Mr. Vik@s
ShareChat
click to see wallet page
@36832142
36832142
Mr. Vik@s
@36832142
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 - एक मेडिटेशन पूर्वी देवांची पूजा झाल्याशिवाय तोंडात पाणीही न घेणारी लोकं होती. त्याची आठवण झाली. मग विचार करता करता वाटलं किती सुंदर पद्धत आहे ना आपल्यात रोजच्या पूजेची. माझ्या डोळ्यांसमोर पूर्वीचं एक छान चित्र ऊभं राहिलं. भल्या पहाटेच ऊठून सर्व स्त्रिया घरातलं दळण, स्वैपाकघरातली कामं, पाणी भरणं, लहान मुलांकडे लक्ष देणं वगैरे कामात मग्न असताना पुरूष मंडळी बाहेरच्या अंगणाची सफाई, चूल पेटवणं, बागेला पाणी देणं, गोठा सफाई, धारा काढणं वगैरे कामात गर्क आहेत. सकाळची सर्व आन्हिकं ऊरकून शूचिर्भूत होऊन घरातले यजमान पूजेसाठी फुलं काढायला बागेत जातात. ऊगवतीची कोवळी किरणं अंगावर घेत, अनवाणी पायांनी, रंगीबेरंगी फुलांची शोभा निरखत पानाफुलांशी हितगूज करत निसर्गाचं अप्रूप मनात साठवत मनाला आल्हाददायक देणारा एक आनंददायी (आणि आरोग्यदायीही) सुंदर अनुभव. फुलं घेऊन देवघरात आल्यावर सर्व देव (स्वत:) स्वच्छ घासलेल्या ताम्हनात काढून देवघराची स्वच्छता, देवांची ऊन पाण्याने अंघोळ, त्यांना लहान बाळांच्याच ममतेने आणि कोमलतेने (भक्तीने) स्वच्छ करून परत जागच्याजागी स्थानापन्न करतात. एकतानतेने सहाणेवर चंदनाचं मऊ मुलायम सुगंधी गंध ऊगाळतात. तुम्हाला तुमच्या चिंता, क्लेश, दु:ख, दैन्य सारं सारं काही विसरायला लावणारा हा अनुभव. खऱ्या भक्तीभावनेत तल्लीन होऊन पूजा करताना 'तो' आहे माझ्या पाठीशी, हेही दिवस जातील, 'तो' समर्थ आहे, मी कशाला ऊगीच काळजी करू किंवा कशाला काही त्याच्याकडे मागू असा सार्थ विश्वास मनात जागतो. चंदनाच्या गंधाचा मऊ स्पर्श, फुलांचे देखणे रंग आणि प्रकार, धूपाचा सुगंध, तेजाळलेले दिवे, वाहिली जाणारी अक्षत, दाखवला जाणारा नैवेद्य म्हणजे जणू टप्याटप्याने रंगत जाणारी महफिल. ही पूजा पूर्ण केल्यानंतर ते सजलेलं, तेजाळलेलं, सुगंधित देवघराचं रूप डोळे भरून मनात साठवून डोळे मिटावेत आणि असा सुंदर दिवस दाखवल्याबद्दल त्या ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करावी. अशी ही साग्रसंगीत पूजा म्हणजे रस, रंग, गंध, स्पर्श या सर्व इंद्रियांद्वारे केली जाणारी साधनाच जणू. यात नादही येतोच की. तुमचं मन जराही भरकटू नये आणि ईश्वरावर अढळ निष्ठा ठेवून समर्पित व्हायला मदत म्हणून धीरगंभीरपणे म्हटली जाणारी स्तोत्रं. खरोखरच तुम्हाला सर्व नकारात्मक भावना विसरायला लावणारी. सकारात्मक भाव जागवून तुम्हाला सात्विक बनवणारी. तुम्हाला जास्त प्रेमळ, करूणामय आणि क्षमाशील बनवून तुम्हाला आत्मविश्वास प्रदान करणारी. मी तुझ्या पाठीशी आहे. सर्व काही ऊत्तमच होईल' असा भक्कम विश्वास देऊ करणारी. हळूहळू तुमच्यातला 'अहं' विसरायला लावणारी.... अशी ही रोजची पूजा. ही बहुधा प्रत्येकाने स्वतंत्रपणे आपापली करणे अपेक्षित असेल का? या वेळेस अंतर्मुख होऊन मौन राखून रोज परमेश्वराशी अद्वैत साधण्याचा प्रयत्न असेल का? यात अमुक फुलं आहेत किंवा नाहीत म्हणून, चंदनाचं गंध हवं तसं किंवा हवं तितकं नाही म्हणून, मनासारखा नैवेद्य नाही म्हणून तुम्हाला राग येत असेल तर किंवा पूजा करताना तल्लीनतेने न करता मनात बाकीचे विचार किंवा इतरत्र लक्ष असेल तर मंडळी या पूजेचा तुम्हाला काही ऊपयोग होईल का? पूजा ही कुणा बाहेरच्या 'देवाला' प्रसन्न करून घेण्यासाठी नाहीये, तर स्वत:मधील ईश्वराची अनुभूती घेण्याचा तो एक प्रवास आहे. स्वतःला प्रसन्न ठेवण्यासाठी आहे. दिवसाची सुरूवात सकारात्मक ऊर्जेने आणि ऊत्साहाने करायचा तो एक सहजसोपा आणि सुंदर मार्ग आहे.
