श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
ShareChat
click to see wallet page
@266210066
266210066
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
@266210066
शेतकर्‍यांसाठीचा माहितीचा खजिना👌
#🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌱मी शेतकरी #🌾शेती माहिती विषाणूजन्य रोग व त्यांचे व्यवस्थापन ⭕वांझ रोग रोपावस्थेत झाडाच्या पानांवर प्रथम गोलाकार पिवळे डाग पडतात. अशी पाने आकाराने लहान पडून कालांतराने आकसतात. पाने पिवळी पडून झाडांच्या दोन पेरातील अंतर कमी होऊन त्यांना अनेक फुटवे फुटून झाडांची वाढ खुंटते. रोगग्रस्त झाडांना फुले व शेंगा येत नाहीत व ती शेवटपर्यंत हिरवी राहून झुडपासारखी दिसतात. रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून ते पीक पक्व होण्याच्या अवस्थेपर्यंत कधीही होऊ शकतो. जास्त पाऊस, २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान व जास्त आर्द्रता रोगाच्या वाढीस पोषक आहेत. 🛡️उपाययोजना 👉रोगग्रस्त झाडे वेळोवेळी उपटून टाकावीत. 👉रोगवाहक कीड ‘एरिडोफाईट माईटस्‌च्या’ नियंत्रणासाठी, डायकोफॉल (१८.५ ईसी) २.५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. 👉आधीच्या हंगामातील बांधावरील तुरीचा खोडवा उपटून नष्ट करावा. ⭕पर्णगुच्छ या विषाणूजन्य रोगाचा प्रसार तुडतुड्यांमार्फत होतो. पर्णगुच्छयुक्त झाडे शेतामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आढळतात. झाडाच्या शेंड्याची वाढ थांबल्यामुळे आजूबाजूच्या फांद्या वाढतात. त्यामुळे झाडास पर्णगुच्छाचा आकार येतो. पीक फुलोऱ्यात असताना प्रादुर्भाव झाल्यास, फुलांची संख्या कमी होऊन ती छोट्या आकाराची, वाळलेली व पोपटी रंगाची दिसून येतात. शेंगा आकाराने लहान होऊन वेड्यावाकड्या स्वरूपात येतात. अशा शेंगांतील दाणे सुरकुतलेले दिसतात. 🛡️उपाययोजना 👉रोगग्रस्त झाडे नष्ट करावीत. 👉रोगवाहक किडीच्या नियंत्रणासाठी, डायमिथोएट (३० ईसी) १ मि.लि. किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.३ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
#🌾शेती माहिती #🌱मी शेतकरी #🌾शेती आणि व्यवसाय⚙ हे कीटकनाशक कोणत्या किडींचे नियंत्रण करते?* 👇 क्लोरोपायरीफॉस 20% EC हे स्पर्शजन्य कीटकनाशक आहे. हे सर्व प्रकारच्या पिकांमध्ये वापरले जाते. क्लोरोपायरीफॉस 50% EC चा वापर प्रामुख्याने पिकांवरील किडींना किंवा जमिनीतील वाळवी कीटकांना मारण्यासाठी केला जातो. फवारणी द्वारे याचा वापर पिकांमध्ये करता येतो. औषधाच्या संपर्कामध्ये कीटक येताच मारून टाकते. हे मानवांसाठी देखील हानिकारक आहे, म्हणून ते सावधगिरीने वापरले पाहिजे. क्लोरोपायरीफॉस 50% चा वापर घर किंवा घरातील वाळवी किंवा इतर कीटक मारण्यासाठी किंवा नियंत्रण करण्यासाठी केला जाऊ शकतो. तसेच क्लोरोपायरीफॉस 50% धान्य साठवणुकीसाठी वापरता येते. *क्लोरोपायरीफॉस 20% EC* हे सहसा पानांच्या खालच्या बाजूने लपलेल्या कीटकांना नियंत्रित करण्यासाठी सर्वात उपयुक्त आहे. ब्रॉड स्पेक्ट्रम असल्याने ते पानांवरील सर्व कीटकांवर नियंत्रण ठेवते. हे कीटकांच्या संपर्कात येताच त्यांना मारून टाकते. यामध्ये कीटकांना जलद मारण्या