🌸नवमी श्राद्ध🌺
18 Posts • 229K views
*🫠ते आणि आम्ही...!* *आम्ही मातीच्या भिंती आणि शेणाने सारवलेल्या जमिनीच्या घरात रहायचो........* *'ते' सिमेंटच्या भिंती आणि चकचकीत टाईल्स लावलेल्या घरात रहायचे आणि आम्हाला गावठी म्हणायचे..* *आम्ही कोंड्याच्या रांगोळीत मीठ कापूर मिसळुन त्या पावडरने दात घासायचो.............* *'ते' चकाचक वेष्टणात मिळणा-या पांढ-या टूथपेस्टने दात घासायचे आणि आम्हाला गावठी म्हणायचे.* *आम्ही जात्यावर धान्य दळायचो आणि पाट्यावरवंट्यावर चटण्या वाटायचो...* *'ते' आयतं किंवा गिरणीवरुन पीठ दळुन आणायचे,मिक्सरात चटण्या वाटायचे ....... आणिआम्हाला गावठी म्हणायचे.* *आम्ही तांब्यापितळेच्या कल्हई लावलेल्या भांड्यातुन चुलीवर शिजवलेलं जरा धुरकट वासाचं अन्न खायचो......* *'ते' गॅसवर स्टीलच्या चकचकीत भांड्यात शिजवलेलं अन्न खायचे ..... आणिआम्हाला गावठी म्हणायचे.* *आम्ही हातसडीच्या तांदुळाचा भात आणि नाचणीची भाकरी लसणीच्या चटणीबरोबर हाणायचो...* *ते शुभ्र पांढ-या तांदुळाचा भात अन् गव्हाची पोळी तुपसाखरेबरोबर खायचे ...... आणि आम्हाला गावठी म्हणायचे.* *आम्ही घाण्यावरुन काढुन आणलेलं तेल वापरायचो....* *ते डबल रिफाइंड तेल वापरायचे ...... आणिआम्हाला गावठी म्हणायचे..* *आम्ही साधे सुती कपडे वापरायचो...* *ते टेरिलीन टेरिकाॅट वापरायचे... आणिआम्हाला गावठी म्हणायचे.* *आमच्या घरी न्हावी यायचा, मागीलदारच्या पडवीत पाटावर बसुन थोरापोरांचे केस कापायचा.....* *ते मागेपुढे आरसेवाल्या सलुनात खुर्चीत बसुन केस कापुन घ्यायचे ...... आणिआम्हाला गावठी म्हणायचे.....* . *काळ बदलला...* *"ते " करायचे त्या सगळ्या गोष्टी आता आम्ही पण करु लागलो...* . *पण आता "ते" दामदुप्पट रकमा मोजुन वीकेन्डांना आणि मन्थेंडांना मुद्दाम मातीच्या घरात रहायला जाण्याची चैन करतात.....* *चुलीवर शिजवलेलं धुरकट वासाचं (साॅरी स्मोकी फ्लेवरचं) अन्न जास्तीचे पैसे मोजुन आवडीने खातात. घरी रिफाइंड तेलाऐवजी "कोल्ड प्रेसवर काढलेलं महागडं तेल वापरतात. हौसेने नाचणीची, कोंड्याची बिस्कीटं खातात, नमकवाल्या, चारकोलवाल्या टूथपेस्टा वापरतात... महागड्या ब्रॅन्डांचे सुती कपडे वापरतात... महागड्या पार्लरमधील हेअर स्टायलिस्टस्ना घरी बोलावुन केसांचं काहीबाही करुन घेतात....* . *आणि आम्हाला गावठी म्हणतात...* 🤦🏼‍♂️😀🤦🏼‍♂️#🌸नवमी श्राद्ध🌺
ShareChat QR Code
Download ShareChat App
Get it on Google Play Download on the App Store
18 likes
9 shares
*🐦‍⬛पितरांचे साठी कावळ्याला घास किंवा नैवेद्य का ठेवतात?🐦‍⬛* एका साधकाने महापेरीयव यांना (म्हणजे श्री आदिशंकराचार्यांना) विचारले, महालयाच्या दिवशी आपण कावळ्यांकरता जेवणाचे ताट का वाढून बाहेर ठेवतो? आपले पूर्वज काय, अति नीच व घाणेरड्या अशा कावळ्यांच्या रुपात येतात? एखाद्या उच्च समजल्या जाणाऱ्या पक्षाच्या रुपात का येत नाहीत? शंकराचार्य मंद स्मित करत म्हणाले, तमिळ मध्ये कवळ्याला आपण काऽकाऽ म्हणतो. संस्कृत मधेही काक म्हणतो. आपण इतर कुठल्या पक्षाचे नाव त्याच्या ओरडण्याच्या आवाजावरून देतो का? कुणी पोपटाला किंकिं किंवा मोराला म्यांव-म्यांव असे म्हणतात का? नाही. कावाळ्यालाच त्याच्या आवाजावरून नाव पडलंय कारण खरच कावळा हा एक विशेष (special) पक्षी आहे. (तमिळमध्ये) ‘का’ चा अर्थ कापथू म्हणजे ‘माझे रक्षण कर’ असा आहे. म्हणून जेव्हा आपण कावळ्याला अन्न ठेवतो व का का असे म्हणतो, तेव्हा आपण खरे म्हणजे, आपल्या पूर्वजांना आपले रक्षण करण्याचे आवाहन करत असतो. तुम्ही कावळ्याला नीच जातीचा समजता कारण तो वाट्टेल ते घाणेरडे सुद्धा खातो, व आपल्या आजूबाजूला सहज आढळतो. पण लक्षात घ्या की तो एक