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - 69 69 - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 सहस्त्रनामातील प्रत्येक नाम हे भगवंताचे गुण वा स्वभाव दाखवून देणारे आहे . ह्याला आपण उपाधी किंवा बिरुद हे देखील म्हणू शकतो . ह्या उपाधी अथवा बिरुदे म्हणजे भगवान विष्णूंचे स्वभाव दर्शन आहे ,दत्त महाराज हे भगवान विष्णूंचेच रूप असल्याने हि विशेषणे किंवा वैशिष्ठ्ये गुरुचरित्रात दत्त महाराजांच्या सर्व कथांमध्ये दिसून येतात . उदाहरण म्हणून पाहू जाता शत्रू हा शब्द घेऊ . शत्रू हे दोन प्रकारचे असतात ,एक म्हणजे अंतस्थ आणि दुसरा बाहेरील . अंतस्थ शत्रूंमध्ये षड्रिपूंचा अंतर्भाव होतो तर बाह्य शत्रूंमध्ये आपल्या मनुष्य वा अन्य प्राणी योनीतील जीवांचा समावेश होतो . दोन्ही शत्रू हे घातकच असतात . श्रीनृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराज या भगवंताच्या नामावलीत आलेल्या सर्व नामांनी किंवा बिरुदांनी संपन्न होते . साक्षात विष्णुस्वरूप आहेत ते , तेव्हा हि बिरुदावली त्यांनाही सार्थ आहे . जितक्रोधः ,क्रोधः आणि जितमन्युः हि विष्णुसहस्त्रनामातील नामे काय दर्शवतात ? क्रोधादि अन्तः शत्रुंना जिंकणारा ,त्यांना आपल्या स्वाधीन ठेवणारा ,याचप्रमाणे क्रोधी ,लोभी मानवाला त्याच्या दोषयुक्त प्रवृत्ती पासून निवृत्त करणारा . गुरुमहाराज हे स्वतः जितक्रोध होतेच पण चौदाव्या अध्यायात त्यांनी क्रोधी अशा यवनाच्या दोषयुक्त प्रवृत्तीपासून त्याला निवृत्त केले . मनामध्ये घडवून आणलेला बदल हा फार मोठा क्रांतिकारी ठरला . सायंदेव हा भयमुक्त होऊन परत महाराजांकडे आला . शत्रुघ्नः विदारणः हि भगवान विष्णूंची नामे दहाव्या अध्यायात दिसून येतात . शत्रूचा नाश करणारा शत्रूला जिंकणारा,शत्रूचे विदारण करणारा असा यांचा अर्थ होतो . केवळ धाव श्रीपादा या हाकेसरशी महाराज समोर उभे ठाकले आणि त्यांनी वल्लभेषाचा वध करणाऱ्या चोरांना मृत्यू दिला . भगवान विष्णू हे श्रीवल्लभ अर्थात लक्ष्मीपती आहेत . या करिता विष्णुसहत्रनामात हिरण्यगर्भ ,श्रीगर्भ ,महाधन ,महानिधी ,श्रीधर ,श्रीपति ,श्रीमान आदी नावे आहेत . सुवर्णाचा संग्रह आपल्यापाशी ठेवणारा ,धनाला आपल्या कोषामध्ये ठेवणारा ,असे अर्थ याचे होतात . गुरुचरित्रात अठराव्या अध्यायात घेवडयाच्या वेलाखाली सुवर्ण कुंभ देणारे गुरुमहाराज ,गंगानुजाला शेतात सुवर्णठेवा देणारे महाराज ,हे भगवान विष्णुस्वरूपीच आहेत . भौतिक उद्धाराची वेळ येताच गुरुमहाराजांनी हा सुवर्ण ठेवा आपल्या भक्तांसमोर ठेवला आहे . हेमांगः हे भगवान विष्णूंचे नाम म्हणजे शरीरावर सुवर्णाची भूषणे घालणारा . आता हे नाम गुरुमहाराजांनी सार्थ केलेले कधी दिसून आले ,तर महाराज एक्कावन्नाव्या अध्यायात जेव्हा पुष्पासनावर बसून गेले तेव्हा त्यांच्या पायात सुवर्ण पादुका नावाड्याला दिसल्याचा उल्लेख आहे . विष्णू सहस्त्रनामातील प्रत्येक नाम हे गुरुमहाराजांना देखील सार्थ होते कारण दत्त महाराज आणि भगवान विष्णू हे एकच आहेत तेव्हा यांची बिरुदे देखील एकच असणे स्वाभाविक नाही का ?? श्री गुरुदेव दत्त !!! --- अभय आचार्य