सोबत जास्त वेळ त्याचा प्रभाव राहण्याची क्षमता आहे. लेपिडोप्टेरन कीटकांच्या नियंत्रणासाठी हे प्रभावी औषध आहे. क्लोरोपायरीफॉस 20% EC कीटकनाशकाचा वापर जवळपास सर्व पिकांमध्ये करता येतो. परंतु पिकाच्या स्थितीनुसार हे कीटकनाशक वापरले जाऊ शकते. हे एक संपर्क कीटकनाशक आहे जे कीटकांच्या संपर्कात येताच त्याचा नाश करते. त्यामुळे क्लोरोपायरीफॉसचा वापर कीटकनाशकांपर्यंत थेट न पोहोचणाऱ्या कीटकांना मारण्यासाठी केला जातो. *वापर :-* *भात पिकामध्ये क्लोरोपायरीफॉस 20% EC चा वापर - खोड कीडीच्या नियंत्रणासाठी. - सर्व कीटकांपासून नियंत्रण करण्यासाठी - पाने गुंडाळलेल्या किडीच्या नियंत्रणासाठी. *गहू पिकामध्ये क्लोरोपायरिफॉस 50% ec चा वापर 1. गव्हाच्या मुळामध्ये वाळवी मारण्यासाठी. 2. खोडावर असलेल्या अळीला मारण्यासाठी. 3. मातीत पसरणारे कीटक मारणे. *सोयाबीन पिकामध्ये क्लोरपायरीफॉस 20% EC चा वापर - खोड किडीच्या नियंत्रणासाठी. - पाने गुंडाळलेल्या किडीच्या नियंत्रणासाठी. *मूग पिकामध्ये क्लोरपायरीफॉस 20% EC चा वापर – मूग पिकातील डास नियंत्रणासाठी वापर केला जातो.क्लोरोपायरीफॉसचा वापर मूग पिकामध्ये आढळणाऱ्या अनेक प्रकारच्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी केला जातो, जसे की पाने खरी अळी, उंटअळी, फळे पोखरणारी अळी.हे संपर्क कीटकनाशक असल्याने, त्याचा प्रभाव 2 किंवा 3 दिवस टिकतो. *चहा पिकामध्ये क्लोरपायरीफॉस 20% EC चा वापर लाल कोळी कीटक,गुलाबी किडे,चहामधील अळी इ. किडींच्या नियंत्रणासाठी करु शकतो. *कापूस पिकामध्ये क्लोरपायरीफॉस 20% EC चा वापर केला जातो -बोंडअळी,फुलकिडे,पांढरी माशी इ. *भाज्यांमध्ये नागअळी,फुलकिडे,पाने कुरतड्णारी अळी,लष्करी अळी ,कोबी उंटअळी,बीटल, *हिरव्या भाज्यावरील लहान किडे ,कोळी, खोडकीड, सुत्रकृमी,गोगलगाय यांच्या नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस चा वापर केला जाऊ शकतो.
#🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌱मी शेतकरी #🌾शेती माहिती योग्य वापर आवश्यक🎋_* *_✒️संकलन : प्रविण सरवदे, कराड_* _*🎯संदर्भ :* ॲग्रोवन पेपर~ *_🍇🍅🐄🦜🐟🌾🥦🍉🐛🌶🦗🌹_* *_━━━━━✥⊱•⊰❉༺☬༒☬༻❉⊱•⊰✥━━ _संतुलित प्रमाणात नत्र, स्फुरद, पालाश वापर करणे गरजेचे आहे. दीर्घ मुदतीच्या पिकांना युरिया खताची मात्रा विभागून द्यावी. नत्रयुक्त खतांचा सेंद्रिय खतांबरोबर वापर करावा. नत्रयुक्त रासायनिक खतामध्ये युरियाचा वापर सर्वाधिक जास्त केला जातो. अमोनिअम व कॅल्शिअम नायट्रेटचा वापर फक्त २ टक्के शेतकरी करतात. युरिया खतामुळे पिकांना नत्राची मात्रा तत्काळ लागू पडते. पिकाची वाढ जोमाने होते, पिकांमध्ये हिरवा गडद रंग निर्माण होतो. इतर नत्रयुक्त खतांच्या तुलनेत युरियाची किंमत कमी असते. ठिबकच्या माध्यमातून देता येते. काही प्रमाणात फवारणीद्वारे देता येतो. पिकांना विभागून देण्यास योग्य असल्यामुळे शेतकरी युरिया खत वापरास अधिक पसंती देतात. सर्वसाधारणपणे नत्र, स्फुरद, पालाशयुक्त खतांच्या गुणोत्तर हे ४:२:१ चांगले समजण्यात येते. संतुलित प्रमाणात नत्र, स्फुरद, पालाश वापर करणे गरजेचे आहे. तृणधान्य पिकांना नत्राची गरज असते. तृणधान्यासाठी २:१:१ नत्र, स्फुरद, पालाश गुणोत्तर असावे. कडधान्यांसाठी १:२:१ नत्रः स्फुरद : पालाश गुणोत्तर असावे._ *_🪀युरिया खताचे गुणधर्म :_* _*१]* युरिया हे कृत्रिम नत्रयुक्त खत आहे. यामध्ये ४६ टक्के अमाइड नत्र असते._ _*२]* खत पाण्यात पूर्णपणे विरघळणारे असते. खत आम्लधर्मीय आहे._ _*३]* युरियामध्ये २०.