Lokesh
570 views • 2 months ago
मैत्री असावी सोज्वळ
नकोच त्यात स्वार्थी विचार !
नाते असावे निखळ
नकोत त्यात व्यवहार..
व्हावी मदत एकमेकांना
एकमेकांच्या सुख दुखात !
असेच असावे नाते
सहकार्य हवे त्यात..
एकमेकांच्या सहकार्याने
वाटेल हक्काचा आधार !
पाठी उभे असलेल्यांचा
वाटू नये कधी भार..
भले व्हावे ही अपेक्षा
असावी निखळ मैत्रीत !
तोच मित्र..तिच मैत्री
निरंतर रहावी हयातीत... #happy friendship day 🥰🥰
8 likes
12 shares