🌻 *li.आनंदी°दीवस.il* 🌻
*शाश्वत सुखाच्या नवरात्रीची*
*मुंबादेवीच्या मुंबापुरीतून*
*आजचा रंग..राखाडी 🩶*
*आजची नवदुर्गा..कात्यायनी*
*कात्यायनी महामाये,*
*महायोगिन्यधीश्वरी ।*
*नन्दगोपसुतं देवी,*
*पति मे कुरु ते नमः ॥*
*नवरात्र आनंद पर्व सुरु आहे. सध्या नऊ दिवस कन्या पूजनाचा सुखद.. अनुपम.. अवर्णनीय आनंद बालिकाच नाहीतर घरातील सारेच अनुभवत आहेत. देवीच्या कृपेने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत आहेत. इच्छापूर्ती करणे ही आदिमातेची ख्याती. पण त्यासाठी तेवढी उपासना हवी.*
*कात्यायन हे विश्वप्रसिद्ध महर्षी.
#आजचा रंग राखाड़ी त्यांनी देवीच्या कृपेसाठी कठोर तप केले. देवीनी आपल्या घरी कन्या रूपात जन्म घ्यावा ही त्यांची मनोकामना देवीने पूर्ण केली. आजही सर्वच कन्याना देवीस्वरूप मानल्या जाते. आपल्याला किमान एक तरी कन्या असावी ही सर्वांची इच्छा असते. महर्षी कात्यायन यांची कन्या म्हणून देवीचे नाव आहे कात्यायनी. नवरात्रात आजचा दिवस कात्यायनी नवदुर्गेच्या पूजनाचा.*
*या देवीच्या कृपेने धर्म, अर्थ.. काम, मोक्ष प्राप्ती होते. पापापासून मुक्ती देणारी.. अभय देणारी, शोक.. संताप.. भय नष्ट करणारी अशी ही कात्यायनी देवी*
*या देवीच्या उपासनेने मुलींची लग्न होतात. त्यांना मनोवांछित वरप्राप्ती होते. कात्यायनी देवीला पिवळ्या रंगाची फुले वाहतात, मध तसेच पिवळ्या रंगाच्या पदार्थाचा नैवेद्य अर्पण करतात. अमोल फलदायीनी कात्यायनी देवीची रुपे तुळजापूर.. कोल्हापूर तसेच कन्याकुमारी येथे आहेत.*
*मुंबई.. इथं विराजमान आहे मुंबादेवी. मुंबई हे जगातील असे महानगर जिथे तुम्ही जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात असा तुमच्या गुणांचे चिज होते. इथे सगळ्या विद्या.. कला.. क्रिडा गुणांना प्रतिष्ठा.. यश आहे. इथे कष्टाने प्रत्येकाला लवकर श्रीमंत होण्याची संधी आहे. इथे "कधी कुणी उपाशी राहणार नाही" असे वरदानच या महानगरीला मुंबादेवी कृपेने प्राप्त आहे.*
*इथे ही मुंबादेवी लक्ष्मी.. अन्नपूर्णा.. जगदंबा स्वरुपात विराजमान आहे. मुंबादेवी जनतेच्या उदरनिर्वाहाचीच काळजी करते असे नाही, तर महानगरीचे संरक्षणही करते. इथे मुंबादेवीचे मंदिर ४०० वर्षे जुने आहे. एवढेच नाही तर समुद्र किनारी महालक्ष्मीचे २५० वर्षे जुने मंदिरही प्रसिध्द आहे.. भाविकांचे श्रद्धास्थान आहे.*
*मुंबई हे लक्ष्मीचे माहेर घर असल्याने तिला देशाची आर्थिक राजधानीचा सन्मान प्राप्त आहे. मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता असल्याने मुंबईकर शुभकार्य प्रसंगी पहिले तिचे स्मरण करतात.*
*महालक्ष्मीची कृपा लाभली की जीवन सुरळीत चालते. आपणा सर्वांवर महालक्ष्मी कृपा निरंतर राहो, यासाठी नवरात्रात या परब्रह्म रुपिणी, दुःख निवारिणी, त्रिपुरसुंदरी महालक्ष्मीचे स्तवन करुया.*
*परब्रह्म रूपिणी माते*
*महालक्ष्मी जय जय जय*
*सुखकारिणी भव दुु:ख निवारिणी*
*पाप विनाशिनी जय जय जय*
*ब्रह्मादिक तुज ध्याती*
*गुण संकिर्तन करिती*
*सुरवर अवघे संकट काळी*
*तुझ्याच नामे तरती*
*भक्तजनावर निज छाया धरी*
*हे भुवनेश्वरी जय जय जय*
*रत्नमण्यांची कांती*
*राजस वदनावरती*
*गरुडारूढ जगन्मातेची*
*भव्य शोभते मूर्ति*
*बैस येऊनी ह्रदय आसनी*
*हे जग जननी जय जय जय*
*प्रणव रूपिणी जय जय जय*
*त्रिपुरसुंदरी जय जय जय*
*मूलाधारनिवासिनी जय*
*महालक्ष्मी जय जय जय*
*गीत : पारंपारिक*
*संगीत : यशवंत देव*
*स्वर : उषा मंगेशकर*
🎼🎶🎼🎶🎼 🎧
*‼️या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता‼️*
*‼️नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः‼️*
*या विश्वात लक्ष्मी रूपात सर्वत्र वास करणाऱ्या देवी मातेला आमचा त्रिवार नमस्कार.*