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 क्षणी संपूर्ण मंडपात एक अदृश्य शांतता उतरली होती. फुलांची सुवास, मंत्रोच्चारांची मधुर लय, पादुकांवर पसरलेला दिव्य तेज हे सगळं मिळून एक अनिर्वचनीय पवित्रता निर्माण करत होतं.महापूजेचा प्रत्येक उपचार संपत आला तसा भक्तांच्या मनातली भक्तिरसाची तरलता अधिकच गहिरा होत गेली... पावित्र्याचे सारे संकेत बाळगून गाभाऱ्यातील पादुकांची पूजा सुरु झाली . आत गेलेल्या पुजाऱ्यांनी पादुकांवरील वस्त्र आणि निर्माल्य अलगद बाजूला काढून ठेवले . याही वेळेस प्रातः पूजेप्रमाणे पुजाऱ्यांनी पाणी घातले आणि महापूजेला सुरुवात झाली . पादुकांना अर्थात दत्त महाराजांना आसन ,अर्घ्य ,आचमन समर्पण करून महापूजेचे उपचार सुरु झाले . श्रींच्या पादुकांना सुवासिक तेल लावून बुक्का लावला आणि उष्णोदकाने न्हाऊ - म्हाखू घातले . पादुका अधिकच खुलून दिसू लागल्या . आता पंचामृत स्नान सुरु झाले . यात सर्वप्रथम दुग्धस्नान . दुधाने भरलेले कलश पादुकांवर रिते होऊ लागले . श्रींच्या पादुका आता स्पष्ट आणि लोभस दिसू लागल्या . दुधाच्या प्रत्येक लाटेसरशी ती चिरंतन पाऊले पाहाताच सर्व भक्तांच्या मुखातून श्रीगुरुदेव दत्त हा भावपूर्ण उदगार मंडपात घुमला . यानंतर शीतल आणि देवांना प्रिय असे दही पादुकांवर अर्पण केले . यज्ञात आज्य म्हणून प्रतिष्ठा लाभलेले घृत ,सर्व औषधांमध्ये अमृतासमान मधू ,शर्करा अर्थात साखर ,आणि या हंगामात आम्रफ़ळ म्हणजेच आंब्याचा मधुर रस हे सर्व अनुक्रमे अर्पण केले गेले . पंचामृत द्रव्ये पादुकांची स्पर्श होताच तीर्थमय बनली . भक्तांकरिता हे तीर्थ कलशांमध्ये भरून ठेवले . आता शुद्धोदक स्नानाचा महाभिषेक सोहळा सुरु झाला . त्याच वेळी मंडपात पुरुषसुक्त ,विष्णुसूक्त यांचे सामूहिक पठण सुरु झाले . शंखतीर्थ घालून शुद्धोदक स्नानाची सांगता झाली . काषायवस्त्राने पादुका कोरड्या करताना चक्रादि चिन्हामध्ये पाण्याचा अंश राहू नये म्हणून पुजारी पाणी टिपून घेऊ लागले . स्वच्छ कोरड्या पादुकांवर अत्तराच्या कुप्या रित्या केल्या . सर्वत्र सुगंधाचे साम्राज्य पसरले . केशरयुक्त चंदन पादुकांवर सजू लागले . मूळ पादुकांवर गंध पाऊले साकार झाली . प्रत्येक बोटावर अष्टगंधाची नखे उमटली . गुलाब ,तुळशी ,मोगरा ,जाई जुई ,शेवंती ,कुंद ,चंपक ,कल्हार आदी वाहून दोन्ही पादुकांच्या मध्ये गंध आणि बिल्वदल लावले . भरगच्च फुलांवर छाटी पसरली . त्यावर सात पानांचे बनतीचे वस्त्र घातले . त्यावर नागप्रतिमा ठेवली . पाण्याचा कलश आत ठेवला आणि चांदीच्या तबकाला हिरव्या पानांची रचना असलेली दत्त प्रतिमा ठेवली . पानपूजेने सजलेली प्रसन्न दत्त महाराजांची प्रतिमा पाहून हात जोडले गेले आणि नकळत शब्द बाहेर पडले.. श्री गुरुदेव दत्त ll अभय आचार्य दत्तरुप ll
