#😱भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी शहर हादरले🔴 रशियाच्या पूर्वेकडील कमचटका बेटाच्या किनाऱ्याजवळ आज सकाळी भूकंपाचा तीव्र झटका जाणवला. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार, या भूकंपाची तीव्रता ७.४ रिक्टर स्केलवर नोंदवली गेली आहे. त्याचा केंद्रबिंदु कमचटका शहरापासून सुमारे १११ किलोमीटर पूर्वेकडे उत्तर प्रशांत महासागरात आहे. पहाटे २.३७ मिनिटांनी झालेल्या या भूकंपामुळे रशियातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.