lahuji
14 Posts • 17K views
भारतात #क्रांतिपिता या नावाने लौकिक मिळवणारे महान नेतृत्व म्हणजे राघोजी_साळवे! आपल्या कार्यकाळात लहुजी यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी इ.स. १८२२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र नाना रास्ते सरदार यांच्या हस्ते सुरू केले. त्यांच्या या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले.त्यांचे हे योगदान विसरता येणे शक्य नाही ! ब्रिटिश राजवटी विरुद्ध सशस्त्र लढा उभारणारे, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #जय लहुजी 🙏 #आद्यक्रांतीगूरु लहूजी वस्ताद साळवे💐💐💐 #lahuji #jai lahuji #🙏 प्रेरणादायक बॅनर
59 likes
47 shares