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 नोव्हेंबर ❗ ‼श्री गुरुदेव दत्त‼ 🌷🌷प्रवचनाचा विषय🌷🌷 🟪🟥🟪भगवंत कल्पनेच्या पलीकडे आहे.🟪🟥🟪 💠मनुष्याचा स्वभावच असा असतो की, आपल्या कल्पनेत जेवढे येते तेवढेच आपण सत्य मानतो. पण आपली कल्पनाच किती संकुचित असते, याचा कोणी विचार करीत नाही. जो कल्पनेच्या पलीकडे आहे, जिथे कल्पना थांबते, ज्याला कल्पना बांधू शकत नाही, त्याला कल्पनेने कसे ओळखता येईल❓💠 💢जो ज्ञानाच्या पलीकडे राहिला आहे त्याला माझ्या तोकड्या ज्ञानाने कसे आजमावता येणार❓माझ्या बुद्धीच्या पलीकडे तो आहे, तेव्हां त्याच्या इच्छेनेच त्याचे खरे ज्ञान होणार आहे.💢 ❄अविद्या ती हीच की आपल्या कल्पनेने होणारे ज्ञान हेच खरे मानणे. याकरिता श्रद्धा आणि कल्पना यांतला फरक ओळखावा.❄ 🛟खरी श्रद्धा तीच की जी कल्पनेच्या पलीकडे राहते. प्रल्हादाइतके आपण नामाला सत्यत्व देत नाही. कल्पनेची मजल प्रल्हादाने नाही चालविली.कल्पनेच्याहीपलीकडे राहिला असे मानायला काय हरकत आहे❓🛟 🔹️सूर्यप्रकाश जसा सर्व ठिकाणी भरलेला असतो, त्याप्रमाणे देवळात, घरात, तीर्थक्षेत्रांत, सर्वठिकाणी परमात्मा भरलेला आहे.🔹️ 🔸️ परमात्मा फक्त विद्वानांचा किंवा श्रीमंतांचा नसून तो सर्वांचा आहे. भगवंत सर्वांचा आहे, म्हणूनच तो सर्वांना सुसाध्य असला पाहिजे.🔸️ 💮एखादा मोठा गणिती हिशेब लवकर करू शकतो; परंतु खेडेगावातले अडाणी लोक गणित न शिकताही हिशेब बरोबर करतात, आणि त्यांचा व्यवहार बरोबर चालतो. तसे विद्वानाला कदाचित् भगवंत लवकर प्राप्त होईल, पण अडाणी माणसाला देखील तो प्राप्त होऊ शकेलच.💮 🌀भगवंताची दृष्टीच अशी आहे की, त्याला आपले अंतःकरण स्पष्ट दिसते. ते जसे असेल त्याप्रमाणे भगवंत आपल्याला जवळ किंवा दूर करतो.🌀 🏵मनुष्य जन्माला आला की सगळी नाती त्याला आपोआप येतात, त्याचप्रमाणे, परमात्मा आनंदरूप आहे असे म्हटले की बाकीचे सर्व गुण त्यामध्ये आले असे समजावे.🏵 ⭕जसा मारुतीमध्ये देवअंश होता तसाच तो आपल्यामध्येही आहे. त्याने तो फुलविला, पण आपण झाकून तो विझवून टाकला, याला काय करावे❓⭕ 🪞मामलेदाराला बरोबर असलेल्या शिपायाची भिती वाटत नाही, चोराला मात्र त्याच्याबरोबर असलेल्या शिपायाची भिती वाटते. त्याचप्रमाणे भगवंत आपल्या पाठीमागे आहे ही जाणीव ज्याला असते, त्याला उपाधीची भिती वाटत नाही; कारण ती त्याच्याच इच्छेने आली आहे अशी त्याची खात्री असते.🪞 🍥आपण आपले मागले घडलेले सर्व भगवंताला अर्पण करावे, मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते.🍥 🌸#बोधवचन 🌸 🌹जे निश्चित नाही त्याचे नाव कल्पना होय. देव आहे असे निःशंकपणाने वाटणे, हे ज्ञान होय.🌹 🌺#प्रवचने:श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🌺 🎄श्री राम जय राम जय जय राम🎄
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - 1 $ کw~ 61 wv 1 $ کw~ 61 wv - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 दिवा पेटण्यासाठी वात, तेल आणि ज्योत यांचा संगम आवश्यक असतो, तसंच सत्संग म्हणजे भक्त, भक्ति आणि भगवंत या तिघांचा पवित्र संगम. काही क्षण देवाभावात, चांगल्या विचारात, नामस्मरणात घालवले की मन जणू पुन्हा नव्याने उजळतं. चार नद्या एकत्र आल्यानं जसा पवित्र संगम तयार होतो, तसंच काही भक्त एकत्र आले की तेथे वातावरण भक्तिरसाने ओथंबून जातं. मनाचे शुद्धत्व टिकवण्यासाठी आणि देवाच्या सान्निध्यात राहण्यासाठी एवढा सुंदर मार्ग दुसरा नाही. || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त || दत्तरुप ll
