Mrs.Manjusha ....
ShareChat
click to see wallet page
@manjusha148
manjusha148
Mrs.Manjusha ....
@manjusha148
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस दत्तजयंती म्हणून साजरा करतात. दत्तजयंतीचे महत्त्व – दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते. जन्मोत्सव साजरा करणे – दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात. दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रम आयोजीत केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात. दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते. दत्तजन्म कथा – दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रेय अशा दोन शब्दांनी बनला आहे. दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. आणि अत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. मात्र या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे अत्रीऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे, असाच बोध होतो. अत्रीऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्रीऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा-विष्णू-महेश हे तिन्ही देव प्रकट झाले. आणि त्यांनी अत्रीऋषींना तपाचे कारण विचारले. अत्रीऋषींनी त्यांना विनवले की, आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्मला आली. श्रीदत्तजन्माची एक कथा ब्राह्मणपुराणात आहे. अत्रीऋषींनी ब्रह्मा-विष्णू-महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की, आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रेय, सोम, दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रीऋषींना प्राप्त झाली. याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी की, राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंध:कारमय झाली. अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्रीच्या या महत्कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला. भारतात शैव, वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत. संपूर्ण भारतात विशेषत: महाराष्ट्रात श्रीदत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभुची उपासना करताना दिसतात. श्री दत्त संप्रदायातील साधक अवधूतचिंतन श्री गुरूदेव दत्त असा जयघोष करत असतात. अवधूत हे दत्तात्रयाचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे- नेहमी आनंदात रमणारा, प्रत्येक क्षण वर्तमानकाळात जगणारा होय. श्री दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे. श्री दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरू मानले होते. पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णु असावे, अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती. तसेच त्यांनी अग्नीला गुरु मानून आपला देह हा क्षणभंगूर आहे, अशी शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वालेपासून घेतली