#😭पंजाबमध्ये पुरामुळे हाहाकार⛈️
पंजाब सध्या मुसळधार पाऊस आणि पूर यांच्या विळख्यात सापडला आहे. राज्य सरकारने संपूर्ण राज्य आपत्तीग्रस्त घोषित केले आहे. मुसळधार पावसामुळे २३ जिल्ह्यांमधील १ सहस्र ४०० गावे पुराचा सामना करत आहेत. आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर ३ जण बेपत्ता आहेत. पठाणकोटमध्ये सर्वाधिक ६ जणांचा, तर लुधियानामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. अमृतसर, बर्नाला, मानसा, रूपनगर आणि होशियारपूर येथे प्रत्येकी ३ जणांचा मृत्यू झाला आहे. बठिंडा, गुरुदासपूर, पटियाला, मोहाली आणि संगरूर जिल्ह्यांत प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.