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - 66 66 - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 क्षेत्र नृसिंहवाडी येथील पवित्र कृष्णा–पंचगंगा संगमावर, शांततेने न्हालेल्या या दैवी भूमीत, औदुंबराच्या सात्विक, पवित्र सावलीखाली अनंतकोटी ब्रह्मांडनायक, राजाधिराज श्री दत्तमहाराज अखंड वास करून आहेत. ध्यानस्त अवस्थेत, विश्वाचा भार हलका करत, ते प्रत्येक भाविकाकडे मृदू, कृपामय दृष्टिने पाहत असतात. © दत्तरूप जो कोण अनन्य भक्तीने त्यांच्या चरणी येतो, मन मोकळ करून शरणागती स्विकारतो त्याच्या इच्छा, त्याच्या मनातील आकांक्षा ते आपुलकीने पूर्ण करतात. कारण तेच आमचे त्रिमूर्ती गुरुमहाराज… भक्तांचे आधार, भक्तीचा अखंड स्त्रोत. त्यांच्या चरणाशी ६४ योगिनींचा शुभसंभार आहे आणि अन्नपूर्णा आईसाहेबांची मातृछाया आहे. या पवित्र औदुंबराखालीच दत्तमहाराजांनी गाणगापूरला प्रस्थान करताना स्वतःच्या श्री मनोहर पादुका प्रस्थापित केल्या. श्रींच्या पादुका भक्तांच्या मनोमनातील प्रत्येक भाव समजणाऱ्या, प्रत्येक मनोकामना पूर्ण करणाऱ्या असून त्याची प्रचिती येथे आल्यावर प्रत्येक भक्तांना येतेच... म्हणूनच, जेव्हा तुम्ही येथे याल, तेव्हा या औदुंबरासमोर शिरसाष्टांग नमस्कार करा… आपल्या मनातील शब्दही न उच्चारता इच्छा व्यक्त करा… आणि मग या पवित्र भूमीचा आश्वासक श्री दत्त महाराज तुम्हाला आपल्या कृपाशीर्वादाने आनंदमय जीवनासाठी प्रेरित करतील हा माझा विश्वास आहे. भयमुक्त व्हा, चिंतामुक्त व्हा… कारण दत्तमहाराजांच्या कृपेच्या सावलीत प्रत्येक भक्त सुरक्षित आहे. || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त || © दत्तरुप ll ------------------------------------------------------- #दत्तरूप #नृसिंहवाडी #दत्तगुरु #श्रीदत्त #दत्त #गाणगापूर #दत्तजयंती
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - 49 49 - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 घेऊ लागले की विकल्प उठतात आणि ते घेण्याबद्दलची निष्ठा कमी होते, याला काय करावे ? अशी तक्रार आपण सर्वसाधारणपणे करतो; पण असे होण्यातच नामाचे महत्त्व प्रस्थापित होते हे आपल्या लक्षात येत नाही. मनुष्य नाम घेऊ लागला की विकल्पांना असह्य होते, आणि आता हा नाम घेऊ लागला, आता आपली धडगत नाही अशा धास्तीने त्यांची चळवळ चालू होते, आणि मनुष्याला नामापासून परावृत्त करण्याचा ते प्रयत्‍न करतात. विकल्प हे अती सूक्ष्म आहेत. त्यांचे उच्चाटन करायला त्यांच्यापर्यंत पोहोचणारा आणि तितकाच सूक्ष्म असा उपाय पाहिजे. तो उपाय म्हणजे भगवंताचे नाम. एखाद्या बिळात सर्प शिरला तर त्याला बाहेर काढण्याकरिता त्याच्यापर्यंत पोहोचून त्याला तिथे राहणे असह्य करील असाच उपाय करणे जरूर असते. बाहेरून