प्रमाणात द्यावी. 👉रोगामुळे शेंडा कूज व पांगशा फुटलेले ऊस शेतातून वेगळे काढावेत व नष्ट करावेत. 👉ऊस पिकावर रोग आढळून आल्यानंतर लगेचच, मॅन्कोझेब (७५ डब्ल्यूपी) ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात १० ते १२ दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात. 👉शेतात पाण्यामुळे दलदल होणार नाही, याची काळजी घ्यावी. पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने करावा.
#🌱मी शेतकरी #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती प्रकाश संश्लेषणाची थोडक्यात रासायनिक अभिक्रिया: 6CO2 + 6(H2O) → C6H12O6 + 6O2 ज्या रासायनिक क्रियेद्वारे वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात हवेतील कर्बद्विप्राणिद वायू (Carbon dioxide Gas) व पाणी यांचा वापर करून अन्न तयार करतात त्या क्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात. प्रकाशसंश्लेषण कुठे घडते :- वनस्पतीची पाने हे वनस्पतींमधील प्रकाश संश्लेषणाचे प्राथमिक उदाहरण आहे. पान हा वनस्पतीचा एक भाग आहे. या भागातून प्रकाश संश्लेषणाद्वारे वनस्पती अन्न बनवतात. पान सहसा हिरव्या रंगाचं असते. प्रकाशसंश्लेषण प्रामुख्याने पानांमध्ये घडते, आणि खोडात जवळजवळ घडत नाही. हे हरितलवक नावाच्या विशेष पेशी घटकात घडते. पानाला एक देठ आणि पाते असते. पाता रुंद असतो, त्यामुळे तो प्रकाशसंश्लेषण होत असताना सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो. हरितलवक, ज्यात प्रकाशसंश्लेषण होते, त्यात हरितद्रव्य असते. हरितद्रव्य सूर्याची प्रकाश ऊर्जा शोषून घेते. पर्णछिद्रे नावाची छोटी रन्ध्रे कार्बन डायऑक्साइड पानात यायला आणि ऑक्सिजन बाहेर पडायला मदत करतात. प्रकाश संश्लेषण (photosynthesis):- सूर्यप्रकाशापासून मिळणाऱ्या ऊर्जेच्या उपयोगाने कार्बन डाय-ऑक्साइड(CO2) व पाणी (H2O) यांसारख्या साध्या संयुगांपासून रासायनिक विक्रियेने ग्लुकोज (C6H12O6), सुक्रोज (C12H22O11), स्टार्च (C6H10O5) इ. गुंतागुंतीच्या संयुगांची निर्मिती होते. ही प्रक्रिया बुरशी, भूछत्रे इ. क्लोरोफिलविरहित (हरितद्रव्यहीन) वनस्पती [उदा. कवक] सोडल्यास इतर सर्व वनस्पतींत आढळते; ह्या प्रक्रियेला ‘प्रकाश संश्लेषण’ म्हणतात. हा शोध लावण्याचे श्रेय डच वैद्य जे. इंगेनहाउस (१७७९) आणि स्विस शास्त्रज्ञ एन्. टी. द सोस्यूर (१८०४) यांना दिले जाते. तत्पूर्वी, जमिनीतील कुजलेल्या (ह्युमस) कार्बनी पदार्थापासून वनस्पतींचे पोषण होते, असे मानले जात असे. प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया :- जेव्हा हिरवे वनस्पती प्रकाश ऊर्जा वापरून त्याचे रूपांतर कार्बन डायऑक्साइड (CO2) आणि पाणी (H2O) मध्ये करते तेव्हा प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया घडते. वनस्पतीचा प्रकाशसंश्लेषण करणारा रंग, हरितद्रव्य, प्रकाश ऊर्जा शोषून घेतो, आणि कार्बन डायऑक्साइड व ऑक्सिजन असलेली हवा पर्णछिद्रातून आत येते. प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेचे सगळ्यात महत्वाचे उप-उत्पादन म्हणजे ऑक्सिजन, ज्यावर बहुतांश जीव अवलंबून असतात. प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत निर्माण झालेला पिष्ठमय पदार्थ ग्लुकोस हे पाने, फुले, फळे, बीज निर्माण करण्यासाठी ऊर्जा स्रोत म्हणून वापरला जातो. ग्लुकोसचे रेणु मग एकत्र होतात आणि अजून संकुल पिष्ठमय पदार्थ निर्माण करतात, जसे स्टार्च आणि सेल्युलोस. सेल्युलोस हे वनस्पतीच्या पेशी भित्ती निर्माण करण्यासाठी मूलभूत पदार्थ आहे. प्रकाशसंश्लेषण हे जवळ जवळ सर्व जीवांसाठी प्राथमिक ऊर्जा स्रोत असते. प्रकाशसंश्लेषणातील महत्वाचे घटक :- प्रकाशसंश्लेषणाच्या स्थिर दरासाठी विविध घटक योग्य मात्रेत आवश्यक आहेत. प्रकाशसंश्लेषणावर प्रभाव टाकणारे काही घटक खालील प्रमाणे आहेत. 1) प्रकाशाची तीव्रता :- प्रकाशाची तीव्रता वाढली की प्रकाशसंश्लेषणाचा दर वाढतो आणि तीव्रता कमी असली तर प्रकाशसंश्लेषणाचा दर पण कमी होतो. 2) CO2 ची संहत तीव्रता :- CO2 ची संहत तीव्रता वाढली की प्रकाशसंश्लेषणाचा दर वाढतो. साधारणपणे ०.०३ ते ०.०४ टक्के कार्बन डायऑक्साइडची संहत तीव्रता प्रकाशसंश्लेषणासाठी पूरक असते. 3) तापमान :- कार्यक्षम प्रकाशसंश्लेषणासाठी २५० ते ३५० से. तापमान इष्टतम असते. 4) पाणी :- प्रकाशसंश्लेषणासाठी पाणी आवश्यक घटक आहे. पाणी नसेल तर कार्बन डायऑक्साइड शोषण्यात त्रास होतो. जर पाणी कमी असेल तर पाने आपली पर्णछिद्रे उघडत नाही कारण त्यांना पाणी साठवून ठेवायचे असते. 5) प्रदूषण :- प्रदूषक आणि वायु (अशुद्ध कार्बन) पानांवर बसतात आणि पर्णछिद्रे बंद होतात ज्यामुळे कार्बन डायऑक्साइड शोषणे कठीण होते. प्रदूषणामुळे प्रकाशसंश्लेषणाचा दर १५ टक्के कमी होतो. उत्तरेकडील भागात हिंवाळ्याच्या दिवसात तापमान शून्य अंशाच्या खाली जाऊन सगळीकडे बर्फाचे साम्राज्य पसरते. दिवसाचा कालावधी अगदी लहान होतो आणि त्या वेळेतही सूर्यनारायण क्षितिजावरून जेमतेम हातभर वर येऊन पुन्हा खाली उतरतो. यामुळे कडक ऊन असे फारसे पडतच नाही. सगळे पाणी गोठून गेल्यामुळे झाडांची मुळे पाणी शोषून घेऊन त्याला फांद्यांपर्यंत पोचवू शकत नाहीत. त्यामुळे फोटोसिन्थेसिस ही क्रिया मंदावते. या वृक्षांना वसंत ऋतूमध्ये पानाफुलांचा बहर येतो. इथल्या उन्हाळ्यातले मोठे दिवस, त्यात भरपूर सूर्यप्रकाश आणि पाण्याचा मुबलक पुरवठा असल्यामुळे