#🙏श्री गुरुदेव दत्त💐 महाराजांकडे काय मागावे यावर अनेक मतमतांतरे आहेत . दत्त अर्थात देणारा तेव्हा तो देत असताना घ्यावे अथवा नाही . काहींचे मत आहे ,मागण्याची इच्छा न व्हावी हे मागावे ,कोणी म्हणते ,पुन्हा जन्म नको अर्थात येरझार चुकवावी हे मागावे ,अन्य काही म्हणतात ,तुमच्या क्षेत्री कायम निवास व्हावा हे दान द्यावे .
सामान्य बुद्धीने आपण अनेक मते देत असलो तरी असामान्य अशा भगवद्भक्तांकडून यावर काय भाष्य झाले आहे पाहू . बापूशास्त्री कोडणीकरांनी दीक्षित स्वामी महाराजांचे गीर्वाण भाषेत श्लोकबद्ध चरित्र लिहिले आहे. यात ते म्हणतात ,
अयमेव परो लाभो नृणां देहभृतां खलु ll
शक्यते तत्कथं नाथ ! दुरापं प्रतिभाति मे ll
देहधारी मानवांचा हाच परम लाभ आहे . तो म्हणजे दत्त दर्शन . देवा ! आपले दर्शन स्वर्गीय देवांनाही दुर्मिळ आहे . ते देखील तुमच्या दर्शनाची इच्छा करतात .
आता प्रश्न असा आहे कि केवळ भक्तांनाच दर्शन झाले असता आनंद होतो का ? तर नाही ,भक्तांच्या भेटीचा आनंद दत्त महाराजांना देखील होतो . बापूशास्त्री पुढे म्हणतात ,भक्तप्रेमाच्या उल्हासाने दत्त महाराज साकार आणि सगुण झाले . आपल्या भक्तांना भेटल्यावर दत्त महाराजांनी आलिंगन दिले पण दोन हातानी आलिंगन देऊन जो आनंद झाला तो अपुरा पडला आणि म्हणूनच महाराज चतुर्भुज झाले . केव्हढे हे भक्तप्रेम !! इथे दत्त महाराजांच्या चतुर्बाहू ध्यानाचे वर्णन आहे .
दत्त माहात्म्यात विष्णुदत्ताच्या गाथेत थोरले महाराज म्हणतात ,विष्णुदत्ताला ब्रह्मराक्षस प्रसन्न झाला ,काय हवे ते माग म्हणाला . काय मागावे ?? संतती मागावी तर मी निर्धन आहे ,धन मागावे तर राहायला घर नाही इथून सुरुवात ,हे सर्व नश्वर म्हणावे तर परलोक देखील नश्वरच कि ! यावेळी विष्णुदत्ताच्या पत्नीने त्याला अप्रतिम मार्गदर्शन केले आहे .
मागू नका नश्वरा l श्रीदत्ताची भेटी करा l
ऐशा वरा मागावे ll
-पुढे ती म्हणते
पडता दत्ताची गाठ l सर्व देव देतील भेट l
संपदा न सोडतील पाठ l मग आटाआट कासया ll
पुढे दत्त महाराजांनी विष्णुदत्ताला दर्शन दिले आहे . केवळ दर्शन नाही तर विष्णुदत्ता घरी महाराज माध्यान्ह कालीन भोजनाला आले होते . ( श्राद्धाकरिता )
दत्त महाराजांची भेट हा फार वेगळा अनुभव आहे ,लक्ष वरुषासी l करितोसी उदासी l लक्षावधी वर्षे तप करून देखील ज्यांची भेट अथवा दर्शन दुर्लभ आहे त्या दत्त महाराजांनी दर्शन दिले कि झाले . आयुष्याची इतिकर्तव्यता यातच आहे . बाकी काय करायचे आहे . श्रीगुरुदेव दत्त !!!--- अभय आचार्य
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll
दत्तरुप ll
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 रूपात दत्त महाराजांनी अनेक आयुधे धारण केलेली आहेत ,आता प्रश्न असा कि संकल्पमात्रे सर्व काही करू शकणाऱ्या दत्त महाराजांना आयुधांची काय गरज आहे ?
