ब्रेकिंग न्युज
1K Posts • 2M views
#🤩17 जुलै अपडेट्स🆕 ची सजावट बोंबलली? राज्यात कृत्रिम, प्लास्टिक फुलांवर बंदी; कारण काय? गणेशोत्सव (Ganeshotsav 2025) तोंडावर आलेला असतानाच अनेकांनीच गणरायाच्या आगमनासाठी आरास नेमकी कशी असेल यासाठी अनेक कल्पना सुचवण्यास सुरुवात केली आहे. काही मंडळींनी कृत्रिम फुलांच्या सजावटीसाठीचा पर्यायसुद्धा निवडला आहे. मात्र हा पर्याय आता फार काळ विचारात ठेवता येणार नाही. थोडक्यात गणपतीच्या सजावटीसाठी आता नवा पर्याय शोधावाच लागणार कारण, राज्यात कृत्रिम, प्लास्टीक फुलांवर बंदी घालण्यात येणार असल्याची घोषणा खुद्द फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी विधानसभेत केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय राज्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी प्लास्टीक- कृत्रिम फुलावर बंदी घालण्याची घोषणा करण्यात आली. महेश शिंदे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे राज्यात कृत्रिम आणि प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. प्लास्टिक फुलांच्या अतिरिक्त वापरामुळे सर्व प्रकारच्या खऱ्या फुलांची बाजारपेठ अडचणीत आली असून फूल उत्पादक शेतकऱ्आंना याचा मोठा आर्थिक फटका बसत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. यावेळी शासनापुढं काही उदाहरणं ठेवत अलिकडच्या काळात बहुतांश कार्यक्रम, समारंभ, मंगल कार्यालय,मंदीरं, उत्सवात प्लास्टीकच्या कृत्रिम बनावटीच्या फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. अशा फुलांच्या वापरामुळं शेती करणारे जवळपास 20 ते 25 टक्के शेतकरी अडचणीत आले असून त्यांचा सुमारे अडीच ते तीन हजार कोटींचा व्यवसाय संकटात आला आहे. ज्यामुळं शेतकऱ्याच्या पोटावर पाय आणणारी ही कृत्रिम फुलांची विक्री बंद करण्याची मागणी जोर धरताना दिसली. #🤩17 जुलै अपडेट्स🆕 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🌺🙏 गणेशोत्सव लवकरच 🙏🌺 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #ब्रेकिंग न्युज
8 likes
19 shares