त्यांचा सदुपयोग करून ही झाडे झपाट्याने वाढतात, तसेच अन्न तयार करण्याचा कारखाना जोरात चालवून त्याचा भरपूर साठा जमवून ठेवतात. कडक थंडीत आणि अंधारात फोटोसिन्थेसिस होत नसल्यामुळे पानांचा फारसा उपयोग नसतो, त्याशिवाय त्यांचे क्षेत्रफळ जास्त असल्यामुळे त्यातून जास्त बाष्पीभवन होते, त्यावर जास्त बर्फ सांचून त्याचा भार वृक्षाला सोसावा लागतो असे तोटेच असतात. हे टाळण्यासाठी हे वृक्ष आधीपासूनच तयारीला लागतात. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस हे वृक्ष आपली वाढ थांबवतात आणि त्यांच्या पानांमधल्या क्लोरोफिलचे विघटन होणे सुरू होते, तसेच पानांमधले रस झाडाच्या आतल्या बाजूला शोषले जाऊ लागतात. ते फांद्या आणि खोडांमधून अखेर मुळांपर्यंत जाऊन पोचतात आणि सुरक्षितपणे साठवले जातात. झाडांना थंडीत न गोठण्यासाठी यांचा उपयोग होतो. पण यामुळे मरगळ येऊन ती पाने सुकायला लागतात आणि गळून पडतात. पाने नसल्यामुळे झाडांचे श्वसन जवळ जवळ बंद होते आणि मुळांकडून पाण्याचा पुरवठा थांबल्यामुळे रसांचे अभिसरण होऊ शकत नाही. त्यापूर्वीच ही झाडे झोपेच्या पलीकडल्या डॉर्मंट स्थितीत जातात. ही झाडे दोन तीन महिने ध्यानावस्थेत काढून स्प्रिंग येताच खडबडून जागी होतात. पानांमध्ये हिरव्या रंगाच्या क्लोरोफिलखेरीज कॅरोटिनाइड्स, क्झॅंथोफिल, ॲंथोसायनिन यासारखी पिवळ्या आणि तांबड्या रंगांची रसायनेसुद्धा असतात. एरवी क्लोरोफिलचे प्रमाण जास्त असल्यामुळे हे इतर रंग झाकले जातात. जेंव्हा क्लोरोफिल नष्ट होते तेंव्हा इतर द्रव्यांचे रंग दिसायला लागतात. कांही झाडे फॉलच्या काळात लाल रंगाचे ॲंथोसायनिन तयारही करतात. या द्रव्यांमुळे निर्माण होणारे रंग एकमेकात मिसळून त्यांच्या प्रमाणानुसार रंगांच्या वेगवेगळ्या असंख्य छटा तयार होतात. मात्र ही झाडे कोणालाही आकर्षित करण्यासाठी हे रंग धारण करत नाहीत. थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांची जी धडपड चाललेली असते त्यात ते बायप्रॉडक्ट्स तयार होतात.
#🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌱मी शेतकरी पक्षी थांबे अर्थात विषमुक्त शेतीकडे वाटचाल ; काय आहे सेंद्रिय शेती? समजून घेऊयात – डॉ महेश गायकवाड, पर्यावरण तज्ञ, बारामती* आपल्याला वाटत असेल कि विषमुक्त शेती अर्थात सेंद्रिय शेती करायची असेल तर मग आपण जैवविविधता समजावून घेणे आवश्यक आहे. नाहीतर विषमुक्त शेतीची घोषणाबाजी होऊ शकते, प्रत्यक्षात मात्र काहीच नसेल, आणि काळानुसार हे धोकादायक असेल. याची नोंद सर्वांनी वेळीच घेतली पाहिजे. नाहीतर आपल्या चुकीच्या अनेक गोष्टी आपल्याला कधीच कळत नाहीत. खरतर आपण शेती करत नाही, आपण फक्त पेरणी करतो आणि शेतीला पाणी देत