♀️स्त्रीलिंग पुल्लिंग♂️
नाते जन्मांतरीचे. ... (उर्वरित भाग) त्याला त्याच्या वागण्याचा खुप पश्चाताप होऊ लागला. त्याने वैदेहीला विचारले आता काय करणार कुठे जाणार? त्यावर वैदेही म्हणाली मलाच ठाऊक नाही आई बाबा तर मला उभेही करणार नाहीत. सारंगचाही माझ्याकडे पत्ता नाही. तो वैदेहीला म्हणाला मला माफ कर मी तुझा अपराधी आहे सांग मला आता मी तुझी कशा प्रकारे मदत करू? वैदेही म्हणाली पैसे देण्यापेक्षा मला कुठे काम लावलत तर बरे होईल खुप उपकार होतील तुमचे. विजय म्हणाला उपकार नाही गं तुला मदत करणेच माझे प्रायश्चीत असेल आता. माझे स्वतःचे कॉफी शॉप आहे इतर कामांमुळे मला तिकडे लक्ष नाही देता येत तुच संभाळ इथून पुढे ते. आणि रहाण्याचे म्हणशील तर इथे माझा स्वतःचा फ्लॅट आहे मी तिथे एकटाच रहातो तिथे रहा तू माझ्यासोबत. विजयला झालेला पश्चाताप तिला त्याच्या डोळयांत स्पष्ट दिसत होता. शिवाय तिच्याकडे त्याचा आधार घेण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता ती काहीही न बोलता त्याच्या सोबत त्याच्या घरी जायला तयार झाले. जाता जाता विजय तिला काही कपडे घेऊण दिले. दुपारी तिला घरी सोडून तो त्याच्या कामासाठी निघूण गेला. विजयचे घर खुप सुंदर होते पण विजय एकटाच रहात असल्याने अस्थाव्यस्थ तर होतेच आणि खुप कचराही झाला होता घरात. संध्याकाळी विजय घरी आला तेव्हा तो पहातच राहीला घराकडे. त्याने पुन्हा खात्री करून घेतली की आपण आपल्याच घरात आलो आहे का. घरात जराही पसारा दिसत नव्हता प्रत्येक वस्तू व्यवस्थीत जिथल्या तिथे ठेवली होती. खुप प्रसन्न वाटत होते त्याला किचन मधून छान आल्याच्या चहाचा वास येत होता. तितक्यात देवघरातून घंटीचा आवाज आला अगरबत्ती हातात घेऊन काहीतरी पुटपूटत वैदेही देवघरातून अगरबत्ती घरभर फिरवत बाहेर आली. अचानक विजयला हॉल मधे पाहून दचकली आणि त्याला म्हणाली बापरे घाबरले ना मी, कधी आलात तुम्ही. विजय म्हणाला केव्हाच आलो आहे सॉरी सवयी प्रमाणे माझ्याकडच्या चावीने दरवाजा उघडून आत आलो. वैदेही म्हणाली अच्छा ठिक आहे फ्रेश होऊन या मी चहा आणते. वैदेही दोघांनाही चहा घेऊन आली विजय चहा पितापिताच संपूर्ण घराकडे पहात होता. वैदेही म्हणाली,काय पहात आहात एवढे? विजय म्हणाला खुप छान ठेवले आहेस घर तू थँक्स आज पहील्यांदा हे घर घरासारखे दिसत आहे. वैदेही म्हणाली एवढ कुठे काय केले आहे फक्त घरातील वस्तू जिथल्या तिथे ठेवल्या आहेत. खरतर तुमचे घरच खुप छान आहे. पुन्हा विजय म्हणाला बर ते जाऊदे तुझ्याकडे सारंगचा फोटो आहे का? वैदेही म्हणाली हो आहे पण माझ्या सामानामधे आहे घरातून काढल्यावर भाडे न दिल्यामुऴे घरमालकांनी माझे सर्व सामान त्यांच्याकडेच ठेऊन घेतले भाडे दिल्यावरच घेऊन जा बोलले. वैदेहीने विचारले कशाला हवा आहे तुम्हाला फोटो विजय म्हणाला काही नाही असेच उद्याच जाऊन आपण तुझे सामान घेऊन येऊ. दूस-या दिवशी ते दोघे जाऊन सामान घेऊन आले. त्याच दिवशी वैदेही कॉफी शॉपलाही गेली पहील्याच दिवशी तिने सर्व काम समजून घेतले घर आणि कॉफीशॉपही छान संभाळू लागली होती ती. पुढे विजय आणि वैदेही मधे खुप छान मैत्री झाली. पण वैदेहीला नेहमी प्रश्न पडायचा विजयला कोणीच कसे नाही तो एकटाच का रहातो त्याचे नातेवाईक कुठे आहेत? न राहून एक दिवस तिने विजयचा मुड पाहून त्याला त्याच्याबद्दल विचारले. विजय तिला म्हणाला सांगणे गरजेचेच आहे का? वैदेही म्हणाली हो प्लिज आज सांगा पुन्हा कधीही नाही विचारणार. तेव्हा विजय म्हणाला कॉलेजमधे असताना माझे एका मुलीवर फार प्रेम होते. तिची परिस्थीती खुप नाजूक होती शिवाय आमची जातही वेगळी त्यामुळे आमच्या घरच्यांनी आमच्या लग्नाला विरोध केला. शेवटी लग्न होत नसल्याने तिने आत्महत्या केली. ती गेल्यापासून मी खुप दारू प्यायला लागलो. माझ्या मनस्थीतीपेक्षा माझ्या घरच्यांना त्यांची गावातील प्रतीष्ठा जास्त महत्वाची वाटत होती त्यामुळे त्यांनी मला प्रोपर्टीतील माझा हिस्सा देऊन घरातून हाकलून दिले. त्यानंतर मी इकडे येऊन एकटा राहू लागलो. खर सांगू तुझ्यात आणि मी जिच्यावर प्रेम करत होतो तिच्यात मला काहीच फरक वाटत नाही तिने परीस्थीती पुढे हार मानूण जीव दिला आणि तू परीस्थीतीमुळेच जिवा इतके मौल्यवान तुझे चारीत्र्य दिलेस. माझ्यासाठी तुमच्या दोघींचेही पावित्र्य एकसारखेच आहे. तिच्यासाठी तेव्हा मला काहीच करता आले नाही पण तुझ्यासाठी जिवात जिव असे पर्यंत करणार विजयचे बोलणे ऐकून वैदेही रडू लागली तिला रडताना पाहून विजय ताडकण घरातून निघूण गेला. वैदेहीला कल्पना होती तो कुठे गेला असेल याची. पिल्यानंतर विजयचा स्वतःवर ताबा रहात नाही आणि त्याची तिच्या मनातील किंमतही तिला कमी होऊ द्यायची नव्हती म्हणून ती तो येण्याआधीच झोपण्याचे नाटक करू लागली. काही वेळाने विजय दरवाजा खोलून आत आला. धडपडत तो वैदेहीच्या खोलीकडे तिला आवाज देत देत गेला. (क्रमशः #♀️स्त्रीलिंग पुल्लिंग♂️
#

♀️स्त्रीलिंग पुल्लिंग♂️

♀️स्त्रीलिंग पुल्लिंग♂️ - मुलांनो मुलीला प्रेमामध्ये अध्र्यावर कधीच सोडू नका . . . कारण तिच्याजवळ खुप पर्याय असतांनाही तिनं तुम्हाला निवडलेलं असतं . - ShareChat
62.3k जणांनी पाहिले
6 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post