▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
*🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
*३० सप्टेंबर इ.स.१६५९ स्वराज्यावर चालून आलेला आदीलशाही सरदार 'अफजलखान' याने १२ मावळ मधील रोहीड खोरेचे वतनदार आणि स्वराज्याशी कायम असणारे "कान्होजी जेधे" यांचे सुपुत्र व छत्रपती श्री शिवरायांचे बालमित्र "शिवाजी जेधे" यांना स्वराज्याच्या विरोधात जाण्यासाठी पत्र पाठवले. पण "शिवाजी जेधे" यांनी ते धुडकावून लावले आणि महाराजांसमोर मुजरा करण्यास हजर झाले.*
*🚩३० सप्टेंबर १६६५ शिवरायानी औरंगजेबाचे फर्मान स्विकारले.बादशाही फर्मानाचा शिवरायाकडुन स्विकार! जुन१६६५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मुघलाशि पुरंदराचा तह झाला त्यानुसार ४ कलमे करण्यात आली. त्यातल्या एका कलमानुसार संभाजी राजाना मुघलाची पाच हजारी मनसबदारी मिळाली.*
*तसेच छत्रपती शिवाजी महाराजाने त्याच्या ताब्यातले २३ किल्ले मुघलाना द्यायचे आणी १२ स्वतः जवळ ठेवायचे असे ठरले. मात्र या पुरंदर तहाला मान्यता देनारे औरंगजेबाचे फर्मान येणे बाकी होते.*
*🚩२७ सप्टेंबर१६६५ ते फर्मान मिर्जाराझ्याच्यां छावणी जवळ आले याची बातमी आधिच येऊन थडकली . महाराज आधिच येऊन पोहोचले होते. अशा प्रकारच्या फर्मानावर मुघल बादशहा उगाळलेल्या गंधात त्यांचा पंजा बुडवुन तो त्या फर्मानावर उमटवत असे. बादशहाच्या विशेष क्रपेचे ते धोतक असे त्यामुळे ,त्या फर्मानाला फार महत्व असे. अशा प्रकारे शाही फर्मान स्विकारण्याची पद्धत होती. पुढीलप्रमाने:- फर्मानाचे स्वागत करण्यासाठी एक स्वतंत्र मडप उभारला जाई. फर्मान घेऊन आलेले बादशाही गुर्झबदाय ३-४ कोस आलिकडेच त्या माडंवात फर्मानवाडीत थांबत .मग ज्याच्या नावे ते फर्मान असेल त्यानें लवाजमा घेऊन पाई अनवानी चालत त्या फर्मानासमोर जायायचे . पत्रवाहक गुर्झबदार फर्मान घेउन उभा राहि आणि फर्मान स्विकारणार्यानी नम्रपणे ते ओजंळीत घ्यायचे व पुन्हा अनवाणी ३-४ कोस पाई वाजत गाजत त्याच स्थितीत पोहचायचे . तिथे मुळ ठिकानी परतल्यावर मग पोशाख नजराने वैगैरे सोहळा संपन्नव्हायचा .ही होती बादशाही फर्मान स्विकारण्याची पद्धत.*
*🚩३० सप्टेंबर इ.स.१६६६ औरंगजेबाने पाठवलेले आग्रा भेटीचे फर्मान छत्रपती श्री शिवरायांनी स्विकारले.*
*३० सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती श्री शिवरायांनी मद्रास गव्हर्नरकडे तोफा व इंजिनिअर्सची मागणी केली.*
*🚩३० सप्टेंबर इ.स.१६६७ ऐतिहासिक किल्ले पुरंदरच्या तहामध्ये महत्वाची कामगिरी बजावलेला औरंगजेबाचा राजपूत सरदार "मिर्झा राजा जयसिंग" यांचं निधन.*
*❀━❀┅━❀━❀━❀━❀━❀━❀━❀━❀━*
*~जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ~*
*❀━❀┅━❀━❀━❀━❀━❀━❀━❀━❀━* #🙏शिवदिनविशेष📜