असतो. बस हे एकमेव सत्य आहे. आता आपण विचारकरूयात कि, नक्की शेती कोण करतंय, कोण आहेत पडद्यावरचे कलाकार आणि कोण आहेत पडद्यामागचे कलाकर. मानव हा पडद्यावरील कलाकार आहे, जो छाती बडवून सांगतोय, मीच सर्व करतोय, बाकी काहीच संबध नाही, माझ्या आधुनिक शेतीमध्ये. खरतर इथच गडबड सुरु होतेय चुकीच्या विचारांची. नुसती गडबड नव्हे तर हा मानवी अहंकार सुद्धा आहे. आपण विचार करूयात कि, पडद्यामागचे कलाकर कि ज्याला आपण नाव देऊयात जैवविविधता. आता शेती आणि आपली जैवविविधता हे नात समजाऊन घेणे आवश्यक आहे, नाहीतर विनाश अटळ आहे. आपण फक्त १ टक्के शेती करतो, बाकी ९९ टक्के शेती जैवविविधता करत असते. हा अर्थ खूप मोठा आहे, कदाचित मीही या लेखात कमी पडेल बहुतेक मांडणी करयाला, पण मी जबाबदारीने प्रयत्न करेन. कालची शेती जंगलात उगम पावली असून, जंगलात शेतीचे क्षेत्र निर्माण करून आपण शेतीचा जन्म सुरु केलेला आहे. जग म्हणजे जंगल, असच मानव लागेल आपल्याला, तरच पटेल, नाहीतर मी पणा आ वासून उभा राहील. भारत हा जंगल प्रधान देश होता, आता अजिबात नाही. कारण अनेक आहेत, यात शहरीकरण, औदोगीकरण, लोकसंख्या वाढ, अनियोजित जीवनशैली, आणि शेतीचे जंगलावर वाढते अतिक्रमण. या मुख्य बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. जंगलात शेती करणारे अनेक आदिवासी, जमीनदार १०० टक्के सेंद्रिय शेती करत होते, किंबहुना आजही आदिवासी लोक करत आहेत. मात्र जमीनदार बदलत गेले आणि आपल्या विकासाच्या गर्तेत सर्व जगच अडकत गेले. मग हरित शेती आणि हरितक्रांती झाली, मात्र खरी गोची इथच झाली, आणि आजची शेती आधुनिक मानल्या जाणार्या शिक्षण पद्धतीमुळे रसातळाला गेली, हे कबुल करावे लागेल, अलीकडे जगाने ते केले सुद्धा आहे. माझा विषय शेती नसून, आजची शेती सेंद्रिय करणेसाठी धडपडणारे अनेक शेतकरी आहेत कि ज्यांना एक योग्य दिशा देण्यासाठी मी लिहित आहे. आपण आता आपली आधुनिक शेती आणि जैवविविधता या विषयावर येऊन १०० सेंद्रिय शेतीकडे वळूयात. भले शेतीचे कितीही तुकडे होऊ द्यात, मात्र शेतीचा बांध मजबूत असलाच पाहिजे. अगदी दात टोकरून कुठ पोट भरते का अशी म्हण उगीच नाही आली जनमानसात. प्रत्येकाने आपल्या शेतीचा "बांध" म्हणजे "ताल" वाटली पाहिजे. कारण ज्या शेतकर्यांनी ताल राखली त्याचीच शेती सेंद्रिय होऊ शकते, एवढं लक्षात घ्यावे. कारण जैवविविधता आणि ताल याचा संबध खूप मोठा आहे, शिवाय किफायतशीर आहे, हे विसरून चालणार नाही. ताल म्हणजे जवळपास बैलगाडी जाईल असा, मोठा बांधच. जुन्या शेतकर्यांनी ताली खूप मोठ्या ठेवल्या होत्या कारण त्याशिवाय आपण शेती सुद्धा करू शकत नाही, हे त्यांच्या मनात ठासून भरले होते. मात्र आजकाल ताल म्हणजे पडीक क्षेत्र