अगदी संन्यस्त स्वरूपातील दत्त महाराजांच्या अवतारात देखील पहा . हातातील दंड हे केवळ संन्यस्त स्थितीचे प्रतीक न धरता चुकणाऱ्या भक्तांना आणि सर्व अभक्तांना तो एक अंकुश आहे . थोरल्या महाराजांनी याचे करुणात्रिपदीत उदाहरण दिले आहे . अपराधास्तव गुरुनाथा l जरी दंडा धरिसी यथार्था ll हा दंड म्हणजे न्यायव्यवस्थेचे प्रतीक देखील म्हणता येईल .
दत्त महाराजांच्या एका आरतीत --- शरणागता जना पाठीशी घालुनी l कळिकाळासी मारी सोटा रे l (अरे प्राण्या सावळा सद्गुरू तारू मोठा रे ll ) दत्त महाराजांच्या हातात सोटा अर्थात दंड आहे . त्यांच्या समोर कली आणि काळ हे दोघेही निष्प्रभ होतात हा मतितार्थ .
पण मग षड्भुज ध्यानात आयुधे का या प्रश्नावर दोन उत्तरे आहेत . पहिले म्हणजे त्रिमूर्ती स्वरूपातील प्रत्येक देवतेच्या हातातील दोन प्रतीके अथवा स्वभाव दर्शनाच्या गोष्टी या षडभुज रूपात आलेल्या आहेत . ब्रह्म स्वरूपाची दोन ,शिव स्वरूपाची दोन आणि विष्णू स्वरूपाची दोन अशी ती प्रतीके आहेत . तर दुसरे म्हणजे हि आयुधे लोक शिक्षणाकरिता धारण केलेली आहेत पण सर्वसामान्यतः आयुधांचा उपयोग कधी केला आहे का ? वेळ येताच दत्त महाराज त्याचा अवश्य उपयोग करतात .
या आयुधांचा विचार करता दत्त महाराजांनी स्वसंरक्षण हेतू कोणत्याही अवतारात काहीही वापरलेले नाही हि गोष्ट अवश्य लक्षात येते . मायाध्यक्ष असणाऱ्या दत्त महाराजांना प्रतिस्पर्धी किंवा आव्हान देणारा कोण असणार आहे ? कोणीही नाही ,तेव्हा कवच ,ढाल अशा कोणत्याही उपायाची गरज नाही . अनेक उदाहरणे घेता येतील ,गुरुचरित्राच्या दहाव्या अध्यायात दोन्ही हातात दोन आयुधे घेत श्रीपाद श्रीवल्लभ दत्त महाराज प्रकट झाले . एका हातात खडग तर दुसऱ्या हातात त्रिशूल . अत्यंत आवेशपूर्ण आणि क्रुद्ध मुद्रा . कुठून आले ,कोण आहेत याची कल्पना करेपर्यंत महाराजांनी दोघा चोरांना ठार केले होते . तेव्हा तिसऱ्याने पाया पडत जीवदान मागितले . भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी हि बिरुदे इथे सार्थ केलेली दिसून येतात .
दत्त महाराजांनी अनेकदा हि आयुधे संरक्षक कवच म्हणून देखील वापरलेली दिसून येतात . दत्त माहात्म्यात याचे उदाहरण म्हणजे नहुषाच्या रक्षणार्थ दत्त महाराजांनी सुदर्शन चक्राची योजना केली होती . नहूष यावेळी काही दिवसांचा होता . याचे हनन करण्यासाठी बल्लवाने या लहानग्या जीवावर दोन वेळा प्रहार केला . पण सुदर्शन चक्राने मध्ये येत संरक्षकाची भूमिका बजावली आणि ते प्रहार वृथा गेले .
दत्त कवचापासून ते माला कमंडलू या ध्यान श्लोकापर्यंत दत्त महाराजांच्या सहा हातात सहा गोष्टी कोणत्या आहेत ते वर्णन केले आहे ,यात माला कमंडलू खालील हातात ,मधल्या दोन हातात डमरू आणि त्रिशूल तर वरील दोन हातात शंख आणि चक्र या गोष्टी आहेत . मात्र हे ध्यान रूप सर्वत्र दिसत नाही . काषाय वस्त्रं श्लोकात दंड कमंडलू हि संन्यस्त चिन्हे तर वरील चार हातात शंख चक्र गदा आणि पद्म हि भगवान विष्णूंची आयुध आणि चिन्हे आहेत .
