हॅप्पी न्यू इयर
13 Posts • 498K views
Mr. Vik@s
1K views 23 days ago
#हॅप्पी न्यू इयर हरि ॐ🚩 जीवनात आज आंग्ल नववर्षाचा शुभारंभ. नवे कॅलेंडर.. त्यावरची ही पहिली रम्य पहाट. सूर्यदेव आपल्या जीवनात नित्य 'आनंदी पहाट' घेऊन येवो. गत वर्षातील अपूर्ण मनसूबे नववर्षात पूर्ण होवोत. आपल्या घरी भक्तिमय मंगल वातावरण राहो.. आपल्या घरी मंगल कार्य घडोत. आपल्या परिवारात सर्वांना निरामय आरोग्य लाभो. देशात शांतता नांदो. देश सर्वच क्षेत्रात प्रगतीची शिखर गाठत राहो, हीच आंग्ल नववर्ष शुभकामना ‼️ 🏵🔆🍃🌸🙏🌸🍃🔆🏵 आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतोऽदब्धासो अपरीतास उद्भिदः। देवा नोयथा सदमिद् वृधे असन्नप्रायुवो रक्षितारो दिवेदिवे॥ ... ऋग्वेद आज आंग्ल नववर्ष प्रारंभ. जग कल्याणासाठी आमची हीच प्रार्थना की, सर्व दिशांनी आमच्याकडे सकारात्मक.. उदात्त.. आनंदी.. प्रेरणादायी विचार येत राहोत. निर्भयतेने आमच्याकडून जगकल्याणार्थ कार्य घडो. प्रगतीपथावर जाण्यासाठी देव आमचे नित्य रक्षण करोत. भारत.. इथे श्रद्धावान राहतात. त्यांना ज्ञानप्राप्ती होते. आदि अनादी काळापासून असलेली ही भूमी. प्रभू श्रीराम-कृष्णाची, ऋषी-मुनी-संतांची, परमपवित्र, सुजलाम- सुफलाम, अविनाशी पुण्यभूमि. या भारतभूवर जन्मलेले आम्ही सारे भाग्यवंत. नदी.. सागर.. डोंगर.. जंगल.. हिरवीगार शेती, माळराने या वैभवाने नटलेल्या भारतात नित्य असते रम्य.. मनोहारी प्रसन्न पहाट. इथे पहाटेच ऐकू येतात घरोघरीचे.. मंदिरातील काकडा आरतीचे.. वेदमंत्राचे सुस्वर. तर कुठे गोठ्यातील गाईचा वासराला साद घालणारे हंबरणे, गाईच्या गळ्यातील घंटाचा नाद. चराचरात चैतन्य बहाल करायला.. ज्ञानप्रकाशाने आमचे जीवन उजळावयाला येतात सूर्यदेव. पहाटेच या सहस्त्ररश्मीचा पूर्व दिशेला सोन्याचा सुंदर ध्वज झळकतोय. त्याची सोनेरी किरणे झाडाच्या पानांवर पसरलीत. त्या किरणानी पक्ष्यांची चिलीपिल्लीही डोळे उघडून आकाशात झेपावलीत. आकाशात पक्ष्यांची गर्दी झालीय. त्यांच्या किलबिलीने आकाशात सप्तसूर ऐकू येत आहेत. पहाटे या अरुण उषेच्या मिलनावेळी प्राजक्ताने फुलांची बरसात केलीय. या नाजुक सुंदर प्राजक्त फुलांच्या हाराने आता देवादिकांच्या मूर्ती सजणार.. अधिकच सुंदर दिसणार. या वर्षाचा प्रारंभ अर्थातच घरातील देवांच्या पूजा अर्चनेने. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःख भागभवेत 🌹🌿🌷🍃🌺🍃🌷🌿🌻🍃🌾🌸🌼🌸🌾🍃🌻
9 likes
9 shares