६ टक्के ऑक्सिजन, २० टक्के कार्बन, ७ टक्के हायड्रोजन, १ ते १.५ टक्का बाययुरेट हे उपघटक असतात._ _*४]* दमट हवामानात आर्द्रता शोधून घेतल्यामुळे खताचे खडे होतात. अन्य खतांत मिसळताना पाणी सुटणार नाही याची खात्री घ्यावी._ _*५]* नत्राचे अमाइड रूपांतर युरीयेज विकारामुळे अमोनियात होऊन नंतर ते नाइट्रेट स्वरूपात होते._ *_🪀युरियाचा काटेकोर वापर आवश्यक :_* _*१]* केवळ नत्रयुक्त खतांचा वापर केला तर पिकांची फक्त शाकीय वाढ होते._ _*२]* रोग, किडीचा प्रादुर्भाव वाढतो. उत्पादनात घट येते._ _*३]* पिकांमध्ये लुसलुशीतपणा राहून खोड नाजूक राहते, पीक लोळते. पिकांचा कालावधी वाढतो._ _*४]* युरिया खताच्या अवाजवी वापरामुळे जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. जमिनीतील कर्ब, नत्र यांचे गुणोत्तर कमी होऊन सूक्ष्म जिवाणूंची संख्या कमी होते._ _*५]* पालाश, कॅल्शिअम, बोरॉन, तांबे या अन्नद्रव्यांची कमतरता भासते._ _*६]* जमिनीमध्ये अमोनिया वायू जास्त प्रमाणात तयार होऊन नायट्रोबॅक्टरसारख्या जिवाणूच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो._ _*७]* गांडुळांच्या संख्येवर परिणाम होतो. जमिनीच्या जडणघडणीवर परिणाम होतो._ _*८]* युरिया खताच्या अवाजवी वापरामुळे भूगर्भातील पाण्याच्या प्रतीवर परिणाम होतो पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण वाढते (१० पीपीएम), जलचर प्राण्यांची हानी होते. पाण्यातील शेवाळ आणि पानवनस्पतींची वाढ होते._ _*९]* युरिया खताच्या अवाजवी वापरामुळे हवेचे प्रदूषण होते, युरियातील अमाइड नत्राचे रूपांतर अमोनिया आणि नायट्रेटमध्ये होते. नायट्रस ऑक्साइड, नायट्रिक ऑक्साइड यासारखे नत्राचे वायू हवेचे प्रदूषण वाढवतात. हे वायू ३०० पटीने कार्बन डायऑक्साइडपेक्षा घातक आहे. पृथ्वीभोवती असणाऱ्या ओझोन वायूच्या स्तरास छिद्रे पडून, सूर्यापासून तयार झालेली अतिनील किरणे जमिनीच्या पृष्ठभागावर पोहोचतात. त्यामुळे वातावरणातील तापमान वाढण्यास मदत होते._ _*१०]* विना निमकोटेड युरिया वापरल्याने त्याचा पाण्याबरोबर संपर्क होताच तो लगेच विरघळतो. त्यातील नत्र पिकांना उपलब्ध होण्याची क्रिया तत्काळ सुरू होऊन काही प्रमाणात पाण्याबरोबर जमिनीत वाहून जातो, त्यामुळे जमिनीतील पाणी दूषित होते या संपूर्ण प्रक्रियेद्वारे नायट्रस ऑक्साइड हा हरितगृह वायू तयार होतो. त्यामुळे वातावरणातील हवा दूषित होते._ *_🪀युरियाचा अवाजवी वापर टाळण्यासाठी :_* _*१]* खते देण्यापूर्वी माती परीक्षण करावे. या अहवालानुसार खते द्यावीत._ _*२]* नत्रयुक्त खतांचा सेंद्रिय खतांबरोबर वापर करावा._ _*३]* हिरवळीच्या खतांचा वापर करावा._ _*४]* नत्रयुक्त खते पेरणीच्या वेळी फेकून न देता, दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे._ _*५]* कालावधी कमी असल्याने नत्र खताची मात्रा विभागून द्यावी._ _*६]* एक किलो नत्र देण्यासाठी २.