आचार ,व्यवहार आणि प्रायश्चित्त यातील प्रायश्चित्त या भागात कर्मविपाक हा भाग येतो . या कर्मविपाकातील फलस्वरूप शासन दत्त महाराज या आयुधांकरवी करतात असेही म्हणता येईल .अनेक संदर्भ आणि त्यावरील उहापोह पाहता विस्तारभयास्तव इथेच थांबतो . श्रीगुरुदेव दत्त !!!--- अभय आचार्य
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 प्रभु पंचदेव पहाड येथे सत्संग करीत असत. श्रीपाद कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत जात. त्यांची पाऊले ज्या ठिकाणी पडत तेथे कमल विकसित होत असे. रात्री प्रभु एकटेच कुरवपुर येथे राहत. श्रीपाद स्वतःपेक्षा मोठ्या महिलांना "अम्मा", "सुमती"अथवा "अम्मा तल्ली" म्हणत. स्वतःपेक्षा लहान महिलांना "अम्मा वासवी", "अम्मा राधा" म्हणत. त्यांच्या पेक्षा वयाने मोठ्या पुरूषास ते "अय्या" किंवा "नायना" म्हणत. लहान मुलांना ते " अरे अब्बी" किंवा "बंगारु" म्हणत.
वृध्द स्रियांना " अम्ममा" आणि वृध्द पुरूषांना " ताता" म्हणत. दर्शनाला आलेल्या भक्तांचे ते क्षेमकुशल विचारित आणि त्यांच्या अडचणी प्रेमाने सोडवत. गुरूवारी गुरु तत्वाबद्दल विवेचन असे या दिवशी विशेष स्वयपाक करून पोटभर जेवण असे. स्वतः श्रीपाद आपल्या हाताने पंगतीत वाढत. काही भाग्यवंताना ते स्वतः घास भरवित असे. श्रीपाद प्रभुंचा सत्संग ज्यांना लाभला ते खरोखर भाग्यवान !
श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो.🙏💐 🌸🙏😊
संदर्भ श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र
अध्याय ४८
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 म्हणजे एका माणसाने दुसऱ्या माणसाच्या उपयोगी येणं , पण आता हे ही प्राण्यांकडून शिकावे का ???
🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
🌷 !! माणूस आणि माणुसकी !!
माणसाने मनाने जगावे, चांगल्या मनाने.
ते प्रत्येकाचे वेगळे असते मन. पण, त्यामध्ये असावा माणुसकीच्या प्रेमाचा प्रेमळ व्रण,
छानशा काळजात प्रेम ठेवावे, सदैव घरटे करून माणसाच्या हृदयात स्थान मिळवावे.
माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर, माणूसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणुस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात.
दैनंदिन जीवन जगत असतांना या सर्वसामान्य माणसाच्या जीवनात असे काही शब्द आहेत की जे बोलताना त्याची घनता, त्याचा खोल गेलेला अर्थ पटकन लक्षात येत नाही पण ते शब्द असे काही कटू अनूभव शिकवून जातात की काहींचा अर्थ जेवढा लावु तेवढा लागतो, जेवढा ताणू तेवढा ताणतो, जेवढा मनावर घेऊ तेवढा घेता येतो आणि एकदा का त्या शब्दाने किंवा त्या शब्दाच्या अर्थाने आपल्या मनाचा ताबा घेतला ना की मग आपण त्या शब्दाप्रमाणे किंवा त्या शब्दाच्या अर्थाप्रमाणे समोरच्या व्यक्तीसोबत वावरतो. प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. कधी ती लगेच पहायला मिळते तर कधी कधी ती शोधावी लागते. कधी समोरच्या व्यक्तीच्या वागण्यातून तर कधी बोलण्यातून त्याची ओळख होत असते.