आणि मग ताल मोडा आणि त्यात सुद्धा पेरणी सुरु करा. हि शेती आजारी पाडण्याची सुरुवात झाली आणि आज शेती आजारी अवस्थेत आहे. ज्या शेतकरी बांधवांचे बांध किंवा ताल मजबूत आहे, त्याची शेती सुद्धा दणकट आहे. त्याला खरी जान आहे शेतीची. उगीच बांधात पेरणी करणाराची शेती नव्हे, तो तर आजारी धंदा झालेला आहे. असो आपण आता फक्त शेती वाचवायची असेल तर फक्त जैवविविधता कशी वाचवायची आणि मग शेती यावर बोलूयात. शेतीच्या बांधावर ‘’पक्षीथांबे’’ निर्माण करायचे असतील तर मग आपल्याला शेतीचे बांध मोठे करावे लागतील आणि ज्याला अगदी १ एकरापेक्षा जास्त शेती असेल त्यांनी शेतीच्या कडेने ताली मोठ्या केल्या पाहिजेत. काय आहे शेतीच्या बांधात आणि तालीत, अहो इथच आहे जैवविविधता. आपल्या शेतीच्या कडेने जैवविविधता वाढविणे अत्यावश्यक आहे. काहीजण तर चुकीचा विचार करतात कि, शेतीच्या बांधावर किंवा तालीत झाड लावली कि, झाडांच्या सावलीमुळे पिक उगवत नाही, मात्र मी, डॉ महेश गायकवाड खात्रीने सांगतो कि आपली स्थानिक झाडे बांधावर असली तरी त्यांच्या सावलीत पिक जोमाने वाढतात. यात फक्त स्थानिक झाड आपल्या सावलीत पिकांना वाढविन्यासाठी मदत करतात. मात्र परदेशी झाड लावली तर शेती पडून राहणार हे नक्कीच. कारण निलगिरी, उन्दिरमारी, सुरु, गुलमोहर, घाणेरी, रेनट्री अशी परदेशी झाड लावली तर आपल्या शेतातील जीवाणू सुद्धा मारले जातील शिवाय जमिनीची सुपीकता झपाट्याने कमी होऊन नापिकता निर्माण होईल. या झाडातून जमिनीत पडणारी पाने सुद्धा असिडस् निर्माण करून जीवाणू ते गवत ते पिक संपवितात. शिवाय नारळ हे झाड कधीही बांधावर लावू नये, कारण दिवसात अगदी ७००-१२०० लिटर पाणी लागते नारळाच्या झाडाला. मग पिक करपू लागतात, नारळाच्या कडेने. निलगिरी तर कधीही बांधावर लाऊ नये कारण जवळपास २००० लिटर पाणी दिवसाला लागते, अहो इरिगेशन कॅनलच्या कडेने निलगिरी झाडे लावली कारण कि, कॅनल चे पाणी पाझरून जवळपास २ किमी अंतरापर्यंत जमीन क्षारपड होऊ लागली, मग जगातील जास्त पाणी पिणारे झाड लावायचे ठरले, त्यात निलगिरी प्रथम क्रमाकावर असल्यामुळे लावली. आपलाल्या पाणी कमी पडत आहे आणि त्यात जर चुकीची झाड लावली तर घोळच.. कडुलिंब, बोर, साधी बाभूळ, करंज, लिबुनी, भोकर, उंबर, निर्गुडी, तरवड, हादगा, शेवगा, आंबा, जांभूळ, कडीपत्ता, पपई, मोहा, सिताफळ, गोधन, शिवरी, गावठी एरंड हीच झाड शेतीच्या बांधावर असणे अत्यंत महत्वाचे आहे. हि सर्व स्थानिक झाड असून यांना पाणी खूपच कमी लागते. अहो आंबा वर्षाला फक्त ३०० लिटर पाणी पितो. बोरी बाभळी तर वातावरणातील पाणी शोषून घेत असतात. आपला उंबर तर दिवसाला १२०० लिटर पाणी जमिनीत सोडतो, मग तरीपण परदेशी झाड का लावतोय आपण. जरा