१७ किलो युरिया द्यावा._ _*७]* युरियाचा वापर कमी करण्यासाठी तृणधान्य पिकांना ॲझोटोबॅक्टर / ॲसिटोबॅक्टर जिवाणू संवर्धक आणि द्विदल पिकांना रायझोबियम या जिवाणू संवर्धकाची २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे या प्रमाणे पेरणीपूर्वी प्रक्रिया करावी जिवाणू खताच्या वापरामुळे तृणधान्य, द्विदल पिके व भाजीपाला पिकांमध्ये १५ ते २० टक्के नत्राची बचत होते. उसामध्ये ५० टक्क्यांपर्यंत बचत होते._ _*८]* भातामध्ये युरिया डीएपी ब्रिकेटचा वापर करावा._ _*९]* पाणथळ जमिनीत प्रामुख्याने अमोनियाधारक नत्रयुक्त खतांचा वापर करावा._ _*१०]* कोरडवाहू शेतीमध्ये नत्रयुक्त खते पेरणीच्या वेळेस पेरून द्यावीत.*📌 संकलन : प्रविण सरवदे कराड*_ _*११]* ऊस, केळी, बीटी कापूस यांसारख्या दीर्घ मुदतीच्या पिकांना युरिया खताची मात्रा विभागून द्यावी._ _*१२]* नायट्रेटयुक्त खते वाहून जाऊ नयेत म्हणून नियंत्रित आणि हलकी ओलिताची पाळी द्यावी. चोपणयुक्त जमिनीत युरिया हे शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खताबरोबरच द्यावे. युरिया खताची मात्रा २५ टक्क्यांनी वाढवून द्यावी._ _*१३]* राज्यातील ५२ टक्के जमिनीत गंधकाचे प्रमाण कमी आहे. अशा जमिनीत युरियाला पर्यायी अमोनिअम सल्फेटचा वापर केल्यावर पिकांना नत्राबरोबर गंधक हे अतिरिक्त अन्नद्रव्य मिळून त्याचे चांगले परिणाम दिसतात._ _*१४]* युरिया फेकून किंवा पेरून देण्यापेक्षा पाण्यात मिसळून फवारणीद्वारे दिला तर अत्यंत कमी खतामध्ये चांगले परिणाम दिसतात._ _*१५]* युरियाला पर्याय म्हणून काही नत्रयुक्त विद्राव्य खते बाजारात उपलब्ध आहे, देशात उत्पादित होणारा आणि आयातीत युरिया सर्व उत्पादक व पुरवठादार यांना नीम कोटिंग करूनच पुरवठा व विक्री करणे बंधनकारक आहे._ *_डॉ.आदिनाथ ताकटे,☎️९४०४०३२३८९_* _(मृद शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)_ *_▣════════⊰T⊱•۩✧❂✧۩•⊰T⊱═══════▣_* ‼️💠‼️💠‼️💠‼️💠‼️💠‼️💠‼️
#🌾शेती माहिती #🌱मी शेतकरी #🌾शेती आणि व्यवसाय⚙ कमी फुलांच्या आणि फुलगळीच्या समस्यांवर मात कशी करावी*. ऑगस्ट ते आॅक्टो महिन्यात कमी फुलोरा वे फूलगळ होणे ही समस्या सामान्य आहे.कापूस हा संपूर्ण फुललेल्या अवस्थेत असतो. मात्र यावेळी पाऊस किंवा ढगाळ हवामान असते, अशा परिस्थितीमुळे सूर्यप्रकाश आणि सूर्याची तीव्रता फार कमी असते. तर कधी जास्त आसते या परिस्थितीमध्ये वनस्पती फुलोरा येण्यासाठी व टिकून ठेवण्यासाठी कारणीभूत ठरणारे औक्सीन नावाचे संप्रेरक तयार करू शकत नाहीत. या कारणामुळे हे हवामान सतत पाणी साठवलेल्या परिस्थितीसाठी कारणीभूत ठरते. पाणी साठलेल्या परिस्थितीमुळे पिके मातीतून पोषक द्रव्ये घेण्यास असमर्थ होतात. त्यामुळे शेतक-यांना सल्ला दिला जातो की ते आवश्यक पोषक निवडून परिस्थितीवर मात करण्यासाठी पुढील प्रक्रियांचे पालन करा. 1. लागवड क्षेत्रात पाणी निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था करावी. 2. अतिरिक्त युरियाचा वापर टाळा. 3. युरियाऐवजी अमोनियम सल्फ़ेटचा वापर: - यामुळे मातीपासून ओलावा शोषण्यास मदत होईल आणि हवा खेळती राहून मातीपासून अधिक पोषण वाढण्यास मदत मिळेल. 4. अल्फा नाफ्थाइल एसिटिक ऍसिड 4.5% एस एल 4.5 मिली / 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे. 