कितीही आरडाओरडा केला तरी त्याचा उपयोग होत नाही. बिळात धूर किंवा गरम पाणी सोडले की तो बाहेर येतो. त्याप्रमाणे नाम घेतले की विकल्प उठतात, म्हणजे विकल्पांच्या मूळ ठिकाणापर्यंत नामाची आच जाऊन पोचली असे ठरते. तर मग नाम घेऊ लागल्यावर विकल्प येऊ लागले तर गांगरून न जाता, हे सुचिन्ह आहे असे समजून विकल्पांच्या उच्चाटनाची गुरूकिल्ली मिळाली अशा जाणिवेने, जास्त आस्थेने नाम घेण्याचा निश्चय करावा हाच त्याला उपाय. || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त || दत्तरुप ll
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat
सद्गुरू होणे फार कठीण..शिष्य होणे उत्तम....प.पु गुळवणी महाराज सद्गुरू योगीराज गुळवणी महाराज एकदा आपल्या भक्तगण बसले असताना त्यांना सांगत होते... "अरे महाराज होणे...सद्गुरू होणे सोपे नाही वरचा देखावा आणि डोलारा पाहून लोक खऱ्या महाराजांस विसरतात...त्यांना लौकिक दिसतो,त्या लौकिकाला पाहून त्यांना वाटते महाराज होणे म्हणजे सुख,विलास,ऐश्वर्य यांचा सुकाळ असतो पण खरे तसे नसते...किती अवघड आहे हे समजणे ही अवघड आहे" "सद्गुरूंनी एकदा शिष्याला आपले म्हणले की त्या शिष्याची सर्व जबाबदारी सद्गुरू घेतात. जबाबदारी म्हणजे त्यांनी पापे केली, दुर्वर्तन केले तरी सद्गुरू त्याला सोडत नाहीत. हे सहन करून त्याला दुरुस्त करीत राहणे सोपे नसते. त्या त्या शिष्याला त्याच्या त्यांच्यां कलाने सुधारणे म्हणजे गुरुची कसोटी लागत असते. तरी प्राण पणाला लावून त्याला सद्गुरू सुधारवल्या शिवाय रहात नाहीत. आपला शिष्य जो पर्यंत मोकळा होत नाही, तो पर्यंत सद्गुरूंची सुटका नसते. परमार्थात सुद्धा थोड्या अडचणी नसतात. प्रयागला भारद्वाज मुनींचा आश्रम आहे.त्या भारद्वाज मुनींचे शिष्य भ्रशुंडी ऋषी होते एकदा भ्रू शुंडी कडून अपराध घडला म्हणून दुसऱ्या ऋषींनी त्याला शाप दिला.हे भारद्वाज मुनींना कळले तेव्हा ते स्वतः त्या ऋषींकडे गेले आणि म्हणाले,"भ्रशुंडी माझा शिष्य आहे.महाराज , त्याची चूक झाली असली तरी आपण शाप माझ्या शिष्याला दिलात,मी त्याचा गुरू असताना आपण त्याला का शाप दिलात? तो शाप मागे घ्या. !' 'एकदा गुरूंनी आपले म्हणले काय होते याचे हे उदाहरण आहे. हेच काय, शिष्याचा कल्याणासाठी एखाद्या दिवशी यमाशी भांडण्याचा प्रसंग आला तरी सद्गुरू हटत नाहीत. महाराज होणे सोपे नाही, समजलात! सद्गुरूंना काय पाहिजे असते फक्त भाव पाहिजे असतो, समर्पण पाहिजे असते , ते सोडून हार तुरे दक्षिणा मिठाई असले आपण देतो, हे देऊ नाही असे नाही, सद्गुरूविषयी बोलताना प.पु. स्वामी माधवनाथ महाराज म्हणायचे , "माझे सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांचं प्रेम कसे त्यांच्यां दृष्टीतून पाझरायचे , कर्मातून पाझरायचे , स्वरूपानंद यांचे हात नेहमी जोडलेले असायचे, कुणीही येवो आबालवृद्ध येणारी व्यक्ती जणू परमेश्वर आहे , पहिल्यांदा त्यांचे हात जोडलेले असत, मग त्या व्यक्तीचे हात जोडले जात, कुणी काही दिले तरी दोन हात व्यवस्थित ओंजळ करून पुढे करत.