चल दिवस आजचा कृष्ण मी गं होतो
आज एकदा बघ तेव्हाचीच राधा होऊन तु
गोकूळ अवतरेल सहज ह्या कलियुगात
युगे लोटली कैक तरिही तोच मी तीच तु
शृंगारात तुझ्या न् न्याहाळण्यात माझ्या
पाहतो तर दिसतेस अगदी कालचीच तु
डोक्यावर माट, माटात दूध दही लोणी नाही
छेडछाड मस्करीत रुसणारी आजही राधा तू
मोर मुकूट कंठी अन् बासूरी दिसतही नसेल
ह्रदयात अन् मम शब्दांत आजही सजतेस तु
तेंव्हा तासंतास डोळ्यात तुझ्या हरवून जाणं
येता जाता मम नजर शोधते ती असतेस तु
काल-परवाच्याच त्या भेटी युगे गेली कोटी
स्फुरण जोष प्रेरणा गती उन्नती स्पंदनही तु
आज एकदा पुन्हा राधा हो मला कृष्ण होवूदे
युगानुयुगे हा एक विचार तया साथ देशील तू !?
***आबा पेडणेकर***
#🎭Whatsapp status #🌹प्रेमरंग #krushn jnmashatmi #🌹राधा कृष्ण #shri krushn janma🙏