प्रत्येक शब्द कितीही छोटा वा मोठा असो त्या शब्दाच्या गर्भितार्थावरून त्या शब्दाची जाडी-रूंदी आणि त्याची विस्तृतता कळते. त्यापैकी असाच एक जो आपल्या सर्वांना परिचित असलेला पण त्याची फारशी खोल ओळख नसणारा शब्द म्हणजे ‘माणुसकी’. ओळख नसणारा शब्द यासाठी की आजचा माणूस माणसाची ओळख विसरत चालला आहे,‘माणुसकी’ हा केवळ शब्दच नव्हे तर पर्यायाने आपल्या रोजच्या जगण्यातून खुद्द माणूसकीच गहाळ होत चालली आहे असे चित्र आहे. ऎकायला आणि बोलायला अगदीच सहज आणि सोपा वाटणारा हा शब्द, पण त्याचा नेमका अर्थ काय..
माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर, माणूसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणुस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात. खरच पाहायला मिळते का या सध्याच्या धावपळीच्या जगात ही माणुसकी. पण या माणुसकीला जर ओळखायचे असेल तर असे अनेक प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात आले असतील आणि जरी अद्याप आले नसतील तरी कधी ना कधी ते नक्कीच येतील. जीवनात आलेल्या त्या प्रसंगाना अगदी एकांतात बसून बारकाईने त्यावर नजर टाका म्हणजे माणुसकीतला माणूस किंवा माणसातली माणुसकी शिल्लक राहिली आहे का हे कळेल. या जगात कोणीही तुमचा मित्र किंवा शत्रु म्हणून जन्माला येत नाही. आपली वागणूक, आपला दृष्टीकोण, आपली नाती आणि त्यापेक्षा त्या नात्यांमधील प्रेम यावर ठरते कोण आपला मित्र कोण आपला शत्रू आहे ते. मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नाही तर त्याच्या विचार आणि कर्तुत्वावर अवलंबुन असते. तुमच्या विचारातूनच तुमचं व्यक्तिमत्व झळकत असतं, त्याकडे तुमचे लक्ष नसले तरी इतरांचे लक्ष असते,
तुमचे विचार समजले की तुम्ही समजलात, म्हणून सुंदर विचार करा आणि सुंदर व्यक्तिमत्व घडवा.
#🙏श्री गुरुदेव दत्त💐
निष्काम कर्माचे फार फार महत्त्व आहे. 'भगवंतासाठी भगवंत हवा' अशी आपली वृत्ती असावी. किंबहुना, नाम घेत असताना, प्रत्यक्ष भगवंत समोर ठाकला, आणि 'तुला काय पाहिजे ?' असे त्याने विचारले, तर 'तुझे नामच मला दे' हे त्याच्याजवळ मागणे, याचे नाव निष्कामता होय. कारण, रूपाने व्यक्त झालेला भगवंत केव्हातरी नाहीसा होईल, पण त्याचे नाम मात्र अखंड टिकेल; आणि त्याचे नाम घेतले की त्याला आपल्याकडे येणे जरूर आहे. म्हणून, देहाला कष्ट देण्याच्या भानगडीत न पडता भगवंतासाठीच नाम घेत असावे. त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही.
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 खंडोबाचे महाराष्ट्र आणि कर्नाटक मिळून एकूण १२ मुख्य स्थाने (पिठे) मानली जातात. ही स्थाने खालीलप्रमाणे आहेत:
१. जेजुरी (पुणे): हे खंडोबाचे मुख्य आणि सर्वात महत्त्वाचे पीठ आहे. जेजुरी गड अधिकृत माहिती
२. पाली (सातारा): येथे खंडोबा आणि म्हाळसा देवीचे सुंदर मंदिर आहे. याला 'पालीचे खंडोबा' म्हणतात.
३. नळदुर्ग (धाराशिव): येथील खंडोबा मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते.
४. शेंदूर (कोल्हापूर): कोल्हापूर जिल्ह्यातील हे एक महत्त्वाचे स्थान आहे.
५. पिंपळगाव (नाशिक): नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात हे स्थान आहे.
६. देवरगुडा (कर्नाटक): हे कर्नाटक राज्यातील मैलार लिंगाचे प्रमुख स्थान आहे.
७. मैलार (बिदर, कर्नाटक): कर्नाटक सीमेवरील हे अत्यंत जागृत देवस्थान आहे.
८. अंबरगुड्ड (कर्नाटक): हे देखील खंडोबाच्या १२ स्थानांपैकी एक आहे.