पुडा देखील हळुवार घेऊन, दोरा सुद्धा हळुवार सोडून रीळ ला गुंडाळत कागदाची घडी घालून गादिखाली ठेवत व पुड्यातील खडीसाखर हळुवारपणे डब्यात ओतत." माधवनाथ स्वामी म्हणायचे "की त्या जागी आपण असतो तर काय केले असते? द्या पुडा,तो दोरा तटकन तोडला असता. त्या कागदाचा चोळामोला करून टाकला असता.ती खडीसाखर खडखड आवाज करत डब्यात ओतली असती.तो कागद कोपऱ्यात फेकून दिला असता. एखादी व्यक्ती एखादी वस्तू देते ती किती प्रेमाने घ्यावी ! ती वस्तू नसतेच तो भाव असतो.वस्तूची किंमत शून्य असते.संत व सद्गुरू यांच्या प्रति भावाची किंमत असते ते भाव घेतात... #🙏श्री गुरुदेव दत्त💐
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 प्रश्नाने हैराण झालो होतो . काय करावे सुचेना ,एकदा रेल्वेने जाताना चोवीस तासात उपाय अशी जाहिरात वाचून फोन केला . त्या तांत्रिक बुवांनी भेटायला बोलावले आणि माझ्या कडे पाहत म्हणाले ,तुझ्यावर मोठे संकट आहे ,बरं झालं वेळेवर माझ्याकडे आलास . माझ्या वाईटावर असलेल्या दुष्ट शक्तींचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी पूजा विधी सांगितला ,खर्चाचा अंदाज पाहून मी उद्या येतो म्हणून पळ काढला आणि त्या बुवांचा नंबर ब्लॉक करत अन्य उपाय शोधू लागलो . एका मित्राने एका साधू बाबांचा पत्ता दिला आणि म्हणाला ,मोठे सिद्ध पुरुष आहेत ,अवतार म्हणेनास . अवश्य जा . गेलो त्याच्या सांगण्यावरून ,सर्व सुखसोयींनी सुसज्ज असा आलिशान आश्रम ,उच्चभ्रू श्रेणीतले भक्त आणि त्यांची सरबराई करत असलेले त्या तथाकथित बाबांचे सेवक ---.साधू बाबा आले ,त्यांचा दरबार भरला ,रांग लागली ,माझा नंबर आला . मी नमस्कार करून काही बोलायच्या आत मला शेजारी असलेल्या सेवकांनी धरून भिरकावून दिले . म्हणाले स्पेशल दर्शन टोकन घ्या आणि तिकडे प्रश्न विचारा . इकडे फक्त दर्शन आहे . टोकन कुठे मिळेल ,त्यासाठी काय करायचं याची चौकशी करता त्या टोकन दर्शनाची किंमत ऐकून काढता पाय घेतला . घरी आलो आणि विसावतो तो समोर आली एका मुंजीची निमंत्रण पत्रिका आणि स्थळ होत नृसिंहवाडी . नातेसंबंध पाहता जाणे अवश्य होते , काही दिवस या विवंचनेतून सुटका होईल मग पुढे पाहू असं म्हणत मी नृसिंहवाडीला गेलो . थोड्क्यात सांगितलेली विवंचना ऐकून आमचे उपाध्ये म्हणाले ,दत्त महाराजांना दक्षिण द्वारात सांगा आणि प्रार्थना करा . पुन्हा म्हणून आठवण करून देण्याची गरज नाही ,सर्व काही ते जाणून आहेत ,इथे सर्व श्रेणी एकसारख्या आहेत धनाढ्य असा किंवा निष्कांचन .तुमच्या मनातील भावाला फळ हे निश्चित आहे. दक्षिण द्वारापाशी जात डोळ्यातील अश्रुना मुक्त वाट देत म्हणालो ,तूच जर असं केलस तर आमचं रक्षण कोण करणार ? मुंबईला परत आलो आणि काही दिवसात एक फरक मात्र जाणवला , प्रचंड असं काही सोबत नसलं तरी खाऊन पिऊन सुखी आहोत ,काही अंशी विवंचना कमी होत आहेत . पुजारी काकांना हा बदल सांगितलं तेव्हा ते म्हणाले ,आता पुढे दिवस बदलले तरी दत्त महाराजांना विसरायचं नाही ,ते पाठीशी आहेत म्हणून सर्व काही चाललं आहे ---श्री गुरुदेव दत्त !!!---अभय आचार्य