होती. अशाप्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूत परमेश्वराचे अस्तित्व आहे. ते पाहण्यासाठी श्रीदत्तगुरूंनी चोवीस गुरू केले होते. श्री दत्त दररोज खूप भ्रमण करीत असत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पांचाळेश्वर, बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत. तांबुलभक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षसभुवन येथे जात, तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नैमिष्यारण्यात बिहार येथे पोहोचत. निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात व योग गिरनार येथे करीत असत. श्री दत्त अवलिये होते. क्षणात कोठेही अंतर्धान पावत असत. श्री कृष्णांच्या लीलाप्रमाणेच श्रीदत्तात्रयाच्या लीला आहेत. वैराग्यस्वरूप, क्षमाशील आणि भक्तवत्सल असणारे दत्तात्रेय – भगवान दत्तात्रेय म्हणजे ‘ब्रह्मा, विष्णू आणि महेश’ या त्रिमूर्तींचे रूप. ब्रह्मदेव ज्ञानस्वरूप, श्रीविष्णू वात्सल्यस्वरूप आणि शिव वैराग्यस्वरूप आहे. अशा त्रिमूर्तींचे एकत्रित रूप असणार्‍या दत्तात्रेयांमध्ये ज्ञान, वात्सल्य आणि वैराग्य यांचा सुरेख संगम झालेला आहे. वैराग्य आणि संन्यस्थ – भगवान दत्तात्रेयांमध्ये वैराग्य असल्यामुळे ते संन्यस्त जीवन व्यतीत करतात. त्यांचा निवास मेरुशिखरावर असतो. संध्या आणि अन्य दिनक्रम ते इतर ठिकाणी पूर्ण करतात. त्यांच्यामध्ये वैराग्य वृत्ती प्रबळ असल्याने त्यांना कोणत्याही स्थानाचे मोहबंधन नाही. त्यामुळे ते वेच्छाविहारी आहेत. ते जीवनमुक्त असल्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडात मुक्तपणे विचरण करतात. दत्तात्रेय आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांना वैराग्याचा आशीर्वाद देतात. जगात सर्व काही मिळू शकेल; परंतु देवदुर्लभ असे वैराग्य केवळ श्रीगुरुकृपेनेच मिळते. अखंड शिष्यभावात असणे – भगवान दत्तात्रेय सद्गुरुपदावर विराजमान असले, तरी ते वृत्तीने सतत शिष्य अवस्थेत वावरतात. शिष्य म्हणजे अखंड शिकत रहाणे.शिष्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भगवान दत्तात्रेय होय. श्रीमद्भागवताच्या अकराव्या स्कंधात यदु आणि अवधूत यांचा संवाद आहे. आपण कोणते गुरू केले आणि त्यांच्यापासून काय बोध घेतला, हे यात अवधूत यांनी सांगितले आहे. त्यांच्या शिष्यावस्थेमुळेच त्यांनी 24 गुरू आणि 24 उपगुरू केले. ते प्रत्येक प्राणीमात्राला गुणगुरू मानतात आणि प्रत्येकाकडून शिकत असतात. क्षमाशील- शिष्य कितीही चुकला, तरी गुरू त्याला क्षमा करून पुन्हा शिकण्याची संधी देतात, याचे उत्तम उदाहरण भगवान दत्तात्रेय आहेत. ते केवळ शिष्याचे दोष क्षमा करत नसून विरोधकांचे अपराधही क्षमा करून त्यांचा उद्धार करतात. श्रीपादश्रीवल्लभ यांचा द्वेष करणार्‍या नरसावधानीफफ नावाच्या मनुष्याला कर्मफलन्यायानुसार कठोर शिक्षा मिळाली होती. तेव्हा त्याने श्रीपादश्रीवल्लभांचे चरण धरले. यावर क्षमाशील वृत्तीच्या श्रीपादश्रीवल्लभांनी नरसावधानीला क्षमा करून त्याचा उद्धार केल्याचे उदाहरण श्रीपादश्रीवल्लभ यांच्या