सुंदर, चांगला व उपयुक्त पक्षी आहे. अहो तो आपल्याला त्याच्या कावकाव ह्या ओरडण्याने ब्राह्म मुहूर्तावर झोपेतून जागे करतो. कोंबडा पहाटे आरवतो व आपल्याला उठवतो असे म्हटले जाते. ते काही अंशी खरेही आहे. पण कोंबडे हे लहरी (मुडी) असतात. ते वेळेवर उठवतीलच असे नाही. पण कावळा मात्र तुम्हाला ब्राह्म मुहूर्तावर, अर्थात जपाकरता सर्वात उत्तम असलेल्या वेळेवर उठवणार म्हणजे उठवणार. आपली योग्य वेळी पूजा-अर्चा व्हावी म्हणून तो आपल्याला जणू मार्गदर्शन करतो. आणि एक ! त्याला थोडे अन्न मिळाले की तो ओरडून आपल्या बांधवांनाही बोलावतो. इतर प्राण्यात हा गुण आढळत नाही. खरच, माणसांनी सुद्धा हे कावळ्याकडून शिकलं पाहिजे. केवळ म्हणी पुरतं “एक तीळ सात जणांनी वाटून खावा” असे म्हणून काय उपयोग? संध्याकाळी सुद्धा कावळा काऽकाऽ करत आपल्या घरट्यात परततो. झोपण्यापूर्वी तो जणू देवाला सांगतो की दिवसभरात जे काही घडलं त्याबद्दल मी तुझा आभारी आहे. आणि तुम्हाला हे माहित आहे का की कावळा सूर्यास्तानंतर काहीही खात नाही? आपल्या शास्त्रात सुद्धा सूर्यास्तानंतर अन्न ग्रहण करणे वर्ज आहे. आता किती जण हे शास्त्रवचन पाळतात नकळे. असो. त्यामुळे मला, कावळा हा एक नीच पक्षी आहे, असे मुळीच वाटत नाही. बघा, आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींप्रमाणे, तो आपल्याला काय काय शिकवतो. म्हणून आपले पितर कावळ्याच्या रुपात येणे पसंत करतात. आणि एक महत्वाचं. तुम्ही कावाळ्याकरता रोज थोडं अन्न ठेवत जा, केवळ महालय असेल तेव्हाच असे नको. आणि हो! कावळा आपल्याला अद्वैत ज्ञान सुद्धा देतो. तुम्ही ठेवलेले अन्न दिसल्या बरोबर तो खूष होतो व आनंदाने ते अन्न खातो. त्याला खातांना बघून तुम्हीही आनंदी होता. म्हणजे तुम्ही दोघेही आनंदी होता. कारण तुम्ही दोघेही भगवान आहात. तुम्हाला काय वाटतं, आपले ऋषी-मुनी वेडे होते? आपल्या पुर्वाजांपर्यंत, आपल्या पितरांपर्यंत अन्न पोचावं म्हणून त्यांनी कावळ्यांना अन्न घालण्याची प्रथा का पाडली असेल? त्यामागे आपल्या साधुसंतांचा एक अतिशय कुशल व विशेष विचार आहे. आता ऐका ते खरं कारण. तुम्ही कधी वडाचं किंवा पिंपळाच झाड लावलय का? आणि कोणाला लावतांना कधी बघितलय का? त्यांच्या बिया मिळतात का हो? नाही ना ! फांद्या लावून पण ही झाडे जगत नाहीत. निसर्गाने यांच्याकरता एक अजब व्यवस्था निर्माण केली आहे. कावळे ह्या झाडांची बियांसकट फळे खातात. ती पचतांना, त्या बियांवर, काही विशिष्ठ प्रक्रिया घडतात. नंतर कावळ्याच्या विष्टेवाटे जिथे ह्या बिया पडतात, तिथेच ही झाडे उगवू शकतात. पिंपळ हे असे एक झाड आहे की जे चौवीस तास प्राणवायू देते, आणि वड तर एक उत्तम औषधी वृक्ष आहे. हे दोन्ही वृक्ष जर नामशेष होऊ नयेत असे वाटत असेल तर कावळ्यांशिवाय पर्याय नाही. पितृ पंधरवडा हा कावळ्यांच्या विणीचा हंगाम असतो. कावळ्यांची चांगली, सुद्रुढ नवी पिढी निर्माण होण्याकरता ह्या जुन्या पिढीला, ह्या काळात चांगले पोषक अन्न मिळाले पाहिजे. म्हणून आपल्या पूर्वजांनी हा एक कर्मकांडाचा भाग करून ठेवला आहे. जेव्हा तुमच्या नजरेस, वड, पिंपळ किंवा कावळा दिसेल तेव्हा आपल्या पूर्वजांच्या दूरदृष्टीची व चांगल्या हेतूची आठवण होऊदे... 🌳☘️🐦‍⬛🙇🏼‍♂️🐦‍⬛☘️🌳#🌸नवमी श्राद्ध🌺
ShareChat QR Code
Download ShareChat App
Get it on Google Play Download on the App Store
14 likes
12 shares
लोकमत
1K views 4 months ago
Pitru Paksha 2025: मृत्यू ते श्राद्धपक्ष; मृत्यूनंतरच्या प्रवासाबाबत काय आहे धर्मशास्त्राची संकल्पना? #🌸नवमी श्राद्ध🌺
ShareChat QR Code
Download ShareChat App
Get it on Google Play Download on the App Store
7 likes
8 shares