ध्येय
12 Posts • 31K views
Dipak Gaikwad
891 views 1 months ago
एक मुलगा प्रिन्सिपलकडे गेला आणि म्हणाला, “मॅडम, आता मी शाळेत येणार नाही.”प्रिन्सिपलने विचारले “पण का?” मुलगा म्हणाला ” मी एका शिक्षकाला दुसऱ्या शिक्षकांबद्दल वाईट बोलताना पाहिले ; आपल्याकडे जे शिक्षक आहेत ते चांगल शिकवत नाहीत ; कर्मचारी चांगले नाहीत ; विद्यार्थी त्यांच्या सहकारी विद्यार्थ्यांना त्रास देतात आणि इथे अनेक चुकीच्या गोष्टी होतात …. प्रिन्सिपल ने उत्तर दिले “ओके. पण आपण शाळा सोडण्यापूर्वी, माझ्यासाठी कृपा करून मी सांगतो ते काम कर. एका काचेच्या प्यालात पाणी घ्यायचं आणि एकही थेंब न सांडता शाळेभोवती तीन वेळा चक्कर मार व नंतर, तू तुझी इच्छा असल्यास शाळा सोड ” मुलाने विचार केला: हे खूप सोपे काम आहे! प्राचार्यांनी सांगितले म्हणून त्याने शाळेला तीन वेळा चक्कर मारली . जेव्हा त्याचे तीन राऊंड संपले तेव्हा त्याने प्रिन्सिपलला सांगितले प्रिन्सिपलने विचारले “जेव्हा तुम्ही शाळेला राऊंड मारत होता, तेव्हा तुम्ही एका शिक्षकाने दुसर्या शिक्षकांबद्दल वाईट बोलत असताना पाहिले का? ” त्या तरुणाने उत्तर दिले, “नाही.” ” सिनिअर विद्यार्थी ज्युनिअर विद्यार्थ्यांशी चुकीच्या पद्धतीने वागताना पाहिले का?” “नाही” “शिक्षक शिकवताना पाहिले का?” “नाही” तेव्हा प्रिंसिपल त्याला म्हणाले की “तुझे लक्ष फक्त पाण्याच्या ग्लासावर होते, त्यामुळे दुसऱ्यांच्या चुकांकडे लक्ष न देता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यामुळे तुझ्या ग्लासातील एकही थेंब न सांडता तू तुझं ध्येय पूर्ण करु शकलास . आपल्या आयुष्याचेही असेच आहे .जेव्हा आपण आपले लक्ष्य / ध्येय (Target ) सुनिश्चित करतो व ते पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला इतरांच्या चुकांकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसतो ” आपन काय शिकलो ध्येयावर लक्ष इतर गोष्टींवर नव्हे तर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा व त्यालाच प्राधान्य द्या … पोस्ट आवडली तर लाईक शेर कमेंट नक्की करा ❤️👍🙏 #fecbookpost #post #wedding #ध्येय #goal
13 likes
1 comment 4 shares