जीवनचरित्रात आढळते. दत्तगुरूंच्या क्षमाशीलतेची अनेक उदाहरणे गुरुचरित्रात आपल्याला पहावयास मिळतात. श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार, श्री नृसिंह सरस्वती हा दुसरा तर स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे. जैनपंथीय श्री दत्तगुरूंची नेमिनाथ म्हणून पूजा करतात तर मुसलमान फकिर म्हणून पूजतात. दत्तजयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा केला जातो. गुरुचरित्राचे पारायण केले जाते. भजन, कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. #श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त - দচ V೪li 9]&[4[[50% TAREAPHO   14   দচ V೪li 9]&[4[[50% TAREAPHO   14 - ShareChat
#श्री गुरुदेव दत्त जयंती 🙏🌹
श्री गुरुदेव दत्त जयंती - विष्णू  धावत येसी भक्तांसाठी , ब्रम्हा , महेश्वरा ! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ! ! n श्रीढल जन्मोत्स्व निमित्त मंगलमय शुभेच्छा AMGraphicofiicidl विष्णू  धावत येसी भक्तांसाठी , ब्रम्हा , महेश्वरा ! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ! ! n श्रीढल जन्मोत्स्व निमित्त मंगलमय शुभेच्छा AMGraphicofiicidl - ShareChat
#🌺जय श्री राधाकृष्ण 🌺
🌺जय श्री राधाकृष्ण 🌺 - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️
☀️गुड मॉर्निंग☀️ - چ दोथ्त्तोय  मज़ा ही कुछ और है. ...! چ दोथ्त्तोय  मज़ा ही कुछ और है. ...! - ShareChat
MIT या अमेरिकन शिक्षण संस्थेच्या मिडिया लॅबने कृत्रिम बुध्दीमतेचा म्हणजे 'AI चा सहज आणि सतत वापर करण्याचा मेंदूवर होणारा परिणाम' या विषयावर काही अभ्यास केला.यासाठी त्यांनी कन्टेन्ट लिहिणार्‍या तीन वेगवेगळ्या टीम बनवल्या.त्यानंतर AI मुळे त्यांच्या कामात झालेल्या बदलांचा अभ्यास केल्यावर जे फरक लक्षात आले ते असे आहेत. १.स्मरणशक्तीचा र्‍हास: ChatGPT वापरणार्‍या ८३% लोकांना काही मिनिटांपूर्वी जे लिहिलं त्यातलं एकही वाक्य आठवत नव्हतं. ज्यांनी AI वापर केला नव्हता त्यांची स्मरणशक्ती पूर्ववत होती. २. एखाद्या विषयावर आपण लिहायला सुरुवात केली की मेंदूची विविध वेगवेगळी केंद्र स्वतःच एकमेकांना जोडतात आणि कन्टेन्ट तयार करतात.थोडक्यात संपूर्ण मेंदू सजग राहतो.सतत ChatGPT वापरणार्‍यांना ४७ % लोकांमध्ये ही मेंदूची कार्यक्षमता कमी होत गेली. ChatGPT वापरणं थांबवल्यावरही हा परिणाम आहे तसाच राहिला. ३. शिकण्याची इच्छा कमी होत जाणे : एखादे काम हातात घेतल्यावर मेंदू त्यावर विचार करतो,अनेक पर्याय वापरतो, नव्या कल्पना पुढे आणतो. अर्थातच कामाला लागणारा वेळ वाढतो.ChatGPT वापरणार्‍या ३३% लोकांची कामं वेगाने झाली पण त्यांच्या मेंदूने शिकण्याचे प्रयत्न थांबवले **** आता काही सकारात्मक प्रयत्न बघा : AI चा वापर बंद करणे हा उपाय नाही.आवश्यक असेल तेव्हाच ChatGPT वापर केला तर स्मरणशक्ती आहे तशीच कायम राहते .मेंदू आधीसारखाच कार्यरत राहतो आणि AI जोड मिळाल्याने आणखी जोरात कामाला लागतो. **** आता नक्की काय करायचे ते बघा. १ कामाची सुरुवात AI वापरून करू नका.