९. मन्नमैलार (बल्लारी, कर्नाटक): दक्षिण भारतातील हे महत्त्वाचे स्थान आहे.
१०. आदि मैलार (कर्नाटक): हे मूळ स्थान मानले जाते.
११. सातारे (छत्रपती संभाजीनगर): औरंगाबाद (संभाजीनगर) जवळील हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे.
१२. निमगाव (पुणे): खेड तालुक्यातील हे स्थान जेजुरीच्या खंडोबाशी संबंधित मानले जाते.
#shreedattarajgurumauli #spritiuality #blessings #dattaguru #spiritualgrowth
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 सद्गुरुंच्या सान्निध्यात एक शिष्य नित्य सेवा करीत होता. अन्न, वस्त्र, निवारा याची त्याला काही उणीव नव्हती.. तरी अंतःकरणात सतत खंत दाटून येई. कधी मन अस्वस्थ होई, कधी विचारांचे काहूर माजे.
एके दिवशी शिष्याने धैर्य करून सद्गुरूंना विचारले,
“गुरुदेव, लोक म्हणतात जगायला फारस काही लागत नाही. तरी मन का भरत नाही? समाधान का मिळत नाही?”
सद्गुरू मंदस्मित करीत उठले. शिष्याला सोबत घेऊन ते आश्रमाबाहेर पडले. मार्गी एक दरिद्री गृहस्थ दिसला. अंगावर जीर्ण वस्त्र, हातात भिक्षापात्र; पण मुखावर विलक्षण शांतता होती. सद्गुरूंनी त्याला प्रेमाने विचारले,
“वत्सा, आज उपजीविका कशी झाली?”
तो नम्रतेने म्हणाला,
“गुरुदेव, प्रभूने आज पोटापुरतं दिलं. त्यातच माझं समाधान आहे.”
थोड्या अंतरावर एक धनाढ्य पुरुष भेटला. संपत्ती विपुल, सेवक अनेक; परंतु मुख चिंतेने ग्रासलेले. सद्गुरूंनी त्यास विचारले,
“सुख आहे ना?”
तो म्हणाला,
“आहे सर्व काही, पण मन शांत नाही. अजून हवंय, नाहीतर चैन पडत नाही.”
तेव्हा सद्गुरूंनी शिष्याकडे पाहून गंभीर वाणी केली,
“ऐक वत्सा. देव प्रत्येकाला देतोच जगण्यापुरत, पोटापुरत. परंतु जो त्यात समाधान मानतो, तो धन्य होतो; आणि जो ‘आणखी’ म्हणतो, तो दुःखी होतो.”
सद्गुरू पुढे म्हणाले,
“जगायला फारसं काही लागत नाही. पण आपण तसं वागत नाही. देवाने दिलेल्या मर्यादेत आपण थांबत नाही, म्हणूनच मन भुकेल राहत.”
हे वचन शिष्याच्या हृदयात आरपार शिरले. त्याच्या नेत्रांतून अश्रू वाहू लागले. त्याला उमगले
देव आपल्याला भरभरून देतो
आपली अपेक्षाच असमाधानी करते..
त्या दिवसापासून शिष्याने जे मिळेल ते प्रसाद समजून स्वीकारले. समाधानाने सेवा करू लागला. आणि गुरुकृपेने त्याचे जगणे साधे, शांत व धन्य झाले.
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
दत्तरुप ll
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 दृढभाव कसा येईल ?
नामात प्रेम नामानेच येणार. हे प्रेम यायला विषयावरचे प्रेम कमी करायला पाहिजे. दृढनिष्ठा पाहिजे. नामच तारील, नामच सर्व काही करील, असा दृढभाव पाहिजे. तो ठेवून व्यवहारातले प्रयत्न चालू ठेवावेत, पण यश देणारा परमात्मा असा भाव पाहिजे. वैद्याकडचे औषध आपण गड्याकडून आणवतो, पण गुण गड्याने दिला असे नाही म्हणत. याच्याही पुढे जाऊन, वैद्याच्या औषधाने आलेला गुण परमात्म्यानेच दिला, असे का मानीत नाही ?
