🥘साउथ इंडियन
☕☕☕☕🌺शुश संध्या 🌺☕☕☕☕☕ 🌹🌹🌹🌹👉खास आपल्यासाठी 👈🌹🌹🌹🌹 मसाला डोसा साहित्य: डोसा साठी: • १ कप उडीद डाळ • अडीच ते पाऊणेतीन कप तांदूळ • १/२ कप चणा डाळ • १/२ टिस्पून मेथीदाणे • चवीपुरते मीठ मसाला : • २ उकडलेले मोठे बटाटे • १ मध्यम कांदा, उभा तापळ चिरून • १ टिस्पून उडीद डाळ • २-३ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून • ५ ते ६ कढीपत्ता पाने • १/२ टिस्पून किसलेले आले • फोडणीसाठी: • २ टिस्पून तेल, • १/८ टिस्पून मोहोरी, • १/२ टिस्पून जिरे, • चिमूटभर हिंग, • १/४ टिस्पून हळद कृती: • उडीद डाळ आणि तांदूळ वेगवेगळे धुवून, ६-७ तास पाण्यात भिजत ठेवावे. उडीद डाळी बरोबरच मेथी दाणे आणि चणा डाळ भिजवावी. • नंतर त्यातील पाणी काढून टाकून मिक्सरवर वेगवेगळे बारीक वाटून घ्यावे. तांदूळ वाटताना त्यात १ टिस्पून साखर आणि १ टिस्पून मिठ घालावे. वाटलेली डाळ आणि तांदूळ एकत्र करावेत. मिश्रण अगदी घट्ट किंवा अगदी पातळ करू नये. मिश्रण चांगले मिळून आले पाहिजे. • वरुन झाकण ठेवून १० ते १२ तास मिश्रण आंबू द्यावे. मिश्रण आंबले कि नंतर त्यात चवीपुरते मीठ घालून ढवळून घ्यावे. याच पिठाच्या इडल्याही करता येतील. म्हणून मिश्रण घट्टसरच ठेवावे. डोसे बनवण्यासाठी आंबलेले पिठातील थोडे पिठ दुसर्‍या भांड्यात काढावे आणि किंचीत पाणी घालून पातळ करावे. • डोसे घालण्यासाठी नॉनस्टीक तवा वापरावा. आमटी वाढायच्या पळीने डोसे नीट घालता येतात. मसाला/ बटाटा भाजी • शिजलेले बटाटे अगदी बारीक चिरून घ्यावे. कांदा बारीक उभा चिरून घ्यावा. • नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये २-३ चमचे तेल गरम करावे. मोहोरी, जिरे, हिंग, हळद, आले घालून फोडणी करावी. त्यात थोडी उडीद डाळ घालावी. मिरच्या बारीक चिरून घालाव्या. कढीपत्ता घालावा. • मध्यम आचेवर कांदा परतावा. चिरलेला बटाटा घालून परतावे. चवीपुरते मिठ घालावे. कोथिंबीर घालावी. डोसे गरमागरम सांबार आणि चटणीबरोबर सर्व्ह करावे. #🥘साउथ इंडियन #🥪आजचा नाष्टा #🍲रेसीपीज् #🤤आम्ही खादाडी
#

🥘साउथ इंडियन

🥘साउथ इंडियन - मसाला डोसा - ShareChat
16.7k जणांनी पाहिले
5 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post