5. फवारणी नंतर 6 दिवसांनी बोरॉन -20% 15 ग्रॅम / 15 लिटर पाणी याची फवारणी करावी. 6. मग्नेशियम सल्फेट कमीत कमी 15 किलो / एकर हे एम ओ पी 25 किलो / एकर व अमोनियम सल्फेट 25 कि.ग्रा. / एकर सोबत मातीतून द्यावे.(हे आवश्यकतेनुसार वाढू शकते). 7. कृपया फवारणीसाठी कोणत्याही वाढ प्रेरित करणार्‍या संप्रेरकाचा वापर करू नये. अत्यंत वाईट परिस्थितीत शेतकरी 00-52 -34 75 ग्रॅम/ पंप किंवा 13-40-13 75 ग्रॅम / पंप फवारणी करू शकतात *कपाशितिल पिवळे पना व फुल १)13:00:45 २)बोराँन 200 ते 250 ग्राम ३)झिंक 200 ते 250 ग्राम ४)मँग्नेशियम v200 ते 250 ग्राम ★हे सर्व 200 लिटर पाण्यात एकत्र करून हे द्रावन एक एकड क्षेत्रावर फवारावे 11 :0 :37 बोराॅन + झिंक दोन्ही एकञ आहे नविन ग्रेड आला 09 28 17 बोराॅन + सल्फर + मॅग्नेशियम असे विद्राव्य खत आता मिळत आहे त्याची फवारणी करावी कोरडवाहू कापूस पिकात पाते निर्मितीच्या वेळी दिवसीचे तापमान जास्त आणि राञी चे कमी असेल तर 1-2% पोटॅशिअम नायट्रेट किंवा 13:00:45 10 ग्रॅम / लीटर पाणी याची 15 दिवसांच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. नविन कापसासाठी ग्रेड 11 : 0 :37 zinc and Boronहे आहेत
#🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌱मी शेतकरी #🌾शेती माहिती पाण्याची गरज जमिनीचा प्रकार, झाडाचे वय, पीकवाढीची अवस्था व मुळांचा विस्तार यानुसार बदलते. भारी जमिनीत पाण्याचा ओलावा आडव्या दिशेने जास्त पसरतो, तर उभ्या दिशेने कमी पसरतो. याउलट हलत्या जमिनीत पाण्याचा ओलावा उभ्या दिशेने लवकर व जास्त पसरतो, तर आडव्या दिशेने कमी पसरतो. या सर्व बाबींवर ड्रीपर्सची संख्या, त्यांचा प्रवाह, ड्रीपर्समधील अंतर इत्यादी अवलंबून असते. ठिबक संचामध्ये एका लॅटरलद्वारे किती पाण्याचा प्रवाह वाहून न्यायचा आहे, त्यानुसार लॅटरलची लांबी ठरविली जाते. जास्त लांबीच्या लॅटरल ठेवल्यास पाण्याचे वाटप समान होत नाही, तसेच लॅटरलची लांबी वाढल्यामुळे संचाचा खर्चही वाढतो. याउलट कमी लांबीच्या लॅटरल ठेवल्यास उपमुख्य नळीची लांबी वाढते, त्यामुळे झाडांची भविष्यातील (पूर्ण वाढ झाल्यानंतर) पाण्याची गरज व पंपातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा प्रवाह विचारात घेऊन उपमुख्य नळीची मांडणी करावी.त्यानुसार मोठ्या बागेस विविध भागांत विभाजन करून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र व्हॉल्वची रचना करावी.यासाठी संचास लागणारा खर्च लक्षात घेऊन पाणी देण्यासाठी सोपा असलेला पर्याय निवडावा. आंतरमशागतीत कमीत कमी अडथळा होईल अशी मांडणी करावी. झाडाची दररोजची पाण्याची गरज माहिती असल्यास ड्रीपर्सची संख्या, त्यांचा दर ताशी प्रवाह इ. ठरविता येतो. साधारणतः पहिल्या वर्षी एका ड्रीपरने पाणी दिल्यास पाणी पुरेसे होईल. दुसऱ्या वर्षी दोन ड्रीपर्स, तर तिसऱ्या व चौथ्या वर्षी तीन ड्रीपर्सने पाणी द्यावे. झाडाचा विस्तार पाचव्या वर्षी वाढल्यास एकाच लॅ टरलवर चार ड्रीपर्स लावू नयेत. साधारणतः झाडाचे वय पाच वर्षे झाल्यास एका ओळीसाठी दोन लॅटरल लावून ड्रीपर्सची संख्या वाढवावी.