परमात्म्याला शरण जाणे म्हणजे परमात्मा आपला आहे, त्याच्यावाचून आपल्याला दुसरे कुणी नाही, आपण काही करीत नसून सर्व तोच आपल्या हिताकरिता करतो आहे, असा दृढ विश्वास ठेवणे. आपण आपल्या बायकोमुलांवर प्रेम करतो, कारण त्यांना ‘आपले’ म्हटले म्हणून. म्हणजे प्रेम हे आपलेपणात आहे, मग परमात्म्याला आपले म्हटले म्हणजे सहजच त्याच्यावर प्रेम बसणार नाही का ?
दुसरे असे की, भगवंत हा आपला जिवलग सखा आहे, तो सर्व काही आपल्या हिताकरिताच करतो आहे, असा विश्वास धरल्यावर काळजीला तरी जागा कुठे उरली ? आपली देहबुद्धी नाहीशी होण्यातच आपले हित आहे. परमात्म्याच्या ठिकाणी आपलेपणा उत्पन्न व्हायला त्याच्या नामाशी पुष्कळ सहवास पाहिजे. सिद्धीच्या, चमत्काराच्या, पाठीस लागू नये; ती आपल्या मार्गात विघ्ने आहेत. उलट, त्यांनी आपल्या पाठीस लागले पाहिजे. एखाद्याला साप चावत नाही, पण त्यात विशेष ते काय आहे?
सापात काय किंवा कशातही काय, भगवद्भाव, आपलेपणा पाहता यावा, म्हणजे कोणीही आपले शत्रू होणार नाहीत. आई आपल्याजवळ आहे या भावनेने मूल जसे निर्भय असते, तसे भगवंत आपल्यापाशी आहे या भावनेने आपण निर्धास्त व्हावे.
आपल्याला ज्या गावाला जायचे आहे, त्या गावाची गाडी आली की नाही एवढे पाहावे; गाडीत कोण भेटतो याला फारसे महत्त्व नाही. समजा, गाडीत आपल्याला कोणीच भेटले नाही, तर आपण स्वस्थ झोप घेत आपल्या गावी जातो, त्याप्रमाणे आपण आपले साधन करावे. सृष्टीची तत्त्वे किती आहेत वगैरेच्या भानगडीत पडू नये, त्याचा निकाल कधीच लागायचा नाही.
शंका गेल्याशिवाय नाम स्थिरच होत नाही हे लक्षात ठेवावे. देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत नामाचे महत्त्व कळणार नाही. आपला उद्धार व्हावा असे वाटत असेल तर नामस्मरण सोडू नये.
परमात्मा जसा निरुपाधिक आहे तसे नामही निरुपाधिक आहे.
दत्तरूप ll
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 जानेवारी❗
‼श्री गुरुदेव दत्त ‼
🚩🚩जया एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🚩🚩
🌹🌹प्रवचनाचा विषय🌹🌹
🟧🟪🟧नामात दृढभाव कसा येईल❓🟧🟪🟧
⭕नामात प्रेम नामानेच येणार. हे प्रेम यायला विषयावरचे प्रेम कमी करायला पाहिजे. दृढनिष्ठा पाहिजे. नामच तारील, नामच सर्व काही करील, असा दृढभाव पाहिजे. तो ठेवून व्यवहारातले प्रयत्न चालू ठेवावेत, पण यश देणारा परमात्मा असा भाव पाहिजे.⭕
❄वैद्याकडचे औषध आपण गड्याकडून आणवतो, पण गुण गड्याने दिला असे नाही म्हणत. याच्याही पुढे जाऊन, वैद्याच्या औषधाने आलेला गुण परमात्म्यानेच दिला, असे का मानत नाही❓❄
🏵परमात्म्याला शरण जाणे म्हणजे परमात्मा आपला आहे, त्याच्यावाचून आपल्याला दुसरे कुणी नाही, आपण काही करीत नसून सर्व तोच आपल्या हिताकरिता करतो आहे, असा दृढ विश्वास ठेवणे.🏵
💮आपण आपल्या बायकोमुलांवर प्रेम करतो, कारण त्यांना 'आपले' म्हटले म्हणून. म्हणजे प्रेम हे आपलेपणात आहे, मग परमात्म्याला आपले म्हटले म्हणजे सहजच त्याच्यावर प्रेम बसणार नाही का❓💮
