वर्षअखेर होताना
अनेक आठवणी जाग्या होऊन गेल्या!!
गेलेल्या महिन्याचा सरता चित्रपट
डोळ्यासमोर जागा होऊन गेल्या!!
किती सुख किती दुःख
भोगल्या आणि काही राहुन गेल्या!!
काही सांगायचे, काही बोलायचे
शब्द साऱ्या गोठून गेल्या!!
काही परके, काही आपले
या जगातून निघून गेल्या!!
कोण आपले, कोण परके
हे माञ समजावून गेल्या!!
काही बरोबर, काही चुक
सर्वच गोष्टी राहुन गेल्या!!
मी पण अवघे माझे
माझ्यात सामावून गेल्या!!
येणाऱ्या नवीन वर्षाची सुखद
पहाट स्वप्नांत येऊन गेल्या!!
सर्व आता चांगले मंगल होईल
ही आशा मजला देऊन गेल्या!! #kavita charoli