मनाला विचारा, लोकहो. स्थानिक झाड किफायतशीर, आरोग्यदायी, जैवाविविधातापुरक, भूजलपातळी वाढविणारी असताना सुद्धा आपण बांधावरील हि संपदा तोडतोय, हे पाहवत नाही. आजकाल बांधावरील कडुलिंबाची झाडे अनेकांनी तोडली कारण काय तर हुमणी किडे यावर बसतात आणि मग त्यामुळे शेतात हुमणी वाढतेय. मात्र असे कधीच होत नाही कारण हुमणी हि जमिनीत असतेच, शिवाय पूर्वीपासून आपल्या शेतात सापडते. इथ गडबड का झाली कारण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उस पिक घेतले जाते, आणि दिवसोदिवस पाण्याची कमतरता वाढत आहे. ज्या शेतीला पाणी कमी तिथ उसाचे कुजणे सुरु होते आणि मग हुमणी कुजलेले अन्न खाण्यात पटाईत आहे. तिला कमी पाणी मिळालेल्या उसाच्या पाचाटीचा वास आला कि जमिनीवर यायला सुरुवात करते आणि मग शेतीचे मोठे नुकसान होत आहे. कारण शेतीला पाणी कमी पडू लागले आहे, आणि पुढे भविष्यात अजूनही पाणी तुटवडा होणार आहे. मग अजूनही हुमणीचे हल्ले वाढणार आहेत, हे फक्त उस पिकाच्या बाबतीतच घडणार आहे, किंवा घडतेय. याचा अर्थ असा कि चोर सोडून सन्यासाला फासी, आपण देऊन बसलोत, बहुतेकजण. यात आपले साखर कारखाने आघाडीवर असतात, यांचे शेतकी अधिकारी तर फतवे सुद्धा काढतात कि, शेतीच्या बांधावर एकही झाड ठेवू नाक, तोडून टाका म्हणून. अस केल्याने निसर्गाचे व शेतीचे अमर्यादित नुकसान होत आहे. इथ जर जास्त कडूलिंब झाडे असतील तर मग त्यावर कावळा हा पक्षी हुमणीचा एक नंबरचा शत्रू, मात्र त्याला बसायला असलेले कडुलिंब झाड तोडले तर कावळे कसे येतील शेताकडे. तसेच हुमणीचा त्रास कमी करणेसाठी एरंड मोठ्या प्रमाणात लावणे आवश्यक आहे. यामुळे हुमणीचे प्रमाण कमी होईल. दुष्काळी भागातील जसे बारामतीचा जिरायती पट्टा, माण खटाव, बीड अश्या अनेक ठिकाणी पहिले असता, १ एकर शेतीच्या बांधावर जवळपास २० ते ३० लिंबाची झाडे आहेत. शेतकरी त्याची निगा राखतात, आणि अभिमानाने सांगतात कि, लिंबाची झाड शेतीला लीम्बुनी खत किंवा लिंब तेल फुकट देत असतात. तर अतिशहाणे शिक्षित शेतकरी ते विकत घेतात, दुर्भाग्य आपल्या देशाचे आहे कि, आपले सर्वात मोठे नुकसान शिकलेल्या शिक्षित पिढीने केले आहे. अगदी शेती, निसर्ग, पर्यावरण आणि जंगलांचे. लिंब खत/पेंड/तेल असे नानविध बाबी कडुलिंबाची झाडे शेतीला पुरवीत असतात. आम्ही कधीच हि झाड तोडणार नाही, उलट अजूनही झाडे लावणार असे अभिमानाने सांगतात. अहो आपल्याला पाडवा आला कि कडुलिंब आठवतो, तोही दुसर्याच्या जागेत जाऊन त्याची फांदी तोडून आणावी लागते, हे खूप निराशाजनक चित्र आहे. अगदी वर्षातून उन्हाळ्यात याच्या काड्यांचा रस काढून पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. शिवाय जनावरे हि याचा पाला