♦️दुसरे असे की, भगवंत हा आपला जिवलग सखा आहे, तो सर्व काही आपल्या हिताकरिताच करतो आहे, असा विश्वास धरल्यावर काळजीला तरी जागा कुठे उरली❓♦️
⭐आपली देहबुद्धी नाहीशी होण्यातच आपले हित आहे.⭐
💢परमात्म्याच्या ठिकाणी आपलेपणा उत्पन्न व्हायला त्याच्या नामाशी पुष्कळ सहवास पाहिजे. सिद्धीच्या, चमत्काराच्या पाठीस लागू नये; ती आपल्या मार्गात विघ्ने आहेत. उलट, त्यांनी आपल्या पाठीस लागले पाहिजे. एखाद्याला साप चावत नाही, पण त्यात विशेष ते काय आहे❓💢
🔹️सापात काय किंवा कशातही काय, भगवद्भाव, आपलेपणा पाहता यावा, म्हणजे कोणीही आपले शत्रू होणार नाहीत.🔹️
🔸️आई आपल्याजवळ आहे या भावनेने मूल जसे निर्भय असते, तसे भगवंत आपल्यापाशी आहे या भावनेने आपण निर्धास्त व्हावे.❓🔸️
🛟आपल्याला ज्या गावाला जायचे आहे, त्या गावाची गाडी आली की नाही एवढे पाहावे; गाडीत कोण भेटतो याला फारसे महत्त्व नाही. समजा, गाडीत आपल्याला कोणीच भेटले नाही, तर आपण स्वस्थ झोप घेत आपल्या गावी जातो, त्याप्रमाणे आपण आपले साधन करावे. सृष्टीची तत्त्वे किती आहेत वगैरेच्या भानगडीत पडू नये, त्याचा निकाल कधीच लागायचा नाही. शंका गेल्याशिवाय नाम स्थिरच होत नाही हे लक्षात ठेवावे.🛟
💠देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत नामाचे महत्त्व कळणार नाही. आपला उद्धार व्हावा असे वाटत असेल तर नामस्मरण सोडू नये.💠
🌷#बोधवचन:परमात्मा जसा निरूपाधिक आहे तसे नामही निरूपाधिक आहे.🌷
🌲#प्रवचने:श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🌲
🚩🚩श्रीराम जय राम जय जय राम🚩🚩
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 सोडा व नारायणाला आठवा....."
दु:खाचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे काळजी, जे आधी झालं, त्याची काळजी, जे अजून व्हायचे आहे, त्याची काळजी. काळजी कमी करायचा रामबाण उपाय म्हणजे आजपासून काळजी करण्याचे अजिबात सोडून देऊन तेवढा वेळ भगवंताच्या स्मरणात (किंवा आपल्या आवडत्या कामात) घालवावा.
आपल्यापेक्षा दु:खी माणसाकडे पहावे. 'असेल तर असू दे, नसेल तर नसू दे' अशी वृत्ती असावी. काळजी करणे म्हणजे भगवंतावर भरवसा नसणे होय. कर्माचे फळ आपल्या हातात नाही, हे जरी समजले तरीही आपण काळजी करतोच. 'चिंता लागणे स्वाभाविक आहे' ही कल्पनाच आधी आपण मनातून काढून टाकली पाहिजे. आपली चिंता का सुटत नाही, या प्रश्नाचे सोपे उत्तर म्हणजे तिने आपल्या ला धरण्याच्या ऐवजी आपणच तिला घट्ट धरून ठेवले आहे.
तिला सोडायचं म्हटलं तर आजच जाईल नाही तर कधीच जाणार नाही. आपला जितका वेळ चिंतेत गेला तेवढा वाया गेला, असे समजावे. काळजी पैशांमुळे वाटत असेल तर तो पैसाच दूर केला तर नाही का चालणार?
(आयुष्य जगण्यासाठी आवश्यक तेवढे सर्व प्राणीमात्रांना भगवंत जरूर उपलब्ध करून देतो) लक्ष्मीची पूजा करण्याआधी नारायणाची आठवण करावी म्हणजे काळजी चे कारणच उरणार नाही.
||• अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त •||
ll श्री दत्तरुप ll













