📢25 ऑक्टोबर अपडेट्स🔴
150 Posts • 1M views
#😱ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हॉस्पिटलमध्ये दाखल Dharmendra Hospitalised: ‘बॉलिवूडचे ही-मॅन’ धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra Hospitalised) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (breach candy hospital) दाखल करण्यात आले आहे. 89 वर्षीय धर्मेंद्र सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. प्राथमिक माहितीनुसार, ही फक्त नियमित वैद्यकीय तपासणी (रुटीन चेकअप) असून, काळजी करण्यासारखे काहीही कारण नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. रुग्णालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांची तब्येत स्थिर आहे. डॉक्टरांच्या टीमने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. चाहत्यांनी मात्र सोशल मीडियावरून त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना सुरू केली आहे. “आमचे ही-मॅन लवकर बरे व्हावेत,” अशा भावना विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्यक्त केल्या जात आहेत. Dharmendra Hospitalised: धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती धर्मेंद्र यांना याआधीही काही वेळा आरोग्याच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल व्हावं लागलं आहे. 2022 मध्ये स्नायू ताणामुळे त्यांना काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागले होते. त्या वेळी त्यांनी स्वतः एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना आपल्या तब्येतीबद्दल माहिती दिली होती आणि काळजी न करण्याचं आवाहन केलं होतं. वयाची ऐंशी पार केली असली तरी धर्मेंद्र अजूनही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं होतं. डिसेंबर महिन्यात धर्मेंद्र 90 वर्षांचे होणार आहेत. सध्या धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. #😱ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हॉस्पिटलमध्ये दाखल #😱ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हॉस्पिटलमध्ये दाखल #📢25 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #ब्रेकिंग न्यूज #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🎭Whatsapp status
574 likes
7 comments 328 shares