मोठ्या प्रमाणात खातात. राजस्थान सरकार याबाबतीत खूप सजग असून त्यांनी रोडच्या दोन्ही बाजूला कडुलिंब व करंज अशी झाडे राज्यभर लावली आहेत. उंटाचे आवडते खाद्य कडुलिंब व खेजडीचा पाला. आपल्याकडेहि शेली, गाय, म्हशी याचा पाला खात असतात. मात्र आजकाल याचे प्रमाण कमी होताना दिसून येत आहे. अहो माझे गाव निंबळक याचे नाव सुद्धा याच झाडावरून पडले असल्याचे इतिहास सांगतोय. काही गावात याची फांदी सुद्धा जाळत नाहीत. शेतीचा बांधावर लावण्यास अत्यंत योग्य झाड आहे. कारण यामुळे अनेक प्रजातीचे पक्षी यावर येतात, घरटी करतात. हेच पक्षी अनेक प्रकारचे कीटक खाऊन शेतीचे कीडनियंत्रण करीत असतात, जेणेकरून आपला रासायनिक फवारणी खर्च वाचविला जातो. पक्षी थांबे मधील झाड आहे करंज, शेतीसाठी अत्यंत उपयोगी असे झाड आहे कारण, या झाडाच्या पानावर अनेक प्रकारचे कीटक व पेस्ट आपली जीवनक्रम पूर्ण करतात, त्यामुळे हे कीटक व पेस्ट शेतात प्रवेश सुद्धा करीत नाहीत. शिवाय यांना फुले आली कि मग, मधमाश्या फुलांवर तुटून पडतात. यात आपल्या शेतीमधील पिकांचे परागीभवन मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे उत्पादन ३० टक्के पेक्षा जास्त वाढते. शिवाय याच्या शेंगा विकून काही प्रमाणात आर्थिक फायदाही मिळतो. पक्षी थांबे मधील साधी बाभूळ व बोर हि झाड तर शेतीचा कणा आहेत. कारण बहुतेक पक्षीथांबे मजबूत करायचे असतील तर बोरी ब बाभळीची काटेरी झाडे पक्षी गणाला सुरक्षित वाटतात. यामध्ये पक्षांना आराम करणे आवडते, तसेच संरक्षण मिळते, खाद्य मिळते, घरटी करता येतात, मधमाश्या पोळी करतात, सुगरणी आपला खोपा बनवितात. मात्र आधुनिक माणसाला हे सगळ नको आहे, कारण पक्षी आले कि आपल्या शेतातील धान्य खातील, हि भावना वाईट विचारांची आहे, यामुळे आपले कधीही भरून न निघणारे नुकसान होत आहे. मधमाश्या पूरक हो दोन्ही झाड आपल्या शेतीत विना पाण्याची सेवा करीत असतात. आपल्या शेळ्या मेंढ्या यांना भरपूर खाद्य देणारी हि झाड शेतीच्या बांधावर लावण आवश्यक आहे. पक्षी थांब्यातील अत्यंत महत्वाची झाड आहेत. कारण अनेक कीटक सुद्धा याच झाडांवर आपली जीविका पूर्ण करतात, जे कीटक पिकांवर हल्ले करण्यासाठी येतात, असे कीटक बोर व बाभळी वर आपली जीविका पूर्ण करून शेतीमित्र होतात. तसेच यावर येणाऱ्या मुंगा आपल्या शेतीत खत निर्मिती करणारे घटक आहेत. मित्र कीटक म्हणून मुंग्या याच झाडांवर राहत असतात. त्यामुळे जैवविविधतेचा वसा घेऊन आलेली बाभूळ व बोर वाचवा तरच शेती वाचेल. पक्षी थांबे मधील तरवड, जगातील सर्वात जास्त कीड व पेस्ट नियंत्रण करणारे झाड, म्हणजे तरवड. अहो शेतीच्या कडेला सर्वत्र दिसणारे झुडूप वर्गातील हे झाड शेतीचा कणा म्हटले तरी कमीच