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 नोव्हेंबर❗ ‼श्री गुरुदेव दत्त‼ 🌷प्रवचनाचा विषय🌷 🟧🟥🟧देव अत्यंत दयाळू आहे.🟧🟥🟧 🏵तुम्ही फार कष्ट करून इथे येता. किती दगदग, किती त्रास तुम्हाला सोसावा लागतो❗बरे, इथे आल्यावर हाल काय कमी होतात ? परंतु इथे कशासाठी आपण येतो, आपल्याला काय हवे आहे, हे आपल्याला कळते का ❓आपल्याला देव खरोखर हवासा वाटतो आहे का❓याचा विचारच आपण फारसा करीत नाही.🏵 ♦आपल्यावर काही संकट आले, किंबहुना आपले काही वाईट झाले, की आपण म्हणतो, देवाने असे कसे केले❓असे म्हणणे यासारखे दुसरे पाप नाही.♦ ❄देवावर विश्वास न ठेवणारा माणूस यापेक्षा एकवेळ परवडला, कारण तो ’ देवाने वाईट केले ’ असे तरी म्हणणार नाही.❄ 🛟देव खरोखर अत्यंत मायाळू आहे, त्याला कुणाचेही दुःख सहन होत नाही. कोणत्या आईला आपल्या मुलाला दुःख, कष्ट झालेले आवडेल❓म्हणून, देवाने माझे वाईट केले ही खोटी समजूत प्रथम मनातून काढून टाका.🛟 💮द्रौपदीला जेव्हा वस्त्रहरणासाठी दुःशासनाने भर सभेत खेचले, तेव्हा तिला वाटत होते की पांडवांना हे सहन होणार नाही, ते माझी विटंबना होऊ देणार नाहीत, ते दुःशासनाची खांडोळी करतील. तिला पांडवांबद्दल विश्वास वाटत होता. दुःशासनाने जेव्हा तिच्या पदराला हात घातला, तेव्हा तिने आशेने धर्माकडे पाहिले.धर्माला वाटले, आता विरोध केला तर आपले सत्याचे व्रत उघडे पडेल, म्हणून त्याने लाजेने मान खाली घातली. हे कसले अहंपणाने लडबडलेले सत्य❗तीच स्थिती इतर पांडवांची झाली. पुढे तिने भीष्माचार्यांकडे पाहिले, परंतु त्यांनीही मान खाली घातली. तेव्हा मात्र तिने जगाची आशा सोडली, आणि कळकळीने परमात्मा श्रीकृष्णाला हाक मारली; आणि त्याने अनेक वस्त्रे पुरवून तिची अब्रू रक्षण केली.💮 ⭕पुढे तिला एकदा श्रीकृष्ण भेटला असताना तिने त्याला विचारले की, " आधीच तू माझ्या बचावासाठी का नाही धावलास ? तो दुष्ट, केस धरून मला खेचून नेत असतानाच का नाही धावलास❓ " तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, " त्यात माझा काय दोष❓ मी तुझ्या रक्षणासाठी आतुर होतो, परंतु तुला पांडवांची आणि इतरांची आशा होती, ते रक्षण करतील असे तुला वाटत होते. मला दरवाजा खुला नव्हता, मग मी कसा येऊ❓ तू जगताची आशा सोडलीस आणि मला बोलावलेस, त्याबरोबर मी तुझ्या भेटीला धावलो. "⭕ 🔸️जगाची आशा, आसक्ति सोडल्याशिवाय परमेश्वराला आपली हाक कशी पोहोचेल❓🔸️ 🔹️ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते त्याच गोष्टीची आपल्याला नड लागते. आपल्याला देवाची नड लागली आहे का❓ देवाचे प्रेम लागायला त्याच्या अखंड सहवासात राहण्याची अत्यंत जरूरी आहे; आणि हा सहवास जर कशाने साधत असेल तर तो एक त्याचे नाम घेतल्यानेच साधेल. भगवंताचे नाम घेऊन त्याचे प्रेम मिळवा, हेच माझे सांगणे.🔹️ ♻#बोधवचन :सर्व विसरून भगवंताला आळवले की तो कृपा करतो.♻ 🌹#प्रवचने: श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🌹 🌲श्री राम जय राम जय जय राम🌲
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - 10 8 10 8 - ShareChat