वडाप
1 Post • 105 views
#भटकंती (ट्रॅव्हल्स) #माझा स्टेटस #जीपमधून प्रवास #वडाप #आठवणी महिन्द्रा ची Thar येण्या अगोदर म्हणजे साधारण 95-96 दरम्यान रस्त्यावर केवळ याच गाडीचे राज्य होते. सीट बेल्ट सोडा ! साधं दार सुद्धा नव्हतं या गाडीला . लेदरचे पडदे असायचे पण ते सुद्धा ड्रायवर गुंडाळून ठेवायचा . सरकारने काळी - पिवळी टॅक्सीचा नियम करण्यापूर्वी खेडयापाडयात प्रवासाचं मुख्य साधन केवळ "कमांडर" होती. दणकट बॉडी, जवळपास नो सस्पेंशन कितीही माणसं भरा ! आत भरा,दारात लटकवा,टपावर बसवा ! ही गाडी चलतच राहायची. प्रवासी वाहतुक करणारे ड्रायवर तर जवळजवळ एका पायावर म्हणजे ? अर्धा आत अर्धा बाहेर लटकलेला गाडी चालवायचा . या गाडीने खुप प्रवास केलाय . त्यातले त्यात या गाडीच्या ड्रायवरकडचे कॅसटमधले गाणे म्हणजे ? तर काय विचारूच नका ! जगभराचा सगळा "दर्द" केवळ यांच्याच कडे असायचा . 2008 पासुन या गाडीची मागणी कमी - कमी होत गेली अन शेवटी हिचं रूपांतर आजच्या Thar मध्ये झालं . तर सांगा आता "कोणाकोणाला आठवते एवरग्रीन कमांडर ...?
15 likes
15 shares