गोड शुभेच्छा
32 Posts • 216K views
Sunil
1K views 2 months ago
खानदेशकन्या मातोश्री बहिणाबाई चौधरी यांची आज १३९ वी जयंती आहे. बहिणाबाई चौधरी जयंती (24 ऑगस्ट 1880 -03 डिसेंबर 1951) *एक अक्षर ओळख नसलेली स्त्री किती दृढ विचारसरणी ठेऊ शकते !* आपण काय करतोय... ~~~~~~~~~~~~~~~~~~ नको नको रे ज्योतिषा माह्या दारी नको येऊ। माह्य दैव मले कळे माह्या हात नको पाहू।। धनरेषांच्या चऱ्यांनी, तळहात रे फाटला। देवा तुह्याबी घरचा झरा धनाचा आटला।। नशिबाचे नऊ ग्रह तळहाताच्या रेघोट्या। बापा नको मारू थापा अशा उगा ख-या खोट्या।। *- बहिणाबाई चौधरी.* कोणतेही पारंपरिक शिक्षण न घेतलेल्या या माऊलीने दारी आलेल्या ज्योतिषाला सुमारे १०० वर्षांपूर्वी हे खणखणित सत्य, सोप्या पण परखड भाषेत सुनावलं होतं. डोके गहाण ठेवून अंधश्रध्दांपुढे सपशेल शरणागती पत्करणारी आजची तथाकथित थोर उच्चविद्याविभूषित माणसे बघतांना या माऊलीची थोरवी लख्ख होऊन समोर येते. ह्या माउलीने शंभर वर्षांपूर्वी व्यक्त केलेली खंत आजही कायम आहे. दंडवत माय ! बहिणाबाईंच्या स्मृतींना विनम्र अभिवादन ! ! #गोड शुभेच्छा #🎭Whatsapp status #बहिणाबाई चौधरी जयंती #कवियत्री बहिणाबाई चौधरी जयंती
ShareChat QR Code
Download ShareChat App
Get it on Google Play Download on the App Store
9 likes
18 shares