तुमच्या मेंदूला नेहेमीप्रमाणेच काम करू द्या. ते झाले की संपादन करणे - अधिक माहितीचा योग्य वापर करून विस्तार करणे - अनावश्यक भाग गाळून टाकणे यासाठी AI चा वापर करा. AI चा वापर मदतनीस म्हणून करा.आपल्याऐवजी काम करणारी व्यक्ती म्हणून AIचा वापर करू नका. २ आतापर्यंत अशा AI सारख्या साधनांचा वापर कोणत्याही मानवी मेंदूने केला नव्हता.त्यामुळे जुनी कौशल्ये विसरण्याचा धोका वाढतो. उदाहरणार्थ: आपण की बोर्डचा वापर करून टायपाला सुरुवात केली आणि हातानी लिहिण्याची क्षमता कमी होत गेली. तुमचेच काही वर्षांपूर्वीचे हस्ताक्षर आणि आताचे हस्ताक्षर या दोन्हींची तुलना करून बघा.फरक तुमच्या लक्षात येईल.फोटोचा वापर वाढल्यावर निरिक्षण करण्याची नैसर्गिक प्रवृत्ती कमी झाली.आधी एखादा पत्ता लक्षात ठेवण्यासाठी आपण म्हणजे आपला मेंदू वेगवेगळ्या खूणा आपोआप लक्षात ठेवायचा.GPS वापरायची सवय झाल्यावर खूणांसकट रस्ता लक्षात ठेवण्याची क्षमता कमी झाली. सांगायचा मुद्दा असा आहे की कामासाठी फक्त AI चाच वापर केला तर मेंदू त्याच्याच आधीन जाण्याची शक्यता आहे. ३ थोडक्यात कामाची सुरुवात AI ने करू नका- मेंदूला त्याचे काम करू द्या. AI चा उपयोग जाणिवपूर्वकच करा.केलेल्या कामावर शेवटचा हात फिरवण्याची जबाबदारी AI ला द्या. थोडक्यात आवश्यकता नसेल तेव्हा केवळ वेळ वाचावा म्हणून AI चा वापर केला तर नैसर्गिकरित्या काम करण्याची क्षमता घटत जाण्याची शक्यता आहे. **** आता बोभाटाचे मुख्य काम कन्टेन्ट तयार करण्याचेच आहे म्हणून आम्हीही काही उपक्रम सुरु केले आहेत ते असे : १ मराठी - इंग्रजी- हिंदी या भाषा वगळता इतर भाषेतला काही मजकूर असेल तर फक्त भाषांतरासाठी AI चा वापर करतो. २ बोभाटाच्या संग्रहात असलेल्या ३०००+ पुस्तकांतून संदर्भ शोधून काढण्यावर भर देतो. ३ स्मरणशक्तीचा र्‍हास होऊ नये म्हणून रोज एखादी कविता -गाणे पाठ करून बघतो. ४ मिटिंग सुरु असताना पेन- कागद वापरून नोट्स लिहून घेतो. ५ दिवसभरात कधीही एखादी रँडम गोष्ट- घटना -शब्द आठवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही असे काही प्रयोग करता का ? आम्हाला नक्की सांगा #🎭Whatsapp status
🎭Whatsapp status - Ai Ai - ShareChat
आज खुप कंटाळा आला.. प्रोजेक्ट पण नुकताच संपला होता.. म्हणून मग आज लवकर घरी निघालो.. तेवढंच घरच्यांना सरप्राइज.. घरी जाताना पिल्लांसाठी भेळ आणी spdp घेउन गेलो.. बायको यायची होती.. जरा निवांत बसुन टीवी बघितला तेवढ्यात मुलं आली.. " काय वडिल, आज लवकर?" माझ्या 12 वर्षांच्या अनय ने विचारलं.. खुषीत असला की तो अशीच हाक मारायचा.. धाकटा 6 वर्षाचा निर्मय मात्र फुरंगटलेला वाटला.. गोबरे गाल लाल झाले होते..