पडेल. पण आपला वाढता मुर्खपणाचा कळस म्हणजे तरवड तोडून अनेक परदेशी झाड लावून शेतीवर संकटे ओढवून घेणारी पिढी. आता जागृतपणे तरवड वाचविणे आवश्यक आहे. अहो बार्शी सोलापूर मधून येणाऱ्या दुधाच्या घागरी पहिल्या असतील एकदातरी आपण सर्वांनी, अगदी रेल्वे किंवा बस मधून या घागरी प्रवास करताना, त्याच्या तोडला पाढरे फडके बांधले असायचे आणि त्यावर तरवडाची गोल चुंबळ करून घागरीला बांधलेली असायची. कारण त्यामुळे दुध नासत नव्हते. एवढी ताकद या तरवडामध्ये आहे, हे आपण विसरून गेलो. मात्र भविष्यात शेती करायची असल्यास शेतीकडेने किंवा पडीक जमिनीत असलेले तरवड वाचविणे आवश्यक आहे. घटस्थापना आली कि सर्वाना एकदम आठवण येते तरवडाची, फुलांचा व पानाचा हार घालून, मग उंबराच्या झाडाखालची माती आणून, वडाची पत्रावळी करून त्यावर ७ विविध प्रकारची धान्य पेरणी करायची, आणि मग १० दिवस वाट बघायची. यात आपल्याला महत्वाचे म्हणजे पिकांची वाढ कशी होतेय हे घरीच समजायचे, आणि मगच पेरणी करायची का, हे उत्तर मिळायचे. एक प्रकारचे ग्रीन हाउस मधील प्रयोग म्हटलं तर वावग ठरणार नाही. माणसाच्या नाकात माळीन सारखा आजार म्हणजे नाकात फोड येणे, हा आजार झाला कि आजी म्हणायची फक्त तरवडाची फुलांचा वास घेतला कि बर होत.....१०० टक्के बरे होणार. आंबा – जांभूळ – शेवगा – सिताफळ – लिंबुनी – आवळा – पपई - मोहा अशी अनेक किफायतशीर झाड शेतात असण म्हणजे आपल्या मनाची श्रीमंती लगेच सर्वांना दिसून येते. हि झाड जैवविविधता पूरक आहेतच. अनेक पक्षी, वन्यजीव यांनाही निवारा, खाद्य देतील आणि मानवाला सुद्धा. मात्र ज्यांचे बांध टोकरलेले असतात तिथ शांतता व समाधान निश्चितच नसते, हे आपण पाहत आहोत. अशी झाड म्हणजे घरातील मंडळी नक्कीच बलवान असतात. कारण घरात पिकते ते मनसोक्तपणे खायला हि मिळते. त्यामुळे बलवान पिढी हीच, देशाची ताकद आहे. हे समजून घेणे आवश्यक आहे. आपल कुटुंब बलवान तर देश बलवान हे समजून घेतले तरच आपण सेंद्रिय शेती करू शकतो नाहीतर फक्त समाजाची व आपली फसवणूक. शिवाय आपल्या बांधावर कुसळी गवत, भाल्या गवत, त्यात दगडीपाला अर्थात एकदांडी असणे आवश्यक आहे. आजकालच्या सेंद्रिय शेती व विक्री व्यवस्थेवर न बोललेले बरे. काहीजण तर शेतकऱ्याकडून माल घेतात आणि शहरात आणून सेंद्रिय म्हणून विकतात, अनेकदा मी पाहते असतो, अनेकदा रोखायचा प्रयत्नहि केलेत. आपणही हे वेळीच रोखले तरच खर्या सेंद्रिय मालाला किंमत मिळेल. आपल्या बांधावर येऊन आपला शेतमाल विकला गेला पाहिजे असे काहीतरी करणे म्हणजे सेंद्रिय शेती आवश्यक आहे, भले थोडी शेती करा, पण सेंद्रिय करावी. डॉ महेश गायकवाड, M.Sc. Ph.D. ( Environment Science), पर्यावरण तज्ञ, बारामती ९९२२४१४८२२👌👍🌹🙏