#🌾शेती माहिती #🌱मी शेतकरी #🌾शेती आणि व्यवसाय⚙ कमतरता की येलो मोझाक व्हायरस?(सोयाबीन)* काही दिवसांपूर्वी सोयाबीनवरील येलो मोझाक व्हायरस ह्या रोगावर एक लेख लिहण्याचा योग आला. त्या लेखाची मांडणी करतेवेळेस माझा मनात एक शंका होती शेतकरी येलो मोझाक व्हायरस आणि लोहाची कमतरता ह्या एकसारख्या दिसणाऱ्या रोगांची ओळख कशी करतील? ह्या हुबेहूब दिसणाऱ्या पण एकमेकांपासून खूप वेगळ्या रोगाची ओळख चुकली तर शेतकऱ्यांचा हातून खूप मोठी चूक होईल.आज शिवार भेटी दरम्यान एकाच प्लॉट मध्ये येलो मोझाक व्हायरस आणि लोहाची कमतरता ग्रस्त झाडांचे दर्शन झाले. ही गोष्ट तशी दुर्मिळच. खाली दिलेल्या फोटोमध्ये घेवडा पिकावरील येलो मोझाक व्हायरस व लोहाची कमतरतेमुळे पिवळी झालेल्या पाने दृष्टीस पडतात. सोयाबीन पिकामध्येही पाने अशीच पिवळी पडतात. झाडांमध्ये एखाद्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे की यलो मोझाक व्हायरस हे समजण्यासाठी आपल्याला थोडं नीट लक्ष देणे गरजेचे आहे. अन्नद्रव्यांचा कमतरतेमुळे पानांचा शिरेचा दोन्ही बाजूस एकसमान पिवळी छटा दिसते.तसेच येलो मोझाक व्हायरस ह्या रोगामध्ये झाडांचा पानावर अनिश्चित पिवळे ठिपके दिसतात जसे हिरव्या तलावावर पिवळ्या कमळांची उपस्थिती दिसते तसे. लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी एकरी १०किलो फेरस सल्फेटचा पाण्यामध्ये मिसळून वापर करावा. लोह ह्या अन्नद्रव्यांची पूर्तता करण्यासाठी एकरी १किलो फेरस सल्फेट किंवा चिलेटेड मायक्रोन्यूट्रिइंट्सचा वापरही फवारणी द्वारे होऊ शकतो. आता आपण वळूया येलो मोझाक व्हायरस ह्या रोगाकडे. यलो मोझाक व्हायरस ह्याची रोगग्रस्त झाडांचा पानाचा दोन्ही बाजूस पिवळे ठिपके दिसतात पण त्या ठिपक्यांचा पसारा शिरेचा दोन्ही बाजूला एकसमान नसतो. गर्द हिरव्या पानांवर पिवळी ठिगळ जोडल्यासारखे दिसतात.यलो मोझाक व्हायरस ग्रस्थ झाडांची वाढ खुंटते. जसे कोरोनाची लागण ऐका व्यक्तीला झाल्यास,त्याचा प्रसार पूर्ण वस्तीला होऊ शकतो तसे यलो मोझाक व्हायरसची लागण ऐका झाडाला झाल्यास त्याचा प्रसार पूर्ण क्षेत्रावर काही दिवसातच होतो. जसे आपण कोरोना ग्रस्त रुग्णाचे विलगिकरण करतो तसे ह्या व्हायरस ग्रस्त रोपांना ही विलगिकरण करण्याची आवश्यकता असते. पण झाडांना आपले स्थान सोडता येत नाही म्हणून आशा झाडांना उपटून टाकणे हा एकमेव सोपा पर्याय आहे.यलो मोझाक व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी ह्या व्हायरसचे वाहक म्हणजे पांढरी माशी किंवा तुडतुडे. ह्या दोन्ही किडींवर नियंत्रण मिळवणे खुप महत्त्वाचे आहे. त्यासाठी रासायनिक कीटकनाशके जसे इमिडाकलोपरिडचा वापर होऊ शकतो. जैविक निविष्ठांमध्ये दशपर्णी, आले लासुनाचा अर्क किंवा तंबाखू अर्क ह्या किडीवर प्रभावशाली आहे. सगळ्यात शेवटी ह्या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वात रामबाण उपाय म्हणजे पिवळे किंवा निळे चिकट सापळा. काही दिवसातच अख्या क्षेत्रावरील ९०% किडी ह्या सापळ्याना चिकटते. व्हायरस, ते सोयाबीन वरील यलो मोझाक व्हायरस असो किंवा मनुष्यांमध्ये होणारा कोरोना असो, व्हायरस ला मनुष्यांमार्फत मारणे जवळजवळ अशक्य आहे. त्यांना एक कठोर कवच असते ज्यामुळे आपली औषधे त्यांचा शरीरात प्रवेश करू शकत नाहीत. रोग प्रतिकारशक्ती वाढवणे व वेळेत उपाय योजना करणे हा एकच इलाज वरील रोगांवर होऊ शकतो. शेतकऱ्यांनी स्वतःची व आपल्या पिकाची काळजी घ्यावी. जय हिंद विवेक पाटील,सांगली©️ ०९३२५८९३३१९
#🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌱मी शेतकरी #🌾शेती माहिती अतिवापराचे परिणाम-* केवळ नत्रयुक्त खतांचा वापर केला तर पिकांची शाकीय वाढ होते. रोग, किडीचा प्रादुर्भाव वाढतो. उत्पादनात घट येते. पिकांमध्ये लुसलुशीतपणा राहून खोड नाजूक राहते, पीक लोळते.पिकांचा कालावधी वाढतो. युरिया खताच्या अवाजवी वापरामुळे जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होतो.जमिनीतील कर्ब:नत्र यांचे गुणोत्तर कमी होऊन सूक्ष्म जिवाणूंची संख्या कमी होते. पालाश, कॅल्शिअम, बोरॉन आणि तांबे या अन्नद्रव्यांची कमतरता भासते. जमिनीमध्ये अमोनिया वायू जास्त प्रमाणात तयार होऊन नायट्रोबॅक्टर सारख्या जिवाणूंच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.गाडूंळाच्या संख्येवर परिणाम होतो. जमिनीच्या जडणघडणीवर परिणाम होतो. त्याचा पीक वाढीवर परिणाम होतो युरिया खताच्या अवाजवी वापरामुळे भूगर्भातील पाण्याच्या प्रतीवर परिणाम होतो.पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण वाढते (१० पीपीएम), जलचर प्राण्यांची हानी होते.पाण्यातील शेवाळ व पाणवनस्पतींची वाढ होते. अवाजवी वापरामुळे हवेचे प्रदूषण होते. युरियातील अमाइड नत्राचे रूपांतर अमोनिया आणि नायट्रेटमध्ये होते. नायट्रस ऑक्साइड, नायट्रिक ऑक्साइड यासारखे नत्राचे वायू हवेचे प्रदूषण वाढवतात.
#🌾शेती माहिती #🌱मी शेतकरी #🌾शेती आणि व्यवसाय⚙ लाल्या विकृती आणि उपाययोजना-:* ( भाग - ३ ) - बाबु येवले. ( Bsc. Agri ) उपाय योजना-: १) पाणथळ जमिन कपाशीच्या लागवडीसाठी टाळाव्यात, २) संकरीत व बीटी वाणाची लागवड हलक्या जमिनी मध्ये करु नये. ३) कपाशीला फुले येताना बराच काळ उघडीप पडल्यास संरक्षण पाणी द्यावे. ४) खताचे व्यवस्थापन शिफारशी प्रमाणे करावे. ५) पाणी साचणाय्रा जमिनीत पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल याची काळजी घ्यावी. ६) पाते, फुले लागण्याच्या अवस्थेत ( ६० ते ७० दिवसांनी २ टक्के युरिया किंवा २ टक्के डीएपी फवारणी करावी, तसेच दुसरी फवारणी बोंडे भरणे अवस्थेत ( ९० ते ११० दिवसांनी ) करावी. ७) तसेच मॅग्नेशिअम सल्फेट, झिंक सल्फेट व पोटॅशिअम नायट्रेट यांची एकत्र फवारणी फुल धारणा होताना व बोंडे भरणे अवस्थेत करावी. ८) मॅग्नेशिअम सल्फेट २० ते ३० प्रति हेक्टरी जमिनीतुन द्यावे . ९) किड नियंत्रणासाठी सिंथेटीक पायरेथ्राईडचा वापर कमी करावा. १०) रस शोषक किडींच्या अर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वर आढळल्यास शिफारशीत किटकनाशकाचा वापर करुन नियंत्रण करावे. * लाल्या विकृती मुळे होणारे नुकसान- १) कपाशीची योग्य वाढ होत नाही. २) कपाशीची पाने लाल झाल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. ३) कपाशीची प्रत खराब होऊन, उत्पादना मध्ये घट येते. त्यामुळे लाल्या विकृती वर योग्य त्या उपाययोजना कराव्यात. - मार्गदर्शक प्रा. विजय येवले सर. ( Msc. Agri ) ( Department Of Horticulture ) मा. आर. आर. चांडक साहेब. ( कृषी अधिकारी अक्राणी जि. नंदुरबार ) 🙏🙏
#🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌱मी शेतकरी #🌾शेती माहिती लाल्या विकृती आणि उपाययोजना-:* ( भाग - २ ) - बाबु येवले. ( Bsc. Agri ) ५) जमिनीत पाणी साचुन राहिल्यास किंवा पाण्याचा जास्त काळ ताण पडल्यास झाडे जमिनीतील नत्र आणि मॅग्नेशिअम सारखी आवश्यक मुलद्रव्ये व्यवस्थितरित्या शोषन घेऊ शकत नाही. ६) कपाशी लागवड पाणथळ जमिनीत केल्यामुळे झाडास नत्र घेण्यास अडथळा निर्माण होतो,त्यामुळे पाने लाल होऊन झाडाची वाढ खुंटते. ७) बीटी कपाशीसाठी केलेल्या खताच्या शिफारशीप्रमाणे खते न दिल्यास पात्यांच्या पोषणासाठी झाडांच्या खालच्या पानातील अन्नद्रव्य उपयोगात येते, त्यामुळे पाने लाल पडतात. ८) कपाशीवर लाल्याच्या प्रादुर्भाव ह देशी वाणांपेक्षा संकरीत वाणांवर जास्त प्रमाणात आढळतो, कारण संकरीत वाण हा देशी वाणांपेक्षा जास्त अन्नद्रव्ये शोषन करत असतात. ज्यामध्ये पिकांना मुळाद्वांरे जमिनीतील अन्नपुरवठा कमी दिवसात जास्त लागतो. या दरम्यान ओलाव्याचे प्रमाण जर कमी झाले तर पाने लाल व पिवळसर होताना दिसतात. ९) अचानक उष्ण वारे वाहु लागल्यास तसेच दिवस व रात्रीच्या तापमानात जास्त फरक पडल्यास पाने लाल होतात. १०) बोंड धरणाच्या अवस्थेत पानांमध्ये नत्राची जास्त गरज असते, या काळात पानांमधील नत्राचे प्रमाण कमी झाल्यास पाने लाल होतात. 🙏🙏
#🌾शेती माहिती #🌱मी शेतकरी #🌾शेती आणि व्यवसाय⚙ लाल्या विकृती आणि उपाययोजना-:* ( भाग - १ ) - बाबु येवले. ( Bsc. Agri ) लाल्या हा रोग नसुन पिकांच्या वाढीसाठी आवश्यक व योग्य प्रमाणात अन्नद्रव्यांच्या अभावामुळे येणारी परिस्थिति होय. यामुळे कपाशीची पाने पिकतात. ६० ते ७० दिवसानंतर लालसर दिसायला लागतात. पिकांची पाने टोकाकडुन व कडेने पिवळसर पडण्यास सुरुवात होते. त्यानंतर पानांमधील हरितद्रव्य नष्ट होऊन अँन्थोसायनीन नावाचे लाल रंगाचे द्रव्य जमा होते. त्यामुळे पाने लाल रंगाची दिसु लागतात. यालाच आपण लाल्या म्हणतात. * लाल्या वाढण्याची कारणे-: १) पुर्वी कपाशी घेतलेल्या शेतात पुन्हा- पुन्हा कपाशी घेणे. २) जास्त अन्नद्रव्यांची गरज असणाय्रा पिकांनंतर ( ऊस, केळी नंतर कपाशी ) त्या शेतात पीक घेतल्यास योग्य प्रमाणात अन्नद्रव्ये मिळत नाही. ३) हलक्या जमिनीत कपाशीची लागवड करणे. ४) रस शोषणाय्रा किडित मावा, तुडतुडे, फुलकिडे हि किड विशेषत: ३० ते ४५ दिवसात उपद्रव करण्यास सुरुवात होते व ती पिकाच्या १२० ते १४० दिवसांपर्यंत कार्यरत असते. ही कीड पानांतील रस शोषण घेतात. ज्यामुळे पिकांतील अन्नद्रव्यांची उपलब्धतेची प्रक्रिया मंदावते तसेच पाने निस्तेज होऊन लाल होण्यास सुरुवात होते. 🙏🙏