रडल्याच्या खुणा होत्या डोळ्यात.. मी काही विचारणार एवढ्यात अनयने " डोंट वरि , मी बघतो " अशा अर्थाची खुण केली आणी दोघं त्यांच्या रुम मधे गेले त्या दोघांसाठी डिश मधे भेळ घेउन गेलो तर धाकट्याच्या मुसमुसण्याचा आवाज आला.. मी आत जाणार तेवढ्यात मला त्यांचं बोलणं कानावर पडलं.. अनय : काय झाल निरु? का रडतो आहेस? काय झाल school मधे? निर्मय: ( खुप चिडून) एकदा सांगितलं ना तुला मी, माझ्या मित्रांनी चिडवलं मला.. अनय : अरे पण का चिडवलं? निर्मय:मी नाही सांगणार तुला.. अनय: अरे तु सांगितल नाहिस तर मी ओरडणार कसं त्या मुलांना उद्या? निर्मय: त्यांना कशाला ओरडायचं, ते बरोबर बोलतात.. अनय: अरे पण काय बोलतात ते तर सांग निर्मय: आधी तु प्रॉमिस कर, तु आई बाबाना सांगणार नाहिस? ( इथे माझी उत्सुकता वाढली आणी मी अधिकच seriously ऐकू लागलो) अनय : प्रॉमिस.. निर्मय: ते म्हणतात, तुझी मम्मा तुझ्यावर प्यार नाही करत.. त्यांच्या मम्मा सारखं ती घ्यायला येत नाही, Teacher ला येउन विचारत पण नाही की निर्मय कसा आहे studies मधे .. सगळ्यांच्या मम्मा येतात.. अनय: हात्तिच्या एवढच ना, आता मला सांग , तुला कोण व्ह्यायचय मोठा झाल्यावर? निर्मय: मला..उम्म्म्म्ं...Pilot.. अनय: ओके, मग सांग तु airoplane चालवायला शिकलास आणी मग तुला घरी च रहायला सांगितल तर तुला चालेल का? (छोटा फुल्ल confused..) निर्मय: अजिबात नाही.. अनय: मग आपली आई एवढी शिकल्ये छान, तीच स्वतःच क्लिनिक आहे.. मग तिला तुझ्यापाशी सारखं घरी राहू देत का? (निर्मय आता विचार करु लागला..) अनय: आणी आपली आई कशाला सारखं टीचर ला जाऊन विचारेल,तो studies मधे कसा आहे, तिच तर आपला अभ्यास घेते ना? तुझ्या friends सारखी tution थोडीच आहे आपल्याला.. (निर्मयला आता हळूहळू पटायला लागलं) अनय: आणी ती आपल्याला प्रोजेक्ट मधे किती हैल्प करते, केवढे printouts काढून आणते क्लिनिक मधून, म्हणून तर तुझा प्रोजेक्ट नेहमी छान होतो ना? निर्मय: हो दादू.. मग हे सगळं मी माझ्या friends ना सान्गू का? अनय: बिनधास्त... मला बघुन आता निर्मय ने साद घातली " काय वडिल, भेळ आणलीत वाट्त?" माझे डोळे मात्र , नकळत शहाण्या समजूदार आणी खरोखरीच मोठ्या झालेल्या माझ्या लेकराला नजरेनेच धन्यवाद देण्यात गुंतले होते सायली साठे ™️©️ #🎭Whatsapp status
एका संध्याकाळी, नवरा दरवाज्यातूनच सहज म्हणाला, “ऐक ना, मी थोडा वेळ मित्रांसोबत बाहेर जातोय.” कपडे घड्या घालत बसलेली त्याची पत्नी फक्त वर पाहत म्हणाली, “ठीक आहे. मजा करा.” तो थोडा चकित झाला. नेहमी ती त्याला लवकर परत ये, सावधपणे गाडी चालव, उशीर करू नको—असे काहीतरी सांगायची. पण त्या दिवशी काहीच नाही — ना सुस्कारा, ना प्रश्न, फक्त शांत “ठीक आहे.” काही तासांनी त्यांचा किशोरवयीन मुलगा किचनमध्ये आला. हातात एक कागद आणि चेहरा फिक्का. “आई,” तो हळू आवाजात म्हणाला, “माझे मॉक परीक्षेचे निकाल आले… आणि ते खूप वाईट आहेत.” तो थिजून उभा राहिला, कारण त्याला नेहमीप्रमाणे ओरडा होईल अशी खात्री होती. आईला त्याच्या अभ्यासाची खूप काळजी, म्हणून आज पुन्हा ‘वेळ वाया घालवला’, ‘क्षमता वाया घालवत आहेस’ अशी भाषणे ऐकायला मिळतील — अशी त्याची तयारी होती. पण त्याऐवजी ती शांतपणे म्हणाली, “ठीक आहे.” तो विस्फारलेल्या डोळ्यांनी म्हणाला, “फक्त… ठीक आहे?” “हो,” ती प्रेमाने म्हणाली. “जास्त अभ्यास केलास तर पुढच्या वेळी चांगले होईल. नाही केला तर सेमिस्टर रिपीट करावा लागेल. तुझा निर्णय. मी दोन्ही परिस्थितीत तुझ्या पाठीशी आहे.” तो हैराण झाला. आई एवढी शांत कधी झाली? दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांची मुलगी घाबरतच घरात आली. हॉलमध्ये थोडं थबकून ती म्हणाली, “आई… मी… मी कारला धडक दिली. फार मोठं नाही, पण डेंट पडलाय.” आईने ना ओरडले, ना रागावली, काहीच नाही. ती फक्त म्हणाली, “ठीक आहे. उद्या गाडी वर्कशॉपमध्ये देऊन टाक.” मुलगी थिजलीच. “तुला… राग नाही?” आईने मंद स्मित केले. “नाही. रागावल्यानं कार परत नीट होणार नाही. पुढच्या वेळी जपून चालव.” आता घरातील सगळेच चिंतित झाले. ही स्त्री — त्यांची पत्नी, त्यांची आई — पूर्वीसारखी राहिली नव्हती. ती कधी तापट, पटकन तणावात येणारी, पटकन बोलून जाणारी होती. आता मात्र शांत, स्थिर, अगदी प्रसन्न दिसत होती. ते एकमेकांत कुजबुजायला लागले — काही बिनसले आहे का? तब्येत बरी नाही का? काही घडले आहे का? शेवटी त्या संध्याकाळी, सगळ्यांनी तिला किचनच्या टेबलाजवळ बसवले. “ऐक,” नवरा म्हणाला, “तू अलीकडे खूप बदलली आहेस. काहीच होतंय तरी तुझा राग येत नाही, तू प्रतिक्रिया देत नाहीस. सगळं ठीक आहे ना?” ती त्याच्या चेहऱ्यांकडे पाहत हसली. “काहीच बिनसलं नाही,” ती म्हणाली. “सगळं अगदी योग्य चाललंय. मला फक्त एक गोष्ट समजली आहे.” ते सगळे शांत झाले. “खूप वर्षांनी लक्षात आलं,” ती म्हणाली, “की प्रत्येकजण स्वतःच्या आयुष्यासाठी स्वतःच जबाबदार असतो.” नवरयाने भुवया उंचावल्या. “काय म्हणायचंय तुला?” ती हात जोडून म्हणाली, “मी आधी प्रत्येक गोष्टीची चिंता करायची. तू उशीर केलास तर काळजी, मुलांचे मार्क कमी आले तर अपराधीपणा, काही तुटलं तर राग, कुणी नाराज झालं तर ते ठीक करण्याची धडपड. मी सगळ्यांच्या समस्या माझ्या मानायचे. पण एक दिवस लक्षात आलं — माझ्या काळजीने त्यांची समस्या सुटत नाही. फक्त माझी शांतता नष्ट होते.” मुलगी शांतपणे ऐकत होती. ती पुढे म्हणाली, “माझ्या तणावाने तुम्हाला काही फायदा होत नाही. माझी धडपड तुमचं आयुष्य सोपं करत नाही — फक्त माझं कठीण करते. मी तुम्हाला सल्ला देऊ शकते, प्रेम देऊ शकते, साथ देऊ शकते. पण तुमचं आयुष्य मी तुमच्यासाठी जगू शकत नाही. तुम्ही घेतलेल्या निर्णयांचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतात — चांगले असोत वा वाईट.” ती क्षणभर थांबली आणि पुन्हा हसली. “म्हणून मी ठरवलं — जे माझ्या नियंत्रणात नाही ते नियंत्रित करण्याचा प्रयत्नच करणार नाही.” मुलगा पुढे झुकत विचारला, “म्हणजे… तुला आमच्याबद्दल काहीच वाटत नाही?” ती डोके हलवत म्हणाली, “अगदी वाटतं. पण चिंता करणे आणि नियंत्रण ठेवणे यात फरक असतो. मी तुमच्यावर माया करू शकते, पण त्यासाठी माझी शांतता हरवू नये.” घरात शांतता पसरली. ती तिघांकडे प्रेमाने पाहत म्हणाली, “माझं काम — तुम्हांला प्रेम देणं, मार्गदर्शन करणं, आणि गरज पडली की तुमच्या पाठीशी उभं राहणं. पण तुमचं काम — स्वतःचं आयुष्य स्वतः हाताळणं. निर्णय घेणं. त्यांचे परिणाम भोगणं. तसंच प्रत्येकजण मोठा होतो.” ती शांतपणे मागे रेलून म्हणाली, “म्हणून आता काही चुकीचं झालं तरी मी स्वतःला आठवण देते — हे माझं दुरुस्त करण्यासारखं नाही. मी शांत राहीन. तुम्ही यातून शिकाल यावर विश्वास ठेवेन. कारण जीवन असंच असतं — धडे शिकवंत.” थोडा वेळ घरात संपूर्ण शांतता होती. वातावरण मात्र बदललं होतं. नवरयाने तिचा हात हातात घेत म्हणाला, “तू आज आम्हा सगळ्यांना काहीतरी शिकवलंस.” ती हसली. “कदाचित. पण हे मला स्वतःलाच आधी शिकावं लागलं.” त्या रात्री सगळ्यांनी तिच्या शब्दांवर विचार केला. मुलगा पुन्हा अभ्यासाला बसला — आई ओरडली म्हणून नाही, पण जबाबदारी त्याची आहे हे त्याला जाणवलं म्हणून. मुलीने स्वतःच कारची दुरुस्ती ठरवली आणि इन्शुरन्सची प्रक्रिया समजून घेतली. नवरा पुढच्या वेळी बाहेर जाताना स्वतःहून फोन करून सांगू लागला — कारण ती सक्ती करत होती म्हणून नाही, तर त्याला तसं करावंसं वाटलं म्हणून. आणि हळूहळू घर हलकं वाटू लागलं. कोणीही भीतीने नाही तर समजुतीने वागू लागले. कोणीही कशावर ओरडा होईल या कल्पनेने दडपून राहत नव्हते. कारण घरातला एक जरी माणूस शांतता स्वीकारतो, तर ती शांतता सगळ्यांत पसरत जाते. एक जण नियंत्रण सोडतो, आणि बाकी लोक स्वतःला नियंत्रित करायला शिकतात. आणि अशा प्रकारे — शांतता संसर्गासारखी पसरते. #🎭Whatsapp status
रात्री स्वयंपाकघरात येऊन सासूबाईंनी सुनेला विचारलं, “अग ऐक ना, मी राहुलला जिलेबीं आणायला सांगितलं होतं… आणली का त्यानं?” सुन म्हणाली, “नाही हो आईसाहेब… ते विसरले बहुतेक.” सासूबाईंचा चेहरा उतरला… कालपासून दिवसभर जिलेबीची तल्लफ लागली होती. मुलाला फोन केला होता… पण तो विसरूनच गेला. सुन मग खोलीत जाऊन नवऱ्याला म्हणाली, “तुमच्या आईनं तुम्हाला जिलेबीं आणायला सांगितलं होतं… मग का नाही आणली?” राहुल म्हणाला, “अगं, खरंच विसरलो यार… आईला सांग ना, उद्या टुरला जातोय, परत आलो की घेऊन येतो.” बायको म्हणाली, “तुम्हीच बोला ना… आईसाहेब रागात आहेत, जेवणसुद्धा नाही घेतलं.” राहुल आईच्या खोलीत गेला… पाहतो तर आई झोपलेली… त्याने हलकेच ‘सॉरी’ म्हटलं, जेवून घे म्हणून खूप विनंती केली… पण आईनं एक शब्दही बोलला नाही. सकाळी चार वाजता राहुल टूरसाठी उठला, तर स्वयंपाकघरातून जेवणाचा सुगंध यायला लागला… आत जाऊन पाहतो तर आई त्याच्यासाठी नाष्टा बनवत होती! त्याला पाहताच म्हणाली, “नाष्टा करून जा हो… आणि बाहेरचं काही खाऊ नकोस. टिफिन बनवलंय, घेऊन जा आठवणीने.” राहुल बाथरूममध्ये जाऊन रडला… आईनं पहिल्यांदाच त्याला काही मागितलं होतं… आणि तो विसरला. आई मात्र कधीच विसरत नाही… मुलगा बाहेर जायचा म्हटलं की अर्ध्या रात्री उठूनही त्याच्यासाठी जेवण करते. त्याने मनोमन ठरवलं— आईला पुन्हा कधीही राग येऊ देणार नाही. मोरल :- ती आई आहे… आई कधीच विसरत नाही ❤️ तिच्या मुलांच्या आनंदासाठी रात्र-दिवस एक करते. आईचा नेहमी मान ठेवा, काळजी घ्या. आईवर प्रेम असेल तर शेअर करा… लव्ह यू आई ❤️🙏 #आई
#श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏 - ShareChat